कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 6
लेखक: शेखर...
भाग : 6
कोपरगाव जवळ आल.......
तसे भयानक प्रकार गाडी सोबत होऊ लागले. अचानक काळी मांजर आडवी जाणे. गाडीचा ताबा सूटणे. पण स्वामी या सर्वसाठी तयारच होते. आणि ड्राइव्हरला याची सवय होती. त्यामूळे म्हणावे असे काही परिणाम झालेच नाहीत. स्वामी फक्त स्मितहास्य करीत होते प्रत्येक वेळी. ताई आणि सानिका मात्र घाबरत होत्या. भीती वाटणारच ना. एक योग पुरुष आणि समान्य मानव यांच्यात हाच तर फरक आहे.
कोपरगाव वेसीपाशी गाडी आली. स्वामीनी गाडी थांबवायला सांगितली.
"माई आता आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. रेवा अजुन इथे पोहचली नाहीये पण तिला माहिती आहे की आपण इथे येतोय ती अपल्या मागावर आहे. मी इथे वेसीवर तिला अडवण्याचा काही बंदोबस्त करतो आहे पण जास्त वेळ नाही अडवू शकणार. तेवढयात आपले कार्य पार पडो हिच प्रार्थना करु."
स्वामी खाली उतरले. त्यानी वेसीवर काही मंत्रित केलेले धागे आणि काळी बाहुली ठेवून दिली. स्वामी परत गाडी मधे आले. गाडी वाड्याकडे चालली. वाड्यासमोर गाडी लागली आणि ताई खाली उतरल्या. त्याना पाहताच लोक समोरे आले. ताईसाहेब खुप दिवसांनी आल्या हे पाहुन गावकरी थोडी अवाक झाले.
"याव ताईसाहेब, किती दिसानी आले तुम्ही."
"नमस्कार, याव लागल. काही काम आहे म्हणून. वाडा एकटाच पडला ना."
"बर हाय आलात तुमी."

ताई स्वामी आणि सानिका वाड्याकडे आले. ताईनी वाड्याचा मुख्य दरवाजा ढकलला.. कर्ररर आवाज झाला. तसे आत असणारे पक्षी आवाज करत बाहेर पडले. त्यांचा किलबिलाट मोठा होता. सर्व आत आले. ताई वाड्या बद्दल पुर्ण माहिती देऊ लागल्या. कोणती खोली कोणाची. स्वयंपाक घर. जवळ जवळ अर्धा तास गेला या सर्वात. वाडा होताच एवढा मोठा. शेवटी ताईनी जिथे ती घटना घडली ती खोली दाखवली. स्वामी म्हटले चला आता तयारीला लागू. स्वामीनी आपले सर्व साहित्य तिथे मांडले. नेमके ते काय करणार हे त्यानाच माहित होत. सानिका आणि ताई एका बाजुला बसल्या. स्वामीनी आत्मा केंद्र तयार केले.
"माई मी आता इथे असणारी दुसरी आत्मा. म्हणजे सुरेश यांची आत्मा इथे बोलवणार आहे. ती आत्मा आपल्याला इथे काय घडले ते सांगेल आणि कदाचित मार्गही. हा प्रयोग मी प्रथमच करतो आहे. परमेश्वर आपल्याला यश देवो."
स्वामीनी पुजा सुरु केली. आत्मा प्रकट करणे तसे सोप्प नाहीये पण अशक्य ही नाहीये हे स्वामीना माहित होत. ते पुर्ण ताकदीनिशी मंत्रोच्चार करत होते. सर्व वाडा त्या आवाजाने गर्जत होता.
अचानक जोराचा वारा वाहू लागला. वाडा काहीशा आवाजाने घुमू लागला. दिवे फडफडू लागले. चाहुल होती ही येण्याची. स्वामी साद घालत होते. तशी आत्मा येत होती. एक सावली समोरुन येत होती. ती त्या केंद्रामधे मध्यभागी आली. स्वामी डोळे मिटुन होते.
गुरगरण्याचा आवाज येऊ लागला..
"का... का... बोलवत आहेस तू मला.." त्या सावलीचा आवाज आला..
