भाग दोनची लिंक https://marathighoststories.blogspot.com/2019/09/blog-post_86.html
👇👇👇
🔹शापित पेटीचे रहस्य🔹- भाग तीन.
त्या तरुणाने सांगितलेली ही कहाणी ऐकून डेव्हिड काहीवेळ शांत बसला आणी विचार करुन थोड्यावेळाने बोलू लागला.
“ओह..रेड इंडियन वंशाचा आहेस तर तु? तरी मला वाटलेच होते तुझ्या एकंदरीत दिसण्या बोलण्यावरून..तुझी शापित पेटीची कहाणी मी ऐकली..म्हणजे तुला असे म्हणायचे आहे कि, ती हिर्यांनी भरलेली पेटी आपल्या जहाजावर आहे आणी त्यामुळे हे विशाल जहाज बुडणार आहे?”🛳️
“होय..त्या पेटीमध्ये भरलेले ते निळे मणी ज्यांना तुम्ही हिरे म्हणता, ते आमच्या ‘देवतांचे रत्न’ आहेत..आणी त्याला रेड इंडियन लोकांच्या रक्ताचे डाग लागल्याने ते आता शापित झालेले आहेत..या भयानक घटनेनंतर काही वर्षे ती पेटी फोनिक्सच्या लष्करी मुख्यालयात होती..त्यानंतर ती न्युयॉर्कमध्ये आणली गेली आणी बरीच वर्षे एका सुरक्षित सरकारी ठिकाणावर ठेवलेली होती..आणी आता ती या जहाजातून यूरोपियन भुमीकडे चालवलेली आहे..पण आजवर ज्या ज्या गोर्या व्यक्तीचा त्या शापित पेटीला स्पर्श झाला त्यातले कोणीच वाचलेले नाही..
आणी जर ती पेटी या जहाजावरच राहिली तर आतापण कोणी ही वाचणार नाही “✋
दरम्यान डेव्हिडने कोटातल्या खिशामध्ये हात घालून दोन सिगार बाहेर काढल्या आणी त्यातली एक त्या तरुणाला ऑफर केली असता त्याने नम्रपणे नाकारली..शेवटी एक सिगार लाईटरने पेटवून झूरके घेत घेत डेव्हिड त्या तरुणाकडे पाहुन बोलू लागला.
“पहाडी कबिला, देवतांचे रत्न, शापित पेटी चांगली आहे स्टोरी..
मी पण लहानपणी माझ्या आजोबांकडून अशा खूप स्टोरी ऐकायचो..मला आधीपासून रेड इंडियन लोकांबद्दल खूप उत्सुकता राहिलेली आहे..पण मी कधी त्यांचा कबिला पाहिला नाही..पण माझ्या आजोबांनी त्यांच्या लहानपणी पाहिला होता.. माझे आजोबा त्यांच्या लहानपणी न्युयॉर्कपासून काही अंतरावरच्या जर्मन वसाहतीमध्ये राहायचे..ते नेहमीच काही मित्रांसोबत सायकलवर बसून गावाबाहेरच्या रेड इंडियन वस्तीवर जायचे 🚴..तासनतास तिथेच भटकत राहायचे..त्यांचे उत्सव,परंपरा, चालिरीती आणी त्यांच्यामधल्या अंधश्रद्धा खूप जवळून पाहिलेल्या होत्या त्यांनी, आणी त्यांच्यासोबत भावनिकदृष्ट्या जोडलेपण गेले होते ते.
तस पाहिल तर, माझ्या आजोबांच्याही खूप आधीपासून ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, जर्मनी इ. प्रगत युरोपियन देशांनी अमेरिकेत आपापल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या..आणी हे सर्वच देश अमेरिकेच्या जास्तित जास्त भुभागावर स्वताचा कब्जा करू पाहत होते..त्याकाळी माणसांना राहण्यासाठी योग्य अशी जमीन मुळातच कमी होती..जे मैदानी इलाके राहण्यासाठी योग्य होते त्यातल्या बहुतांश जमीनीवर अमेरिकेचे मुलनिवासी असणाऱ्या रेड इंडियन लोकांच्या वस्त्या होत्या.🗿
त्यामुळे साहजिकच मुलनिवासी रेड इंडियन विरुद्ध युरोपियन वसाहतवादी यांच्यामध्ये वारंवार खटके उडू लागले..
रेड इंडियन आपल्या जमीनीवरचा हक्क सोडायला तयार नसल्याने भीषण संघर्ष होऊ लागला..
अशा संघर्षात वसाहतवादी यूरोपियन आधुनिक शस्रांच्या आणी युक्तीच्या बळावर बाजी मारत असत..
त्यामध्ये आणखी कहर म्हणजे युरोपीय देशातील अनेक खतरनाक दरोडेखोर,गुंड आणी राजद्रोही शिक्षेपासून वाचण्यासाठी आपले देश सोडून अमेरिकेत आश्रय घेऊ लागले..त्या दरोडेखोरांच्यापण अनेक मोठ्या टोळ्या तयार झालेल्या होत्या...एकेकाळी शांत असलेला अमेरिकेचा प्रदेश आता धगधगती यूद्धभुमीच बनला होता..🔫⚔️
माझे आजोबा लहानपणी नेहमी ज्या आदिवासी वस्तीवर जायचे त्या वस्तीवर पण एका रात्री दरोडेखोरांच्या मोठ्या टोळीने भीषण हल्ला करून त्यांची घरे आणी शेती पेटवून दिली..त्यादिवशी जेव्हा नेहमीप्रमाणे माझे आजोबा त्या वस्तीवर गेले तेव्हा तेथे त्यांना फक्त जळालेली घरे, आणी फुटकी तुटकी भांडी पाहायला मिळाली..त्या वस्तीवरचे माणसे पुन्हा त्यांना कधीही दिसली नाहीत..हि आठवण सांगताना आजोबांच्या डोळ्याला नेहमीच पाणी यायच..असो..!”😥
डेव्हिडने संपत आलेली सिगार समुद्रात फेकून दिली आणी खाली पाहून पुढे बोलू लागला..
