रिंगण... एक भयाण घटना..
आजोबांच वय साधारणता 30 ते 32 वर्षे असेल. त्यावेळीची गावे खुप
मागासलेली होती, वाहतुकीच कोणतेही साधन नसल्याने प्रवास पायीच व्हायचा मग
तो प्रवास कितीही लांबचा असला तरीही. शकुन अपशकून, बाधा, पिशाच्च , करणी
वगैरे गोष्टींचा खुपचं प्रभाव सर्वच खेडोपाडी होता. त्यायलच एक माझेही गाव.
किर्रर्रर्रर्रर्र दाट हिरवंगार जंगल, उंच डोंगराच्या लांबवर पसरलेल्या
रांगांच्या रांगा, काळजात धडकी भरवणा-या खोल द-यांनी व्यापलेल्या भागातुन
जाणारी एखादी चिंचोळी पायवाट... वरवर हा निसर्ग मनाला भुरळ घालणारा वाटत
असला तरी प्रत्यक्षात या परीसरातील एक जागा अशी होती की तीथ कोणी दिवसाही
जाण्याच धाडस करत नसे... आणी अशातच एक अशी घटना घडली ज्यान तीथ राहाणा-या
प्रत्येकाच आयुष्य बदलून गेल...
घरात नेहमीच्या कामाची लगबग सुरू होती. कमरेला धोतर गुंडाळलेल तर अंगात
पांढरी मळकट बंडी चढवली. बाजुला एका ठिकाणी ठेवलेली चुना तंबाखूची पुडी
बंडीला असणा-या पोटावरच्या खिशात कोंबली... आजोबा कमरेला कोयता अडकवून
डोक्याला पागोटे बांधत आजीला म्हणाले..
" जणे...( जणाबाई - पत्नी ) यंदा भाकरी यणार का भाईर..?"
तशी आजी कपडात गुंडाळलेली भाकरी घेऊन लगबगीनं बाहेर आली..
" ही घ्या..आणी रात करीत बसु नगा... वाईस लवकरच घरला या.. कुरवाड्याचा पांडु सांगीता की जनावर सुटल्यात.."
" त्या पांड्याच्या आईचा...?" आजोबा वैतागले
" आवं..?" आजी काळजीनं म्हणाली..
पायात कोल्हापुरी चपला चढवत आजोबा बाहेर पडले.. दाट
किर्रर्रर्रर्रर्रर्रर जंगल.. पायाखाली वाळलेला पालापाचोळा तुडवत ते आत आत
दाट जंगलात जाऊन लागले... आता ते बरेच आत आले होते... दुरवर कुठेही माणसाचा
मागमुसही नव्हता.. आणि इतक्यात त्यांना चाहूल लागली.. कोणी तरी त्यांना
गर्द हिरव्यागार झाडीतून पहात होत. ते जागेवर थांबले.. कसलीच हालचाल न करता
ते आजुबाजुला अगदी शांत पने न्याहाळु लागले.. तोच मागुन कोणीतरी झपाट्याने
त्यांच्या दिशेने धावत आल.. त्यान आजोबांच्या अंगावर झेप घेतली आणि आजोबा
जमीनीवर कोसळले... डोक्यावरच पागोटे निघून जमिनीवर पडलं तसे त्याच्यात आणि
आजोबांच्यात झटपट सुरू झाली.. काही क्षणातच आजोबांनी कमरेचा धारधार कोयता
त्याच्या मानेवर ठेवला... दोघांनाही धाप लागली होती...
" शिकार करायला इकड फिरकायच नाही म्हणून सांगितल व्हत न्हव.? "
झाडांच्या मागुन एक धिप्पाड काळाकुट्ट अर्धनग्न इसम चालत पुढं आला.. तसे
आजुबाजुला लपलेले त्याचे साथीदार पटापट बाहेर पडत हातातील कोयते त्यांनी
आजोबांच्या मानेवर ठेवले...
****
रात्र झालेली.. आजी काळ्या पाषाणावर लाकडी तुकडा पाण्याचे थेंब घालून
उगळत होती तशी चुलीवर ठेवलेली वीट गरम झालेली दिसली. विट कापडात गुंडाळून
ती तशीच बाहेरच्या सोप्यात आली. आजोबा जखमी होऊन लाकडी खाटेवर पडले होते..
