#कथा :- Annexes
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ६
#©सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
या कथेचा भाग - ५ ची लिंक खाली दिलेली आहे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/10/annexes_7.html
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
सर्वांना धक्का बसला. जेन आणि मेरी त्या जवळ गेले . डोळ्यातल्या अश्रूंना दोघांनी वाट मोकळी केली. तिच्या हाडांवर होत होता पुन:मिलनाचा अभिषेक. सर्वच भावविवश असताना घडली एक अशी घटना जिने सर्वांचे लक्ष तत्क्षणी वेधून घेतले. . . . . . .
सर्वांनी मागे पाहिलं आणि दात आतल्या आत गच्च बसावे , असे सगळ्यांचे दात करकचून गेले. कामगार तर गळून पडले. पाठीमागे असलेल्या दोन दगडांच्या चीरे मधून पांढरट धूर बाहेर यायला लागला होता. पन्नास फूट खाली हे शक्यच नव्हतं. मग नेमक काय असावं हे ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मुखावर उमटला होता. चिडीचूप शांतता होती. सर्वांचं लक्ष त्या कृतीकडे खिळले होते. बघता बघता धूर वाढत गेला आणि संपूर्ण खालच्या भागात तो पसरला. इतका पसरला की अगदी बाजूला असून सुध्दा ते एकमेकांना बघू शकत नव्हते. पांढरट...पांढरट.... होऊन गेलं सारं. टाचणी पडली तरी आवाज येइल इतकी भयाण शांतता होती आणि अचानक गुर् गुरन्याचा आवाज यायला लागला . जसा तो आवाज चालू झाला तेव्हा मात्र सगळ्यांची भीतीने चाळण उडाली.एकतर 50 फूट खाली आणि कुठलही शस्त्र नाही की, काही उपाय ही करू शकत नाही.... अश्या प्रसंगाला करायचे काय ? असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर अगदी घामा बरोबर निथळत होता आणि थेट जमिनीत मिसळून जात होता. . .
संपूर्ण अंधारलेल्या त्या खड्ड्यात पन्नास फूट खोल खाली, फक्त त्यांच्याकडे असणाऱ्या टॉर्च च्या उजेडात सर्वजण एकमेकांना खिळून उभे होते. अचानक ट्रंपेट ( ब्रास वाद्य ) चा आवाज यायला लागला. कोणालाही कळेना तो काय प्रकार चालला होता. गुर गुर्ण्याचा आवाज आणि त्यात त्या वाद्याचा आवाज नुसता घुमत राहिला होता. मनुष्य प्राणी किती ही बुध्दीमान असला, कितीही श्रेष्ठ असला तरी अश्या प्रसंगाला त्याचं सुध्दा काहीही चालत नाही. फक्त बघत राहणे आणि देवाचं नामस्मरण करणे, धावा करणे गे इतकच आपल्या हातात असतं. सर्वांनी तेच करायचं ठरवलं.. त्या सर्वांनी आपले हात एकमेकांना दिले , गच्च तळवे दाबून गोलात उभे राहिले. जेन म्हणू लागला. . . . .
जेन - the name of the father and the name of the god and the holy spirit.heyyy.. yeshumassi forgive us for all our mistakes, and keep blessing on us... The word of the holy water which are holy.
yeshumassi....amen...
सर्वजण त्या मागोमाग बोलत राहिले. वाटलं होतं त्यापेक्षा उलट प्रतिक्रिया आली. येशूच्या पावित्र्या ने आवाज कमी व्हायच्या ऐवजी वाढला. दगड हलू लागले, आवाज गरगर करत आतल्या आत खडकांना आदळून घुमू लागला. काही सुचेना काय करावे. सगळ्यांच्या मनात भीतीने इतकं थैमान घातले की , प्रत्येकाचे ओठ थरथर कापायला लागले. दात दातावर आपटायला लागले. जेन ला ही घाबरून चालणार नव्हते. अश्या परिस्थितीत डगमगून गेले तर खूपच बिकट परिस्थिती उद्भवते म्हणून त्याला धीट राहणे भाग होते. आधीच मेरीवर बरीच संकट ओढवेलेली होती त्यात तिच्या बरोबर जेन ही भरडला गेला होता.
