🔹शापित_पेटीचे_रहस्य - भाग एक🔹
युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका (USA)..प्रचंड राजकिय व सामाजिक चढउतारांचे व धामधूमीचे अठरावे शतक संपुन नुकतेच एकोणिसावे शतक चालू झाले होते..या नव्या यूगात अमेरिकेतील जनजीवन आता बर्यापैकी स्थिरावले होते..तंत्रज्ञानाच्या नवनवीन शोधांमुळे मानवी जीवन आता सुखकर बनण्यास सुरूवात झाली होती..त्या एकोणिसाव्या शतकाच्या सुरूवातीच्या काळातील घटना आहे..🗽
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून अटलांटिक महासागरामार्गे युरोपच्या किनाऱ्याकडे एक भलेमोठे नवीन प्रवासी जहाज निघाले होते..त्या जहाजाची हि पहिलीच दुरची ट्रिप होती..
अनेक सूखसोयींनी संपन्न असे त्याकाळातील ‘जगातील सर्वात मोठ्या जहाजांपैकी एक’ अशी त्या जहाजाची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात आली होती.. त्यामुळे जगभरात त्या जहाजाविषयी मोठी उत्सुकता पसरलेली होती..
अनेक रेस्टॉरंट, शॉप्स, डिस्को क्लब,इन्टरटेनमेंट शो हाऊस,स्विमींग पुल्स, सी वॉच डेक्स पॉइंट्स अशा सुखसोयींनी भरगच्च अशा त्या जहाजातून दूरवरचा प्रवास करणे म्हणजे स्वर्गसुखच.🛳️
अमेरिका आणी यूरोपमधील जवळपास अडीच हजार प्रवासी त्यामधून प्रवास करत होते..आणी सोबतच सहाशेच्या आसपास स्टाफ व कर्मचारी पण.

आज स्वच्छ सुर्यप्रकाश असल्याने बोटीवर आनंदी आणी उत्साही वातावरण होते..काहीजण रेस्टॉरंटमधील स्वादिष्ट खाद्यपदार्थांवर ताव मारत होते..काही स्री पुरूष स्विमींग पुलमध्ये उतरून पोहण्याचा आनंद घेत होते..गोरीपान आणी स्मार्ट लहान लहान मुले ईकडे तिकडे धावताना खेळताना दिसत होती..काही रसिक प्रेक्षक जहाजावरील छोट्या थिएटरच्या स्टेजवर चालू असलेल्या नाच गाण्यांचा आनंद घेत होते..👯
तर काही तरुण मुले मुली उगीचच काही कारण नसताना जहाजावर इकडे तिकडे भटकत होते.
तर काही तरुण मुले मुली उगीचच काही कारण नसताना जहाजावर इकडे तिकडे भटकत होते.
या अलिशान जहाजाचे कँप्टन ‘स्मिथ’ नावाचे एक माजी नेव्ही ऑफिसर होते.. दररोजच्याप्रमाणे आजपण त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये सर्व डिपार्टमेंटच्या अधिकार्यांना नियमीत मिटींग साठी बोलावले होते..सर्वांना आवश्यक त्या सुचना देऊन आणी त्यांचे म्हणणे ऐकुन काहीवेळातच स्मिथने मिटींग संपवली..सर्व अधिकारी आपआपल्या विभागाकडे परतले..
डेव्हिडपण कँप्टनच्या केबिनमधून बाहेर पडला आणी थेट जहाजाच्या मागील शेवटच्या डेकवर गेला..
त्या अलिशान जहाजाच्या इंजिनिअरिंग विभागाची संपुर्ण जबाबदारी डेव्हिड वर होती...तीन दिवसापुर्वी जहाज न्यूयॉर्कच्या किनार्यावरून हलल्यापासून इंजिनिअरिंग विभागातील सर्व इंजिनिअर आणी कर्मचारी यांच्यावर जातीने लक्ष ठेवणारा डेव्हिड आता सर्व काही सुरूळीत चालू असल्याने आज काहिसा निवांत वाटत होता.

एका हातात बियरचा ग्लास, एका हातात पेटती सिगार आणी नजरेसमोरचा अथांग निळा समुद्र..🍷
अशा वातावरणातला एकांत डेव्हिडला नेहमी हवाहवासा वाटायचा..आजही तो शांत महासागराकडे एकटक पाहत सिगारचे झुरके घेत होता..
आणी त्याला हव्याहव्याशा वाटणार्या एकांताचा आनंद घेत होता..
विचारात मग्न असल्याने त्या बोटीवरील एक कर्मचारी कधी त्याच्या मागे येऊन उभा राहिला हे पण त्याला समजले नाही..

