ब्रम्हास्त्र भाग ...२
......हा सर्व प्रकार पाहून त्या साधूला कळून चुकले की कोणीतरी म्हणजे मीच त्या रिंगणाला काहीतरी केले आहे त्यामुळे हे सर्व होत होते. त्याने एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि माझ्याच भाषेत माझ्याशी बोलू लागला की, हे तू चांगले नाही केलेस, ह्या रात्रीची आम्ही ३०० वर्षांपासून वाट पाहिली आहे, तू तुझी जादू हटवून टाक नाहीतर माझ्या मालकाला तुझा आणि तुझ्या त्या हरामखोर मित्राचा कुटुंबाचा पण बळी चढविन. त्यानेही आम्हाला खूपच त्रास दिला आहे म्हणूनच आता तो हे सर्व भोगतोय, तो तर मरणारच आहे पण तू जर असा वागलास तर तुझ्यामुळे त्याच्या सर्व कुटुंबाचा पण बळी जाईल आणि त्याला सर्वस्वी तूच जबाबदार असशील. त्याच्या प्रत्येक शब्दगणिक परत माझ्यात काहीतरी शक्ती संचार करू लागली होती. हे सर्व चालू असतानाच त्या पक्षाने परत जोराचे पंख हलवले आणि मानवी भाषेत माझ्याकडे बघून बोलला की मला ह्याचाच बळी पाहिजे. असे म्हणत त्याने मला पायाने मारण्याचा प्रयत्न केला परंतु परत मोठ्या स्फोटासारखा आवाज येऊन त्याचा वार खाली गेला. तेवढ्यात त्या साधूने काहीतरी मंत्र उच्चारण करण्यास सुरुवात केली, त्या उच्चारणा बरोबर त्या शक्तीची कंपने माझ्यावर येऊन आदळू लागली. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की माझ्यावर आदळून परत गेलेल्या त्या लहरींमुळे आजूबाजूची झाडे पेट घेऊ लागली. खरेतर मला ह्या सर्वाचा काहीच अनुभव नव्हता, मी फक्त गुरुस्मरण करीत होतो आणि बाकीच्या गोष्टी आपोआपच होत होत्या. इतक्यात मला असे दिसले की माझे गुरुदेव माझ्या बाजूलाच येऊन उभे राहिले आहेत. ते मला म्हणाले की तुला काल दिलेल्या मंत्रांचे उच्चरण कर, त्यावर मी म्हणालो की ते तर मला अजिबात मुखोद्गत नाहीत. ते म्हणाले की फक्त डोळे मिटून कालचा प्रसंग आठव. तसे केल्याबरोबर मला असे वाटले की मी एका वेगळ्याच मितीत प्रवेश केला होता आणि त्याला एक पुरातन अशी गुरू परंपरा लाभली होती. ती गुरू परंपरा कित्येक लाख वर्षे जुनी असावी आणि वर्षानु वर्षाच्या संस्कारांनी अधिक प्रभावी होत गेली असावी. मी पाहिले की जेव्हा आदी मानवाचा ही जन्म झाला नव्हता त्याच्याही अगोदर, किंवा सतयुगाच्या कित्येक युगे आधी अशा कुठल्यातरी अमानवी युगात माझ्या अवचेतंन मनाने प्रवेश केला होता. अचानक मला मानवास अगोचर असे वेदांचे ध्वनी ऐकू येउ लागले होते आणि त्यातुनच तो मंत्र, ती शक्ती माझ्यासमोर प्रकट होऊ लागली होती जीच्या तेजपुढे सहस्त्र सूर्य देखील निस्तेज वाटले असते. हे सर्व होत असतानाच त्या साधूने त्याच्या मंत्रांची तीव्रता वाढविली. आता त्याच्या मुखातून निघणाऱ्या मंत्रांची स्पंदने खूपच प्रखर होऊ लागून ती प्रत्यक्षात दृष्टिगोचार होत होती. त्या मंत्रांपासून निघणाऱ्या लहरीनी आता सूक्ष्म जगातून ह्या भौतिक जगात प्रवेश केला होता त्यामुळे त्यांना ह्या भौतिक जगातील