आजीनं हलकेच विट त्याच्या पाठीवर ठेवली .. आजोबा अगदी शांत होते..
" तुमास्नी निशाण न्हाय व्हय दिसल...? कसकाय त्यांच्या इलाक्यात गेलासा..?"
आजोबा शांत पने ऐकत होते... तशी आजी पुढे म्हणाली..
" तुमच्या भणीला ( बहिणीला ) पोरगा झालाय... सकाळी सांगावा घेऊन दगड्या आलता... आजनं चार दिस हायती.."
खबर ऐकताच आजोबांच्या गंभीर चेह-यावर समाधानाच हासु पसरल..
" काय गा लक्ष्या (आजोबांचे नाव लक्ष्मण) भणीला पॉर ( बहिणीला पोरग) झाल
व्हय...? म्या बी इचारलय म्हणून सांग तीला, आण शिस्तीन जावा. दोन दिसा
पासन वाटतया कायतरी इप्रीत ( विपरीत, वाईट) हूनर. बायका पोरास्नी संबाळुन
न्हे. चलतो म्या."
'व्हय गा' म्हणून आजोबा पुन्हा वाटेला लागले. कार्यक्रम संध्याकाळी होता
त्यामुळे सर्वजन निवांत एकमेकांशी बोलत तर मुले दंगामस्ती करत चालले होते.
पण माझी आत्या 'विमल' जी त्यावेळी अवघी सहा ते सात वर्षाची होती. एरवी
दंगामस्ती करणारी पण त्या दिवशी एकदम शांत होती.
सर्व गावामधे पोहोचले तेव्हा संध्याकाळ झाली होती. सगळेच
कार्यक्रमात गुंग झाले होते तर लहान मुले आपापल्या खेळात दंग झाली होती.
पुर्ण अंधार पडला होता, दिवे लावनीची वेळ झाली. कार्यक्रम संपला. पुरूष
माणस जेवण करून बाहेर सोप्या मधे गप्पा मारत बसले होते. सुपारीची खांड
आडकीत्यात फोडुन त्याच्ये तुकडे चघळताना इकडच्या तिकडच्या गप्पा रंगु
लागल्या.. मधे ठेवलेल्या दिव्याची वात कोणीतरी मोठी केली तशा पांढ-या
मातीच्या भिंतींवर त्यांच्या सावल्या आणखी गडद्द झाल्या. त्या भिंतीवर
चुन्याच्या बोटांना ओढलेल्या रेघांच ते सुरेख नक्षीकाम आणखीनच उठावदार वाटत
होत..
अचानक मजघरात बायकांचा गोंधळ सुरू झाला, आजोबानी काय झाल विचरल तशी माझी आजी म्हणाली... 'इमल कुट दिसना'.
'इमल' म्हणजे 'विमल ' माझी आत्या.
अचानक मजघरात बायकांचा गोंधळ सुरू झाला, आजोबानी काय झाल विचरल तशी माझी आजी म्हणाली... 'इमल कुट दिसना'.
'इमल' म्हणजे 'विमल ' माझी आत्या.
आजोबा म्हणाले
"बगा, इकडच कुटतरी कुनाच्या तरी घरात आसल ती पोर".
" समदीकड बगीतल, कुटबी न्हाय." बोलता बोलता आजीच्या डोळ्यात पाणी आल.
आजोबा एकदम चिडले,
"रडाया काय झाल. कोन मेल व्हय. म्या बघुन यतो."
एवढ बोलून ताडकन उठले आणि हातात काठी घेऊन बाहेर पडले, पाठोपठ त्यांचे
भाऊ आणि दाजी ही निघाले. पुर्ण गावात शोधल, आजुबाजूचा परीसर पिंजुन काढला,
घराघरात विचारल पण काहीच पत्ता लागत नव्हता... सगळे रिकाम्या हाती परतले
तसे आजीला आणखीनच रडू कोसळले. रात्र पुढ सरकत होती तशी आता आजोबांना देखील
काळजी वाटू लागली. बायकांच मुसमूसन सुरु झाल, लहान मुल आपापल्या आईच्या
पदराखाली शिरली, कळती मुल भिंतीकडेला उभी थोरामोठ्यांच्या तोंडाकड आशेने
पहात होती.
