वरती भाग 13 ची लिंक दिली आहे.
The_untold_truth_of_amezon
भाग_14
लेखक_शेखर
भाग_14
लेखक_शेखर
सैम झाला... जॉन झाला... एक आदिवासी तरुणही झाला.. स्टीव तर अगोदरच गेला आहे... उरले फक्त सारा.. आंद्रे... लॉरा.. आणि तो तरुण.. अमेझोन मधील गुहेचे एक रहस्य शोधायला आलेले हे सर्व आज मरणाच्या दारात उभे होते. त्याना ते माहिती ही झाले होते आणि तरिही ते काही करु शकत न्हवते.
*******
लॉरा आणि स्टीव आता सोबत चालत होते. गुहेच्या आतमधे ते चालले होते. बाकिच्या लोकाना शोधायला. लॉरा सावध होतीच कारण स्टीव हा एक आत्मा आहे आणि तो कधी काय करेल याची कल्पनाही ती करु शकत न्हवती. स्टीव पुढे चालत होता आणि लॉरा त्याच्या मागे. तिच स्टीवच्या प्रतेक हालचालीवर बारीक लक्ष होते. स्टीव आता हळुहळु त्याच्या मुळ रुपात येत होता. त्याचा त्याच्या हाताची नखे वाढत होती. पाय वेडेवाकडे होत होते. तो आता विद्रूप दिसू लागला. हे सर्व पाहून लॉरा सावध झाली होती. स्टीव आता पुर्ण एक शैतान झाला होता आणि ती रहस्यमय शक्ती आता त्याच्यावर पुर्ण हावी होत होती. त्याचे केस विस्कटलेले होते आणि ते लांबलचक झाले होते. डोळे एकदम लालबूंद.. चेहर्यावर सूरकत्या... डोळ्यातील बुबळे लालभडक दिसत होती.. कान थोडेसे पसरले होते... एकूण त्याचा अवतार हा एका सैतानासारखा झाला होता. अचानक त्या गुहेत एक सावली घिरट्या घालू लागली तशी लॉरा तयार झाली. तिला जाणवले की आता संकट जवळ आले आहे. समोर असणारा स्टीव आता योग्य वेळेची वाट पाहत होता. लॉराने पाहिले की, ती सावली इकडून तिकडे घिरट्या घालत होती. अचानक स्टीव एका जागी स्थिर झाला. तशी ती सावली स्टीवच्या त्या भयाण शरीरामधे समाविष्ट झाली..... ते पाहून लॉरा जोरात किंचाळली...
*******
इकडे आंद्रे सारापाशी पोहचला होता. झालेला सर्व प्रकार त्याने पाहिला होता. वेळ खुपच कमी आहे हे त्याने ओळखले.
आंद्रे : सारा आपल्याला इथुन आत्ताच निघायला हवे. ही गुहा खुपच भयानक आहे.
सारा : हो आंद्रे.. ही खुपच भयानक गुहा आहे. आणि स्टीव. तो ही एक आत्मा आहे. लॉरा त्याच्यासोबत आहे.
आंद्रे : मला वाटलेच होते. पण माझ्या ते लक्षात नाही आले. आपण लगेच इथुन निघूयात आणि लॉराकडे जाऊयात. तिला वाचवले पाहीजे.
सारा : हो.. चल लगेच..
सारा : हो आंद्रे.. ही खुपच भयानक गुहा आहे. आणि स्टीव. तो ही एक आत्मा आहे. लॉरा त्याच्यासोबत आहे.
आंद्रे : मला वाटलेच होते. पण माझ्या ते लक्षात नाही आले. आपण लगेच इथुन निघूयात आणि लॉराकडे जाऊयात. तिला वाचवले पाहीजे.
सारा : हो.. चल लगेच..
रडत रडतच सारा बोलत होती. भीतीने गारठलेली सारा कशीबशी स्वताला सावरत उठली. पुढे आंद्रे.. मग सारा.. आणि शेवटी तो तरुण असे तिघे लॉराकडे चालू लागले. आंद्रे ज्या मार्गाने आला तो मार्ग सुरक्षित होता त्यामूळे ते त्याच मार्गाने बाहेर पडले. चालत असताना मधेच त्याना कधी सैम तर कधी जॉनचा आवाज ऐकू यायचा. पण हे सर्व एक खेळ आहे हे लक्षात ठेवून तिघेही चालत होते. सारा मनोमन प्रार्थना करु लागली की लॉराला काही होऊ नये. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. अचानक त्याना लॉराच्या किंचाळण्याचा आवाज आला तसे आंद्रे आणि सारा एकमेकाकडे पाहू लागले. लॉरा संकटात आहे हे त्यानी लगेच ओळखले आणि ते आवाजाच्या दिशेने धावू लागले.
