कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 9
लेखक: शेखर...
भाग : 9
"इथे जे काही घडत आहे ते अतिशय भयानक आहे. पण यावरती मार्गही नक्कीच आहे. तो थोडा भयंकर आणि त्रासदायक आहे. यामधे काय घडेल हे मात्र मी नाही सांगू शकत" पंडीत राधेश्याम बोलत होते. सकाळच्या प्रहरीच त्यांचे आगमन झाले. स्वामीनी त्याना संपूर्ण घटना अगदी सुरवातीपासुन ते काल रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला. ते ऐकुन पंडीत राधेश्याम थोडेसे अवाक झाले होते.
"स्वामी आजवर खुप पाहिल पण हे फारच विचित्र आणि भयानक आहे. कारण सूड घेण्यास आलेली आत्मा सहजासहजी नाही फ़सायची. आणि त्यात त्या आत्माने आपल सावज अधीच पकडून ठेवले आहे. अशा परिस्थिती मधे कोणतीही गोष्ट करणे म्हणजे धोकाच आहे तो. हा जुगार आहे हो स्वामी."
"पंडीतजी तुम्ही जे बोलत आहात ते सत्य आहे. आणि म्हणुनच तर आम्ही तुम्हाला इथे बोलवल आहे. मी एकटा काहीच करु शकत नाहीये हे माझ्या लक्षात कधीच आले आहे. यावेळी आपणास एक वेगळाच प्रकार करावा लागेल. आणि याचसाठी आपण इथे जमलो आहोत."
"स्वामी तुम्ही म्हणत आहेत म्हणजे मार्ग नक्कीच असणार. पण तो जुजबी असावा."
"पंडीतजी ते आपण चर्चा करु तेव्हा समजेलच."
कांचन ताई, सानिका, मयुर, स्वामीजी, पंडीत राधेश्याम, आणि गावचे काही मुख्य लोक असे सर्वजण मंदीरातील गुप्त खोलीत एकत्र आले होते. सर्वजण बसती झाली. स्वामी बोलू लागले.
"परमेश्वर कृपा की आज पंड़ीत राधेश्याम आपल्यासोबत आज इथे आहेत. जे काही आता घडते आहे ते सर्व आपणाला लवकरच संपुष्टात आणायचे आहे. आणि त्याच साठी आपण आज इथे जमलो आहे. या विषयावर पंडीतजी आणि माझे बोलण झाले आहे. सध्य परिस्थिती पाहता आपल्याला खुपच मोठ्या संकटातून जाव लागणार आहे. रेवाला जर वाचवायचे असेल तर रणजितची आत्मा तिच्या शरीरातून बाहेर काढणे गरजेचे आहे आणि ते शक्य नाहीये."
"आणि म्हणूनच.." पंडीत राधेश्याम बोलू लागले. "एक वेगळीच नामी युक्ती आपल्याला करावी लागणार आहे जी तांत्रिकदृष्ट्या आजवर कदाचितच वापरली गेली असेल. पण जर ती यशस्वी झालीच तर खुप काही बदल होतील आणि परिणामी रेवाच काय तर त्या आत्माने घेतलेले कित्येक जीव परत येतील. पण त्यासाठी ती आत्मा ज्या ठिकाणी वास करते आहे ते ठिकाण शोधणे गरजेचे आहे."
"ते आपण कसे शोधू शकतो पंडीतजी" मयुर.
"तेच सांगणार आहे मी आता. त्यासाठी आम्हाला तुझ्या आत्म्याची गरज पडणार आहे. आम्ही आमच्या योग साधनेने तुझी आत्मा वश करु आणि तिला त्या दुनियेत पाठवू जिथे रणजितचा तुला शोध घ्यावा लागले. या दरम्यान कदाचित ती आत्मा हल्ला करेल. यात धोका जास्त आहे. पण जर तू स्वत: तुझ्या आत्म्याला जर लढायची प्रेरणा देऊ शकलास तर विजय नक्कीच आपला असेल. बोल आहेस तयार तू?"