एका हाताने पदर सावरत आजी बाहेरच्या सोप्यात आली आणि भरलेल्या डोळ्यांनी म्हणाली.
"कायतरी इपरीत झाल नसल नव्ह...देवळात जाऊन देवी म्होर कौल लाऊन तरी इचारा."
एवढ बोलुन पुन्हा आजी धाय मोकलुन रडू लागली ... आजीच बोलण संपत न संपत
तशी सर्व पुरूषमंडळी गावच्या गुरवाकडे निघाली. तरातरा चालताना आजोबांच्या
मनात नको नको ते विचार येऊ लागले.
'एखाद्या जंगली जनावरान तर ओढत नेल नसल माज्या पोरीला, न्हाय न्हाय, आसल ती यवस्तीत.'
सर्वजण गुरवांच्या घरी पोहचले... हाक दिल्यानंतर गुरवांचा मुलगा बाहेर
आला... मळका पांढरा शर्ट, आणी ठिगळ लावलेली खाकी चड्डी वर खेचतच विचारू
लागला..
" काय ओ..?"
" तुजा बा कुठ हाय र..?" सोबत आलेल्यांपैकी एकान विचारल
'आबा पारावर आसल.' एवढ बोलून त्या पोरान जोरात हाक दीली,
"ये आबा.... कोनतर आलय बग..".
एवढ बोलून पुन्हा आत पळाला. पार घरापासुन काही पावलांवरच होता . 'पार'
म्हणजे आंब्याच्या झाडा भोवती बांधलेला कट्टा. सर्वानी मोर्चा पाराकडे
वळवला... समोरच्या एका वयस्कर व्यक्तिने हातात चूना तंबाखू आंगठ्यान मळत
विचारले.
"कोन गा.?".
त्यावर आजोबांचे दाजी बोलू लागले.
"आगा मी शिरपा"..
"शिरप्या तू..? यवड्या रातचा..?"
"म्हेवण्याची पोर कुट गावना. लय हुडकली. पन काय बी सुगावा लागना तीचा.
घरात बायका हनून, बडवून घ्याल्याता. तवा कौल बगून काय झालय ते तुमीच
सांगा.."
सगळेच गंभीर झाले. दिर्घ श्वास घेत गुरव खाली उतरले , मळलेली तंबाखु जमिनीवर टाकुन बटवा पुन्हा बंडीच्या खिशात सारला
आणि देवळाच्या दिशेने चालु लागले . तसे सगळे लोक त्यांच्या पाठोपाठ
निघाले. त्याकाळी गाव अविकसित . घड्याळं गोरगरीबांच्या आवाक्या बाहेर , वेळ
अंदाजेच मोजली जायची. नऊ ते दहा वाजले असावेत...सर्वजण देवळात पोहोचले,
देवीला नमस्कार करून सर्व देवळाच्या पाय-यावर, गाभा-यात जिथ जागा दिसेल
तीथ बसले. गुरवांना कौल लावण्यास सुरवात केली.... सर्वांच्या नजरा गुरवांवर
स्थिरावलेल्या.. गुरव काहीतरी मंत्र पुटपूटत होते. काही वेळानंतर
गुरवांचा चेहरा गंभीर झाला, ते अजोबांकडे पाहून म्हणाले,
" पाव्हण, काळजावर दगड ठेऊन ऐका आणि धीर सोडू नगा".
आजोबांच्या डोळ्यात पाणी तराळले,
"काय झाल माझ्या पोरीला....?"
त्यावर गुरव म्हणाले,
" धीर धर. पोर जीत्ती हाय. पण...?"
"पन काय....?"
"पन... कोंबड आरवायच्या आत ती सपल."
आजोबानी जड अंत:करणाने प्रश्न विचारला, "म्हजे . काय झालय ? जनावरान काय केलय काय....?"
गुरव म्हणाले " न्हाय. जनावरान न्हाय, एका पिशाच्चान न्हेलय तिला. ती
आजुन जीत्ती हाय पण रात भरात आल्यावर ते तुझ्या पोरीला सपीवनार."
"कुट हाय ती आता..?" पुन्हा आजोबांनी प्रश्न केला.
