कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 3
लेखक: शेखर...
भाग : 3
रेवाच्या हातात धागा बांधला होता त्यामूळे त्या रात्री काही विपरीत घडल नाही पण ती आत्मा त्यामूळे जागृत होऊ लागली. त्या आत्म्याची चाहुल स्वामीना जाणवू लागली. रात्र भर ते आपल्या जागी ध्यान लाऊनच बसले होते. होणारी प्रतेक हलचाल आणि बदल ते आत्मसात करत होतेच. त्यांच सर्व लक्ष रात्र कधी संपते इकडे होते. ते झोपले सुधा नाहीत. रात्र सरली तसे स्वामी तयार झाले. त्यानी दिवस उगवताच रेवाच्या घरी म्हणजेच कांचनताई कडे प्रस्थान केले.
बेल वाजली तशा कांचन ताई दर उघडायला सरसावल्या. त्यानी दार उघडले. स्वामी एवढ्या लवकर आलेले पाहून त्या थोड्या चक्रावल्या.
"स्वामी या आत या.."अस म्हणत त्यानी स्वामीना आत घेतल आणि पदस्पर्श करुन आशिर्वाद घेतला.
"शुभं भवतू.. माई कुठे आहे रेवा आम्हाला लगेच तिला भेटावयाचे आहे. खुप उशीर होत आहे. आपल्याकडे वेळ खुपच कमी आहे." स्वामी.
"स्वामी अस काय घडत आहे. आणि माझी रेवाच का बरे? काही होणार तर नाही ना रेवाला"
"माई आत्ताच काही सांगू शकत नाही. तुर्तास आपण रेवाला पाहू नंतर काय ते सांगू" स्वामी
"रेवा तिच्या खोलीमधे आहे. मी बोलावते तिला."
"नको माई आपणच तिकडे जाऊ."
स्वामी आणि ताई रेवाच्या खोलीकडे चालू लागले.
खोली मधे पाय ठेवताच स्वामीना त्या आत्म्याचावास तिथे जाणवू लागला. रेवा तिच्या बेडवर अजुनही झोपलीच होती.
"माई तुम्ही अशा एका बाजुला थांबा. दुर रहा. आणि आता जे काही होणार ते कदाचित तुम्हासाठी खुपच भयानक आणि भितीदायक आहे. पण तुम्ही घाबरू नये. ही माळ तुम्ही गळ्यात घाला आणि शांत रहा." स्वामीनी त्याना माळ दिली आणि रेवा जवळ गेले.
आपल्या हातातील रूद्राक्ष माळ त्यांनी हातात घेतली. रेवाच्या माथ्यावर ती माळ धरुन त्यानी मंत्रोउच्चार केला..
"ऊं नमः रुद्राय, नमः कालिकायै, नमः चंचलायै नमः कामाक्ष्यै नमः पक्षिराजाय, नमः लक्ष्मीवाहनाय, भूत-प्रेतादीनां निवारणं कुरू-कुरू ठं ठं ठं स्वाहा।"
तशी रेवा जागी झाली. तिचे डोळे लालबूंद झाले होते. स्वामीना पाहुन ती अधिक क्रोधित झाली. स्वामी मंत्र एकसारखा म्हणत होते. तशी रेवा जास्तच क्रोधित होऊ लागली. आणि ती गुरगुरु लागली..
"हुज हुज.. गप्प हो स्वामी. नको देऊ मला त्रास. नाहीतर खुप भयानक होइल. हुज हुज."
कांचन ताईना धक्काच बसला कारण तो आवाज चक्क एका पुरुषाचा होता.
"का आला आहेस तू इथे. काय आहे तुझी इच्छा. या मुलीला सोडून दे तू. तुझ्या दुनियेत परत जा. मला कठोर होण्यास भाग नको पाडू."स्वामी.
तशी रेवा मधील आत्मा कर्णकर्कश्य आवाजात हसू लागली..
"हहा.. हहा... हाहाहाहाह.. तू स्वामी तू.. तू कठोर होशील. हहा..हहा... तुझ्यात एवढी ताकत आहे का की तू मला घालवशील... हहा.. हहा... हाहाहाहाह"
आणि अचानक रेवाने स्वामीला झटका दिला. स्वामी उडून भिंतीवर आदळले. रेवा हवेत तरंगू लागली. आणि जोरजोरात हसू लागली. हळूहळू खोलीत वातावरण बदलू लागल. खोलीतील प्रतेक वस्तू थर थर कापू लागली. तड तड तड आवाज होऊ लागले. ताई खुपच भितीग्रस्त झाल्या. स्वामीना सावरायला त्या पुढे झाल्या पण स्वामीनी हातानेच त्यांना थांबायला सांगितले. स्वामी उठुन उभा राहीले. खुपच भयानक होता प्रकार.
आडवी तरंगत असलेली रेवा अचानक हवेतच उभी झाली. तिचे केस हवेत उडू लागले. तिची मान मागे झुकली.. कड कड कड आवाज येऊ लागला. तिचा चेहरा विद्रूप दिसत होता. स्वामी पुढे झाले. तशी रेवा त्यांच्या अंगावर गेली आणि स्वामीना पकडल आणि हवेत भिंतीसोबत धरल. स्वामी सुटका व्हावी म्हणून धडपडू लागले.
"स्वामी नको म्हटल होत ना मी. तू नाही ऐकल. तुला जाणुन घ्यायच आहे ना...तर मग जा.. जा कोपरगाव ला.. कळेल तुला सर्व काही. आणि कोपरगाव कुठे आहे ते या कांचनला चांगलच माहिती आहे."
रेवाने स्वामीना सोडून दिल आणि परत बेडवर आली.
"सूड आहे हा सूड.. कांचना.. मी असा नाही सोडायचो तुला." एवढ बोलून आत्मा अदृश्य झाली. रेवा धापकन बेडवर आदळली. रेवा बेशुध्द होती.स्वामी पडलेल्या ठिकाणीच स्वताला सावरत होते. सर्व शांत झाल. रेवा गाढ झोपली.
स्वामी आणि कांचन ताई खोली बाहेर आले.
"माई झाला प्रकार तुम्ही पाहिला आहे. काय आहे कोपरगाव.. आणि ती आत्मा सूड घेते आहे. काय आहे अस कोपरगाव मधे. तुम्ही मला सर्व सांगा. आणि आपल्याला आजच तिकडे जाव लागेल."
"स्वामी मी तुम्हाला सर्व सांगते. आणि हो हा आवाज मला माहिती आहे. आधी तुम्ही थोड आराम करा मग आपण बोलू. तुम्हाला खुप लागल आहे."

To be continued.....