कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 8
लेखक: शेखर...
भाग : 8
स्वामीना आता एका गोष्टीची जाणीव झाली की ही आत्मा आपल्याला जेवढी भयंकर वाटली होती त्याहून आधिकच भयानक आहे. त्यात सूड भावना म्हणजे खुपच भयानक. आपण एकटे काहीच करु शकणार नाही. यासाठी आपल्याला तांत्रिक ज्ञानाची गरज मोठ्या प्रमाणात असणार्या एखाद्या साधू महाराजांना बोलवावे लागेल. आणि अशी फक्त एकच व्यक्ती आहे. पंडीत राधेश्याम तेच आपल्याला यात मदत करु शकतात. तसे बोलवणे आम्ही पाठवले आहे. आशा आहे की ते उद्या सकाळ प्रहरी इथे पोहचतील. हा भयानक प्रकार नेमके कोणते परिणाम भोगायला लावेल काही समजेना आता. आपल्याच विचारात दंग होते स्वामी. कारण जे त्यानी पाहिल होत ते भयावह होत. कदाचित इतका भयानक प्रकार त्यानी पुर्वी कधीच अनुभवला नसावा. तस पाहता जी अवस्था स्वामीची होती तीच अवस्था सर्व गावाची होती. कारण जे काही आता घडत होत ते भयानक चित्र किती विदारक होत तुम्ही जाणताच.
रात्र सुरु झाली. सर्व लोक जेवण आटोपून झोपायच्या तयारीला लागले. पुरुष लोक जागेच होते आणि स्वामीही कारण रात्र ही भयानक असणारच हे त्याना चांगलच माहिती होत. आणि तसेच झाले. ज्या मंदीरात सर्व गाव होत ते मंदीर नेमक वाड्याच्या समोरच होत. रात्री 12चा प्रहर झाला आणि वाडा जागा झाला. वाड्यात विचित्र आवाज येऊ लागले. ते इतके भयानक होते की सर्वजण खडबडून जागे झाले. स्वामी सर्वात समोर आले. "कोणीही गलतीने मंदीरा बाहेर पडू नका. जिथे आहेत तिथेच तटस्थ रहा." स्वामीनी सर्वाना उपदेश केला. जो तो जागच्या जागी भीतीने गारठून गप्प उभा होता. महिला आपल्या मुलाना सावरत होत्या. अचानक वड्याचा मुख्य दरवाजा उघडला गेला. कररर.. कररर.. आवाज झाला. आणि त्या दारातून वटवाघळांचे थवेच्या थवे चित्कार करत बाहेर पडू लागले. ते जेव्हा बाहेर पडत होते तेव्हा सर्वत्र रक्ताचे सडे पडत होते. स्वामी डोळे मिटून जप करत होते. ती वटवाघळे मंदीराकडे झेपावली तसे सर्वजण भीतीने थरकापू लागले. पण मंदिराच्या आवारात येताच त्या वटवाघळांचा नाश झाला. ती जळून खाक झाली. जळणारी ती वटवाघळे जमिनीवर पडली आणि तशीच जळत राहिली. त्याचा एक उग्र वास हवेत पसरला. तसा वाड्यातून आवाज आला. "सूड आहे माझा हा.. पाहतोच किती दिवस हा स्वामी तुम्हाला वाचवतो." आणि पुन्हा वाडा बंद झाला. काही जास्त हानी झाली नाही हे पाहुन सर्वाना हायस वाटल तोच पून्हा दरवाजा करकरला आणि सर्वांची नजर पुन्हा तिकडे गेली. यावेळी चक्क रेवा स्वता बाहेर होती. ती ओरडू लागली.
"आई.. ये आई.. मला वाचव ग.. हा मला मारुन टाकेल.. आई ऐकत आहेस ना तू.. अग वाचव ना मला" तिचा तो आवाज ऐकुन कांचन ताई धावत पुढे आल्या. त्या बाहेर पडणार तोच स्वामीनी त्याना अडवल आणि काही लोकानी घट्ट पकडल. "माई ती रेवा नाहीये. हा खेळ आहे. कृपा करुन तुम्ही शांत रहा.. हा एक डाव आहे. माईना पकडून ठेवा." पण इकडे मयुरने बाहेर उडी घेतली आणि तो रेवापाशी पोहचला. तो तिच्या जवळ गेला. "रेवा तुला काही होणार नाही मी आहे ना."
"मयुर तू आलास... मला वाचवायला आलास..ही.. ही.. हाहाहा.... फसलास..." आणि तिने जोरदार धक्का मयुरला दिला.. मयुर अलगद हवेत उडाला आणि भिंतीवर जाऊन आदळला. स्वामीनी ताबडतोब अराधना चालू केली आणि सुरेशच्या आत्म्याला बोलवल. इकडे रेवाने मयुरला पुन्हा उचलून उंच हवेत फेकल. तो अलगद वरती गेला आणि पुन्हा खाली येऊ लागला. यावेळी मयुर मरेल ही सर्वांची खात्री होती. तोच सुरेशच्या आत्माने मयुर मधे प्रवेश घेतला. आणि जमिनीपासुन अगदी काहीच अंतरावर मयुर थांबला. ते पाहून रेवा रागाने लालबूंद झाली. मयुर आता तयार होता. मोठ घमासान होणार हे सर्वाना जाणवल. जो तो ते पाहू लागला. "सुरेश फक्त रेवास शांत करणे आहे. हे ध्यानात असूद्या" स्वामी. "काळजी नको स्वामीजी मी तेच करेन."