“गुड आफ्टरनुन सर”
अचानक आलेल्या या आवाजाने डेव्हिडने मागे वळून पाहिले..
जहाजावर काम करणार्या सामान्य खलाशासारखा वाटणारा आणी त्याच वेशभुषेमधला एक अश्वेतवर्णीय तरुण त्याच्या मागे उभा होता..मध्यम उंची, लालसर सावळा वर्ण,डोक्यावर दाट कुरूळे केस, मोठे ओठ आणी काळेभोर पण भेदक डोळे असणारा तो तरुण डेव्हिड कडेच रोखून पाहत होता.👮

पण तो असा अचानक आलेला बहुतेक डेव्हिडला रूचले नसावे..एकांत भंग झाल्याने त्या तरुणाकडे पाहताना डेव्हिडच्या गोर्या कपाळावर आठ्या पडल्या..पण चेहर्यावर राग न दाखवता तो नरमाईने बोलला.
“गुड आफ्टरनुन.. कोणत्या डिपार्टमेंटला काम करतोस तु? तुला याआधी कधी पाहिले नाही मी जहाजावर”
“मी.. स्टोअरमध्ये असतो सर” तो तरुण अडखळत उत्तरला.
“स्टोअर डिपार्टमेंट..पण ते तर जहाजाच्या पलीकडील टोकाला आहे..मग तु ईथे काय करत आहेस..माझ्याकडे काही काम आहे का तुझे?”
“असच..सहज.. एकदा सगळ्या जहाजाला एक फेरफटका मारून यावे असे वाटले...म्हणुन सकाळपासुनच फिरत होतो..संपुर्ण जहाज पालथे घातले खुप छान वाटले मला तर,एखादे तरंगणारे शहरच असल्यासारखे”⛴️
“हो मग..जगातले सर्वात मोठे प्रवासी जहाज आहे हे..पण या जहाजाचेपण काही नियम आहेत..नवीन आहेस बहुतेक तु? येथे काम करणाऱ्या कर्मचार्यांना आपल्या डिपार्टमेंटच्या बाहेर फिरणे अलाउड नाही, याचीपण माहिती नाही वाटते तुला?” डेव्हिडचा आवाज थोडासा चढला होता.
“माहित आहे सर..सगळे नियम माहित आहेत..पण एकदा हे अलिशान जहाज समुद्रात बुडल्यानंतर हे सर्व वैभव पुन्हा पाहायला मिळाले नसते ना..म्हणुन जहाज बुडण्याआधी एकदा शेवटचे पाहुन घेत होतो..
पण पाहिल्यानंतर असे वाटायला लागले कि नसते पाहिले तर बरे झाले असते...काय ती भव्यता आणी चकचकाट..प्रवास करणारे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे हजारो प्रवासी..खेळणारे लहान लहान मुले आणी इकडे तिकडे उत्साहाने फिरत असलेल्या स्रिया यांना पाहून कसेतरीच वाटले..त्या बिचार्यांना तर त्यांच्या भविष्यात काय वाढुन ठेवले आहे याची कल्पना पण नाही..”😶

तो तरुण डेव्हिडच्या डोळ्यात टक लावून पाहत बोलत होता.
पण त्याचे हे बोलणे ऐकून डेव्हिडचा पारा चढला..
पण त्याचे हे बोलणे ऐकून डेव्हिडचा पारा चढला..
“शटअप..! यु इडियट..! तुला या जहाजाची क्षमता आणी अँडवान्स सेफ्टी टेक्नोलॉजी माहित नाहीये म्हणुन तु मुर्खासारखी बडबड करत आहेस..एक लक्षात ठेव..काही जरी झाले ना तरी हे जहाज कधीच बुडू शकत नाही “😡
डेव्हिड रागाने थरथरत बोलत होता..पण त्याला रागावलेला पाहून तो तरुण मोठमोठ्याने हसू लागला..थोड्यावेळाने बळेच हसणे आवरत तो पुढे बोलू लागला,
डेव्हिड रागाने थरथरत बोलत होता..पण त्याला रागावलेला पाहून तो तरुण मोठमोठ्याने हसू लागला..थोड्यावेळाने बळेच हसणे आवरत तो पुढे बोलू लागला,
“ओके..ओके सर..मी एक अशिक्षित आणी सामान्य माणूस आहे..मला खरोखरच या जहाजाची क्षमता माहिती नाहीये...पण या जहाजाला बुडवू शकणारी एक शक्ती या जहाजावर आहे याची मात्र मला माहिती आहे.. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका..
पण हे विशाल जहाज बूडण्यापासुन वाचावे असे मला आता वाटायला लागलेय ..म्हणुन फिरत असताना या एकांतात तुम्हाला पाहिले आणी जहाज वाचवण्याची एक शेवटची संधी तुम्हांला द्यावी असे मला वाटले..म्हणून मी तुमच्याकडे आलो”

