( मी सायली कुलकर्णी . माझ्या आधीच्या कथेसाठी तुम्ह दिलेल्या प्रतिसादा बद्दल खूप खूप आभार . माझी पुढील कथा सादर करत आहे . काही चुकले असेल तर मोठ्या मनाने माफ करा .काही सुधारणा असतील तर अवश्य सुचवा .ह्या कथेतील सर्व पात्रे , घटना व स्थळे काल्पनिक आहेत .ह्या गोष्टीतून कोणतीही अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही . कथेचे 4 पार्ट आहेत .चित्र - सौ .गुगल )
भसम्या ( पार्ट 1 )
गीता आणि अनिल नव्यानेच त्या गावात आले . अनिल private बँकेत कामाला होता . त्या गावात त्याची बदली झाली होती . गावापासून जरा लांब असलेल्या त्या कौलारु घरात त्यानं नव्याने संसार थाटला होता . बँकेने तात्पुरत ते घर त्यांना राहायला दिल होत ते घर बँकेत गहाण पडून होत . गीता ला अनिल ची नोकरी अजिबात आवडत न्हवती . दर 3 वर्षांनी नवीन गाव , नवीन शेजारी , नवीन सुरुवात तीला कंटाळा आला होता त्या सर्वांचा . आणि ह्या आधी त्यांची जिथे जिथे बदली झाली होती तिथे तिथे कायम काही तरी प्रॉब्लेम यायचे . शेजारी भांडखोर होते तर कधी कधी शेजारी खूप पक्के असायचे . त्यात अनिल आणि गीता ला मुलं न्हवत . लग्न होऊन 6 वर्ष झाली होती पण अजुन गीताला मुल न्हवत त्यामुळे तिची चिडचिड होत असे . त्यात अनिल दिवसभर कामात असे पण गीता ला एकटीला घर खायला उठत असे .
पण हे घर तस बर होत कारण एक तर गावाच्या बाहेर होत , शेजार न्हवता , आणि घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर एक मस्त तळे होते . तळ्यात खूप सारी लाल , पांढरी , पिवळी , जांभळी कमळे होती . तळ्याच्या साईड ला मोठी झाडें होती . तळ्याला छान कठडा पण होता . त्यावर जाळी घातली होती आणि जाळीला कुलूप लावलं होत .
ते तळे गीताला तिच्या घरातून पण दिसत असे . हल्ली गीता तीच आवरलं की त्या तळ्या कडेच जात असे . तिथल्या झाडावर तिने एक झोपाळा बांधला होता . तीच आवडीचे पुस्तकं घेऊन ती तिथं जात असे . तिकडच्या झाडावर खूप पक्षी होते , त्यांची घरटि होती . तीला पुस्तकं वाचून कंटाळा आला की ती त्या पक्ष्याच्या मध्ये गुंग होत असे . ती त्यांच्या साठी घरातून धान्य घेऊन जात असे . आता पक्षी पण तीला घाबरत नसे . एकूण एक गीता ह्या नवीन गावात रूळत चालली होती . पक्ष्यान मुळे , त्या तळ्या मूळे तिचा वेळ जात होता आणि ती खुश होती . अनिल सकाळी कामावर गेला की गीता तीच आवरून तळ्या कडे जात असे . हल्ली हल्ली तर ती जेवण पण तिकडेच घेऊन जात होती . उन्ह उतरली की घरी परत येऊन संध्याकाळच्या तयारीला लागत असे .
एके दिवशी कुठून तरी भटकत एक कुत्र्याच पिल्लू तिकडे आलं . पिल्लाला खायला नीट मिळत नसल्याने अगदी मरतुकडे झालं होत . गीता ने त्याला खायला घातलं . त्याला घेऊन ती घरी आली . त्याला अंघोळ घातली . आता ते पिल्लू पण तिच्या घरच नवीन सदस्य झालं होत . लाडाने तिने त्या पिल्लाच नाव जीमी ठेवल . अनिल ला कुत्री आवडत न्हवती . पण गीता च्या ख़ुशी साठी तो राजी झाला . आणि ते दोघे असं गावाच्या बाहेर राहत होते , तेवढीच रात्री राखण होत असे . आणि व्यवस्थित खायला मिळत असल्यामुळे जीमी ची तब्येत पण छान झाली होती .अनिल गेला की गीता तीच आवरून तळ्याकडे जात असे . जीमी पण तिच्या मागे जात . गीता निवांत झाडाखाली पुस्तकं वाचत बसे . जीमी निवांत हिंडून येई . दुपारी जेवणाच्या वेळी परत येई . गीता आणि जीमी झाडाच्या सावलीत जेवण करून घेत . कंटाळा आला की गीता आणि जीमी परत घराकडे निघून येत .