त्यावर गुरव म्हणाले, " हीतन पाच कोस लांब . 'भुताच्या जाळीत.' तुझ धाडस तुला तारल, तुझ भ्या तुला मारल. ते मृत्यूच 'रिंगण' हाय.. "
"रिंगण...?" आजोबांच्या चेह-यावर काळजी दिसत होती..
" व्हय... रिंगण... जीथ जाता येत पन जाणारं जीत येत न्हाय.."
एवढ बोलून गुरव शांत झाले. (भुताची जाळी हे इथल्या जंगलातील
पिशाच्च्याचा ताबा असलेले ठिकान, जिथ इतकी गर्द झाडी आहे की दिवसा देखील
सुर्य दिसत नाही)
'भुताची जाळी' नाव ऐकल्यावर सर्वच भयभीत नजरेन एकमेकाकडे पाहू लागले.
काय कराव कोणालाच समजत नव्हत. तीथ जाणं म्हणजे मरणाच्या दाढेत स्वता:हून
जाण... रात्र पुढे सरकत होती. सगळे आपसात कुजबूजत होते, तेवढ्यात आजोबा
ताडकन उठून उभे राहीले
" कोन यणार माज्या संग...?"
थोरला भाऊ बोलतोय म्हणजे चौघे भाऊ पण उठले तसे आजोबांचे दाजी व गावची दहा ते बारा गावकरी पण जाण्यासाठी तयार झाले.
" समद्यानी देवी म्होर साकड घाला. आण निघा. रात मध्यान व्हायला आलीया. तुमी परत इयीस्तवर म्या देवीला गा-हान घालीन."
देवीसमोर नतमस्तक होऊन आणि गुरवांच्या पायाला हात लाऊन देवळातुन बाहेर पडले. आजोबा सर्वाना उद्देशून म्हणाले ,
" तयारी करुन लगेच निगूया".
सगळे आपापल्या घरी परतले आणि निघण्याची तयारी करू लागले. आजोबा पुन्हा
बहीणीच्या घरी परतले. स्त्रीयांना काहीच न बोलता हातातली काठी दारा मागे
ठेवली. आजोबांनी डोक्यावरचा फेटा काढला आणी डोके आणि चेह-या भोवती असा
बांधला जेणेकरून फक्त डोळे उघडे राहतील, डाव्या हातात मशाल पेटवून घेतली
आणि उजव्या हातात तीन फूट लांबीचा धारधार कोयता.
त्यांच्या दाजीनी कु-हाड कमरेला लावली आणि कंदिल पेटवून घेतला. रात्र
मध्यावर आली होती. ठरल्याप्रमाण पारा जवळ सर्वजन एकत्र आले,पंधरा ते सोळा
जण आसतील, झाकलेले चेहरे, हातात पेटत्या मशली, कंदिल, कु-हाडी, धारधार
कोयते आशा तयारीने गावाबाहेर पडले. सर्वजण एकमेकाशी काही न बोलता चालत
होते. वातावरण कमालीच गंभिर बनलेल, गाव थोड मागे पडल तशी जंगलातून जाणारी
एक चिंचोळी पायवाट लागली... आजुबाजूला दाट, गर्द झाडी, मध्यरात्रीची निरव
शांतता, प्रत्येकाच्या पायातील चामड्याच्या कोल्हापुरी चपलाचा कर्र कर्र
असा येणारा आवाज, रात किड्यांच्या किर्र आवाजाने भेदत चाललेली शांतता, आणी
रात्रीच्या त्या भयान काळोखाला मागे सरकायला भाग पाडणा-या पेटत्या मशाली
घेऊन त्या घनदाट जंगलात शिरणारे ते लोक.
सर्व काही एखाद्या military rescue operation सारखे सुरू होत.
सर्व डोंगराच्या माथ्यावर पोहोचले , मध्यरात्री निरभ्र आकाशातल ते टपोर
चांदण आणी नदीकाठचा काजव्यांनी एकदम उजळुन निघणारा परिसर . रात्रीच्या
भिषणतेती तीच सौंदर्य खुलुन दिसत होत.. गांव आता खुप मागे राहील..
डोंगराचा चढ उतार सुरू झाला. काही अंतर पुढ येताच यांच्यातला एक जन एकदम
थांबला...
" थांबा... कसलासा आवाज यतोय.."
सर्व जागेवर थांबले...
" थांबा... कसलासा आवाज यतोय.."
