झिनी
भाग ::-- पाचवा
मांजरांच्या पंज्यात उंदीर गावणारच आता अशी गत असतांनाच अचानक उंदीर बिळात घुसल्यानं मांजर बिळाजवळून आल्या पावलांनी परत फिरावी तशीच झिनी काल रात्री चंदरच्या मळ्यात परतली होती.पण विजेचा प्रचंड आगिठा घेऊनच.कारण उंदराला बिळातून बाहेर काढण्यासाठी तिला आता आपल्या चंदरची गरज होती व उंदराचा खात्मा केल्यावरही तिला चंदर कायमचाच हवा होता.
पांडू पाठोपाठ दिना शिंदेही गेला हे कळताच लेकीच्या गावाला जाऊन बसलेल्या धावजीबास चैन पडेना.कारण आज आपण येथून हललो नाहीत तर डाॅ.वसंताही हमखास शिकार होईलच व आपण तात्यासाहेब सामंताच्या घरचं मिठ खाल्लंय.त्या मिठाला जागणं हे आपलं कर्तव्यच आहे , शिवाय चंदरलाही धोका आहेच.म्हणून ही पळपुटी वृत्ती आपणास सोडावीच लागेल.असा विचार करत दुपारीच धावजीबा दिना शिंदेच्या प्रेतयात्रेला धावतपळत तुराटखेड्यास आला व तेथे आलेल्या तात्यासाहेबांना बाजुला घेत स्मशानातच 'चंदरनं बांध काढतांना झिनीच्या कवठीचं बुजगावणं कसं उभारलं व त्यानंतर सलग दोन दिवसात झिनीनं पांडू राऊताला व दिना शिंदेला कसं गिळलं व आज आपल्या वसंताच्या जिवीतास कसा धोका आहे हे समजावलं.सत्तरीकडं झुकलेल्या तात्यासाहेबांना आपल्या इमानी नोकरांच्या खुलाशानं परिस्थीतीचं गांभिर्य कळताच त्यांनी प्रेतयात्रा आटोपून परस्पर जीपनं मांत्रिक बाबास गाठलं व चार वाजेपर्यंत त्यांना तुराटखेड्यास आणलं.मांत्रीक बाबानं लगोलग सामंताच्या मळ्याचं जो आता चंदरला विकला होता निरीक्षण केलं.पण झिनीच्या प्रभावानं धावजीबा व मांत्रिक बाबास मळ्यात जाणं मुश्कील झालं.बाबास कळून चुकलं इथं की पूर्ण तयारीशिवाय मळ्यात पाय ठेवून बुजगावण्यास हात लावणं जिवावर बेतणारं ठरेल.म्हणुन त्यांनी परतत तात्पुरतं दोन तीन दिवस वसंताला सुरक्षित ठेवत नंतर झिनीचा बंदोबस्त करायचं ठरवलं. ते आल्या पावली गावात तात्यासाहेबांच्या वाड्यावर परतले.सद्या वाड्यात नव्या बंगल्यात फक्त वसंताचा दवाखानाच होता.तात्याचं सारं कुटुंब तालुक्यालाच राहत होते.फक्त वसंता तेव्हढा येथं राहत तालुक्याला ये-जा करी.तो मात्र बऱ्याचदा दोन - तीन दिवस येथेच मुक्काम करी.वाड्याचं स्वरूप तसंच ठेवून पुढच्या भागात नविन बंगला बनवला होता पण बांधकाम झालं नी झिनी प्रकरण घडलं म्हणून तात्यांनी आपलं बिऱ्हाड तालुक्याला हलवलं.पण वसंता आपला डाॅक्टरी पेशा करण्यासाठी व दिना, पांडूची सोबत,पिणं खाणं व इतर गोरखधंदे म्हणुन गावातलं राहतं घर सोडून वाड्यातल्या(खळ्यातल्या)या एकांत जागी नविन बांधलेल्या बंगल्यात राहत होता.