"स्वामीजी आणि पंडीतजी मी यासाठी तयार आहे. कारण माझ प्रेम आहे रेवा. आणि तिला मी अशा अवस्थेत नाही सोडू शकत. तुम्ही मला सांगा की मला काय करायचे आहे. त्याप्रमाणे मी नक्कीच कार्य पुर्ण करेण."
"आज रात्री आपण योग हवन सुरु करुयात. तुझी आत्मा जेव्हा त्या दुनियेत जाईल तेव्हा सर्वप्रथम तू रणजितला शोधने आहे हे लक्षात ठेव. त्याप्रमाणे तुझा मार्ग ही असेल. जेव्हा तुला ती आत्मा मिळेल तेव्हा फक्त तिचा ठिकाणा काय आहे ते तुला पहायचे आहे. लक्षात ठेव प्रतेक आत्मा ही कुठे ना कुठे गुन्तुन असते आणि तोच तिचा ठिकाणा असतो. जर तू योग्य ठिकाणा शोधू शकला तर आम्ही रणजितची आत्मा तिथेच नष्ट करण्यासाठी प्रयत्न करु."
"नाही पंडीतजी.."स्वामी मधेच पडले.."अस नाही करु शकत आपण कारण त्यामूळे रेवाचा मृत्यु होईल. आपल्याला त्या ठिकाणावरून रणजितची आत्मा वश करता आली पाहिजे तेव्हाच आणि तरच रेवा आणि इतर लोकांचे जीव वाचवले जाऊ शकतात. एक गोष्ट आहे की आता कोणीही मृत्यु झाले नाही पाहीजे. आणि याचसाठी आपण प्रयत्न करायचे आहेत."
"ठिक आहे स्वामीजी तसेच करुयात. आज रात्री ठिक 10 वाजता आरंभ करुयात. परमेश्वर आपल्याला सहाय्य करेल. यादरम्यान सर्व गावकरी या योगसाधनेत सहभागी होतील. त्यामूळे रणजितची आत्मा त्या दुनयेतच राहील ती रेवाकडे येणार नाही. आणि याच वेळी आपल्याला रेवासाठी एक वेगळी पुजा करायची आहे जिथे आपण रेवाला त्याच्या तावडीतून सोडवू शकतो. जर आपण रेवाला सोडवू शकलो तर ती आत्मा तिथेच वश करु शकतो आणि तिचा नाशही करु शकतो."पंडीत राधेश्याम...
" प्रश्न एकच आहे की रेवाला पुजेच्या ठिकाणी कसे आणायचे. आणि त्याचसाठी सरपंच आम्हाला तुमची मदत लागेल. पुजा सुरु झाली आणि अम्हाला खात्री पटली की आम्ही तुम्हाला तस कळवू. त्याच वेळी तुम्ही तबडतोब वाड्यात जाऊन रेवाला उचलून इथे या रिंगणात आणावे लागेल. तिथे आम्ही तिची सोडवणुक करु आणि मग आम्ही त्या आत्म्यास वश करु. या सर्वात मयुरचे शरीर जपणे आहे. ते आम्ही करु. माई आणि सानिका तुम्ही मयुरच्या शरीरासोबत रहा. एक लक्षात ठेवा आपली एक चुक सर्वाना महागात पडू शकते. परमेश्वर कृपेने हे कार्य यशस्वी होईल."
*******
बैठक संपली. स्वामी आणि पंडीतजी त्यांच्या पुजेच्या तयारीत व्यस्त झाले. पुजेस लागणारी सर्व सामुग्री जमा करण्यात आली. मयुर मंदीरात शिवलिंगपाशी बसुन स्वामीनी सांगितलेली साधना करत होता जी त्याला मदत करणार होती. ताई आणि सानिका होणार्या प्रकारातून सर्वांची सुटका होवो एवढीच एक प्रार्थना करत होत्या. गावचे सरपंच आणि काही तरुण मंडळी रेवाला कसे आणि कुठे आणायचे यावर चर्चा करत होती. त्या सर्वांचे रक्षण व्हावे म्हणून स्वामीनी त्याना धागे दिले बांधायला.

आजची येणारी रात्र ही रात्र शेवटची असेल......
To be continued...