आता आमने सामने होते ते रणजित आणि सुरेश... रेवा आणि मयुर फक्त शरीर होत. आक्रमण सुरु झाले. रणजित सर्व ताकद एकवटून हल्ला करत होता पण सुरेश आपला बचाव करत त्याला चकवा देत होते. खुप वेळ हे घमासान चालूच होते. प्रतिहल्ला करणे सुरेशना शक्य न्हवते कारण रेवा होती. स्वामीनी आता मंत्रोच्चार चालू केले जेणेकरुन होणारे घमासान आटोक्यात येईल आणि आत्मा वाड्यात परत जातील. होम चालू केला. अग्नी भडकला. महदेवाचे नामस्मरण चालू झाले. सर्व गाव आता मोठमोठ्याने जप करु लागला. परिणामी रणजितची आत्मा थरकापू लागली आणि हल्ला करयचा सोडून वाड्याकडे पळू लागली. ती वाड्यात जाताच सुरेशनी मयुरला मंदीराजवळ घेतले आणि त्याचे शरीर सोडले. तसे गावातील लोकानी त्याला उचलून आत घेतले. आणि सुरेश तिथेच समोर झाडावर विसावले. वाडा बंद झाला. पुन्हा सर्व शांत झाले. मयुर बेशुद्ध पडला होता. स्वामीनी त्याला पाहिले. "तो ठिक होईल काही वेळात निश्चीत रहा."
ती रात्र खुपच भयानक झाली. पुन्हा सर्व गाव झोपी गेला. स्वामी पुढे झाले तसे सुरेश सामोरे आले.
"स्वामीजी हे खुप भयंकर होत आहे. काही मार्ग मिळाला आहे का. एक लक्षात ठेवा या पौर्णिमा रात्रीला रणजित पुर्ण पणे एक शैतान होईल. आणि एकदा जर तसे झाले तर होणारा परिणाम तुम्ही जाणताच. मार्ग लवकर शोधा. वेळ खुप कमी आहे"

"सुरेश मला सर्व कल्पना आहे. यावर मार्ग ही आहे. सकाळी माझे सहचारी इथे पोहचते होतील तेव्हा यावर चर्चा करुन आम्ही योग्य तो मार्ग काढू."
"स्वामी जे काही कराल ते योग्यच असेल यात शंका नाही. आणि मी तुमच्या प्रतेक कार्यात मदत करेन."
*****
3 वाजले होते. सर्वत्र शांतता होती. स्वामी एकटेच जागे होते. ते विचारमग्न होते. सर्वात एक मृत्य नक्कीच आहे. पण तो कोण हे मात्र अजून समजेना. असो पंडीत राधेश्याम आले की यावर सविस्तर चर्चा करावी लागेल.
हरी ओम......

To be continued....