बाबांनी दोन तीन दिवस वसंताला येथेच सुरक्षित ठेवण्याचं ठरवलं.कारण तालुक्याला नेलं तर कुटुंबातील इतरांनाही धोका आहे.त्यांनी एकाला पाठवत काही पुजेचं सामान लगेच मागवलं. धारेचा भला मोठा लिंबू,काळी बाहुली,हिरव्या मिरच्या अशा बऱ्याचशा वस्तुनं विधी करत वाड्यास चहुबाजुनं फिरुन त्या वस्तू दूर चौ रस्त्यावर टाकावयास लावल्या. व वसंताला कडक शब्दात बजावलं.
"वसंता!, तू डाॅक्टर असल्यानं माझ्या म्हणण्यावर तुझा कदाचित भरवसा बसणार नाही .पण तरी मी परत येईपर्यंत तू रात्री या वाड्याबाहेर मुळीच पाय ठेवायचा नाही.कुणी कितीही बोलावलं वा अर्जंट पेशंट आला तरी.भले वाड्यातच त्याला आणावयास लावून ट्रिटमेंट दे.शिवाय रात्रीचं कुण्या परक्या व्यक्तीस वाड्यात प्रवेश देऊ नको.ओळखीचा असला तरच वाड्यात घे",बाबानं वसंताला सारं समजावून सांगितले.
वसंतानंही पुजा व हे असलं बाबाचं सांगणं हे सारं नविन असल्यानं सारं त्यानं हसण्यावारी नेलं.पण तात्यासाहेब जवळ असल्यानं त्यानं फक्त हो म्हणत त्याकडं दुर्लक्ष केलं.
बाबा 'मी दोन दिवसात परत येतो'सांगत निघून गेले.तूर्तास धोका टळला म्हणून तात्यासाहेब ही निघून गेले.
त्या रात्री झिनी वाड्याजवळ आली पण तिला वाड्यात प्रवेश करताच येईना.उंदीर बिळाच्या तोडात दिसत होता पण तिचा नाईलाज होता.म्हणुन ती तशीच मळ्यात परत गेली.पण विजा, गारा, वादळ घेऊन तिनं दुसऱ्या रात्री बिळातनं उंदीर काढण्यासाठी चंदरला साथीला घेतलं.
सकाळी नऊ वाजताच धावत पळत रघू व सिद्दपा यांनी वसंताला गाठलं.दिना शिंदेचं कलेवर पडलं होतं त्या ठिकाणी मातीत आंब्याखाली रघूच्या पोलीशी नजरेला रेघोट्या दिसल्या होत्या.त्यानं त्या सिद्दपाला बारकाईनं न्याहाळायला लावल्या होत्या.माशांच्या चावांनी व नंतर अस्वलाच्या हल्यानं दिना शिंदे पायाच्या टाचा घासुन मरतांना टाचांनीच काही तरी लिहून गेला होता.ते रघुनं बारकाईनं पाहीलं असता 'झिनी' ही अक्षरं दिसताच शिंदेच्या प्रेतयात्रे नंतर तो व सिद्दप्पा अनकाई टेकाडावर गेले.पण त्यांना त्या ठिकाणी ऊसतोडणी मजुराचा तांडा पडलेला दिसलाच नाही.त्यांनी मग काल रात्री गस्तीच्या वेळी दिसलेली बाई कोण? याचा शोध घेण्याचं ठरवलं. म्हणुन ते आज वसंता जवळ आले होते.
"डाॅक्टरसाहेब काल संध्याकाळी कोणी पेशंट आले होते का आपणाकडं?"
"पेशंट म्हणजे ?दररोज किती पेशंट येतात ,कुणाचं नाव सांगू?"
"तसं नाही डाॅक्टरसाहेब.पण पोटुशी बाई!कुणीतरी ऊसतोडणी मजूर?"
"पोटुशी? ऊसतोडणी मजूर? नाही.
पण का?" वसंतानं विचारलं
"चांगलं आठवा.संध्याकाळपासुन तर रात्री दहा अकरा वाजेपर्यंत?"
वसंतानं मेंदूला ताण देत काल या वेळेत कोण कोण आलं हे आठवून पाहिलं नी ठाम नकार दिला.
