अनुष्ठान....
हा अनुभव मला माझे एक साधक मित्र श्री. दीपक कुशारे ह्यांनी सांगितला आहे. ते आपल्या ग्रुपवर मेंबर आहेत. त्यांच्या दीक्षांत विधीच्या वेळी हा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर घडला आहे. तो प्रसंग त्याच्याच शब्दांत.
.....ही साधारणतः १४ ते १५ वर्षांपूर्वी ची गोष्ट आहे. त्यावेळी नाशिक आणि त्रिंबकेश्वर येथे महाकुंभमेळा भरला होता. भारतात ४ ठिकाणी कुंभमेळे भरत असतात. प्रत्येक कुंभमेळा हा प्रामुख्याने दर ठिकाणी १२ वर्षांनी भरत असतो. त्या मध्ये त्रिंबकेश्वर आणि नाशिक येथे भरणारा कुंभमेळा हा सिव्हस्थ कुंभमेळा म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे ह्याठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्याला विशेष मान आहे कारण त्रिंबकेश्वर येथे भगवान त्रिंबकेश्वराचे ज्योतिर्लिंग आहे आणि हे ज्योतिर्लिंग हे आद्य ज्योतिर्लिंग मानले जाते. आद्य म्हणजेच सर्वात पहिले, सर्वात जूने.
भारतातल्या ह्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरण्यामागचे कारण असे सांगितले जाते की ज्यावेळी देव आणि दानव ह्यांच्यात अमृत मिळविण्यासाठी समुद्रमंथन झाले त्यावेळी अमृत वाटपाच्या वेळी अमृतकुंभ नेत असताना त्यातून ४ थेंब आपल्या पृथ्वीवर सांडले. ते थेंब ज्या ज्या ठिकाणी सांडले त्या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो. सर्वांची अशी मान्यता आहे की ज्यावेळी कुंभमेळ्याला प्रारंभ होतो त्यावेळी सर देव, तीर्थ, योगी, यक्ष, किन्नर इत्यादी अतिमानव कोटीतील व्यक्ती त्या अमृताचे प्राशन करण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या कुंभमेळ्यात असलेल्या नदी इत्यादी मध्ये प्रवेश करत असतात त्यामुळे त्यांचा संचार झालेल्या त्या पाण्याचे रूपांतर तीर्था मध्ये होत असल्याने ते जल पवित्र होऊन त्यामध्ये सर्व पापे नष्ट करण्याची शक्ती निर्माण होते आणि ह्याच कारणासाठी भाविक मोठ्या संख्येने त्या तीर्थांत स्नान करण्यासाठी येत असतात आणि त्याचा लाभ घेत असतात.
नाशिक आणि त्रिंबकेश्वर येथील कुंभमेळा हा गुरू जेव्हा सिव्ह राशीत प्रवेश करतो तेव्हा चालू होत असल्याने त्याला सिव्हस्त कुंभमेळा असे म्हटले जाते. हा कालावधी साधारण १ वर्षे चालत असतो परंतु मुख्य उत्सव हा साधारणतः १ महिना असतो. त्या उत्सवाच्या वेळी राज्य सरकार त्या त्या ठिकाणी करोडो रुपयांचे निधी उपलब्ध करून देत असल्याने त्या त्या शहरांचा विकास साधला जातो त्या मुळे कुंभमेळ्याला राजकीय महत्व देखील प्राप्त झाले आहे. कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्या काळात देशभरातले किंवा जगभरातले सर्व साधू, संत, फकीर, अघोरी साधू, नागा बाबा इत्यादी वेगवेगळ्या पंथातले साधू कुंभमेळ्याच्या ठिकाणी तिर्थस्नानासाठी एकत्र येत असतात आणि आपापले शक्ती प्रदर्शन करत असतात. त्या साधूंचे तिर्थतल्या स्नानाला एक वेगळे महत्व असते. त्यामुळे त्यांनी स्नान केल्यानंतर इतर सामान्य जनांना स्नान करण्याची परवानगी असते, अशा प्रकारे त्यांचे स्नान राजेशाही असल्याने त्यांच्या स्नानाला शाही स्नान असे म्हटले जाते. शाही स्नानाचे मुहूर्त ठरलेले असतात त्यातच ते पार पडत असतात.
