वरती भाग 12 ची लिंक दिली आहे.
The_untold_truth_of_amezon
भाग_13
लेखक_शेखर
भाग_13
लेखक_शेखर
लॉरा खुपच विचारात पडली होती. तिच्या एक गोष्ट लक्षात आली होत. ती म्हणजे त्या चार्ल्सने जे काही सांगितले ते खरे आहे आणि आपल्याला इथे आणले गेले आहे. प्रश्न एकच होता की ती कोण? उत्तर खर तर सोप्प होते पण भीतीच्या सावटामधे ते उत्तर काही केल्या सापडत न्हवते. कितीतरी विचार एकाच वेळी तिच्या मनात थैमान घालू लागले होते. आपण इथे आलो... नाही आपल्याला आणल आहे.. ती एक आत्मा आहे.. तिचा साथीदार ही आहे... हे सर्व सांगणारीही एक आत्माच आहे.. अरे देवा.. पण हे सर्व कोण करत आहे... कस कळेल मला.. काही काही समजत नाहीये.. मला आता.. मी वेडी होईन अशाने.. आणि हा स्टीव.. याला काय कळणार आहे.. किती विचार एकाच वेळी करत आहे मी.. मनात लॉरा खूपच संघर्ष करत होती. अचानक तिच्या लक्षात काही आले आणि ते विचारायच म्हणून तिने स्टीव कडे पाहिले तशी ती एकदम स्तब्ध झाली. डोळे विस्फारुन ती त्याला पाहत होती. स्टीव जिथे उभा होता तिथेच खाली बाजुला एक छोटेस पाण्याच डबके होते. खर पाहता त्या डबक्यात स्टीवचे प्रतिबंब दिसायला हवे होते पण ते दिसत न्हवते. "ओह माय गॉड" लॉरा त्या क्षणी खुपच घाबरली पण तिने स्वताला सावरल. तिच्या लक्षात आल की समोर स्टीव नाहीये ती एक आत्मा आहे. पण तो मला काहीच करत नाहीये म्हणजे काही वेगळ नक्की असणार. लॉराने एक युक्ती लढवली. एक तर तिने जाणवू दिले नाही की तिला काहितरी समजले आहे आणि ती एकदम नॉर्मल व्हायचा प्रयत्न करु लागली.
लॉरा : स्टीव मला वाटत आपल्याला इथे कोणी का आणेना पण तो साथीदार बहुतेक आंद्रेच असावा.. तुला काय वाटते.
स्टीव : आंद्रे... हा.. हा.. तोच असणार... तुझ बरोबर आहे.. (लॉरा त्याच्या चेहर्यावरील हावभाव पाहत होतीच)
लॉरा : तेच ना.. तो इथलाच आहे.. त्याला इथली माहिती पण आहे.. तोच असणार..
स्टीव : तुझे बरोबर आहे लॉरा.. पण आता आपण काय करायचे..?
लॉरा : आपण आत जाऊयात.. सारा आणि जॉनला हे माहिती नाहीये की आंद्रे एक भुत आहे..
स्टीव : हो जाऊयाच आपण..

मनातल्या मनात स्टीव खुष होता. कारण त्याला जे करायला सांगितले होते त्याप्रमाणे आता सर्वच गुहेमधे आत एका जागी गोळा होणार होते. चला आपले काम फत्ते. लॉरा इथे मात्र खुपच विचार करु लागली. साथीदार तर मिळाला पण मुख्य कोण? तो विचार आता नको. आता पहिले सर्व सोबत होऊदेत मग बाकीचे पाहू. सोबत स्टीवचा बंदोबस्त केला पाहीजे..
स्टीव आणि लॉरा आता गुहेमधे आत निघाले..
************
स्टीव आणि लॉरा आता गुहेमधे आत निघाले..
************
इकडे सारा जॉन आणि तो आदिवासी तरुण आराम करत होते. सैमचा तर काहीच पत्ता लागला नाही या विचाराने सारा खुपच नाराज झाली होती. जॉन पायाला झालेल्या दुखपतींमुळे वेदनेने व्याकुळ झाला होता. जॉनला लवकरच हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज होती कारण खुपच जास्त प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामूळे जॉन कमजोर होत होता. तो आदिवासी तरुण मात्र त्या मोकळ्या जागेत फिरत होता.
अचानक एक मोठा दगड सरकवल्याचा आवाज झाला. तसे सारा आणि तो तरुण सावध झाले. कोणीतरी येत आहे हे त्यानी ओळखले होते. पायाचे आवाज येत होते पण दिसत तर कोणीच नाहीये. अरे बापरे हे काय नवीन आता. सारा आणि तो तरुण इकडे तिकडे पाहत होते. ईतक्यात जॉन मोठ्याने ओरडला. सारा.... सारा आणि तो तरुण धावत तिथे पोहचले आणि समोरचे चित्र पाहून ते अर्धमेले झाले. जॉन हवेत उलटा लटकला होता. त्याचे पाय दोन्ही हातानी घट्ट पकडले होते. ते फक्त हातच होते.. ते पण सैमचे हात.. सैमचे मुंडके तिथेच जॉनच्या शेजारी लटकत होते. सैमचे डोळे बंद होते. सैमचा चेहरा खुपच विद्रूप दिसत होता. पण तो सैमच आहे हे मात्र सहज ओळखत होते. ते पाहूनच सारा अर्धमेली झाली होती. आणि तो तरुण हमसून रडत होता. साराच्या मनात विचार आला की... यावेळी आपण चूकलो तर नाही ना...