रघू व सिद्दप्पा आता गोंधळले.जर यांच्याकडे आली नव्हती व टेकाडावर नव्हती तर मग ती बाई कोण?
शिंदे साहेबांनी तक्ष मरतांना 'झिनी' लिहीलंय.मग झिनी असावी का?
पण रेघोट्या पायानं सहजही उमटू शकतात.कायद्यानं दोन दिवसातील घटनांना झिनी जबाबदार हे आपण ठोस सांगू शकत नाही.
"डाॅक्टर साहेब !सावध असा!पांडुचं शिजलेलं पुलीत चोळामोळा झालेलं कलेवर व अस्वलानं फाडलेलं शिंदे साहेबाचं कलेवरपाहता वरपांगी या घटना अपघात वाटत असल्या तरी यात कुठं तरी झिनी प्रकरणाचा वास येतोय.म्हणुन आपण सावधानताबाळगा"रघू व सिद्दप्पा जगतापांनी वसंतास सावध करत निघून गेले.
आता वसंता कालच्या तात्यांनी आणलेल्या बाबाच्या व रघूव सिद्दप्पा यांच्या म्हणण्यावर हसावं की रडावं या संभ्रवावस्थेत पडला.त्यानं कपाट उघडत बाटली काढली व नीट मारली.मग दुसरी तिसरी...
तो झोपला तर सायंकाळी सातलाच उठला.सायंकाळी बाहेर बरेच पेशंट उभे होते.त्यांना कसंतरी तसाच तपासत औषधोपचार करू लागला.त्यापैंकीच पेशंटसोबत आलेल्या एकाला गावातनं जेवणाची व इतर सोय करायला लावली.तो बाबाच्या व रघूच्या सांगण्याचा मनात विचार करत तालुक्याला परतलाच नाही.पेशंट कमीहोताच आलेल्या जेवणाचा डबा झाकून ठेवत प्यायला बसला.पिता पिता त्याला दहा वाजले.पुढचा व मागच्या वाड्याचा दरवाजा लावून जेवण करून झोपावं असा विचार करत तो दरवाजा लावू लागला.पुढचा लावुनतोबंगल्यातून मागच्या बाजून वाड्यात उतरला.वाड.याच्या मागच्या बाजूला येताच 'कृष्णा' घोडा जोरजोरात खिंकाळू लागला.कावऱ्या बावऱ्या नजरेनं पाहत पुढच्या पायानं उभा राहत दोर खेचू लागला.जागच्या जागी थयथयाट करू लागला.वसंतानं खळ्याचं मागचं झापं बंद असल्याची खात्री केली.तोच खळ्यातील जुन्या लिंबाच्या झाडावरून पोपटाचा थवा मिठू मिठू करत उंच झेपावला नी त्याच झाडाच्या ढोलीतलं दिवांध रडवेल्या व भयाणकारी आवाजात घुत्कारू लागलं .वसंताला हा प्रकार अजब वाटला.तो वाड्याकडं परतू लागताच उंच उडालेला पोपटाचा थवा खाली झेपावत त्याच्या डोक्यावरून बंगल्याच्या पुढच्या दरवाज्याकडं धाब्यावरनं उडत निघाला.वाड्याचं लोखंडी गेट बंद करत तो बंगल्यात परतत असतांना कृष्णाचं जीव तोडून खिंकाळणं व थयथय करणं सुरुच होतं.एकवेळ वसंतानं त्याला शांत करत मागं पाहतांना त्याची नजर निंबाच्या झाडाकडं गेली.त्याला चमकणारे दोन डोळे दिसले.धुंदीत पक्षी असावा असं समजत तो बंगल्यात परतला.तोच बंगल्याचा पुढचा दरवाजा कोणी तरी जोरजोरात ठोठावत असल्याचा त.याला आ्आज आला.