आवाज आता विकोपाला पोहोचला होता. कानठळ्या बसवणारा आवाज सहन होत नव्हता. टॉर्च पूर्ण प्रकाश पाडत होत्या. प्रत्येकाच्या डोळ्यातल्या पांढऱ्याखड रंगाने भीतीने लाल रंग स्विकारला होता. का आलो ? कशाला आलो इथे ? प्रश्न असे घोंगावत त्या खोलीचा कोपरा न कोपरा व्यापत होते. मेरी जेन ला बिलगून घाबरून उभी होती. जेन ने ही तिला धरले होते कारण , त्या काळ्या शक्तीचा रोष हा मेरीकडेच होता. तो येत असलेला आवाज इतका विचित्र होता की काय समजून येत नव्हते...तो आवाज पराकोटीला पोहोचला होता. त्यात त्या धुराने तर संपूर्ण काळोख आपलासा करून टाकला होता.... त्यातच हळूहळू दिसायला लागली काळपट सावली. . . .
ती बघताच क्षणी सर्वांना कापरे भरले. सावली हळूहळू मोठमोठी होत होती. मेरी दचकून गेली. त्या सावलीने बघता बघता विशालकाय रूप घेतले. धडपड करून कामगारांची धावपळ झाली पण जाऊन जाऊन जाणार कुठे म्हणून मग घाबरून रडत एकाजागी उभे राहीले. मेल्यानंतर आत्मा साधारण बारा दिवस आपल्या शरीराबरोबर राहत असतो कारण ,त्याची त्या देहा बरोबरची असलेली इतक्या वर्षांची नाळ त्याला सहज तोडता येणार नसते. जेन ने हजरजबाबी पणा दाखवून सर्वांना हात जोडायला सांगितले. सर्वांनी हात जोडले .जेन ने रेजिका ची काळ्या मण्यांच माळ हातात गच्च दाबून धरली आणि मनोमनी रेजिका ला हाक मारली. तशी सर्वांनी जेन ला साथ दिली. सर्वजण मिळून रेजिका ला बोलावू लागले. पाहिली पाच मिनिटे काहीच होत नव्हते पण, काही क्षण ओसरल्या नंतर रेजिका ची आकृती त्या पांढरट धुरात उभारून येऊ लागली. तिने सर्वांना स्मितहास्य दिले आणि जेन कडे पाहू लागली.. मेरीने तिला हात केला आणि डोळ्यातल्या पाण्यांनी भेट घेतली. . . .
रेजिका ने जेन ला हाताने खूनवून सांगितले की "त्याखाली ह्याची उत्तर तुला मिळतील." जेन ला त्याही परिस्थितीत आनंद झाला होता. तिने काही का होईना पण मृत्यू नंतरही मदत केली होती. जेन ला पुन्हा रडू आले कारण त्याला तिच्यासाठी काहीच करायला मिळणार नव्हते , एवढे तिने त्यांच्यासाठी केले होते.तेवढं दाखवून रेजिका त्या धुरात नाहीशी झाली.तिने तिची खून दिली होती. इशारा केला होता सुटकेचा , विश्वासाचा . जेन पुन्हा हिरीरीने उठला. कामगारांना सुध्दा जोम चढला.ते ही इरेला पेटले. जेन ने पुन्हा एका कामगाराला वर पाठवून काही खोदकाम च सामान घेऊन खाली यायला सांगितले.त्यात एक तास गेला. तोपर्यंत सकाळचे 4 वाजले होते. . . .
पुन्हा खोदकाम चालू झाले. झपाझप खोदकाम सुरू झाले. मोजून आठ कामगार , जेन आणि मेरी सर्वजण खोदकाम7 करू लागले.10 फूट खाली खोदायचे म्हणजे साधी गोष्ट नव्हती कारण , तिथे सुरुंग देखील लावू शकत नव्हते. एकाचवेळी सर्व उडाले असते. खोदून खालपर्यंत पोहोचणे इतकच त्यांच्या हातात होते. घामाच्या धारांनी भिजून ती कामगार मंडळी खोदकाम करू लागली होती. अस करता करता सकाळचे 7 वाजले. तीन तास भर वेगाने धावत पूर्ण झाले होते. तीन तासात त्यांनी 10 फूट खोदून काढले होते. खर बघता दहा जण आणि तीन तासात 10 फूट खणणे म्हणजे नक्कीच मोठी गोष्ट होती... पण प्रत्येकाला आपल्या यशा जवळ पोहोचायचे होते.
बरोबर सात वाजता त्यांचे खोदकाम थांबले आणि शेवटचा एक फटका जेन ने जमिनीवर मारला आणि पुढे जे घडलं आणि दिसलं ते अनुभवून सर्व जण अवाक् झाले. . .. .
भाग - ७ पुढील टप्प्यात
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
( माझ्या भयकथे व्यतिरिक्त इतरही कथा वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा , आनंद घ्या ...)
https://marathighoststories.blogspot.com/
(अमर्याद रचना वाचा , मित्रांसोबत शेयर करा )
💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀
@_by_Chetan_Salkar