गीताला देवपूजे ची खूप आवड होती . देवा साठी तिने घराबाहेर भरपूर फुलझाडें , फळझाडें लावली होती . म्हणजे ती झाडें आधीपासूनच लावली होती पण त्यांची निगा राखली गेली नसल्यामुळे ती झाडें वाळली होती . गुलाब , मोगरा , जाई- जुई चा वेल , शेवंती , चाफा , जास्वाद , आंबा ,चिकू , पेरू आणि बरीच झाडें होती . गीता ने त्यांची व्यवस्थित निगा राखली . झाडें छान बहरली होती . झाडावर खारुताईची रोज पळापळ चाललेली असे . छोट्या छोट्या पक्ष्याची घरटी होती .तिने लावलेला जास्वाद तर खूप उंच झाला होता . देवपूजेला गीता एवढी फुल वापरत होती की त्या फुला मूळे देव पण दिसत नसे . तीला कमळ पण खूप आवडत असे . तीला तिच्या घराबाहेर एका खड्ड्यात कमळे लावायची होती . एकूण एक काय गीता आणि अनिल सुखी होते . ह्या गावात बदली झाल्या मुळे ख़ुश होते . अनिल कामावर गेला की गीता तिची देवपूजा आवरून घेत . बाहेर झाडांना पाणी घालत असे . झाडावरच्या पक्ष्यासाठी धान्य घालत असे . मग घरातील बाकीची कामे आवारत असे . आणि तो पर्यंत जीमी महाराज धान्य खाण्यासाठी आलेल्या पक्ष्याना बघून खारुताई ला बघून भुंकू लागत असे . जरा काही वेगळं दिसल की भुंकायच ही जीमी सवय गीताच्या लक्षात आली होती .
" अनिल फुलाचा बहर खूप कमी आला आहे रे आणि झाडावर कसला तरी रोग पडला आहे . पांढरी पांढरी कीड पडली आहे . काल तरी देवपूजे साठी खूप कमी फुल निघाली . " गीता रात्रीच्या स्वयंपाकांची तयारी करत बोलली .
" बर झालं देवाला श्वास तरी घेता येत असेल . एवढी फुल घालतेस की देव घुसमटत असतील आत म्हणून त्यांनीच फुलाचा बहर कमी केला असेल . " अनिल तीला चिडवत बोलला .
गीता न त्याच्या कडे रागानं पहिले तसा तो गप्प झाला .
" बर राणी सरकार तुमच्या फुलांन साठी मी उद्याच औषध आणतो " अनिल म्हणाला . तसें म्हणताच गीता ने त्याला गोड स्माईल दिली .
दुसऱ्या दिवशी अनिल आवरून बाहेर पडला . तशी गीता पण तिचे घरकाम आवरू लागली . देवाच्या पूजेसाठी फुले तोडायला जाताच तिच्या लक्षात आलं की झाडावर जास्त फुल नाहीत . तिचा हिरेमोड झाला . पण मग तीला त्या कमळाच्या तलावाची आठवण झाली . ती तलावाच्या दिशेने निघाली . पाठीमागे जीमी होताच . तलावा जवळ आली पण तलावाच्या काठड्या वरून जाळी घातली होती. तिथेच बाजूला असलेला मोठा दगड तिने उचलला . कुलपा वर घाव घालणार तोच तीच लक्ष कुलपाला बांधलेल्या त्या लाल दोऱ्या कडे गेले , तीला जरा विचित्र वाटल पण मग तिने त्या कडे दुर्लक्ष केल .परत तिने त्या कुलपा वर जोरात घाव घातला . 2 मिनिटात कुलूप तुटून खाली पडले . तिने त्या जाळीतुन कमळ घेण्यासाठी खाली घातला , तिचा स्पर्श जसा पाण्याला झाला , तस तलावातील पाणी शहारले ...... पाण्याच्या आत तळाशी काहीतरी जाग झाले .... त्याला रोखण्यासाठी जे बंधन घातलं होत ते गीता ने अनावधानाने तोडलं होत जसं परत कुणीतरी तरी खूप दिवसांनी स्वातंत्र्य होणार होते .... पोटात उठलेला आगीचा डोंब आता परत शांत होणार होता . परत तो मोकळा होणार होता .... आता फक्त त्याला त्या तलावातुन मोकळ होण्यासाठी एक थेंब रक्ताची गरज होती .... मग ते कुणाचेही असून चालणार न्हवत.... ज्यानं त्याला मोकळ केल त्याचंच रक्त त्याला मोकळ करू शकणार होत .... गीता देवपूजे साठी कमळे तोडत होती ... पण त्या कामळाच्या पाठीमागून दोन डोळे तिच्या वर खिळले होते .... हळूहळू दोन डोळे तिच्या हातांच्या दिशेने सरकु लागले होते .... आता ते गीता वर झडप घालणार तोच जीमी जोरजोरात भुंकू लागला ... त्याच्या आवाजाने गीताने कमळे तोडायची थांबवली ... तशी तिने बरीच कमळे तोडली होती .... ती उठून घराकडे जाऊ लागली .... जीमी अजुन पण तलावाच्या कडे बघून जोरजोरात भुंकत होता .... जशी काही त्याला अशुभाची चाहूल लागली होती .... म्हणतात ना प्राण्यांना काहीतरी वाईट होणार असेल तर त्याचे संकेत आधीच मिळतात . पण आपणच ते समजू शकत नाही . नेहमीप्रमाणे जीमी काहीतरी किरकोळ कारण वरून भुंकत असेल असा समज गीता ने केला . ती घरी गेली . तिने देवपुजा केली . पण नेहमी देवपूजा केल्यावर देव जसे प्रसन्न दिसायचे ना तसें दिसत न्हवते . कमळाची सर्व फुले घालून पण देवघरात पावित्र्य न्हवत . पण गीता च्या ते लक्षातच आले नाही .
क्रमश ......