सर्व जागेवर थांबले...
" व्हय... कोणतरी हाक देतय..."
"शिरपा, कोणतरी मदत मागतय..."
सर्व जागेवरच थांबले आणि आवाजाची चाहूल घेऊ लागले. खरोखरच आवाज येत
होता. कोणीतरी कन्हत असाव असा आवाज होता. सर्वजण शांतपने कान लाऊन ऐकू
लागले, पण आवाजाची दिशा समजत नव्हती..
हळुहळू ते शब्द स्पष्ट होऊ लागले..
" आगा ये, मला वाचीव की गा... म्या हीत , हीत हाय." कन्हत कन्हत तो आवाज
पुन्हा घुमला तसे सर्वच चक्रावले. तेवढ्यात आजोबांचे दाजी म्हणाले.
" कुनीबी जागच हालू नगा, ह्यो चकवा हाय. आपली वाट धरा, न्हायतर ह्यो आपल्याला रातबर हीतच फिरवील."
सर्व पून्हा चालु लागले पण तो आवाज त्यांच्या पाठोपाठ येतच होता...
" ये.. आर मला वाचवा की र..."
आवाज मागुन येतच होता पन त्या कडे लक्ष न देता सगळे चालत होते.
चालण्याचा वेग वाढला तसा तो आवाज मागे पडू लागला. आता समोर काही अंतरावरच
भुताच्या जाळीची हद्द सुरू होत होती.. तेच एका आवाजान प्रत्येकाच्या अंगावर
काटा उभा राहीला...
"ए.....हीत वाचलासा रे पण तिथ न्हाय वाचनारा."
मागुन आलेल्या या जोराच्या किंकाळीने सर्वच हादरून गेले. एकमेकाकड भयभीत नजरेन पहात एक एक पाऊल पुढ सरकु लागले.. पिशाच्चा ची हद्द सुरू झाली. गर्द झाडी, काटेरी झुडपे अशा या भुताच्या जाळीत सर्वजण पोहोचले. गुरवांनी सांगितलेली जागा आली होती, मशालीच्या प्रकाशात आता मुलीचा शोध सुरू झाला. काटेरी झुडपात कधी एखाद्या घुबडाच घरट दिसायच,तर कधी झुडपातून एखादा विषारी साप सळ सळ करीत वाटेतून बाजूच्या झुडपात शिरायचा... कोल्ह्या लांडग्यांचे चकाकणारे डोळे काळजाच पाणी करायचे... वाट काढत ते आता बरेच आत आले होते. तेवढ्यात त्यांना कसला तरी आवाज येऊ लागला. एखाद्या हिंस्र श्वापदाच आपल्या शिकारीवर झडप घालण्या आधीच गुरगूरण्या आवाज. सर्वच थरारले. हातातील हत्यारे आणि मशाली पूढे करून करवंदाची काटेरी झुडपे कापत वाट करत सर्व त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागले. घरघरणारा तो आवाज आता वाढू लागला. आणि एकदम सगळ वातावरण शांत झाल. घरघरणारा तो आवाज अचानक बंद झाला तसे सगळेच आपापल्या जागेवर तसेच थांबले. तोवर एका मुलीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. ती विव्हळतच बोलू लागली,
" बाबा, कूट हायीस गा. म्या हीत हाय. मला हीतन न्हे की गा..... बाबा. "
ती रडत होती
आजोबांनी आपल्या मुलीचा आवाज ओळखला, त्यांच्या डोळ्यात पाणिच आले. पण
काही न बोलता ते आवाजाच्या दिशेने पुढे निघाले. आता आवाज खुप जवळून येत
होता. " ए बाबा, आलास व्हय गा."
एवढ बोलून ती गप्प झाली. पुन्हा वातावरण शांत झाल. ती त्यांच्या जवळच
कुठतरी होती. सगळे मशालीच्या पिवळ्या तांबुस प्रकाशात ती कुठे दिसते का ते
पाहू लागले... इतक्यात आजोबांची नजर समोर ऊभ्या असलेल्या जांभळीच्या झाडावर
गेली आणी त्यांच्या सर्वांगावर काटा आला. आजोबांना दरदरून घाम फुटलेला,
त्यांची नजर एका ठिकानी स्थिरावलेली.. सर्वाची नजर त्या झाडाकडे गेली.