जॉन अजून ओरडत होताच. सारा काहीच करु शकत न्हवती. ती फक्त एका जागी स्तब्ध झाली होती आणि ते सर्व पाहत होती. अचानक त्या गुहेत एक सावली इकडून तिकडे जोरजोरात फिरु लागली. ती येताच सैमच्या हातानी जॉनला सोडून दिले. जॉन तसाच खाली पडला. सारा लगेच धावत त्याच्या पाशी गेली.
सारा : जॉन.. तू ठिक आहेस ना...
जॉन : (वेदनेने व्हिवळत) अजून तरी आहे..
"तो अजून जीवंत आहे कारण मला त्याला ईतक्यात मारायचा नाहीये." एक कठोर आणि कर्णकर्कश आवाज त्या गुहेमधे उठला. चक्क हवेत लटकवलेल ते सैमच मुंडके बोलत होते. सारा आणि जॉन ते पाहून घाबरू लागले.
"सारा.. मी तुला बजावल होत इकडे नको येऊ. पण तू नाही ऐकले. तुम्हाला वाटत या दुनियेत भुत प्रेत आत्मा असले काही नसते. पण लक्षात ठेव ते असते. तुझा काकाही असाच आला होता इथे रहस्य शोधायला. तोच एक रहस्य बनला. इथे काय रहस्य आहे हे तुला नक्की कळेल पण ते सांगायला तुम्ही कोणी जीवंत नसाल."
सारा : कोण आहेस तू?
अचानक साराला एक जोरात चपराक बसली.
"चूप.. मधे मधे अजिबात बोलायच नाही. मी जे सांगतो आहे ते ऐकायच. तुझा हा साथीदार तर इथेच मरणार आहे. कसा ते तू पाहशीलच. पण अजून तुझे दोन साथीदार लॉरा आणि आंद्रे आणि सोबत हा आदिवासी... असे तुम्ही चौघे.. हो चौघेच.. कारण स्टीव तर ऑलरेडी मेला आहे.." हे ऐकुन सारा अचंबित झाली.
"तो तर तेव्हाच मेला जेव्हा हरवला होता. कारण एक मोहरा तर हवाच ना. आणि तो स्टीवच होता. फक्त तुम्हाला शंका नको म्हणून त्याचे शरीर जीवंत ठेवावे लागले."
सारा हे सर्व ऐकूण खुपच घाबरली. तिला जाणीव झाली की आपण खुप मोठ्या संकटामधे सापडलो आहे. पण आता विचार करुन काही उपयोग न्हवता.
"या गुहेचे रहस्य तुला माहिती करायचे आहे ना.. ऐक मग... इथले रहस्य हे आहे की गेली हजारो वर्षे ही गुहा आहे अशीच आहे आणि इथे आत राहणारे आम्ही किती छान रहात होतो. आम्ही या जंगलामधे खुप सुखाने रहायचो. किती छान होते हे जंगल. आमची सर्व जमात होती या गुहामधे. पण अचानक एक दिवस इथे बाहेरचे काही लोक आले तुमच्यासारखे आणि त्यानी विध्वंस केला आमच्या जमातिचा. अम्हाला नष्ट केल. खुप वाईट होता तो क्षण आमच्यासाठी. आम्हीही त्याना इथे कायमचे गाडले. तेव्हापासून आजवर कित्येक लोक आले इथे आणि ते इथेच मेले. कारण आम्ही त्याना जीवंत नाही सोडत. एक रहस्य शोधायला आलेले तुम्ही स्वता एक रहस्य बनून जाता हेच इथले रहस्य आहे. आणि हो हा रहस्यमयी खेळही आहे. जो आता सुरु झाला आहे. तुझ्याकडे वेळ आहे. तू धाव.. इथून बाहेर पड. स्वताला आणि बाकी सर्वाना वाचवायचा प्रयत्न कर. मी मारणार हे नक्की पण तू वाचवू शकतेस का बघ. हा खेळ सुरु झाला आहे. हाहाहाहा..."ती सावली अचानक नाहीशी झाली. सैमचे अवयव तिथेच खाली पडले. जॉन अचानक तडफडू लागला. त्याच्या डोळ्यातून.. कानातून.. तोंडातून.. रक्त बाहेर पडू लागले. त्याचे शरीर सुकू लागले. रुक्ष पडू लागले. सारा त्याच्यापासून दुर झाली. जॉनचे शरीर नष्ट होऊ लागले. सारा ते सर्व पाहत असताना रडू लागली. जॉनचे शरीर शेवटी पुर्ण नष्ट झाले....

आंद्रे तिथे आला. त्याने झालेला सर्व प्रकार पाहीला होता आणि तो आवाजही ऐकला होता.. प्रश्न आता एकच होता पुढे काय? आणि लॉरा कुठे आहे आणि कशी असेल?
क्रमशः...