सामर्थ्य आणि दृष्टीगोचरता प्राप्त झाली होती. त्याच्या मंत्रांचे काही ध्वनी माझ्या कर्णपटलांवर आदळत असल्या कारणाने माझी मंत्रांवरील एकाग्रता ढळून माझे अनुसंधान क्षीण होत होत माझ्या मनात एक भीती दाटून अली होती. आता त्या भीतीने साकार रूप घेतले होते. मला दिसू लागले होते की माझ्या मित्राला हाल हाल होऊन मरण येत आहे, त्याचे कुटुंबीय रडत आहेत, त्याची बायको पांढरी साडी घालून माझ्यासमोरच त्याच्या छातीवर डोके आपटत आहे. हे सर्व पाहून क्षणभर मला असे वाटले की आता सर्व संपलेच इतक्यात मधेच एक धीर गंभीर आवाज आला की मन एकाग्र कर ग्रहण लागायला फक्त काही अवधीच हातात उरला आहे. ह्या सर्व गोष्टीचा विचार करायला खूप वेळ आहे. तुझ्या मित्राचे आणि सर्व मानवजातीचे अस्तित्व फक्त तुझ्या हाती आहे. तू प्रतिकार केला नाहीस तर जे तू आता पाहातोयस तेच होणार आहे त्यापेक्षा त्या प्रकटलेल्या शक्तीचे अनुसंधान कर. मंत्र म्हण आणि एका महान युद्धाचा साक्षी हो. चिरंतर काळापासून कोणालाही ही शक्ती चालवायची परवानगी नसताना फक्त दैवयोगाने तुला मिळाली आहे. हे ऐकून मी परत भानावर आलो, मन पूर्ण एकाग्र केले असता आपोआप माझे ओठ हलून मंत्रांचे काही वर्ण उच्चारले जाऊ लागले ते असे होते...
......"ओम् श्रीम् कां क्योम् ओम् औम् ह्राम ह्रं ह्यां ओम् अरीन् मर्दय मर्दय प्रज्वल प्रज्वल ओम् तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धिमहि धियो यो नः प्रचोदयात्।"......
त्या उच्चारांची तीव्रता इतकी प्रचंड होती की मला क्षणभर असे वाटले की माझा पूर्ण देह जळून जाऊन त्या जागी नवीन देहाची निर्मिती होऊ लागली आहे आणि त्याच बरोबर माझ्या देहावर एक विशिष्ट प्रकारचे चिलखतासारखे संरक्षक आवरण तयार होत होते. खूप वेदना, खूप तीक्ष्ण भावनांत मंत्र म्हटले गेल्यानंतर आपोआपच माझे डोळे उघडले गेले तेव्हा मी पाहिले की त्या मंत्रांनी सौरलोकांतुन एक अमोघ अशी शक्ती माझ्यासमोर प्रकट केली होती आणि तिच्या तेजाने संपूर्ण आसमंतात सहस्त्र सूर्य चमकावेत असा एक तेजस्वी प्रकाश पसरला होता. मी पाहिले की तो साधु माझ्या समोरच उभा राहून त्राहीमाम् त्राहीमाम् असेच काहीतरी बडबडत होता. तो नक्की काय बडबडत होता हे त्यावेळी त्या शक्तीच्या तेजापुढे मला काहीएक ऐकू येत नव्हते. ते मंत्र सतत माझ्या कानात, मनात, मेंदूत घुमत होते. परत परत त्या मंत्राचे वर्ण माझ्या मुखातून बाहेर पडत होते तसे ते शस्त्र, ती शक्ती अजूनच तेजस्वी होत होती, आजूबाजूची झाडे पेट घेत होती, उष्णतेने दगडे फुटत होती, त्या साधूंच्या इतर सहकाऱ्यांच्या जागी आता फक्त राख उरली होती. तो साधू होरपळलेल्या अवस्थेत दिसत होता. त्या पक्षाला मात्र फारसे काही झाले नव्हते कारण त्याची शक्ती अमोघ होती, कित्येक हजार वर्षे जुनी, कित्येक सहस्त्र साधूंच्या पवित्र रक्ताच्या तेजाने त्याची काया शक्तिशाली झाली होती. कोण होता तो पक्षी