कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 7
लेखक: शेखर...
भाग : 7
इकडे रेवा मधे असणारी रणजितची आत्मा वेसीपाशी पोहचली होती. पण वेसीवर स्वामीनी केलेली अडवणुक आत येण्यास मज्जाव करत होती. वेसीवरच थैमान चालू होत. अजब गजब आवाज. सर्व गाव त्या आवाजाने हैराण आणि भयभीत झाले होते. गावकरी वाड्यावर जमा झाले. ताई स्वामी सानिका आणि मयुर चौघेही बैठक खोलीत होते. गावचे मुख्य लोक आत मधे आले.
"नमस्कार ताई.. खुप दिवसांनी येण केलत. तुम्ही आल्याचे कळताच इकडे आलो. सुरेशराव गेले आणि त्यानंतर तुम्हीही गेलात. आणि हा वाडा सुना झाला. आज आपण आलात खरच खुप छान केलात." गावचे सरपंच बोलले. "माफ करावे ताई पण हे योग पुरुष कोण आहेत?"
"सरपंच तुम्ही सर्व आधी बसुन घ्या."सर्व लोक बसले. "हे स्वामीजी आहेत. इकडे येण्याचा विचार कधीच न्हवता मनात. पण काही गोष्टी अशा घडत आहेत की पुन्हा या वाड्यात यावे लागले." ताईनी सर्व प्रकार तिथे सांगितला.
"ताई हे तुम्ही जे काही बोलत आहात ते सत्य आहे. या वाड्यात भुत आत्मा आहेत हे आम्ही पण अनुभवले आहे. खुप काही घडले आहे इथे तुम्ही गेल्यावर. तेव्हा आम्ही हा वाडा कायमचा बंद केला. ते ही मंत्रित करुन त्या आत्मा बंदिस्त केल्या होत्या. पण काही दिवसापुर्वी इथे काही मुली आल्या होत्या त्यानी हा दरवाजा उघडला आणि त्या आत्मा पुन्हा मुक्त झाल्या. त्याच रात्री आपल्या गावातील पुजारी ज्यानी हा वाडा बंदिस्त केला होता त्यांचा मृत्यु झाला. तो इतका भयानक होता की विचारु नका. तेव्हापासुन या वाड्यावर येणारी प्रत्येक व्यक्ती मरण पावली आहे. आतापर्यंत 5 लोक मरण पावले आहेत. काही मार्ग मिळत नाहीये आम्हाला. काय करावे आणि कसे हे आम्हाला समजत नाहीये. स्वामीजी काही मदत होऊ शकेल का?"
"हरी ओम.. सरपंच तुम्ही जे काही सांगत आहात तो सर्व भयानक प्रकार आहे. आणि आम्ही यावर मार्ग काढण्यासाठीच इथे आलो आहोत."
तोच बाहेर खुप गलका ऐकू आला. तसे सर्व बाहेर आले.
"अहो सरपंच वेसीवर खुपच भयानक प्रकार होत आहेत. तिकडे चलाव आत्ताच."
सर्व लोक वेसीकडे धावले. समोर पाहताच त्यांचा भीतीने थरकापच उडाला. कारण दृश्य तसेच होते. रेवा आता पुर्ण भुत काबूत गेली होती.
"ये स्वामी, तुला काय वाटतं तू वाचवशील या सर्वाना. मूर्ख आहेस तू. कारण मी काय आहे हे तुला अजुन कळले. त्याचा एक नमुना आज तुला मी दाखवतो आहे. नीट पहा."
एवढ बोलून रेवा फिरली. सर्वाची नजर आता रेवावर होती. अचानक सोसाट्याचा वारा सूटला. आकाशात काळे ढग जमा झाले. वीज कडकडू लागली. कानठळ्या बसतील असे विचित्र हास्य रेवाने काढले. जो तो घाबरुन गेला. अचानक स्वामीना हवेत उचलल गेल. स्वामीना काहीच कळेना.
"स्वामी नीट बघ काय होत आहे"
सर्वानी पाहिले की गावतील काही लहान मुले तिच्या जाळ्यात होते. तिने त्यांना अलगद हवेत उचलल होते. सर्वजण किंचाळले. कोणी रडू लागले. स्वामीना ते पाहून होणारे संकट लक्षात आले.
"थांब रणजित, सोड त्या लहान मुलाना. नको करु हा अघोरीपणा. त्या लहान मुलानी काय बिघडवल आहे तुझे. तुला काय हवे ते सांग. आम्ही ते देऊ तुला. तुझी दुष्मनी सरदेशमुख घरासोबत आहे. त्या लहान मुलाना का त्रास देतो आहेस."
"ह... हा..हा..हाह.... सरदेशमुख ते तर मरणारच आहेत. पण या गावाने पण मला बंदिस्त केल. याना कस सोडू. तो पुजारी तर त्या रात्रीच मेला.. आज यांची बारी आहे. गप्प बस तू फक्त.. बघच आता काय काय होणार आहे ते."
शेजारी एक मोठी गवताची गंजी रचलेली होती. एक मोठी वीज तिथे पडली आणि पाहता पाहता गंजीने पेट घेतला. मोठ मोठ्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. ती लहान मुले जी हवेत होती त्याना एकाच झटक्यात त्या पेटत्या गंजीत फेकले. फक्त किंचाळया आणि ओरडण्याचा आवाज येऊ लागला. ती मुले जळत होती. स्वामी, ताई, सानिका, मयुर आणि सर्व गाव.. पाहण्याशिवाय काहीच करु शकले नाही.
"पाहिलात ना काय होत आहे. फक्त येणारी पौर्णिमेची रात्र.. तो पर्यंत सर्व संपत जाणार. एक एक करुन प्रतेकजण मारला जाणार. ह.. हा.... हा...." ती हसत निघून गेली.. कुठे गेली.. कोणाला नाही कळल. गंजी विझवली गेली. ती मुल जळून खाक झाली होती. कोण होती काही कळत न्हवत. स्वामी निराश झाले.
"ही आत्मा खुपच भयानक झाली आहे. आपल्याला आता सावध राहील पाहीजे. तेव्हा मी सांगतो म्हणून आपली घरे सोडा. सर्वजण महादेव मंदिरात रहायला या. तिथे ही आत्मा आपल्याला काही करु शकणार नाहिये. पुढचे 4 दिवस तरी खुपच धोक्याचे आहेत. क्रुपया सर्व गावकरी काळजी घ्या."
"पण स्वामी यावर ऊपाय काय आता."
"यावर ऊपाय एकच आहे माई आता. ती आत्मा नष्ट करायलाच हवी. आणि म्हणूनच काही नवीन साथीदार बोलवावे लागतील. उद्याच सर्व बंदोबस्त लावावा लागेल. तुम्ही गाव एकत्र करा. मी बाकीच सर्व पाहतो."

सर्व गाव स्वामींच्या सांगण्यावरून महादेव मंदीरात एकत्र झाला. सर्वाना रहायला याव अशी सोय सरपंचानी केली.
"आपला गाव संकटात आहे. तेव्हा सर्वानी एकमेकाची काळजी घ्या. स्वामी आहेतच आता. ते नक्कीच आपल्याला मार्ग देतील." सर्व गावाला त्यानी कळकळीची विनंती केली.

स्वामी आता तयारीला लागले...
To be continued....