त्रिंबकेश्वर येथे कित्येक प्रकारचे साधूंचे समूह आहेत त्यांना आखाडा असे म्हणतात. जसे निरंजन आखाडा, नाथ आखाडा इत्यादी. त्या त्या पंथाचे साधू त्यांच्या त्यांच्या पंथाच्या आखाड्यात समूहाने राहत असतात. परंतु प्रामुख्याने शैव पंथाचे साधू त्रिंबकेश्वर येथे आणि वैष्णव पंथाचे साधू नाशिक येथे एकत्र जमतात. अशाच एक आखाड्यात माझ्या मित्राचा दीक्षांत विधी संपन्न होणार होता. त्या दीक्षांत विधीला अनुष्ठान असे म्हटले जाते. अनुष्ठान हे ९ दिवसांचे असते. अनुष्ठान हे एक प्रकारचे तपच आहे जे तप ऋषीकुलांमध्ये पूर्वीच्या काळी होत असे. पण त्यावेळी ते तप करण्यासाठी शिष्यांना वर्षोनवर्षे तिथे वास करून सद्गुरूंची सेवा करत ते करावे लागत असे तेव्हा त्यांना सिद्धी किंवा विद्या प्राप्त होत असे परंतु आत्ताच्या धकाधकीच्या काळात गुरुगृहांत वर्षानुवर्षे जाण्यासाठी वेळ नसल्याने सद्गुरूंनी तो वर्षानुवर्षीचा अभ्यासक्रम ९ दिवसांच्या कालावधीत आणून शिष्यांवर एकप्रकारे मोठा उपकारच केलेला आहे.
अशाच एका आखाड्यात मी अनुष्ठान करण्यासाठी भाग घेतला होता. आमचा एकनिष्टपणा, कठोर साधना, ब्राम्हचर्येचे पालन आणि श्रमदान ह्या व्यतिरिक्त सद्गुरूंची आमच्या कडे कुठलीच अपेक्षा नव्हती. तिकडे जेवण, राहणे, लागणारे साहित्य हे सर्व मोफत पुरवले जात असे. त्याचप्रमाणे साधनेसाठी आलेल्या महिला वर्गाची पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी सोय केलेली होती. अनुष्ठान करणाऱ्यांसाठी काही नियम असतात आणि ते काटेकोरपणे पाळावेच लागतात. कठोर ब्रम्हचर्यत्व, हठयोग ह्या सर्व गोष्टींचे कठोर पालन करावेच लागते. त्यातीलच दोन महत्वाचे नियम म्हणजे सतत मौन व्रत धारण करणे आणि अनुष्ठानाची जागा सोडून कुठेही बाहेर न जाणे. कारण अनुष्ठान चालू असताना अशुभ शक्तींचा त्रास साधकाला होऊ नये म्हणून हे नियम काटेकोर पणे पाळावा लागत असत. हे सर्व नियमांचे पालन करण्याची प्रतिज्ञा करून मी आणि माझ्यासारखाच इतर काही साधकांनी अनुष्ठानात भाग घेतला होता. हे आमचे पहिलेच अनुष्ठान होते त्यामुळे आमचे नीट ध्यान लागत नसे त्याचप्रमाणे कधी कधी आमच्याकडून काही नियमांचे उल्लंघन होत असे. परंतु आम्ही नवीनच असल्याकारणाने ते काही प्रमाणात माफ केले जात असत. अशातच अनुष्ठानाच्या ४ते५ दिवसांनंतर आम्हाला अनुष्ठानाच्या चतुसिमेत राहण्याचा खूप कंटाळा येऊ लागला होता म्हणून आम्ही काही जणानी पहाटेस अंघोळीसाठी गुपचूप कुशावर्त वर जाण्यास सुरुवात केली होती.ANKUSH NAVGHARE
