कथा: रात्र शेवटची...
लेखक: शेखर...
भाग : 1
लेखक: शेखर...
भाग : 1
दुपारचे बारा वाजले होते घड्याळात. ऊन्ह आता कडक झाली होती. वारा नावाचा प्रकारही न्हवता. रेवा तिच्या खोलीत बेडवर पडली होती. कानात हेडफोन टाकलेले. गाणी चालुच होती. आपल्याच नादात ती धुंध होती. पंखा जोरात चालू होता. गाणी चालू होती पण रेवाच्या मनात काही वेगळच चालल होत. तिने गाणी बंद केली. हेडफोन काढून टाकले. आणि अचानक उठुन बसली. एकसारखी ती आता समोर पाहत होती. तिच्या लक्षात काहितर आल. ती उठली आणि खाली आली.
"आई.. ये आई.. कुठे आहेस.. आई..."
"अग हो हो रेवा किती ओरडा करतेस.. आहे ना मी इथेच" आईने प्रतिसाद दिला
"अग काल मी तुला एक वस्तू दिली होती. कुठे आहे ती. आहे ना तुज्याकडेच"
"कोणती वस्तू? कसली?" आईने थोड प्रश्नार्थक नजरेन रेवाकडे पाहिल.
"अस काय करतेस आई. एवढ्यात विसरली तू. कालच तर दिली होती. अग ती काळी बाहुली. तू म्हटली ठेवते म्हणून. तुलाच तर दिली ना मी"
"ये रेवा असल काहीही तू मला दिली नाहीस तू. आणि कसली काळी बाहुली. गप्प बस. काहीही काय विचारते. झोप झाली नाही का तुझी"
"आई मी ठीकच आहे. तू विसरभोळी झाली आहेस. जाऊदे आपण नंतर बोलू"
"रेवा अग रेवा ऐक तरी..." एव्हाना रेवा पाय आपटत तिच्या खोलीत गेली होती..

रेवाची आई.. कांचन.. रेवा गेलेली पाहून त्यांच्या खोलीत आल्या. कपाट उघडल त्यानी आणि ती काळी बाहुली बाहेर काढली. त्यानी एक कॉल केला.'हल्लो स्वामीजी आहेत का? ठिक आहे मी येतेय. त्यानी ती बाहुली आपल्या साडीच्या पदरात लपवली आणि घरा बाहेर पडल्या. त्याना भीती वाटत होती. काहितर भयानक होत आहे. पण काय होत आहे ते समजत न्हवते. त्यानी रिक्षा पकडली आणि स्वामींचे घर गाठले. कारण आजवर जेव्हा काही संकट आले तेव्हा स्वामीच तर होते ज्यानी मार्ग दाखवला. यावेळी ही तेच काय तो मार्ग देतील. रेवा खुप बदलली आहे. तिच ते भयानक रुप एकदाच पाहिलय. बस तेव्हाच ठरवल स्वामीना भेटायच. पण ते बाहेरगावी गेले होते. आज परत आलेत.. दोन दिवस जे घडत आहे ते त्याना सांगितल पाहीजे... "अहो ताई.. स्टॉप आला तुमचा" त्या कणखर आवाजाने कांचन ताई भानावर आल्या. "अह्ह हो.. किती झाले" पैसे चुकते करुन त्या स्वामीच्या घरी आल्या. आत जाताच त्यानी स्वामीना प्रणाम केला. स्वामी शांतपणे बसले होते. कांचन ताईच्या येण्याने त्यांची तन्द्री भंग पावली.
"बोला माई कस काय येन केल आज. तुमची मुद्रा पाहता असे वाटते आहे की काहितरी विपरीत नक्किच घडले असणार. घरी सर्व कुशल मंगल आहे ना? एवढी चिंता अचानक तुमच्या भाळी का बरे दिसते आहे" स्वामी एक सुरात बोलते झाले.
"स्वामी.. काहीही कुशल मंगल नाहीये. गेले दोन दिवस झाले घरी वेगळाच प्रकार घडतो आहे. रेवा अचानक विपरीत वागत आहे. ते सर्व तुम्हाला सांगावे म्हणुन इकडे येणे केले"
"बोला माई.. जे काही घडले आहे ते सविस्तर सांगा"
"स्वामी दोन दिवसापूर्वी रेवा तिच्या मैत्रिणीच्या गावी गेली होती. तिकडून ती परत आली तेव्हापासून खुपच विचित्र वागत आहे. मधेच ती खुप काही अशा लोकांब्द्द्ल विचारते जी मलाच काय कोणालाच माहित नाहियेत. रात्र रात्र भर बडबडत असते. आणि हो अचानक ती गवळण देखील म्हणते. तो आवाज तिचा नसतोच तेव्हा. ती कधीच अशी विचित्र वागत न्हवती. आणि आता ती साडी नेसते.. जे तिला अजिबात आवडत नाही. तिच्या बाबतीत काहितर नक्कीच झाल आहे स्वामी. यावर काही मार्ग सुचवावा."
"माई तुम्ही जे काही बोलत आहात ते पाहता हा प्रकार थोडासा विचीत्रच वाटतो आहे मज. या सर्वाची पडताळणी करण्यास मला घरी यावे लागेल. पण आज लगेच नाही. उद्या मी तुमचे घरी येईन.. तेव्हाच मी सांगू शकेन. पण माई काळजी करु नये. भगवंत आपल्या पाठीशी सदैव आहे. मला एक सांगा काही वेगळी गोष्ट अथवा वस्तू येताना रेवाकडे होती का?"
"हो स्वामी.. ही काळी बाहुली तिने सोबत आणली आहे"अस म्हणत कांचन ताईनी ती पदरामधे लपवलेली काळी बाहुली स्वामीना दिली.
काही क्षण ती बाहुली पहात स्वामी निशब्द झाले...
"माई तुम्ही आता निघा. हा धागा सोबत घेउन जा. रेवाच्या हाती बांधा. आणि हो निश्चीत रहा. उद्या मी घरी लवकर येईन.. मार्ग नक्कीच मिळेल. हरी ओम. हरी ओम......"स्वामिनी धागा कांचन ताईना दिला..
कांचन ताई तिथुन घरी परतल्या......

To be continued...