"आलो आलो"म्हणत तो तिकडं जाऊ लागताच धुंदीत ही त्याला मांत्रीक बाबांचे 'अनोळखी माणसास आत घेऊ नको व तू ही बाहेर पाय ठेवू नकोस'हे बोल आठवले.तरी कोण आहे हे तर पाहू म्हणून तो दरवाज्याच.या फटीतून पाहू लागला.
बाहेर चंदर दिसताच त्याला हायसं वाटलं व त्यानं दार उघडत "चंदर काय काम काढलंस रे या वेळेला?नी तू सध्या मळ्यातचराहतोस का,घरी नाही जात का?"विचारलं.
"डाॅक्टर साहेब सध्या मळ्यातच कामंं भरपूर म्हणुन घरी जाणं कमी झालंय"चंदरनं आत येत सांगितलं.
"बरं काय काम काढलंय?नी मळ्यातनं पायीच आलास का?"
"डाॅक्टर साहेब गाडी मळ्यातच बंद पडलीयम्हणुन पायीच आलोय, नी..." चंदर बोलावं की बोलू नये या विचारात पडत इकडे तिकडे पाहू लागला.
वसंताच्या ध्यानात येताच कपाटातनं बाटली काढत ग्लासात ओतत त्यालाही देत "घाबरू नको,इथं माझ्याशिवाय दुसरं कोणीचं नाही म्हणुन काय काम आहे ते मनमोकळं सांग."चंदरला दारू सोबत धीरही दिला.
चंदरनं एक ग्लास मारत "डाॅक्टर साहेब एका अडचणीत सापडलोय,मला आपली मदत हवीय" आता चंदरनं बाटली उचलत ग्लास भरून डाॅक्टरला दिला.पण त्या सोबतच बोलतांना टेबलाजवळच पडलेल्या औषधीतून कुठली तरी नेमकी गोळी चपखल शोधत चलाखीनं ग्लासात टाकत त्यांना दिला.डाॅक्टरला दररोज सोबतीला असणारे पांडू व दिना आज नसल्यानं चंदरची सोबत मिळताच हायसं वाटून त्यानं तो ग्लास घटाघटा घशात ओतला व आणखी खाली ग्लास पुढं करत "चदर मित्रा तुझं काम सांग आधी?"विचारलं.
चंदरनं लगेच आणखी गोळी टाकत ग्लास देत "डाॅक्टरसाहेब ,काम जरा नाजूक आहे,मळ्यात बाई आहे,दिवस गेल्यात,तिची तब्येत बिघडलीय तिला चालायला त्रास होतोय गाडीपण बंद पडलीय म्हणुन त्या ही स्थितीत आणली तिला पण चालणं अवघड झाल्यानं रस्त्यावर बसवून तुम्हास घ्यायला आलोय"चंदरनं एका दमात सांगितलं.
आता डाॅक्टराची बोबडी वळायला लागली.चंदरनं खिशातनं चाखणं काढत टेबलावरची इच्छीत पावडर मिसळली.ते चाखणं खात ,चंदरनं भरून दिलेले ग्लास रिचवत वसंता अडखळत बोलू लागला.
"चंदर तू मळ्यात बाई आणली!घरच्यांना ,गाववाल्यांना माहित नाही.आणली तर आणली वरून....अरे रे रे .बरं जाऊ दे मला मळ्यात येता येणार नाही.माझं ही असंच जुनं एक प्रकरण डोकं वर काढतंय पण ते जाऊ दे तू मागं जा व माझी गाडी घेऊन जा पण त्या बाईला इथंच घेऊन ये,मग मी इलाज करतो."
एवढा डोस देऊन ही याची बुद्धी काम करतेय म्हणुन चंदरनं आणखी दिली.
तोच मागच्या वाड्यात घोड्यानं हैदोस मांडला.
"डाॅक्टरसाहेब हे घोडं का खिंकाळतंय एवढं?",चंदरनं मागं विचीत्र नजरेनं पाहत विचारलं.