असेच सहाव्या दिवशी आम्ही आंघोळ इत्यादी आटोपून अनुष्ठानाला बसलो असताना आमच्यावर लक्ष ठेऊन असणाऱ्या संन्याशी आचार्यांना असे वाटले की कोणीतरी अज्ञात अघोरी साधू किंवा साधक आमच्या सर्वांच्या मध्ये अनुष्ठानाला येऊन बसला आहे. असे वाटल्यामुळे त्यांनी सर्व साधकांचे निरीक्षण केले असता असे दिसून आले की एक कोणीतरी अशी व्यक्ती होती जीच्याकडे आखाड्या तर्फे पुरवण्यात आलेली कुठलीच वस्तू म्हणजे ओळखपत्र, बाबाजींचा फोटो किंवा आसन नव्हते म्हणून त्यांनी दोन जुन्या साधकांना आज्ञा करून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यास सांगितले. त्यां प्रमाणे त्या दोन जुन्या साधकांनी त्या अज्ञात व्यक्तीला आखाड्याच्या बाहेर जाण्यास सांगितले असता त्याने स्पष्ट नकार दिल्यामुळे स्वतः परमपूज्य बाबाजींनी त्या दोन साधकांना आज्ञा करून त्याला हाताला धरून बाहेर काढण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार ते दोन साधक त्याला पकडण्यासाठी पुढे सरसावले असता तो अघोरी साधू क्रोधाने उठून उभा राहिला आणि परमपूज्य बाबाजींना तसेच त्या दोन साधकांना अपशब्द बोलू लागला आणि धमकाऊ लागल्यामुळे इतर साधकानाही क्रोध येऊन त्यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला असता तो अजूनच आगबाबूळ झाला त्यावेळी त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल भडक झाले होते. तो क्रोधाने काहीतरी मंत्र पुटपुटू लागला आणि म्हणाला की कोणालाच सोडणार नाही, माझा अपमान करतात, मला बाहेर जायला सांगतात, कोणाची इतकी हिम्मत नाही मला बाहेर काढायची असे म्हणून त्याने त्या दोन साधकांचे हात झटकले आणि स्वतःच आखाड्याच्या बाहेर निघून गेला.
तो निघून जातो ना जातो तोच माझ्या पुढच्या रांगेत आणि त्या अघोरीच्या बाजूला आणि अंगाने एकदमच किडकिडीत असलेला एक साधक उठून उभा राहिला आणि जोर जोरात हसू लागला. त्याचे डोळे लाल बुंद झाले होते. तो मोठं मोठ्याने ओरडायला लागला आणि आचार्यांकडे पाहून म्हणू लागला की, हरामखोर साले मला बाहेर काढतात काय! आता कोणालाच सोडणार नाही. त्याला अचानक ओरडत उठलेला पाहून माझ्यासकट इतर नवीन साधक खूप घाबरून गेले आणि त्याच्यापासून दूर पळाले. त्यांना पळालेले पाहुन तो साधक अजूनच जोरजोरात हसू लागला आणि जे हाताला मिळेल ते इतर साधकांवर फेकून मारू लागला. त्यामुळे आखाड्यात एकच हाहाकार झाला आणि त्याचाच फायदा घेऊन त्या साधकाने किंवा त्या साधकात घुसलेल्या त्या अघोरीने तिथेच उभ्या असलेल्या एक मोठ्या ट्रॅक्टर ची मागच्या बाजूची ट्रॉली उचलली. ती ट्रॉली ऊचलण्यासाठी सामान्यतः १५ ते २० माणसांची आवश्यकता असताना फक्त एक साधा किडकिडीत माणूस एकटा ती उचलतो हे सर्व पाहून अवाक झालेले इतर सर्व साधक आणि आजूबाजूचे लोक घाबरून सैरावैरा पळू लागले. त्यानंतर त्याने ती ट्रॉली जोरजोरात फिरवायला सुरवात