“हे बघ मित्रा..बदल आणी उन्नती हा जगाचा नियमच आहे..भुतकाळात जाणते अजाणतेपणी आमच्याकडून तुमच्या लोकांवर अन्याय,अत्याचार झाले हे मी मान्य करतो.. पण आता आम्ही आमची चूक सुधारली आहे..रेड इंडियन लोकांना आणी काळ्या निग्रो गुलामांना आम्ही समानतेचा हक्क दिला आहे..आणी यापुढे रेड इंडियन लोकांना प्रगत आणी विकसित बनवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू”
डेव्हिडचे बोलणे ऐकून त्या तरुणाला हसू आवरले नाही..
“प्रगत आणी विकसित बनवण्यासाठी आता रेड इंडियन वंश राहिलाच कुठे सर….खरेतर यामध्ये चूक तुमच्या लोकांची नाहीच,खरी चूक तर आमच्या पुर्वजांचीच आहे..आम्हाला वाटायचे अमेरिका हा खूप मोठा भुभाग आहे आणी त्यावर आमच्यासोबत गोरे लोकपण सहज सामावून जातील..आमच्यासोबतच मिळून मिसळून राहतील.. त्यामुळे सुरूवातीच्या काळातल्या लहान लहान यूरोपियन वसाहतींना आम्ही कधी विरोधच केला नाही..
आणी जेव्हा गोर्यांची राक्षसी महत्वकांक्षा आमच्या लक्षात आली तेव्हा खूप उशीर झाला होता.🏹
आणी आता तर आमचा वंश आमची संस्कृती सर्वकाही जवळपास नष्ट झाल्यासारखेच आहे..आमचे अस्तित्व आता इतिहासजमा झाले आहे..आमचे खरे नाव सुद्धा कोणाला माहित नाही..जगाला माहित असलेले आमचे ‘रेड इंडियन’ हे नाव पण तुम्हीच ठेवलेले आहे..आता आमचे स्वताचे असे काही उरलेच नाही.”
त्या तरुणाचे बोलणे ऐकून डेव्हिड निरूत्तर झाला होता..काय बोलावे हे त्याला समजतच नव्हते..
“हे बघ मित्रा.. तुझ्या पुर्वजांविषयी तुला आत्मियता असणे स्वाभाविक आहे..त्या कबिल्यातल्या सगळ्या लोकांची हत्या करून रिचर्डने ते हिरे मिळवले हे पण सत्य असावे..आणी त्या हिर्यांना तुम्ही लोक परंपरेने देवतांचे रत्न मानत असल्याने साहजिकच तुला हे सर्व हिरे गोर्या लोकांच्या ताब्यात जाणे हे रूचत नसणार..त्यामुळेच ती पेटी शापित असल्याचे सांगुन ते हिरे तु पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेस ना..📦
पण मुळातच तुमच्या लोकांसारखा देवता, राक्षस, शाप, वरदान इत्यादि गोष्टींवर आमचा विश्वास नाही..
आम्ही गोरे लोक दैवापेक्षा प्रयत्नांवर जास्त विश्वास ठेवणारे आहोत आणी कदाचित त्यामुळेच जगावर राज्य करत आहोत..
तरी त्या पेटीच्या बाबतीत मी तुझी काहीही मदत करू शकेल असे मला वाटत नाही..भावनेपेक्षा मला माझे कर्तव्य जास्त महत्वाचे वाटते..आय अँम स्वारी”
डेव्हिडचे बोलणे ऐकून त्या रेड इंडियन तरुणाच्या चेहर्यावर गुढ स्मितहास्य उमटले..आणी तो हळूहळू जहाजाच्या कठड्याजवळ जाऊन थांबला..आणी डेव्हिडकडे पाहुन म्हणाला,
“ठिक आहे..मला जे सांगायचे होते ते मी सांगीतले..आणी परत एकदा सांगतो..ती ‘शापित पेटी‘ कधीही न बुडणाऱ्या या जहाजाला समुद्रतळाला घेऊन जाईल हे नक्कीच..
बहुतेक यापुढे कित्येक वर्षे या दूर्घटनेची चर्चा जगभरात होत राहिल..कोणी म्हणेल हे विशाल जहाज हिमनगाला धडकून बुडाले तर कोणी म्हणेल अंतर्गत बिघाडामुळे..पण जहाज बुडण्याचे खरे कारण कोणालाच समजणार नाही..त्या शापित पेटीमधील देवतांचे रत्न कोलंबसच्या राक्षसी भुमीला कधीच मिळणार नाहीत”
ऐवढे बोलून तो तरुण घाईघाईने जहाजाच्या कठड्यावर चढला..आणी त्याने स्वताला निळ्याशार खोल अटलांटिक महासागरामध्ये झोकून दिले.⛴️
क्रमश..