कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 10 (अंतिम भाग)
लेखक: शेखर...
भाग : 10 (अंतिम भाग)
रात्र झाली. सर्व तयारी झाली होती. बाकी होत ते फक्त वेळ.. पोर्णिमेची रात्र. तरिही चंद्रावर पसरलेला काळसर पट्टा अंधाराची जाणीव करुन देत होता. जसा तो चंद्र काळवंडला होता तसे इकडे सर्वच झाले होते. कारण आजची रात्र शेवट होती. स्वामीजी, पंडीतजी तयार झाले. जे काही करायच आहे ते अवघ्या काही तासात करायच आहे. जास्त वेळ गेला तर कदाचित सर्वच गमवावे लागेल. याची जाणीव सर्वाना होती. मयुर तयार होताच.
10 वाजले. होम पेटवला गेला. पंडीतजी आपल्या कार्यास सुरवात करु लागले. स्वामीनी त्यांची पुजा पण सुरु केली. स्वामी मयुरचा आत्मा दुसर्या दुनियेत पाठवणार होते आणि त्याच वेळेत पंडीतजी रेवाला मुक्त करणार असा हा सर्व प्रकार. आत्मवचन रिंगण तयार केले होते त्यात मधोमध मयुरला झोपवल गेल. त्याची पुर्ण शुध्द हरवली जावी म्हणून स्वामीनी संमोहन शक्तिचा वापर करु लागले. स्वामीनी मयुरला निद्रा अवस्थेत घालवल. स्वामी तयारीला लागले. आता खरा खेळ सुरु होणार होता. स्वामीनी मंतरौच्चार केले आणि मयुरचा आत्मा वश करुन मयुरच्या शरीरातून मुक्त केल. सोबत स्वामीनी सुरेशची आत्मा ही बोलवली. कारण रणजितची आत्मा किती घातक आहे हे त्याना चांगल ठाऊक होत. स्वामीनी आदेश दिले. "मी तुम्हाला आता पिशाच्च दुनियेत पाठवत आहे. तुम्हाला तिथे जाऊन रणजितची आत्मा शोधून तिला खत्म करायचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही इथुन करतच आहे. पण गडबड होता कामा नये. जेव्हा तुम्हाला रणजितचा आत्मा मिळेल तेव्हा तुम्हाला लगेच काही करता येणार नाही. आम्ही प्रथम रेवास मुक्त करु मग पुढे जाऊ."
आदेश देऊन स्वामीनी त्या दोन्ही आत्मा पिशाच्च दुनियेत पाठवल्या. मयुर आणि सुरेशराव (या आत्मा आहेत. आणि ते त्याच गावात आहेत. कारण रणजितची आत्मा त्या वाड्यात कैद आहे. आणि तिथेच तिला पकडाव लागणार आहे.) वाड्याच्या बरोबर समोर होते. ते आता गडबडीने कामाला लागले. रणजितची आत्मा शोधण कठीण होत. कारण तिथे आता पिशाच्च दुनियेतील सर्वच आत्मा होत्या. पण खुणगाठ होती सोबतीला. सुरेशना पाहून रणजित हल्ला करणार ही गोष्ट स्वामीनी आधीच मयुरला सांगितली होती. मयुर आणि सुरेश वाड्यात आत आले.
मयुर सावध होता. सुरेशराव पण तयारीत होते. कितीतरी आत्मा आता तिथे भटकत होत्या. शोध घेण गरजेच होत. आता वाड्याची एक एक खोली दोघे पालथी घालू लागले. भेटणारी प्रत्येक आत्मा त्याना काही वेगळेच अनुभव देत होती. एक एक करत वाड्यातल्या सर्व खोल्या झाल्या पण रणजित काही मिळत नाहीये हे पाहून ते दोघे हताश झाले होते. वेळ जात होता. काय कराव काहीच सुचेना. तोच अचानक सुरेशवर मागुन एक जोरदार प्रहार झाला आणि सुरेश कोसळले. मयुर लगेच सावध झाला. त्याने ओळखले हिच ती आत्मा. रणजितची आत्मा. जिचा शोध आपण घेत आहोत. रणजितने पुन्हा हल्ला केला सुरेशवर. सुरेश तयार होतेच त्यानी प्रतिहल्ला केला. मयुर आता शांत होता. कारण अजून महत्वाची गोष्ट बाकी होती.
******
इकडे स्वामीनी लगेच पंडीतजीना इशारा केला. रणजितची आत्मा व्यस्त आहे तोच रेवाला मुक्त करणे आहे. पंडीतजीनी त्यांचा विधी सुरु केला. पिशाच्च मुक्ती योगविधी. सरपंच आणि बाकिच्या लोकाना पंडीतजीनी रेवाला घेऊन येण्यास सांगितले. थोड्या भीतीत ते लोक वाड्यात घुसले. रेवा एका कोपर्यात शांत पहुडली होती. मोठ्या धाडसाने तिला लोकानी उचलले. आणि पुजेच्या ठिकाणी घेउन आले. तिला त्या रिंगणात मधोमध बसवले. पंडीतजी विधी करत होते.