**********
स्टीवचे भयानक सैतानी रुप पाहूनच लॉरा भीतीने गारठली होती. पण जीवाच्या आकांताने काही मदत मिळावी म्हणून ती ओरडत होती. लॉरा तशीच ओरडा करत धावू लागली. आणि तिच्या मागुन तो सैतान चालू लागला. तो खुपच विचित्र आवाजात हसत होता. त्याच्या तोंडातून बाहेर आलेल्या दाताच्या सुळक्यातून रक्त बाहेर पडत होते. लॉरा धावत असताना तिचा पाय घसरला आणि ती जोरात पुढे कोसळली. त्यामधे तिचे कपाळ खुप जोरात एका दगडावर आपटले आणि त्यातून रक्त वाहू लागले. तिचा गुडघाही फुटला होता. ती तशीच उठली आणि लंगडत लंगडत ती पुढे चालली. एव्हाना तिने त्या सैतानाला चकवा दिला होता आणि परत पहिल्या मोकळ्या ठिकाणी ती आली होती. तिच्या कपाळामधून एकसारखे रक्त वाहत होते आणि गुडघा सुजला होता. चालणे खुपच कठीण आणि त्रासदायक झाले होते. ती थकली होती. शेवटी ती चक्कर येऊन खाली पडली.
********
सारा आंद्रे आणि तो तरुण पहिल्या जागी पोहचले. ते पुढे जाणार ईतक्यात आंद्रेने साराला अडवले आणि हातानेच खुण केली. आडोशाला राहूनच त्यानी पाहिले. लॉरा मोकळ्या जागेत मधोमध पडली होती. बहुतेक ती बेशुद्ध होती. तिच्या समोरच एक भयानक स्वरुपाचा माणुस होता जो अगदीच स्टीवसारखा दिसत होता पण त्याचे रुप हे सैतानासारखे होते. एक काळी सावली तिथेच घिरट्या घालत होती.
अशा परिस्थितीत पुढे जाणे खुपच धोकायदायक होते त्यामुळे ते तिघे तिथेच आडोशाला बसुन राहीले. लॉरा अजुनही बेशुद्ध होती. आता तो सैतान उठला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तसे सैमचे मस्तक तिथे हजर झाले. सैमचे हातही तिथे आले होते. त्या हातामधे पाणी होते. ते पाणी लॉराच्या तोंडावर मारताच लॉरा शुध्दीवर आली. पुसटशे डोळे उघडताच तिला समोर फक्त सैमचे मस्तक दिसले. ते पाहून तिच्या चेहर्यावर थोडा आनंद झाला पण डोळे पुर्ण उघडताच तिला समोर सैमचे फक्त मस्तक पाहून पुन्हा भोवळ आली. पुन्हा पाणी तिच्या तोंडावर मारले. लॉरा आता पूर्ण शुध्दीवर आली. ती उठली तसे तिने समोर तो सैतान पाहिला आणि भीतीने ओरडु लागली. त्या आवाजाने त्रासलेला तो सैतान झपकन पुढे आला आणि त्याने लॉराच्या तोंडात हात घालून तिची जीभच खेचून बाहेर काढली. ते पाहून सारा आंद्रे आणि तो तरुण भितीने थरथर कापू लागले. लॉराचा आवाज पुर्ण बंद झाला.
"किती आवाज करत होती. आता कशी शांत झाली. कोणी नाही येणार तुझा आवाज ऐकुन." तो खरडा आवाज खुपच भयानक वाटत होता. लॉरा आता निपचित पडली होती. त्या सैतानाने एका बाजुला पडलेली कुर्हाड त्याच्या हातात घेतली आणि तो लॉरापाशी आला. खाली बसुन त्याने लॉराचे डोके वर उचलले आणि आपले टोकदार दाताचे सुळे तिच्या मानेमधे घुसवले. तो तिचे सर्व रक्त पिऊ लागला. तशी लॉरा तडफड करु लागली. रक्त पिऊन झाल्यावर त्याने लॉराला तिथेच खाली सोडली आणि उभा झाला. हातात ती कुर्हाड घेतली आणि तो लॉराच्या शरीराचे तुकडे करु लागला.
"किती आवाज करत होती. आता कशी शांत झाली. कोणी नाही येणार तुझा आवाज ऐकुन." तो खरडा आवाज खुपच भयानक वाटत होता. लॉरा आता निपचित पडली होती. त्या सैतानाने एका बाजुला पडलेली कुर्हाड त्याच्या हातात घेतली आणि तो लॉरापाशी आला. खाली बसुन त्याने लॉराचे डोके वर उचलले आणि आपले टोकदार दाताचे सुळे तिच्या मानेमधे घुसवले. तो तिचे सर्व रक्त पिऊ लागला. तशी लॉरा तडफड करु लागली. रक्त पिऊन झाल्यावर त्याने लॉराला तिथेच खाली सोडली आणि उभा झाला. हातात ती कुर्हाड घेतली आणि तो लॉराच्या शरीराचे तुकडे करु लागला.
कितीतरी वेळ तो सैतान लॉराच्या शरीराचे तुकडे करत होता आणि मधेच ते तुकडे तो खात होता. ते सर्व पाहताना सारा आणि आंद्रे मरणयातनाच सोसत होते. एक वेळ असाही विचार त्यांच्या मनात आला की.. आपले काय होईल..? आता तिथे बसुन फक्त वाट पाहावी लागणार होती तो सैतान कधी जातोय याची....
क्रमश:....