कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 4
लेखक: शेखर...
भाग : 4
सकाळचे 10 वाजले होते. झाल्या प्रकारात स्वामीना मार थोडा जास्तच लागला होता. त्यामूळे नाही म्हणत असतानाही ताईनी स्वामीना आराम करण्यास सांगितले. पण ताई आता विचारमग्न झाल्या. तो आवाज ओळखीचा होता. कोपरगाव इतक्या वर्षानी हे सर्व काय घडत आहे. हे नेमक काय घडत आहे याचा शोध घेतलाच पाहिजे. जो भूतकाळ मी आजवर लपवला आज तोच माझ्या अयुष्यात आलाय आणि तो ही माझ्या मुलगीला अडचणी मधे आणुन. परमेश्वर काय रे हे. हाच दिवस बाकी ठेवला होतास का अयुष्यात. विचारांची मालिका कही संपत न्हवती. ताई जास्तच हरवून गेल्या होत्या. तोच अचानक बेल वाजली. ताई भानावर आल्या. दार उघडले. सानिका होती. रेवाची जिवलग मैत्रीण.
"ये सानिका आत ये."
"काकू काय झाले. तुम्ही इतक अर्जंट का बोलवल. सगळ ठिक आहे ना. आणि रेवा कुठे आहे. गेले 3 दिवस झाले ती बोलली सुद्धा नाही"
"तू बस तुला सर्व सांगते."
घडलेला सर्व प्रकार ताईंनी सानिकाला सांगितला. सानिकाला मोठा धक्काच बसला यामुळे. ताई रडत होत्या. त्याना सावरण सानिकाला थोड कठीण होत पण तिने सावरल.
स्वामी आता बाहेर आले. स्वामी सोफा मधे बसले. सानिका समोरी आली आणि आशिर्वाद घेतला.
"तर माई काय आहे हे कोपरगाव. तिथेच आता सत्य आहे. रेवाला वाचवायचं असेल तर ते सत्य कळणे गरजेचे आहे. मनात कोणतीही गोष्ट किवा शंका न ठेवता तुम्ही ते सत्य सांगावे अन्यथा मी काही करु शकणार नाही"
"हो स्वामीजी मी सर्व सांगते तुम्हाला."
"ये सानिका आत ये."
"काकू काय झाले. तुम्ही इतक अर्जंट का बोलवल. सगळ ठिक आहे ना. आणि रेवा कुठे आहे. गेले 3 दिवस झाले ती बोलली सुद्धा नाही"
"तू बस तुला सर्व सांगते."
घडलेला सर्व प्रकार ताईंनी सानिकाला सांगितला. सानिकाला मोठा धक्काच बसला यामुळे. ताई रडत होत्या. त्याना सावरण सानिकाला थोड कठीण होत पण तिने सावरल.
स्वामी आता बाहेर आले. स्वामी सोफा मधे बसले. सानिका समोरी आली आणि आशिर्वाद घेतला.
"तर माई काय आहे हे कोपरगाव. तिथेच आता सत्य आहे. रेवाला वाचवायचं असेल तर ते सत्य कळणे गरजेचे आहे. मनात कोणतीही गोष्ट किवा शंका न ठेवता तुम्ही ते सत्य सांगावे अन्यथा मी काही करु शकणार नाही"
"हो स्वामीजी मी सर्व सांगते तुम्हाला."
कोपरगाव... रेवाचे वडील सुरेशराव यांच मुळ गाव. मोठे घराण होत आजही आहे. 27 वर्षापूर्वी माझ लग्न झाल आणि मी कोपरगावला आले. मोठा चिरेबंदी वाडा. एकत्र कुटुंब होत सर्व. सगळे कसे गुण्यागोविंदाने रहायचे. सरदेशमुख घराण. गावात मोठ होत. मान सन्मान सर्व काही होत. सुरेशराव गावातील राजकारणात सक्रिय होते. त्यामूळे सर्वच त्याना खुप मानायचे. सुखात होत सर्व. एक वर्षातच रेवा पण झाली आणि हे सुख वाढत गेल. पण त्या सुखाला नजर लागलीच. लग्ना अगोदर मी एका मुलावर प्रेम करायचे. रणजित नाव होत त्याच. मला तो आवडत होता आणि तस मी घरी सांगितल होत पण घरचे तयार नाही झाले. कारणही तस होत तो गुंड प्रवृत्तीचा होता. आणि हे मला खुप उशिरा समजले. आणि मग मी सुरेशरावांशी लग्न केले. रणजित तुरुंगात होता. जेव्हा त्याची सुटका झाली तो सरळ माझ्या घरी माहेरी गेला. मी तिथे नाही हे पाहुन त्याने खुप धिंगाणा घातला तिथे. घरच्यानी त्याला माझा पत्ता लागू दिला नाही. पण त्याला कुठूनसे कोपरगाव कळले आणि तो आलाच. त्याला पाहताच खरे तर मी भीतीने गार झाले होते. तो सरळ वाड्यात आला आणि खुप धिंगाणा केला त्याने. हा प्रकार काय आहे कोणालाच समजत न्हवत. पण सुरेशरावानी त्यालाच उलट जाऊन हाकलून दिल. मला राहवल नाही मी सर्व काही त्यांना सांगितलं. त्यानी ते समजून घेतल आणि तू काळजी नको करु तो काहिच करु शकत नाही मी आहे ना.
त्याच रात्री रणजित आणि त्याच्या साथीदारांनी वाड्यावर हल्ला केला. त्यादिवशी वाड्यात कोणीच न्हवत. आम्ही तिघेच होतो. तो हल्ला भयानक होता. सुरेशरावानी खुप प्रतिकार केला पण त्या सर्वासमोर ते फार काळ नाही टिकले आणि रणजितने मोका साधून त्यांच्यावर तलवारीने वार केले. आता मी आणि रेवा आम्हा दोघांना मारण्यास रणजित पुढे आला पण सुरेशराव अजुन शुद्धित होते ते कसेबसे सावरत उठले आणि त्यानी मागुन रणजितवर वार केला. तलवार आरपार गेली त्यामुळे रणजित ठार झाला. आणि तेव्हा एक आवाज सुधा झाला.."कांचन सुड घेईनच मी आज नाही तर उद्या मी येईनच" सुरेशराव ही मयत झाले. आणि सर्व संपल. वाड्याला नजरच लागली. हळू हळू सर्व वैभव संपल. शापित वाडा झाला तो. शेवटी एका साधूंनी अम्हाला वाडा सोडण्याचा सल्ला दिला आणि आम्ही तो वाडा आणि ते गाव सोडल. जुन्या सर्व आठवणी पुसल्या आणि मी इकडे आले. रेवाला कधीच हे कळून नाही दिल. ताई थांबल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी होत.
आता मात्र सानिका रडू लागली. "काकू रेवाला तिच गाव माहिती आहे. परवा आम्ही कोपरगावलाच गेलो होतो. तो वाडा आम्ही उघडला. आम्ही तुम्हाला नाही सांगितल कारण तुम्ही जाऊन नाही देणार म्हणून."
स्वामी.."माई आपल्याला तिकडेच जाव लागेल. तिथेच काय तो मार्ग मिळेल."
दिवस मावळतीला झुकला होता. स्वामीनी उद्या सकाळीच निघायच आहे अस सांगून बाहेर पडले.
To be continued...

