शापित धनाचा फटका भाग १
सत्य कथन पंढरिनाथ महाडिक
*पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग*
माझ्या सहयोगी मित्रांनो आजचे सत्य कथन असे आहे कि आमच्या गल्लीतील विठ्ठल मंदिराच्या बाहेरच्या आवारात पत्र्यांच्या छोट्या खोल्या होत्या तेथील खोल्यांमध्ये दोन तीन गरीब कुटुंब राहात होती तीच लोक मंदिरातील साफसफाई दिवाबत्ती करीत असत तसेच धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी मदत करीत असत त्यापैकी एका खोलीत बाबूराव नावाचा एक वृद्ध माणूस एकटाच राहत होता पुण्यातील गल्लोगल्ली फिरून रेवड्या विकून तो आपला उदरनिर्वाह करीत असे गल्लीतील लोकांनी काही खायला दिले तर तो खात नसे तो स्वत: आपल्या हाताने चुलीवर जेवण बनवून खात असे तो सुध्दा विठ्ठलाचा भक्त होता गळयात तुळशीमाळ व कपाळी बुक्का अंगी सदरा व धोतर असा त्याचा पेहराव होता विठ्ठलाला रेवडीचा प्रथम नैवेद्य दाखवूनच तो विक्रीसाठी बाहेर पडत असे
एके दिवशी सकाळी त्यांच्या खोलीचे दार बंद असलेले पाहून शेजा-यांना आश्चर्य वाटले आणि ते त्यांना आवाज देऊ लागले हाकेला प्रतिसाद न मिळाल्याने उपस्थितांना शंका आली आंणि त्यांनी मंदिराच्या ट्रस्टीना पाचारण करण्याचे ठरविले त्यानुसार त्यांनी सर्कस व्हीला या बंगल्यात राहण्या-या धोत्रेताईंना बोलविणे केले धोत्रेताई ह्या अशिया खंडातील सर्कसीतील प्रथम रिंग मास्टर कै. दामोदर धोत्रे यांच्या पत्नी होत्या त्यांनी पोलिसांना पाचारण केले व खोलीचा दरवाजा तोडला आत पहाताच तर बाबुराव रात्रीच झोपेत मरण पावलेले आढळून आले होते पोलीसांनी रीतसर पंचनामा करून मृतदेह उपस्थितांच्या ताब्यात दिला बाबुरावांना कोणीही नातेवाईक नसल्यामुळे गल्लीतील लोकांनीच सर्व सोपस्कार पूर्ण केले काही दिवसांनी धोत्रे ताईंनी आजूबाजूचे दोन चार लोक बोलावून बाबुरावांची पत्र्यांची ट्रंक खोलली त्यात दोनचार कपडे व थोडीफार रोकड मिळाली हया सर्वांची त्यांनी एका कागदावर नोंद केली तेवढयात तिथे उपस्थित असलेल्या एका पंचाचे लक्ष चुलीवर गेले चुलीच्या राखेत त्याला काही तरी चमकलेले दिसले म्हणून त्याने राख हळूच बाजुला सारली तर तिथे सोन्याची वळ्याची अंगठी त्याला दिसली मग सर्वांनी ती चुलच उखडून टाकण्याचे ठरविले व त्याप्रमाणे चुल पुर्णपणे खोदली असता तर आपणास खोटे वाटेल चुलीच्या जागेतून शंभराच्यावर सोन्याच्या वळ्याच्या अंगठ्या व बारीक घडी घालून ठेवलेल्या शंभराच्या खूपशा नोटा मिळाल्या त्या सर्वांची रितसर यादी बनवून उपस्थित पंचांच्या सही साक्षीने ते धन ट्रस्ट मध्ये जमा करण्यात आले असो.