******
इकडे रणजित आणि सुरेश मधे चुरस चालू होती. मयुर मधून मधून रणजितला विरोध करुन सुरेशना मदत करत होताच. पण रणजित जास्त हावी होत होता. अचानक रणजितच्या आत्म्याला जाणीव झाली की त्याच सावज बंधनात ठेवल जात आहे आणि म्हणून ती आत्मा बेभान झाली आणि परत वास्तव दुनियेकडे झेपाऊ लागली. ते लक्षात येताच मयुर आणि सुरेश आडवे पडले. यावेळी रणजितने एक जोरदार प्रहार सुरेशवर केला त्यामधे सुरेशची आत्मा छिन्न विछिन्न झाली आणि नष्ट झाली. आता मयुरकडे लक्ष गेले. पण इकडे स्वामी तयार होते. त्यानी ताबडतोब मयुरची आत्मा परत बोलवायची तयारी केली. रणजित पाठी पडला. मयुर जिवाच्या आकांताने धावत होता. रणजितने शेवटी मयुरला पकडलच आणि प्रहार करण्यास सुरवात केली. मयुरच्या आत्म्यावर होणारे वार मयुरच्या शरीरावर उठुन दिसू लागले. कोणाला काहीच समजेना. स्वामीनी आपली पुर्ण शक्ती पणाला लावली. मयुरच्या आत्म्याने एक जोरदार झटका परत दिला ज्यामुळे रणजितची पकड थोडी सैल झाली आणि तोच स्वामीनी डाव साधला आणि मयुरची आत्मा परत बोलवली. ती आत्मा परत आली आणि तडक स्वामीनी ती आत्मा परत मयुरच्या शरिरात समाविष्ट केली. मयुर वाचला. तो पुर्ण घायाळ होता.
*****
पंडीतजीनी रेवाला बंधनात ठेवल होत. रणजितची आत्मा आता परत वास्तवात आली. अचानक वाड्यात मोठमोठे चित्कार उठू लागले. दारे खिडक्या थड थड वाजू लागल्या. सर्व गावाचा थरकाप उडाला. वाड्याची दारे अचानक अलगद हवेत फेकली गेली. रणजितची आत्मा होती ती. रेवाला शोधत होती. पण रेवा बंधनात होती. ती आत्मा पुढे सरसावली पण विजेचा धक्का बसावा असा धक्का तिला बसला आणि ती दुर फेकली गेली. एक मोठी किंचाळी त्या आत्म्याने केली. ज्याने अक्षरशा कानठळ्या बसल्या.
"नाही नाही.. अस कस झाल.. ये कांचन तुला वाटत असेल तुम्ही सुटला.. नाही.. अजिबात नाही.."
अस म्हणून ती आत्मा अचानक विशाल झाली. तिच रुप पाहताना त्रास होऊ लागला. अचानक कांचन ताई अलगद उचलल्या गेल्या आणि त्याना हवेत भिरकवल.
"ही आत्मा आता खुपच क्रोधित आहे स्वामी. ती आता काहीही करु शकते. काहितर लवकरच करायला हवे."
पंडीतजी पुढे झाले. त्यानी आपल्या हतातली माळ नजरेसमोर घेत मंतरौच्चार चालू केले. ती आत्मा त्यामूळे जास्त चवताळली आणि पंडीतजीनाही तिने तसेच हवेत भिरकवले. जो तो घाबरुन गेला. स्वामी सामोरे झाले. त्यानी वेळ न दवडता तेथील इतर आत्मा बोलवण्यास सुरवात केली. ती आत्मा आता पंडीतजी आणि ताईकडे कुच करु लागली. जो तो विचारात होता आता काय होईल? वाचण्याचा काहीच मार्ग दोघाना दिसत न्हवता. ती आत्मा अगदी जवळ आली आणि त्या दोघावर हल्ला केला.. "हाहाहाहाहा.. संपला.. तुझा खेळ कांचन... तू आणि मग ती रेवा... तो सुरेश तर कधीच.."
ताईनी डोळे गच्च मिटले होते. ती आत्मा त्याना मारणार तोच तिला कोणीतरी जोमात मागे खेचले. आणि दूर भिरकावले. क्रोधित होऊन ती आत्मा किंचाळली "कोणाला जीव नको झाला आहे?" पण समोर पाहताच तिचे अवसान संपले. समोर होत्या त्या निष्पाप लहान मुलांच्या आत्मा. ज्या प्रतिशोधात होत्या. स्वामीनी त्याच निष्पाप आत्मा समोर्या केल्या. कारण एक वाईट आत्मा नष्ट करायची झालीच तर निष्पाप आत्माच आपल्याला मदत करतील हे स्वामीना माहित होत. आणि त्यानी तेच केल. त्या छोट्या निष्पाप लहान मुलांच्या आत्मा त्यानी वश केल्या आणि त्याकरवी प्रतिहल्ला केला. रणजितची आत्मा या हल्ल्यात प्रतिकार नाही करु शकली. त्या आत्मानी रणजितच्या आत्म्यावर हल्ला केला आणि तिला समोर असणार्या अग्नी कुण्ड़ात टाकले. त्या पवित्र अग्नीत ती द्रुष्ट आत्मा जळून खाक झाली. स्वामीनी त्या लहान आत्मा ही मुक्त केल्या...... चंद्र चमकला.. त्याची काळसर छ्टा नाहीशी झाली. सर्वत्र प्रकाश पडला.. पंडीतजी आणि स्वामी यांचा जयजयकार झाला. रेवा शुध्दीवर आली. मयुरही आला. सर्व ठिक झाले....
एक सूड भावना घेऊन आलेली आत्मा तिच्याच चुकिने पुन्हा संपली होती.....

समाप्त.......
कथा कशी वाटली यावर आपले अभिप्राय नक्कीच व्यक्त करावे....
लवकरच भेटू पुन्हा एकदा एका नवीन कथेत.. शीर्षक... पत्र लिहण्यास कारण की......!!!!