हे जाणण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य मानवाला कित्येक जन्म घ्यावे लागले असते तरी त्याचा उगम कळला नसता, परंतु फक्त गुरुकृपेमुळेच मला ते जाणता आले. मला ज्ञान झाले की राक्षसांचा कधीच अंत होत नसतो. ते पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि मानवांचा संहार करण्यासाठी परत परत येतात कारण मानव सर्वश्रेष्ठ आहे. सर्व गुरू सद्गुरू हे मानवरूपीच आहेत. देवाला ही मानव जन्म घेण्याचा मोह आवरता येत नाही. मोक्ष प्राप्ती फक्त मानवच प्राप्त करून घेऊ शकतो. देवांना बांधण्याची शक्तीपण फक्त मानवातच आहे आणि देवांना यज्ञाद्वारे शक्तीही मानवच पुरवू शकतो जी कोणताही नाही. ह्या जगाच्या नियंत्याने म्हणजेच ब्रम्हा विष्णू महेश ह्यांनीही श्री गुरुदेव दत्तांच्या रुपात मानव योनीत जन्म घेतला होता इतकी श्रेष्ठ ही योनी आहे, आणि म्हणूनच संपूर्ण मानवजातीला नष्ट करण्याचे व्रत ह्या राक्षस योनीने घेतले आहे, त्यासाठी ते वारंवार प्रकट होत असतात. मुळात ते मरत नाहीत तर फक्त काही काळासाठी बांधले जातात. जसा रावणाने पुढील जन्मी शिशुपाल म्हणून जन्म घेतला आणि त्याला मारण्यासाठीच परत भगवान नारायणाना भगवान श्रीकृष्णाचा अवतार घ्यावा लागला. हे असेच चालू राहणार युगानुयुगे. त्यांना आवरण्याची मारण्याची शक्ती फक्त एकच अस्त्रात आहे आणि होती.
......त्या साधूने त्या पक्षाला सांगितले की महाराज इतकी अमोघ शक्ती मी पाहिल्यांदाच पहात आहे, मी ह्याचा सामना करू शकत नाही आणि मला वाटतेय की आपणही ह्या शक्तीच्या शरण गेलो तरच आपले प्राण वाचतील. त्यावर तो पक्षी म्हणाला की तू माझा एक तुछ सेवक असून मलाच अक्कल शिकवत आहेत, तुझा आता अंतकाळ जवळ आला आहे म्हणून तुला ही बडबड सुचत आहे त्या पेक्षा तू मरायला तयार हो. ते ऐकून तो साधू म्हणाला की मी तुमची इतकी वर्षे सेवा केली त्याचे हेच फळ मिळणार असेल तर, असे म्हणून त्याने माझ्या समोर प्रकट झालेल्या त्या शस्त्रावर उडी घेतली तत्क्षणी त्याला स्पर्श व्हायच्या आताच त्याचे बाष्पात रूपांतर झाले. ते पाहून आता तो पक्षी अजूनच भडकला आणि त्याने जोरजोरात पंख फडकवायला सुरुवात केली त्यामुळे आजूबाजूची झाडे दगड सर्व हवेत उडून माझ्यादीशेने येऊ लागले. परंतु त्या अमोघ शक्ती पुढे काहीच टिकले नाही. तेवढ्यात परत तोच धीरगंभीर आवाज सर्वत्र घुमला, ग्रहण लागले आहे शक्तीचे अनुसंधान कर... शब्द कानात घुमताच क्षणी मी धनुष्य पकडतात तशी हाताची कमान केली असता हातात एक अजेय, अमोघ आणि तेजस्वी असे धनुष्य प्रकट झाल्याबरोबर माझ्या मुखातून दुसरे आवर्तन उच्चारले जाऊ लागले...
......"ओम् धियोयोनः प्रचोदयात् भर्गो देवस्य धिमहि तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धिमहि यंणिरेर्वतु ओम् तत्सवितुर्वरेण्यं अरीन् मर्दय मर्दय प्रज्वल प्रज्वल ओम् श्रीम् कां क्योम् ओम् औम् ह्राम ह्रं ह्यां ओम्।".......