गर्द काटेरी झुडपात ते जांभळीचे झाड. झाडाच्या एका फांदीवर बसली होती..
एकसारख पायांना झोके देत ती एका हाताने झाडाच्या फांदीला नख्यांनी
हळुवारपने ओरबडत होती... विस्कटलेल्या केसांनी चेहरा पुर्ण झाकला होता. ती
आपल्याच तंद्रीत खाली मान घालून एकसारखी डुलत होती. तीच्या आवाजातील घर घर
अगदी स्पष्ट ऐकु येत होती..
धडधडत्या काळजान आजोबा तीच्याकड पहात म्हणाले...
"पोरी खाली उतर आमी तुला न्ह्याला आलोय." आजोबांच शब्द ऐकताच ती एकदम
शांत झाली. पाय हालवणे बंद करून काही क्षण तशीच बसली. फक्त झाडावर नखांच
ओरखडे सुरु होते. संथपने... सगळे तीच्या दिशेने चालू लागले तशी ती जोराने
किंचाळली.
"ए थांो तीतच."
अचानक तीचा आवाज घोगरा झाला. सगळे थबकले. तीने झाडावरून उडी मारली आणि झुडपात तशीच उभी राहीली. पुन्हा तीच्या आवाजातील घरघर्र वाढू लागली,
"आल्या मार्गी परत जा न्हायतर यकाला बी जीत्ता न्हाय सोडणार."
एक सहा , सात वर्षाची मुलगी हिंस्त्र घोग-या आवाजात बोलत होती. सगळे
थक्क झाले. थोड धाडस करून आजोबा पुढ गेले, मशालीचा प्रकाश पाडून पाहील आणि
काळीजात चर्रर्रर कण झाल , आपली मुलगी समोरच्या झुडपात अवघ्या पंधरा , वीस
फुट अंतरावर उभी होती. काटेरी झुडपामुळे अंगावर काही जखमा झालेल्या,
अंगातला फ्रॉक थोडा फाटला होता, लाल रक्ताळलेल्या डोळ्यांनी ती पहात होती.
काय कराव कोणालाच सुचत नव्हत. आजोबा पुढ जाणार इतक्यात ती दात ओठ खात रागात
बोलु लागली..
" ए..... तु हीला न्ह्यायला आलास, माझ्या तोंडातला घास काढून न्हेनार व्हय र.. इsssह इsssह इssssह"
एवढ बोलुन तीन बोंब ठोकली.. जांभळीच झाड दोन्ही हातानी गदा गदा हालवू
लागली.. सर्वाची भितीन गाळण उडाली, पाय जमिनीत रुतल्यासारखा जो तो समोरच ते
भिषण दृष्य पहात होता ... जोरात ओरडत एक हात तोंडावर बडवत होती तर दुस-या
हाताने गदागदा झाड हालवत होती... सहा सात वर्षाची मुलगी एक दोन फुटांचा घेर
असलेल झाड एका हातान हावलत होती आणी हेलकाव घेणार ते ते झाड पाहुन
सगळ्यांची बोबडीच वळली. समोरच भीषण दृष्य पाहून सगळेच थरारले... गर्भगळीत
होऊन फक्त एकमेकाकडे पहात होते... आजोबांनी आपल्या हातातला कोयता कंबरेला
आडकवला आणी सगळ्यांना आपल्या मागे येण्यास खुणावल, आजोबा तीच्या जवळ
पोहोचले झाडाला गच्च पकडलेला तीचा दंड पकडला तशी ती थांबली. ओरडण किंचाळण
साार काही शांत झाल... तीचा दंड पकडुन तीला त्या झुडपातुन बाहेर ओढण्याचा
प्रयत्न करू लागले, तस तीन झटकन आपली मान वळवली आणी रक्ताळलेल्या डोळ्यांनी
त्यांच्याकडे पाहील...
केसांनी झाकलेल्या जखमी चेह-यावरून रक्त येत होत... स्वता:च मरण स्वता:
पहाव तसे सर्व थरारले. तीने जोराचा हिसडा मारून हात झटकला आणि जमीनीवर
बसुन झाडाखालच्या एका दगडावर आपल डोक आपटू लागली. सर्वच घाबरले, आजोबा
सगळ्यांकडे पाहून म्हणाले
" समद्यांनी हत्यार कंबरला लावा, यका हातात पलीता (मशाल) धरा. समद्यांनी जोर लावून हीला ह्यातन भाइर वडायची आण झटक्यात माग परतायच."