"अरे चंदर कालपासुन त्याला कुणी फिरवलंच नाही व व्यवस्थीत चन्याची चंदी पण मिळाली नाही म्हणुन खिदळतंय वाटतं"
"मग गाडीपेक्षा मी त्यालाच नेतो.त्याचं फिरवणं पण होईल व तिकडणं मी बाईला पण आणतो" चंदरनं न दिसणाऱ्या घोड्याकडं पाहत विचारलं.
"चालेल मला काही हरकत नाही पण त्या तुझ्या बाईला नक्की आण"
वसंताला आता चालणं ही मुश्कील होत होतं तरी तो उठला. त्यानं मागच्या खळ्याच्या झापाला लावलेल्या कुलपाची किल्ली घेत चंदरसोबत वाड्याकडं आला.वाड्याच गेट उघडताच चंदर घोड्याकडं जाऊ लागला.तोच घोडा थयथयाट करत खिंकाळू लागला व लाथा झाडत उभा राहू लागला.चंदरनं हासत पाहून त्याच्या पाठीवर हात फिरवताच बिथरलेलं घोडं शांत होत त्याचा हात चाटू लागला.तो पावेतो वसंतानं लोखंडी गेट उघडत खळ्यातून झापाकडं जाऊ लागला.त्याही स्थितीत झापाच्या बाहेर आपल्याला जायचं नाही ही संवेदना त्याला आठवतच होती पण त्याचा चालतांना तोल मात्र जात होता.
खळ्यातल्या निंबावर पोपटांनी पुन्हा जोमानं उच्छाद सुरू केला व तोच दिवांध घुत्कारू लागलं.जवळच्या चिंचेवरची वटवाघळं या थैमानानं उठत उडत दूर निघाली.चांदाच्या उजेडात वसंता झापाच्या कुलूपाचं लिव्हर शोधत गरागरा फिरवू लागला .कुलूप काढुन त्यानं मेढीवर ठेवत झापं पायानं ढकलताच दुरुन 'टिटिव टिव! टिटिव टिव!' करत टिटवी जवळ येऊ लागली.
चंदरनं तितक्यात घोड्यास दोन तीन बाटल्या चढवल्या.खोगीर चढवत त्यानं रिकीबित पाय अडकवत मांड पक्की करून घोडा बाहेर काढला पूर्ण खळ्यास उलट दिशेनं चक्कर मारत वसंता झाप लावण्याच्या आधीचं परत खळ्यात घातला.
"काय रे चंदर परत का?"
"काही नाही बेवक्ताला घोडं बाहेर जायला अडलंय नी माघारी परतलं.त्यानं खळ्यात एक चक्कर मारली.चालता चालता त्याला दोर दिसताच त्यानं खाली झपटी मारत दोर उचलला व वसंता उभा तिथं घोडा आणला.घोडा आता हवेत पुढचे पाय उचलत उभा होऊ लागला, खिंकाळू लागला व गरगर फिरू लागला.चंदरनं संधी साधत घोड्याच्या पोटात पाय जोरात मारताच घोड्यानं मागच्या दोन्ही लाथा झाडत वसंताला झापाच्या बाहेर अलगद फेकला.
बस्स वसंताला काही कळून उठणार व आत जाणार तोच घोडा मागून लाथा झाडत त्याला खळ्यापासून दूर नेऊ लागला.आता खळ्यातील झाडावरील सर्व पक्ष्यांनी एकच राडा व गिल्ला उठवला.वसंताचे ओठ दातात घुसले व सारं थोबाड सुजायला लागलं.तोच त्याला घोड्यावर चंदरच्या कवेत झिनी बसलेली दिसली.
तो सुजू पाहत असलेल्या चेहऱ्यावर आश्चर्य व भिती आणत"झिनी तू?" उद्गारला.
"मेल्या कुत्र्या!तुला कालच फाडणार होते पण तुला त्या मांत्रिकानं माझ्यापुरता बंदिस्त केलेल्या बिळात बंदिस्त केला नी मला मग चंदरला आणावं लागलं!,आता तू सुटणार नाही.तोच चंदरनं आणलेल्या दोराचा फासा करत झिनीनं वसंताच्या पायात फेकला.चंदरनं घोडं उधळवलं.फासा पायात पक्का बसताच वसंता घसडून ओढला जाऊ लागला.मग चंदर व झिनीनं घोड्यास चौखूर पळवत काट्याकुट्यातून ,दगडधोड्यातून, बांधावरून तर कुठे ऊस तोडलेल्या धसकटाच्या शेतातुन फेकला. वसंताच्या कपड्यासोबतच कातडीच्याही चिंध्या झाल्या.मध्येच दारुत तर्रर्र घोडं मागच्या लाथा तोंडावर झाडतच होतं.चांद कलतीला लागेपर्यंत चंदर व झिनीनं घोडं मळा अनकाई टेकाड, नाला व पुन्हा मळ्यात फिरवला.विहीरीवरनं अल्लर उडी मारताच टरबुज भिंतीवर आपटलं जावं त्याप्रमाणं वसंता विहीरीच्या भिंतीवर आपटला.त्याची हाडं कडाकडा मोडली.आता वसंताची सुध हरपायला येऊ लागली.घोडं बरोबर झिनीला पुरलं होतं त्या सपाट केलेल्या बांधावरच्या जागी येऊन थांबताच झिनीनं दोर काढत त्याची तंगडी धरत घोड्याच्या रिकीबीत अडकवली.
"मेल्या कुत्र्या मला बेशुद्धीत भोगतांना तुला जी मजा आली त्याच्या दुप्पट मजा तुला बेशुद्धीत पळवतांना वाटली.आता जा खुशाल त्या पांड्या व दिन्या कुत्र्यांजवळ"संतापात बेफाम होत झिनीनं त्याच्या दोन्ही तंगड्यात वर्मावर लाथ घातली.बेशुद्धीतही कुत्रं केकाटावं तसं हीन आवाजात केकाटत वसंता श्वासासाठी काल्यावाल्या करू लागला. वसंताची सुध हरपण्यापुर्वी त्याला'माणसानं हसत हसत केलेली पापे रडत रडत फेडावी लागतात'हे वाक्य आठवू लागलं.
सकाळी पुर्वेला सूर्य आला तरी रिकीबीत अडकलेल्या वसंताला ओढत ओढत घोडं त्याच जागी फिरत होतं. आता वसंताच्या फुटलेल्या टरबुजागत लाल दिसणाऱ्या चेहऱ्याभोवती माशा घोंगावू लागल्या.
दहाच्या सुमारास पुजेच्या विधीचं सारं सामान घेऊन धावजीबा ,मांत्रीक व तात्या तुराटखेड्यास वाड्यात परतले.बंगल्याचं, वाड्याचं व खळ्याचं दारं सताड उघडी पाहताच तात्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले.मांत्रिकानं वसंता न दिसताच तोडलेलं रिंगण ओळखलं.त्यांनी साऱ्यांना वसंतास मळ्यातच शोधायला पाठवलं.
दुपारी वसंताच्या प्रेतासोबतच झोपडीत विज कोसळून मरून पडलेल्या चंदरलाही गावात आणण्यात आलं चार दिवसात चार घटना.दारूच्या नशेत घोड्यावर बसल्यानं घोडा उधळला व वसंता रिकीबीत पाय अडकून तर चंदर कालच्या रात्री पडलेल्या बेमोसमी पावसातील वीज कोसळल्याने मेल्याचं वरकरणी दिसत होतं.रघू व सिद्दपा पुन्हा हातच चोळत राहिले.इकडे चंदर व वसंताला भडाग्नी देत असतांनाच आता कुठलीही भिती न बाळगता धावजीबा बुजगावण्यातील झिनीची कवठी आणून चंदरच्या पेटत्या चितेत टाकत होता.
तात्या डोळे पुसत होते तर चंदरच्या घरचे हंबरडा फोडत होते.
पण झिनी आज चंदरसोबत खुशीत मुक्त होत होती.

समाप्त.
(कथा काल्पनिक असुन केवळ मनोरंजनासाठी).
(कथा काल्पनिक असुन केवळ मनोरंजनासाठी).
✒ वासुदेव पाटील.