कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 2
लेखक: शेखर...
भाग : 2
कांचन ताई बाहेर पडल्या तसे स्वामी जागचे उठले आणि आपल्या ध्यानस्थ खोलीमधे आले. ती काळी बाहुली हातात होतीच. ती बाहुली पाहूनच त्याना जाणवल होत कदाचित की काहितर भयानक आणि विपरीत प्रकार आहे हा. स्वामी त्यांच्या नेहमीच्या जागी बसले. समोर असणारया वर्तुळाकार जागेत मधोमध ती काळी बाहुली त्यानी ठेवली. ते वर्तुळ प्रेत आत्मा आणि शैतान यांच्या बद्दल माहिती मिळावी यासाठीच होत. स्वामिनी आता डोळे मिटले आणि मंत्र उच्चार चालू केले.
"ऊं नमः रुद्राय, नमः कालिकायै, नमः चंचलायै नमः कामाक्ष्यै नमः पक्षिराजाय, नमः लक्ष्मीवाहनाय, भूत-प्रेतादीनां निवारणं कुरू-कुरू ठं ठं ठं स्वाहा।"
त्यानी त्या कळ्या बाहुलीला डाव्या हातात घेतले आणि उजव्या हाताचे मधले बोट तिच्यावर ठेवले आणि पुन्हा मंत्र उच्चार केला.
"ऊं नमः रुद्राय, नमः कालिकायै, नमः चंचलायै नमः कामाक्ष्यै नमः पक्षिराजाय, नमः लक्ष्मीवाहनाय, भूत-प्रेतादीनां निवारणं कुरू-कुरू ठं ठं ठं स्वाहा।"
तोच त्याना एक भयानक झटका बसला आणि त्यांच्या हातातील बाहुली समोर उभा राहिली.
"हे स्वामी का तू मज जागवतो आहे. नको करु हा वेडेपणा. शांत मज आता राहूदे."बाहुली बोलू लागली.
"शांत आणि तू.. का तू तुझी दुनिया सोडून इकडे आला आहेस. काय आहे तुझा विचार."स्वामी.
"विचार माझा काहिच नाही. शांत मजला राहूदे. येणारे संकट आसमानी. तुला नाही ते समजायचे. मार्ग माझा मला जाऊदे. उगा आडथळा तू बनू नको."बाहुली.
"असे कसे मी तुला जाऊन देऊ. त्या मुलीने काय रे चुक केली. सत्य मला सांगशील का?"स्वामी.
"वाह रे वाह स्वामी बंधनात मज तू अडकवू पाहतो. पण असे होणे नाही. हाहाहाहा..." अस म्हणत ती बाहुली वरती छताकडे गेली आणि तिचा विस्फोट झाला.

स्वामीना पर्याप्त उत्तर न देताच ती आत्मा तिथून निघुन गेली खरी पण ती रेवा मधे वसली आहे हे स्वामीना कळले होते. जास्त वेळ घालवणे योग्य नाही. ही आत्मा नेमकी कोणाची हे शोधण जास्त गरजेच आहे अन्यथा अनर्थ होइल. मला आत्ताच जायला हव पण हा योग चांगला नाहीये. मी आत्ताच काही हलचाल केली तर आत्मा रेवाच्या जीवाला बर वाईट काहीही करु शकते. कांचनमाईना तस कळवल पाहीजे. स्वामीनी वेळ न घालवता लगेच फोन केला व झाला प्रकार कांचन ताईंना कळवला. सोबत काळजी कशी घ्यावी, काय करावे व काय नको हे सर्व स्वामीनी त्याना सांगितले. वेळ भयानक आहे आपण सावध असा आणि रेवाला जपा. हा सल्ला स्वामी द्यायला विसरले नाहीत.
सर्व प्रकार कळताच काही वेळ कांचनताई खुपच भितीग्रस्त झाल्या. या अगोदर असा प्रकार त्यानी कदाचित कधीच अनुभवला नवता. आणि हे आत्मा भुत हे तर मनात सुधा कधी आल नसेल त्यांच्या. पण स्वामी सांगत आहेत म्हणजे काहितर तथ्य हे असणारच. खुपच विचारात त्या मग्न होत्या. तोच रेवाच्या खोलीतून भयानक आवाज आला. तशा त्या भानावर आल्या. पळतच त्यानी रेवाची खोली गाठली. दर उघडले आणि समोर पाहिल. समोरच दृश्य पाहून त्या अवाक झाल्या. रेवा तिच्या बेडवर होती आणि अगदी तशीच हुबेहुब दिसणारी एक छबी हवेत अलगद तरंगत होती. ती छबी वेगवेगळे आवाज काढत होती. एकदम विचित्र असे ते आवाज. ती भाषा पण किती वेगळी होती. शब्द कळत न्हवते नेमके. कांचनताईचा भीतीने थरकाप उडाला होता. पण स्वामीनी सांगितले होते की ही आत्मा अजुन धोकादायक नाहीये. रेवाला सावरा ती आत्मा शांत राहील. शरीरातील संपूर्ण ताकद एकवटून त्या आत खोलीत गेल्या. ती छबी अजूनही तशीच होती. काळी बाहुली जशी होती अगदी तशीच. त्या रेवाच्या जवळ गेल्या. त्यानी रेवाच्या डोक्यावर हात फिरवला आणि हाक दिली..
"रेवा.. ये रेवा.. बाळ रेवा.. अग रेवा.. उठलीस का.. रेवा.."
तशी ती हवेत फिरणारी छबी हवेतून खाली आली आणि रेवाच्या शरिरात शरीक झाली. रेवा जागी झाली.
"अरे आई.. तू काय करते आहेस इथे. अग मला झोपूदे किती मस्त स्वप्न पाहत होती मी. शी बाबा तू आलीस आणि सर्व विस्कटले." रेवा.
"अग बाळ खुप वेळ झाला झोपली आहेस ना म्हणून जाग केल. बाकी काहीच नाही. चल उठ आता जरा खाऊन घे." एवढ बोलून ताई बाहेर आल्या.

झाला प्रकार पाहून त्या खुपच घाबरल्या होत्या पण रेवा समोर त्यानी स्वताला सावरल. बाहेर येताच स्वामीना सर्व काही कळवले त्यानी. स्वामीनी दिलेला धागा हातात बांधा आणि उद्या सकाळीच मी तिथे येतोय आपण बोलू असे सांगितले. रेवा फ्रेश झाली. बाहेर आली. ताईनी आणलेला धागा तिच्या हातात बांधला. आणि दोघी मायालेकी गप्पा मारत बसल्या.
To be continued.....