केली आणि लोकांच्या दीशेने फेकली असता लोकांनी जीव मुठीत धरून त्वरित त्या ठिकाणाहून दूर जाऊन त्याचा वार चुकवला. ते पाहून तो जास्तच पिसाळला आणि त्याने जो त्याच्या वाटेत येईल त्याला पकडून हाणायला सुरवात केली असता परपूज्य बाबाजींचा आज्ञेने चार धष्टपुष्ट अशा सेवकांनी त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांनाही लांब उडवून लावले. म्हणून अजून जास्त लोकांनी त्याला पकडून मजबूत आणि जाड्या दोरखंडाने एक मोठ्या झाडाला बांधून टाकले. परंतु तिकडे ही, तो कधीही दोरखंड तोडून बाहेर येईल अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे इतर नवीन साधक घाबरून अनुष्ठानाला बसायला तयार होत नव्हते म्हणून शेवटी त्याला तिकडे असलेल्या गाई बैलांच्या विस्तीर्ण आशा गोशाळेत जाड अशा लोखंडी साखळ्यानी बांधले तरीही सुटण्यासाठी त्याच्या हालचाली चालूच होत्या. आता तो तिकडे असलेल्या जनावरांना त्रास देऊ, मारू लागला होता. दिवस रात्र गाई बैल जोरजोरात हंबरडा फोडत असायच्या. कित्येकांच्या तोंडातून फेस यायचा परंतु बाबाजींचा कृपेने काही अघटित घडले नव्हते. इकडे सर्व साधक गण त्या किडकिडीत साधकाला घाबरून असत. त्याच्या अंगातून तो अघोरी निघून जावा म्हणून त्याला यथेच्छ बडवत असत. त्या क्षणाला त्यांचे मारणे त्या किडकिडीत मुलाला लागत नसे परंतु त्याच्या शरीराला मात्र खूप इजा झाल्या होत्या.
बाबाजी सहजपणे त्या मुलाला त्या अघोरीच्या तावडीतून सोडवू शकत होते परंतु ते त्याचे प्रारब्ध होते म्हणून भोगावेच लागणार होते. नंतर असे कळले की अनुष्ठानाला येण्यापूर्वी त्या किडकिडीत साधकाकडून एक चुक झाली होती की ज्यावेळी तो अंघोळीला कुशावर्तावर गेला होता त्यावेळी एका स्नान करत असणाऱ्या स्त्रीकडे बघून त्याच्या मनात वासना निर्माण झाल्यामुळे त्याचे ब्राम्हचर्यत्व खंडित झाले होते त्याच प्रमाणे त्याने त्या साधूला आखाड्यात घुसताना पाहिले होते व त्या साधूला बघून त्याला असा संशय आला होता की तो अघोरी त्यांच्यातला एक नसून कोणीतरी भलताच होता परंतु त्याने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते, नाहीतर तो अघोरी आखाड्यात घुसू शकला नसता, आणि हे सर्व त्याचेच फळ होते. सत्पुरुषांना कोणालाही त्रासमुक्त करण्याची ताकद असते परंतु जर असे केले तर त्याच्या प्रारब्धानुसार त्याला तो त्रास भोगता न आल्याने ते निसर्ग नियमाच्या विरुद्ध होऊन त्या व्यक्तीला परत नियतीनुसार जन्म घेऊन तो त्रास फेडण्यासाठी मानवयोनीत यावे लागते. हे कोणालाही टळलेले नाही आणि म्हणुनच बाबाजी उचित वेळ येण्याची वाट पाहत होते. जेणेकरून त्याच्या कर्माचे फळ त्याच्याकडून तिथेच फेडले जावे.
