#कथा :- Annexes
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ७
#©सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ६ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/annexes_8.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
( काही कारणास्तव आजची 6 ची वेळ नाही पाळता आली , त्याबद्दल क्षमस्व 🙏)
बरोबर सात वाजता त्यांचे खोदकाम थांबले आणि शेवटचा एक फटका जेन ने जमिनीवर मारला आणि पुढे जे घडलं आणि दिसलं ते अनुभवून सर्व जण अवाक् झाले. . . . . .
तो आवाज वाढू लागलं तसं सर्वांनी आपला खोदायचा वेग वाढवला. त्या काळ्या शक्तीचा तो हेलकावा फक्त त्यांना भुल पाडण्यासाठी होता. मुखतः अश्या शक्ती आपल अस्तित्व तेव्हाच दाखवतात , जेव्हा त्यांना कोणाकडून काहीतरी इच्छित गोष्ट हवी असते. जेन-मेरी , आणि 8 कामगार त्या सगळ्या ला अलिप्त होते. काय वाढून ठेवलंय ते त्यांना कल्पितच नव्हतं. जिवाच्या आकांताने सर्वजण खड.. खड ... करून शेवटचा भाग खोदू लागले. कधी एकदा तो भाग संपतो आणि त्या ध्येया पर्यंत पोहोचतो असे प्रत्येकाला झाले होते.
एक जोराचा फटका त्या शेवटच्या भागावर असा बसला की सारे दगडांचे मोठाले जाळे एका क्षणात गळून पडले. एखादा पत्त्यांचा डाव फिस्कटून जावा तसे जागच्या जागी ते खडक उलटे सुलटे झाले. सारेच्या सारे दहा जण खोलगट भागात खाली कोसळले.खरचटत, ठेचकाळत , एकमेकांना आपटत , ओरडत, किंचाळत सगळे आदळत खाली असलेल्या जमिनीवर आपटले. काळोखात नेमके काय घडले हे कोणालाच कळले नाही .जो तो आपापल्या वस्तू सांभाळण्यात मग्न झाला. सर्वांनाच आनंद झाला. सर्वजण पन्नास फूट खोदकाम करून खाली पोहोचले होते. जेन आणि मेरी उठून उभे राहिले. अंगाखांद्यावर ची धूळ झटकून टाकली. टॉर्च घेतली आणि वर पाहून इकडे तिकडे फिरवायला लागले. तरीही काही स्पष्ट दिसत नव्हते. जेन ने सर्वांना टॉर्च एकाजागी मारण्यास सांगितल्या आणि मग बघता बघता प्रकाश पसरला. काळ्या कुट्ट अंधाराला चिरत टॉर्च चा प्रकाश साऱ्या मोकळ्या जागेत पसरला. समोर नजरेत जे प्रत्येकाला दिसलं ते पाहून प्रत्येकाचे डोळे विस्फारले गेले. कुठे बघावं ? किती बघावं ? असं प्रत्येकाला झालं. . . . .
समोरचे दृष्य साऊथ आफ्रिका चे भविष्य बदलणारे होते. टॉर्च चा प्रकाश एकत्र आल्यावर ज दिसले ते पाहून धडकी भरली. डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता, हातपाय कापायला लागले, थरथर करणारी कंपने सर्वांगात इंजिनासारखी धडाडत भर वेगाने धावत सुटली, डोके काम करणे बंद झाले , हातापायाच्या मुंग्या जळजळीत दंश कराव्यात तश्या उभ्या अंगाला डसू लागल्या. समोर दिसले ते पाहून प्रत्येकाला आपल्या ध्येयाची वाटचाल दिसु लागली. जेन पुढे सरसावला. हळूहळू निरखून पाहू लागलं आणि काही क्षणात त्याला दिसले असे सत्य, जे ऐकून त्याची दातखिळी बसायची पाळी आली. . . . .
समोर पाहिले तर होते मोठे पो पुरातन काळातील मंदिर. इतकं पुरातन असावं की त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. पडक्या भिंती , दरड कोसळलेली , जलमट आणि एक प्रकारची मरणप्राय शांतता होती तिकडे. दगडांनी युक्त अस टणक बांधकाम दिसत होते. मंदिराचा रंग नाहीसा झालेला होता. एखाद्या जुनाट फोटोतला रंग असावा तसा कृष्णधवल रंगाचे ते मंदिर होते. इतक्या दिवसांनी अंधारात खितपत पडलेले ते मंदिर टॉर्च च्या प्रकाशाने स्पर्शून लखलखून उठले.कित्येक प्रश्न तिथे खितपत पडले होते प्रत्येकाच्या मनात. इतकं मोठं मंदिर ? काय असेल या मागचा इतिहास , 50 फूट खाली ही इतकी रहस्यता ? कसलं मंदिर असेल ? कोणी बांधलं असेल ? बरेच प्रश्न आणि प्रश्न ?