"का म्हणजे.. काय होत आहे आणि काय झाले आहे ठाऊक नाही का तुला.. सर्व तर पाहिले असणार तू. मग असा गप्प का बरे राहीला. इथे तुझी पत्नी आज आली आहे. तिच्या आणि तुझ्या मुलीला रेवाला वाचवायला. जेव्हा त्या रणजितची आत्मा रेवावर हावी झाली तेव्हा इथेच होता ना. मग का अडवल नाही तू. बोल.."
"रेवा... माझी मुलगी.. हो ती आली होती. सांगितल होत इकडे यायच नाही. तरिही आली. किती अडवल पण आलीच ती. इथेच तर रणजितने तिच्यावर ताबा घेतला. खुप धडपडलो पण बंधन होत. काही नाही करु शकलो. आणि मुक्त झालो तरी आता काही करु शकत नाही. तो रेवा मधे आहे. त्याला माराव तर रेवा पण. नाही नाही. खुप कठिण आहे आता."
"मार्ग शोधू. पण तुझी मदत लागेल."
"माझी मदत.. करेन मदत. पण कशी?"
"ते वेळ आल्यावर सांगेन. तुर्तास तू जागृत रहा. आम्ही वाड्यात आहोत. रणजित आता मुक्त आहे. तो काहीही करेल. तू फक्त त्याला रोख. मी तुला मुक्ती देतो आहे. पण रेवाला काही होता कामा नये. फक्त रोखायच आहे. बाकी मी पाहतो."
एवढ बोलून स्वामीनी सुरेशरावाची आत्मा मुक्त केली. आणि पुजा आटोपली.
******
बाहेरच्या बैठक खोलीत आता सर्व विराजमान होते.
"स्वामी.. आता काय करायचे आहे. मार्ग काय आहे. रेवाला वाचवू शकेल ना आपण."
"माई तुर्तास मी काहीच नाही सांगू शकत. पण जर रेवाला वाचवायचे असेल तर मार्ग एकच आहे."
"कोणता स्वामी?"
"मला एक आत्मा या दुनियेतून त्या दुनियेत पाठवावी लागेल. आणि तिथे जाऊन रणजितची आत्मा सुरेशच्या मदतीने बंधीस्त करुन तिचा नायनाट करावा लागेल. पण यात एक अडचण आहे. या दुनियेत अशी व्यक्ती मिळणे कठीण आहे. आणि त्याच्या जीवाला धोकाही आहे. कारण त्या दुनियेत काय घडेल हे काही सांगता नाही येणार. असा कोण आहे जो मदत करेल? माई... सर्व कठीण आहे"
"मी जाईन त्या दुनियेत" एक भारदस्त आवाज आला. एक तरुण मुलगा चालत येत होता. त्याला पाहताच सानिका उठुन उभा राहिली.
"दादा तू काय बोलतो आहेस हे. तुला माहिती नाहीये ही किती भयानक आहे"
"सानु मला सर्व माहिती आहे. माफ करावे मी तुमच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष देऊन होतो. सानु तुला माहिती आहे रेवावर माझ प्रेम आहे. आणि अशा वेळी जर मी तिला वाचवू नाही शकलो तर ते योग्य आहे का?"
"दादा पण"
"सानु मला नको अडवू"
"बाळ कोण आहे तू आणि रेवाला वाचावयाला जाणार आहेस तर एक लक्षात ठेव. तिथे मृत्यु समोर असेल."
"स्वामी मी मयुर. या सानिकाचा मोठा भाऊ आहे. माझ रेवावरती प्रेम आहे आणि तिचही माझ्यावर. आम्ही हे रेवाच्या घरी सांगणार होतो पण तोच हा सर्व प्रकार घडला. मी तयार आहे. तुम्ही मला काय करायचे ते सांगा. बाकी परमेश्वर इच्छा."
"अति उत्तम. तुझ प्रेम निस्वार्थ आहे आणि ते आपल्याला नक्की मदत करेल. माई परमेश्वर पाठीशी आहे. चला सर्व आता आराम करा. आज रात्री आपल्याला रेवाला वाचावयाच आहे.."

सर्वजण नमस्कार करुन आराम करणेस निघून गेले....
To be continued