त्याचे बोलणे ऐकून डेव्हिडने अर्धवट जळालेली सिगार समुद्रात फेकून दिली..🥃बियरचा उरलेला ग्लास एका घोटात रिकामा करून खाली ठेऊन दिला आणी लक्षपूर्वक पुढे त्याचे बोलणे ऐकू लागला.
“तुम्हाला माहिती असेलच कदाचित, या जहाजाच्या स्टोअरमध्ये एक अतिसुरक्षित सेक्शन आहे..त्याठिकाणी काम करणार्या कर्मचार्यां शिवाय इतर कोणालाही तिथे प्रवेश करता येत नाही.. कारण फक्त अतिगोपणीय सरकारी वस्तु किंवा कागदपत्रे आणी दूर्मीळ चीजवस्तुचीच आयात निर्यात करण्यासाठी ते सेक्शन राखीव ठेवण्यात आलेले आहे..त्या सेक्शनमध्ये एक लोखंडाची मोठी पेटी/संदूक ठेवलेली आहे.📦
जरी ती पेटी दिसायला सामान्य वाटत असली तरी ती सामान्य नसून शापित पेटी आहे..
जर तुम्हांला वाटत असेल हे जहाज काही दिवसानंतर सुखरूप पणे यूरोपच्या किनाऱ्याला लागावे तर तुम्हांला ती पेटी आजच्या आज समुद्रात फेकून द्यावी लागेल..नाहीतर ती पेटी या जहाजासहित सर्व प्रवाशांना घेऊन समुद्रतळाला जाईल हे निश्चित”

त्या काळ्यासावळ्या तरुणाचे हे आत्मविश्वासपुर्वक बोलणे ऐकून डेव्हिड पण क्षणभर चकित झाला..हा काळा तरुण एकतर वेडा असावा किंवा कोणीतरी आपली गंमत करण्यासाठी त्याला आपल्याकडे पाठवलेले असावे असे त्याला वाटुन गेले..
जरी शापित वगैरे गोष्टी वर माझा अजिबात विश्वास नसला
तरी कारण काहीही असो पण त्याचे म्हणने नक्की काय आहे हे एकदा आपण ऐकूनच घेऊ..जर हा वेडा असेल तर त्याच्या डिपार्टमेंटच्या अधिकार्यांच्या ताब्यात त्याला सोपवू ते पाहतील ह्याचे काय करायचे ते.. आणी जर मुद्दामहून आपली गंमत करत असेल तर ह्याला आपणच धडा शिकवू असा विचार डेव्हिडने केला..👈

“बर..ठिक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे जहाज वाचवण्यासाठी आपण ती शापित पेटी समुद्रात फेकून देऊ..पण त्या पेटीमध्ये नक्की काय ठेवलेले आहे ? आणी ती पेटी शापित कशी काय झाली हे मला आधी समजल पाहिजे..मग मी ठरवेल त्या पेटीचे काय करायचे ते”
डेव्हिडने आपल्या बोलण्यामध्ये इंटरेस्ट दाखवला हे पाहुन त्या तरुणाला काहीसे समाधान वाटले आणी तो डेव्हिडला त्याला माहित असलेले #शापित_पेटीचे_रहस्य उलगडून सांगू लागला..
●●●●●●●●●●●
बर्याच वर्षापुर्वीची घटना होती ती..अमेरिका खंडात गेल्या काही शतकांपासून चालू असलेला मुळनिवासी रेड इंडियन आदिवासी जमाती विरूद्ध गोरे यूरोपियन वसाहतवादी यांच्यामधला रक्तरंजित संघर्ष आता जवळपास संपुष्टात आला होता.⚔️
अत्याधुनिक शस्त्रशास्त्र पारंगत महत्वकांक्षी यूरोपियन लोकांसमोर पारंपरिक शस्त्रांनी लढणारे रेड इंडियन कधीही स्वताचा टिकाव धरू शकलेच नव्हते..जवळपास सर्व मैदानी रहिवासी ईलाक्यांवर आता गोर्या युरोपियन लोकांचा कब्जा झाला होता..तसेच त्यांनी आता स्वताला यूरोपियन साम्राज्यापासुन वेगळे करून ‘अमेरिका’ हा एक स्वतंत्र देशपण घोषित केला होता.🗽

हजारो वर्षापासून पिढ्यानपिढ्या अमेरिकेच्या भुमीवर राहत असलेले रेड इंडियन आता विस्थापित झाले होते..सततच्या लढायांमध्ये मोठ्या प्रमाणावर मारले जात असल्याने त्यांचे अस्तित्वच संकटात सापडले होते.. सामुहिक नरसंहारापासून वाचलेल्या काही रेड इंडियन जमाती आता दूर जंगलामध्ये आणी दुर्गम प्रदेशामध्ये वस्ती करून स्वताचे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते🏕️
क्रमश...
©लेखक - Dnyanesh W.
©लेखक - Dnyanesh W.