सगळे तयार झाले. ती अजुनही त्या दगडावर डोक तसच आपटत होती. जखमी होऊन
डोक्यातून रक्त वाहत होत. आजोबांनी मन घट्ट केल. हळुच तीच्या मागे आले,
तीचा हात पकडला तशी तीन आपली मान गर्रकन वळवली आणि हसु लागली, पेटत्या
मशालीच्या लाल तांबड्या प्रकाशात तीचा चेहरा अधिकच भिषण वाटत होता.
कपाळावरील जखमेतून येणार रक्त तीच्या पुर्ण चेह-यावर पसरलेल. तीच भयान
हास्य काळजाचा थरकाप उडवत होत. आजोबांनी जोरात तीला बाहेर ओढायला सुरवात
केली तसे सोबतच्या लोकांनीही तीला खेचायला ताकत लावली... तशी ती जोराने
किंचाळली,
" तुमच मराण तुमास्नी हीथ घीऊन आलय..." डोळे विस्फारून सर्वांकडे पाहु
लागली जशी ती एका एकाला कच्चा खाऊन टाकेल... झटकन तीन मागे एका हातान ते
झाड पकडल आणि या सर्वाना आत खेचू लागली तसे ते सर्वजन तीच्याकडे ओढले जाऊ
लागले, एक लहान मुलगी पंधरा ते सोळा पुरूषांना भारी पडत होती. पण हे सर्व
पिशाच्य करत होत. आजोबांनी अंगातली सारी शक्ती एकवटली. तीच्या
रक्ताळलेल्या डोळ्यात डोळे घातले
आणी ओरडले..
" ए सैताना, काय वाटल तुला. तु माज्या पोरीच लचक तोडून खायाला म्या पैदा केलय व्हय तीला, हे चामुन्डा देवी धाव ग....धाव."
आजोबांच्या आवाजान सार गगन भेदल, तोंडावर बांधलेला फेटा काढुन तीच्या
चेह-यावर टाकला आणी झटकन तीचा दंड पकडला.. एखादी शक्ति अंगात संचारावी तसा
सगळ्यांनी जोर लावला आणि एका झटक्यात तीला बाहेर खेचल.ती किंचाळू लागली,
हात झटकून पळायचा प्रयत्न करत होती. पण आता ते शक्य नव्हत.. सर्व गावच्या
दिशेने धावत सुटले आणी मागे पडत चाललेल्या ' भुताच्या जाळीतुन ' गगनभेदी
किंकाळ्यांनी सार जंगल हादरून जाऊ लागल... सर्वांचच काळीज भितीन धडधडत
होत... पन आता गावचा रस्ता दिसु लागलेला... आजोबा सर्वांना म्हणाले..
" कुणीबी माग बगु नका...कोंबड आरवायला थोडाच यळ -हायलाय, हीतन भाइर पडा लवकर"
हातातील मशाली धरून गावाच्या दिशेन निघाले. त्या रात्रि पहाटे सर्व परतले ते गावच्या हद्दीत आले आणि कोंबडे आरवले....
सगळे जन तसेच धावत देवळात पोहोचले, गुरव अजुन देवी समोर बसुन मंत्र
पुटपुटत होते... आजोबानी आपल्या मुलीला देवी समोर ठेवली तसे सर्वानीच
देवीपुढ लोटांगन घातल... तीच ओरडण, किंचाळण सार काही थांबलेल..
गुरव शांत पने म्हणाले...
" तुझी मुलगी गावात आलीच नव्हती.. तीला त्या पिशाच्च्याने जंगलातूनच आपल्या सोबत नेल होत..."
आजोबांनी आपल्या मुलीच्या तोंडाभोवती गुंडाळलेला तो फेटा काढला.. ती
डोळे बंद करून पडली होती, शांत. स्थीर... सकाळी तीला जाग आली... पन जे घडल
त्यापैकी तीला काहाच आठवत नव्हत... सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला...
... अशा त-हेने एका भीषण युद्धाचा अंत झाला....
समाप्त...