......त्याचा एक एक वर्ण असंख्य तीक्ष्ण आणि अग्नी पेक्षाही जास्त दाहक अशा रुपात बदलून त्या पक्षावर आदळू लागला, त्या तीक्ष्ण प्रहारांनी तो पक्षी अधिकच व्याकुळ होऊ लागला. शेवटचा वर्ण उच्चरला गेला आणि ती शक्ती त्या अमोघ धनुष्यातून सुटण्यास सज्ज झाली असता तोच धीरगंभीर स्वर परत ऐकू आला "लक्षभेद", त्वरितच मी लक्ष्यावर त्या शक्तीचे अनुसंधान साधले आणि काही कळायच्या आतच त्या पक्षाच्या शरीराची राख होऊन त्या राखेतुन एक दिव्य ज्योती प्रकट झाली आणि त्या शैतानी रिंगणात नाहीशी झाली असता त्वरित तिकडचे वातावरण बदलून पवित्र झाल्यासारखे वाटले. ती शैतानी ताकद परत अनंत काळासाठी त्या रिंगणाखालील जमिनीत कैद झाली होती. त्यानंतर माझे गुरुदेव तिथे प्रकट झाले आणि उपासंहार मंत्राने त्या पवित्र शक्तीला तिच्या मूळ जागी सौरलोकांत पाठवले असता माझ्या अंगावरचे संरक्षक कवच नाहीसे होऊन माझे शरीर परत सामान्य झाल्यामुळे मला प्रचंड ग्लानी आली आणि काही कळायच्या आतच मी धाडकन खाली कोसळलो. परंतु कोसळता कोसळता माझ्या मनात सतत एकच प्रश्न स्फुरत होत असताना मोठा गडगडाटासारखा आवाज झाला "...", आणि मी तिथेच बेशुद्ध झालो.
......त्यानंतर किती काळ गेला असेल माहिती नाही पण पहाटेचा गार वारा वाहत होता. अचानक मला जाग आली आणि दिसले की परत कालचाच माणूस मला हाका मारून झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत होता. मी अर्धवट झोपेतच त्याच्याकडे पहात होतो तेव्हा मी पाहिले की मी माझ्या खोलीतच झोपलो होतो आणि मला काहीतरी स्वप्न पडल्यासारखं आठवत होत. ज्यात एक साधू, एक मोठा पक्षी, एक तेजपुंज अस्त्र अस काय नी काय आठवत असतानाच अचानक आठवल की काल मला गुरुजींचा मानसिक संदेश आला होता आणि त्यांनी मला माझ्याजवळाची विभूती जंगलातल्या त्या दगडावर टाकायला सांगितली होती आणि मी मात्र झोपून राहिलो होतो. त्या विचारांनी मी पूर्ण भानावर आल्यामुळे मला त्या माणसाचा आवाज नीट ऐकायला आला, माझ्या मनात खूप धाकधूक होती की आता काय ऐकायला मिळणार आहे कारण मी गुरुजींची आज्ञा न मानता झोपी गेलो होतो. अत्यंत जड अंतःकरणाने मी त्याला काय झाले असे विचारले असता तो म्हणाला की भाभीजी ने संदेसा भेजा है की अब सब कूछ ठीक होगया है। किसी चमत्कार की वजह से आपके दोस्त की तबीयत एकदम से सुधर गयी है और डॉक्टर बोले की उनको घर ले जाने मे कोई प्रॉब्लेम नाही है। वॉचमेन ला सांगून मुलांना घरी ठेऊन मी हॉस्पिटल ला गेलो आणि माझ्या मित्राला हॉस्पिटल मधून घरी घेऊन आलो. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही सकाळी वॉक ला गेलो असता आम्हाला असे दिसले की तो दगड आता त्याच्या पूर्वस्थितीत होता, त्यावर कसलेच डाग नव्हते की आजूबाजूला कुठ्याल्याच प्राण्यांची पक्षांची पिसे पडली नव्हती. सर्व काही जसे च्या तसेच होते. सर्व सृष्टी जणूकाही नवचैतन्याने न्हाहून निघाली होती. त्यावेळी मला घडलेलं काहीच आठवत नव्हतं परंतु काहीतरी अनामिक हुरहूर वाटत होती. माझा मित्र दगडाजवळ चालत गेला आणि दगडाला हात लावणार इतक्यात त्याला तिकडे काहीतरी वस्तू पडलेली दिसली. तो ती हातात घेऊन म्हणाला की अरे ही तर तुझी पेन आहे ना, इकडे कशी आली. मी ती हातात घेतली आणि म्हटले की अरे हो ही तर माझीच पेन आहे. मलाही माहीत नाही इकडे कशी आली ते. नंतर मी सहज त्या दगडाला हात लावला असता एक तीक्ष्ण ध्वनी माझ्या कानात उमटला "ब्रम्हास्त्र".
समाप्त...