मला वाटत तो 1जानेवारीचा नवीन वर्षाचा पहिला दिवस होता वेळ संध्याकाळची होती गल्लीतील काही लोक घोळक्याने मंदिरात एकत्र जमली होती त्यात माझ्या आईलाही मंदिरात तातडीने येण्याचा निरोप आला होता आईसुद्धा लगबगीने मंदिरात पोहोचली मंदिरात विठ्ठला समोर धोत्रेताई धायमोकलून रडत होत्या आंणि बोलत होत्या माझ्या मुलाला वाचावा चूक मी केली आहे त्याची सजा माझ्या मुलाला नका देवु माझ्याकडे गडगंज संपत्ति असून मला मोह आवरता आला नाही मी सर्वांची नजर चुकवून बाबुरावची दोनचार सोन्याची वळी ढापली आणि त्याचा फटका माझ्या मुलाच्या प्राणावर बेतलाय मी बाबुराव आणि विठ्ठलाची माफी मागते असे म्हणून त्यानी हातातील सोन्याच्या वळीच्या अंगठ्या विठ्ठलाच्या पायापाशी ठेवल्या लोक संभ्रमित झाले होते कि घडल तरी काय? तर घडले असे होते की ज्या दिवशी बाबूरावच्या धनाची पंचांच्या साक्षीने मोजणी चालली होती त्यावेळी धोत्रेताईंनी पंचाची नजर चुकवून काही सोन्याची वळी ढापली होती आंणि त्याच रात्री बाबूराव धोत्रेताईंच्या स्वप्नात येऊन म्हणाले मी एक रेवडीविक्या उन्हातान्हात फिरून धन कमावले चुरमुरे व उरलेल्या रेवडया खाऊन मी माझे पोट भरले पै पै जोडून पैसा कमविला आणि तु माझे धन चोरले आणि ते सुद्धा सर्वांसमोर त्यामुळे माझा आत्मा लई तळमळतोय आणि आता मी सुद्धा तुझे धन चोरून तुझा आत्मा तळमळविणार आहे हे लक्षात ठेव स्वप्नातील ह्या प्रकाराने त्या झोपेतून खाडकन जाग्या झाल्या आणि खुपच भयभीत अवस्थेत त्या मुलाच्या रूममध्ये गेल्या तर तिथे त्यांचा मुलगा नव्हता मग त्यांच्या लक्षात आले कि तो तर पुणेकॅम्प येथे मित्रांकडे पार्टी करण्यासाठी गेलाय तो अजून कसा आला नाही म्हणून त्या चिंताग्रस्त होऊन आरामखुर्चीवर जाऊन पहूडल्या होत्या पहाटेचे चार वाजले होते आणि काही वेळाने टेबलावर ठेवलेला फोन खणखणला पलिकडून त्यांना सांगण्यात आले आपला मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मुलाची फटफटी(बाईक) केईम चौकातील रस्त्यावर लावलेल्या गरर्डल वर आदळून त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे आणि त्याला केईम हाॅस्पीटल मध्ये दाखल केले आहे हे ऐकूण त्यांच्या पायाखालची जमीनच दुभंगली आणि तात्काळ त्यांनी हाॅस्पीटलचा रस्ता पकडला तिथे त्यांना सांगण्यात आले की त्यांच्या मुलाच्या मेंदूला मोठी इजा झाल्यामुळे तो काही तासांचाच सोबती आहे हे ऐकूण त्यांचे डोकं सुन्न झालं होतं आणि मग त्यांना आठवल रात्रीच स्वप्न आणि त्यानी ठरविले सर्वांसमक्ष आपली चूक कबूल करायची व बाबूरावची माफी मागून विठ्ठलाच्या पायापाशी बाबूरावचे चोरलेले धन अर्पण करायच आणि त्याचसाठी त्या मंदिरात आल्या होत्या असो.
बाबुरावाच्या शापित धनाचा असा जबरदस्त फटका धोत्रे ताईंना बसला कि त्याच रात्री त्यांचा एकुलता एक मुलगा निधन पावला गडगंज संपत्ति असून सुद्धा थोडया मोहापोटी त्यांच्या कडून चुक झाली आणि बाबुरावाच्या तळतळाटाने त्यांचे अमुल्य धन हिरावून घेतले
म्हणून जीवनात सर्व सुख प्राप्त करा पण कोणाच्याही आत्म्याचा तळतळाट न घेता अन्यथा फार मोठी किंमत मोजावी लागेल
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
शुभंभवतु