जेन आणि मेरी दोघेही अवाक् झाले. केवढे ते आवढव्य विस्तारलेले , प्रशस्त मंदिर . त्या मंदिराला होते टणक कणखर दगडांचे मोठमोठाले खांब . हिरवट-काळपट रंगाचे भिंतींवरील नक्षीकाम . मंदिराच्या मुख्य 3 इमारती होत्या. प्रत्येकाच्या आत जाण्यासाठी प्रवेशद्वार म्हणून मोठे खांब असेलेले दगडी दरवाजे होते. जेन, मेरी आणि 8 जण मिळून हातात टॉर्च तश्याच धरून इकडे तिकडे विहरू लागले. मंदिर पाहू लागलं होते.खाली एकही सजीव प्राणी नव्हता. अस्तावस्थ अवस्थेत उमटलेले होते कित्येक नक्षी कामांचे नमुने.ते पाहून जेन, मेरी आणि कामगार सर्वांना मात्र घाम फुटला. जिथे पाहू तिथे ते विशिष्ट प्रकारच्या नक्षी कोरलेल्या किंवा रेखाटलेल्या होत्या. . ते पाहत पाहत जेणानी मेरी एकमेकांकडे पाहत होतो. सर्व इमारती फिरून झाल्यावर ते त्या मंदिराच्या समोरच प्रांगणात आले. काय करायचे ? हा विचारविनिमय करण्यास .
ज्या कामासाठी ते वेलकौम ला आले होते ते तर पूर्ण झाले होते. त्यांना सोपवण्यात आलेल्या कामाला त्यांनी यश दिले होते.50 फूट खोल खाली रहस्यमयी मंदिर आहे ते त्यांनी जगाला दाखवून दिले होते पण , त्यानंतर सुरू झालेल्या अमानवी अघटीत घटना ? त्यांना रोखणं , त्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी इतक्या घाई गडबडीने अख्खी रात्र पालथी घालून त्या सर्वांनी ते खोदकाम केल होतं. ते पूर्ण करणं ही तेव्हा महत्त्वाचं होतं पण , खाली गेल्यानंतर एकही गोष्ट , हालचाल, इशारा , अघटीत घटना , आवाज अस काही घडलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांना तेव्हा प्रश्न पडला खरच काही अमानवी आहे की नाही ? त्यासंबंधी चर्चा करत असतानाच पाठीमागून म्हणजेच, तीन इमारतींपैकी मुख्य इमारतीचे दार करकरss.. आवाज काढत उघडले गेले आणि सताड उघडे पडले. सर्वजण पुन्हा अवाक् झाले. जेन आणि मेरी पुढे आणि ते आठ कामगार मागे मागे चालू लागले. . . .
धक्का ओलांडून सर्वजण मुख्य दरवाजा जवळ आले. आत काही दिसत नव्हते ,फक्त आतून अतिशय विचित्र आणि भयानक गंध येत होता .त्याच बरोबर सूक्ष्म स्वरूपात आवाज ही ऐकू येत होता. ट्रंपेट चा आवाज पुन्हा घुमू लागला. सगळ्या भिंती थरारून उठल्या , कदाचित इतक्या दिवसांचा , वर्षांचा अलिप्त सैतान जागा झाला होता. भिंतीच्या गर्भाला हादरे जाणवत होते. काय होतंय ? का होतंय ? कळत नव्हतं. तरीही सर्व उघड्या डोळ्यांनी बघणे एवढेच त्यांच्या हातात होते. हळूहळू वातावरण पेटायला सुरवात झाली. विविध चित्र-विचित्र आवाजांनी आसमंत घेरायला लागला. काळ्याकुट्ट अंधारातली ती कुठली कोण काळी शक्ती तेव्हा आपल धारिष्ट दाखवून बाहेर येऊ पाहत होती.
चालत चालत जेन आणि मेरी एकमेकांना धरून एक ठिकाणी थांबले आणि दोघांनाही समोर अस चित्र दिसलं जे बघून दोघे एकमेकांकडे बघायला लागेल आणि काहीतरी स्मरू लागले. . . इतक्यात . . . .
भाग - ८ पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
https://marathighoststories.blogspot.com
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )