🔹शापित_पेटीचे_रहस्य🔹भाग - दोन.
उत्तर अमेरिकेतील एक प्रांत अँरेजोनाच्या पहाडी भागामध्ये अशीच एक रेड इंडियन आदीवासींची छोटीशी वस्ती होती.
अत्यंत दूर्गम भागात असल्याने शक्यतो तिकडे बाहेरचे सहसा कोणी जात पण नव्हते..बाह्य जगापासून दूर असे ते आदीवासी जंगलात शिकार आणी शेती करून आपली उपजीविका चालवत होते.🗿त्यांच्या जगात ते खूश पण होते..पण एके दिवशी त्यांच्या खुशीला ग्रहण लागले.

अमेरिकन लष्करातील एक धाडसी अधिकारी ‘रिचर्ड’ आपल्या दोन सहकार्यासोबत घोड्यावर बसून अँरेजोनाच्या डोंगर दर्यातुन निघाला होता..🏇
प्रवास करत असताना एका टेकडीजवळ त्याला तेथे दोन लहान ‘रेड इंडियन’ मूले खेळत असताना दिसले..रिचर्डने जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या गळ्यामध्ये काही धातूंचे आभूषणे होती आणी त्याचबरोबर एक चमकणारा मोठा मणीपण होता..चमकदार निळ्या रंगाचा तो मणी मोठ्या हिर्यासारखा तेजस्वी दिसत होता..रिचर्डने त्या मुलांकडे त्यांच्या गळ्यातील मण्यांची मागणी केली..पण मुलांनी नकार दिला.

त्या मुलांना इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता..आणी त्यांची पारंपरिक भाषा रिचर्डला अवगत नसल्याने त्या मुलांना रिचर्डचे नेमके म्हणणे पण समजत नव्हते..खूप वेळ खाणाखुणा करूनही ते मुले आपल्या गळ्यातील मणी त्यांना द्यायला तयार होत नव्हती..
शेवटी रिचर्डने कंटाळून कंबरेची रिवॉल्वर बाहेर काढली आणी त्या दोन्ही मुलांना गोळ्या घालून ठार केले.🔫
मोठ्याने किंचाळत ते मुले खाली लाल मातीमध्ये कोसळले.. पण त्यांचा आवाज ऐकायला त्या तीन सैनिकाशिवाय तिथे कोणच नव्हते..रिचर्डने जवळ जाऊन त्यांच्या गळ्यातील निळे मणी खेचून काढले आणी निरखून पाहु लागला..ते मोठ्या आकाराचे मौल्यवान हिरे पाहून त्याचे डोळे विस्फारले.

“ओह माय गॉड..’ब्लू डायमंड’..या साध्या जंगली मुलांकडे असे महागडे किमती हिरे आहेत..ईथे जवळपासच कुठेतरी रेड इंडियन लोकांची एखादी वस्ती असली पाहिजे..चला शोधून काढू ..तिथे अजूनही हिरे असतील”💎
रिचर्ड आणी त्याचे दोन साथीदार त्या डोंगरामध्ये मानवी वस्ती शोधू लागले..खूप वेळ शोधल्यानंतर त्यांना त्या जंगलातील एका उंच टेकडीच्या वर ती वस्ती दिसली..पन्नास साठच्या आसपास कच्ची घरे होती तिथे..रिचर्डने दूरूनच सर्व निरीक्षण केले. तिथे माणसांची हालचाल त्याला जाणवली.
जरी त्यांच्याकडे अजून हिरे असले तरी आता आपण तिघे जणच आहोत त्यामुळे भलते धाडस करण्यापेक्षा काही दिवसांनी जास्त सैन्य घेऊन येऊ असे त्या तिघांचेही मत ठरले..

त्या टेकडीचे नेमके ठिकाण आणी आजुबाजूच्या नैसर्गिक खाणाखुणा त्यांनी पक्या लक्षात ठेवल्या..परतीच्या वाटा पण लक्षात ठेवत दोन दिवस घोड्यावरुन प्रवास करत करत ते 'फोनिक्स'ला त्यांच्या लष्करी मुख्यालयात पोहोचले..तिथे गेल्यानंतर रिचर्डने त्याच्या वरिष्ठ अधिकार्याला ते हिरे दाखवले आणी अँरेजोनाच्या त्या पहाडी प्रदेशातील त्या कबिल्यावर लष्करी कारवाई करण्याची परवानगी मिळवली.🤺
पुढच्या आठवड्यात शंभर घोड्यांवर शंभर बंदुकधारी गोरे जवान, आवश्यक सामान, दारूगोळा वाहण्यासाठी काही काळे गुलाम आणी रेड इंडियन जमातींची भाषा अवगत असलेला एक दूभाषक घेऊन रिचर्ड मोहिमेवर निघाला..रिचर्ड आघाडीवर राहून सर्वांचे नेतृत्व करत होता..पहाडी भागातुन अनेक डोंगर दर्या ओलांडून सैन्य तुकडीला तिसर्याच दिवशी तो त्या वस्तीजवळ घेऊन आला.
काही अंतरावर थांबून त्याने सर्वांना व्यवस्थित प्लँन समजावून सांगीतला..त्या जंगली लोकांना संशय आला तर ते पळून जातील किंवा त्यांचे दागिने लपवून ठेवतील हे त्याला माहित होते त्यामुळेच तो सर्वांना योग्य ती खबरदारी घेण्यास बजावत होता.🎩

त्या संपूर्ण टेकडीला घेराव घालून ते बंदुकधारी सैन्य हळूहळू त्या वस्तीकडे सरकू लागले..वस्तीवरील आदिवासींना या सर्व प्रकाराची जराही कल्पना नव्हती..त्यांचे दैनंदिन व्यवहार रोजच्यासारखाच चालू होता..जेव्हा ते पुर्णपणे घेरले गेले तेव्हाच त्यांना कल्पना आली..पण तेव्हा पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते.
त्या घोड्यावरील सैन्याचा आता संपुर्ण वस्तीला घेरा पडला होता..रिचर्डने हवेमध्ये फायरिंग चा ईशारा दिला..सैनिकांच्या बंदूका हवेमध्ये गर्जू लागल्या..सगळीकडे आरडाओरडा आणी गोंधळ होऊन काहीवेळातच सर्वजण आपापल्या घरामध्ये दरवाजे बंद करून लपून बसले..तरूण आदीवासी स्री, पुरूषांनी घरातील भाले आणी धनुष्यबाण हातात घेतले..🏹
फायरिंगच्या कानठाळ्या बसवणार्या आवाजाने घराघरामधून लपून बसलेल्या आदिवासींच्या जीवाचा थरकाप उडाला..लहान मुले घाबरून वडीलधाऱ्यांना चिकटून बसले..
फायरिंग थांबताच सगळीकडे भयाण शांतता पसरली..रिचर्डसोबत आलेला दुभाषक हातात मोठा भोंगा घेऊन घोड्यावरुन उतरला..आणी आदिवासींच्या भाषेमध्ये मोठ्या आवाजात त्याची चेतावणी सांगू लागला..🔊

“रेड इंडियन जंगलींनो..तुम्हच्या संपुर्ण वस्तीला अमेरिकन सैन्याने घेराव घातलेला आहे, कोणीही हल्ला करण्याची किंवा पळून जाण्याची हिंमत करू नये..स्वताचा जीव प्रिय असेल तर तुमच्या कबिल्याचा जो कोणी प्रमुख असेल त्याने लवकरात लवकर बाहेर यावे..नाहीतर आताच हवेमध्ये झालेला गोळीबार तुमच्या दिशेने होईल..तुमच्या घरांना आग लावली जाईल..हाच शेवटचा ईशारा समजा”
काहीवेळातच एक काटक शरीरयष्टीचा मध्यमवयीन आदिवासी व्यक्ती एका घरातुन बाहेर आला.. लांब कुरळे केस आणी डोक्यावर रंगीत पक्षांच्या लांब पिसांचा मुकूट घातलेला होता..गळ्यामध्ये इतर ओबडधोबड दागिन्यांसोबत निळ्या मण्यांची माळपण चमचमत होती..आणी कंबरेला एक धारधार कट्यार लटकवलेली होती.🗡️
रिचर्डने दुभाषकाला इशारा करताच तो पुढे झाला..आणी त्या कबिल्याच्या प्रमुखाला त्यांचा ईथे येण्याचा उद्देश सांगितला..
”सर्व जंगली स्री- पुरूषांनी आपापल्या गळ्यामध्ये आणी घरांमध्ये असलेले निळे मणी मुकाट्याने आमच्या स्वाधीन करा..तसेच तुमच्याकडे ते कोठून आले हे पण सांगा.. नाहीतर मरणाला तयार राहा”
असा इशारा ऐकून त्या आदिवासीच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या..तो तावातावाने हातवारे करून मोठ्या आवाजात खूप वेळ बोलत होता..
रिचर्डचा राग हळूहळू वाढत चालला होता..त्याने त्या मोरक्याला मध्येच थांबवून दूभाषकाला तो नक्की काय सांगत आहे हे विचारले..
दूभाषकाने सांगितले कि, “हे जंगली लोक त्यांच्या गळ्यातील हिर्यांना त्यांच्या ‘देवतेचे रत्न’ मानतात..गेल्या कित्येंक पिढ्यांपासून ते हे मणी गळ्यात परिधान करत आलेले आहेत..त्यांच्या पुर्वजांकडे हे मणी कोठून आले हे कोणालाच माहिती नाही..पण हिच त्यांच्या कबिल्याची ओळख आहे..आणी ते एकवेळ जीव देणे पसंत करतील पण गळ्यातील मणी जिवंतपणी कदापीही देणार नाहीत”💎
दुभाषकाचे बोलणे ऐकून रिचर्डच्या चेहर्यावर क्रूर हास्य उमटले..
“ठिक आहे..या मुर्ख जंगली लोकांची मरायचीच ईच्छा आहे तर त्याला आपण तरी काय करणार?”
“ठिक आहे..या मुर्ख जंगली लोकांची मरायचीच ईच्छा आहे तर त्याला आपण तरी काय करणार?”
कबिल्याचा प्रमुख असणारा तो आदिवासी हात जोडून गयावया करत करत रिचर्डच्या घोड्याच्या जवळ आला..आणी डोळ्याची पापणी लवायच्या आत अंत्यत चपळाईने त्याने कंबरेचा खंजीर काढून रिचर्डच्या अंगावर एखाद्या चित्यासारखी झेप घेतली..
रिचर्ड काहिसा गडबडला आणी त्याच्या दिशेने येणाऱ्या खंजीराच्या वारापासून बचाव करण्यासाठी झटक्यात मागे सरकला..पण रिचर्डच्या शेजारच्या घोड्यावर बसलेला एक चपळ गोरा सैनिक अशा अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीसाठी तयारच होता..त्याची बंदूक आधीपासूनच त्या आदिवासी वर रोखलेली होती..त्याने लगेचच ट्रिगर दाबुन बंदूकितून गोळ्या झाडायला सुरुवात केली..रिचर्ड आणी त्याच्या सहकार्याच्या एकत्रित गतीमान प्रतिक्रिये मुळे रिचर्डच्या काळजाच्या दिशेने वेगाने येत असलेला त्या आदिवासीचा खंजीर त्याच्या डाव्या हाताच्या दंडात घुसला..रिचर्ड थोडक्यात बचावला होता..पण कबिल्याचा प्रमुख नाही वाचू शकला..अंगात गोळ्या शिरल्याने तो तसाच रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला.🔫

रिचर्डने वेदनेने विव्हळत आपल्या उजव्या हाताने डाव्या दंडात घूसलेला खंजीर उपसून काढला..त्याचे डोळे आता आग ओकत होते..
“सैनिकांनो..ह्या जंगली लोकांच्या वस्तीचे पुर्ण नामोनिशाण मिटवून टाका..एकही जंगली नाही वाचला पाहिजे” त्याने मोठ्याने ओरडून सैन्याला आदेश दिला.
“सैनिकांनो..ह्या जंगली लोकांच्या वस्तीचे पुर्ण नामोनिशाण मिटवून टाका..एकही जंगली नाही वाचला पाहिजे” त्याने मोठ्याने ओरडून सैन्याला आदेश दिला.
एक गोरा सैनिक लगबगीने घोड्यावरुन खाली उतरला..जमीनीवर खाली पालथा पडलेल्या कबिल्याच्या प्रमुखाच्या पाठीवर बुटाचा पाय देऊन त्याच्या गळ्यातील मण्यांची माळ त्याने जोराचा हिसका मारून तोडुन काढली..तेवढ्यात अचानक त्या वस्तीवरील एका घराचा दरवाजा उघडला..आणी त्या घरातून एका आदिवासी तरुणाने अंत्यंत वेगाने एक धारधार भाला त्या सैनिकाच्या दिशेने फेकला..पोटात आरपार घुसलेल्या भाल्याने तो गोरा सैनिक जागेवरच कोसळला.
“फायर..” आदेशाची वाट पाहत असणाऱ्या गोर्या सैनिकांना रिचर्डची एवढी सुचना पुरेशी होती..
चारही बांजूनी बंदूका त्या वस्तीच्या घराघरांवर आग ओकू लागल्या..घरांच्या दरवाजे आणी खिडक्यांमधून पण सैनिकांच्या दिशेने विषारी बाणांचा वर्षाव चालू झाला..काही सैनिक बाण लागून घोड्यावरुन खाली कोसळायला लागले त्यामुळे लगेच रिचर्डने सर्वांना काही अंतर मागे जाऊन बाणांच्या टप्यापासून दूर राहायला सांगीतले.🏹

सैन्याने काही अंतरावरून गोळीबार चालू केला..गोळ्यांच्या मार्याने हळूहळू घरांची पडझड होऊ लागली..सर्व वातावरणात धुर, दारूचा तीव्र वास पसरला..मधूनच कोणाचीतरी किंकाळी ऐकू यायची..मध्येच कोणीतरी पळत पळत घराच्या बाहेर पडायला बघायचे आणी गोळी लागून जमीनीवर कोसळायचे..बराच वेळ चकमक चालल्यानंतर आता घरांमधून बाण बाहेर येणे बंद झाले होते..तिथे आता कोणीही जिंवत उरले नव्हते..त्या पडक्या झडक्या..अर्धवट उरलेल्या घरांमधून आता बंदूकधारी गोरे फिरू लागले..आदिवासी स्री-पुरूष, लहान मुले यांच्या म्रुतदेहावरील निळ्या हिर्यांचे दागदागिने ओरबाडून काढत होते..रिचर्डच्या अपेक्षेपेक्षा जास्तच हिरे होते त्या वस्तीवर..त्याने सोबत आणलेली ती लोखंडी पेटी त्या निळ्या हिर्यांनी गच्च भरली💎
पण त्या हिर्यांवर त्या रेड इंडियन लोकांच्या रक्ताचे लालभडक डागपण पडले होते पण त्याकडे लक्ष द्यायला रिचर्डला वेळच नव्हता..तो स्वतावरच खूष झाला होता जमा झालेला तो अमाप खजिना पाहून.
पण त्या हिर्यांवर त्या रेड इंडियन लोकांच्या रक्ताचे लालभडक डागपण पडले होते पण त्याकडे लक्ष द्यायला रिचर्डला वेळच नव्हता..तो स्वतावरच खूष झाला होता जमा झालेला तो अमाप खजिना पाहून.
गोर्या सैनिकांसोबत आलेल्या काळ्या गुलामांनी काही वेळानंतर त्या वस्तीवरील सर्व घरे आगीने पेटवून दिली.
रेड इंडियन लोकांच्या आणखी एका वस्तीचे अस्तित्व इतिहासजमा झाले होते..🗿
रेड इंडियन लोकांच्या आणखी एका वस्तीचे अस्तित्व इतिहासजमा झाले होते..🗿
क्रमश..
©लेखक- Dnyanesh W.