शेवटी तो दिवस उगवला, अनुष्ठानाची सांगता होणार होती. कोणालाही रोगमुक्त किंवा त्रासमुक्त करण्यासाठी बाबाजी एक युक्ती करत असत. ती अशी होती की सर्व साधकांना जेवणाचे उष्टे हात एका मोठ्या भांड्यात धुवायला सांगून ते खरखटे पाणी त्या व्यक्तीच्या डोक्यावर ओतायला सांगत असत, आणि असे केल्याने त्याचे सर्व आजार, दोष निघून जात असत. कारण असे म्हणतात की आपली सर्वात जास्त साधनेची शक्ती ही हातात जमा होत असते आणि म्हणूनच रोज सकाळी उठल्या बरोबर लगेचच डोळे न उघडता पहिल्यांदा आपल्या दोन्ही हाताकडे पाहून "कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंदम्, प्रभाते करदर्शनम्" हा मंत्र म्हणून दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवून मगच सावकाश डोळे उघडल्याने रात्रभर जमा झालेली सर्व शक्ती हातावाटे परत आपल्या डोळ्यांमधून शरीरात गेल्यामुळे दिवसाची सुरवात चांगली होते हे सर्वांना माहिती असेलच. ह्याच प्रकारच्या रोजच्या साधनेमुळे किंवा सवयी मुळेच मला खालील दिव्य काव्य सुचले होते...
साईबाबांच्या १८ शिकवणी....
जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे...१
मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे...२
अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे...३
समोर फक्त साई आणि
आई वडिलांनाच भजावे...४
सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे...५
काहीना मागता त्याच्याकडे
त्यालाच सर्व अर्पावे...६
घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे...७
येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे...८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे...९
समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे...१०
चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे...११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे...१२
जगात खुप भांडण तंटे
आपण शांत राहावे...१३
सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे...१४
जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे...१५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे...१६
साईचे शिकवणे हे
सतत ध्यानी धरावे...१७
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे...
जीवन आपुले जगावे...१८
..
......त्याच प्रमाणे पूर्वी साधू हात उंचावून श्राप, आशीर्वाद किंवा शक्तिपात करत असत. तसेच आपल्या पूर्वजांच्या म्हणण्या प्रमाणे कोणाही अनोळखी, वाईट विचारांच्या व्यक्तीशी हस्तांदोलन केल्याने त्याची नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते म्हणूनच पहिल्या भेटीत आपल्या संस्कृतीत हात मिळवण्या पेक्षा हात जोडून नमस्कार केला जातो किंवा कोणीही सत्पुरुष योगी कोणालाही पायाला स्पर्श करू देत नाहीत.
.....शेवटी तो दिवस उगवलाच. त्यादिवशी अनुष्ठानाचे समापन होणार होते. त्यादिवशी तो झपाटलेला मुलगा जरा जास्तच गोंधळ घालत होता, शिव्या देत होता. म्हणून बाबाजींचा आज्ञेप्रमाणे ४ ते ५ आडदांड सेवकांनी त्याला धरुन आणले आणि बाबाजींसमोर उभे केले आणि जेवणाचे खरकटे हात धुतलेले पाणी त्याच्या डोक्यावर ओतायला सांगितले. त्याप्रमाणे ते पाणी त्याच्या डोक्यावर ओतताक्षणी त्याने एक जोराची आणि हृदय पिळवटून टाकणारी किंचाळी मारली आणि तो उभ्या जागेवरूनच खाली कोसळला. आता त्याचे शरीर सोडून तो अघोरी निघून गेला होता परंतु त्यामुळेच त्याच्या शरीराला झालेल्या जखमांच्या खऱ्या वेदना आता त्याला जाणवू लागल्या होत्या ज्या खूपच असहनिय अशा असाव्यात कारण त्या दिवसानंतर बरेच दिवस त्या साधकाला धड उठताही येत नसे. दिवसभर तो कण्हत पडलेला असे. त्याला त्याच्या कृत्याचा आता पश्चाताप होत असावा म्हणून तो सतत बाबाजींचे नाव घेत पडून राहत असे. शेवटी एके दिवशी बाबाजींनी त्याची दया आली कारण त्याचे भोग संपले असावेत म्हणून, म्हणून बाबाजींनी त्याच्या अंगाला विभूती मंत्रउन त्याचा लेप लावला असता त्याच्या वेदना खूपच कमी झाल्या आणि काही दिवसांनी तो पहिल्यासारखा झाला. हा अनुभव टाइम पास म्हणून एखादे अनुष्ठानाला हजेरी लावणाऱ्या लोकांसाठी इशारा आहे. धन्यवाद...