🔸भाग चारची लिंक 👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/09/blog-post_22.html
🔸मनोरूग्ण - भाग पाच🔸
संतोषला जाग आली तेव्हा तो सरकारी हॉस्पिटल मधील बेडवर होता.. डोक्याला मोठी पट्टी लावलेल्या अवस्थेत तो दचकून उठला. डोके भलतेच जड झालेले होते आणी आश्चर्य चकित नजेरेने तो इकडेतिकडे पाहु लागला..
"इन्सपेक्टर घोरपडेंना बोलवा आतमध्ये..आरोपी शुद्धीवर आलाय म्हणुन सांगा त्यांना"
त्या रुममधील डॉक्टरने शेजारील नर्सला सांगितले..
थोड्याच वेळात नर्स घोरपडेला घेऊन आत आली.. आणी घोरपडे डॉक्टरांसोबत चर्चा करू लागले..त्या चर्चेवरून संतोषच्या लक्षात आले की काल त्याच्या हातून काहीतरी मोठी भयंकर घटना घडलेली असून लवकरच त्याची रवानगी कारागृहात केली जाणार आहे... मुळातच हे प्रकरण एवढे विलक्षण होते की संतोषला सावरण्याचा किंवा स्वताची बाजू मांडण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नव्हता..आता फक्त जे काही होईल ते फक्त मुकपणे पाहत राहणे एवढेच त्याच्या हातात उरले होते. 🤐
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
संतोषने अनंतसमोर त्याची अपिरीचीत बाजू मांडली..एवढे सगळे प्रकरण शांतपणे ऐकून घेतल्यानंतर अनंतला आता पुढे काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजेनासे झाले.
"हंम्म..म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की, तु केलेला गुन्हा हा तु स्वतः केला नसून सागरने तुझ्याकडून करून घेतला आहे.. इंटरेस्टिंग..! तु खरं बोलतोयस का खोटं हे मला माहित नाही.. पण प्रथमदर्शनी तरी मला असे वाटतेय की, बेदरकार पणे गाडी चालवून तु ज्या पंधरा-सोळा लोकांना ठार मारलेस, वीस पेक्षा अधीक जखमी केलेस त्याबद्दल तुला फाशीपेक्षा कमी शिक्षा होणार नाही, त्यापेक्षा हे सगळे सागरने केले असे भासवून तु फक्त प्रेमप्रकरणातुन घडलेल्या एका खूनाची जबाबदारी स्वतावर घेतलीस तर जास्तित जास्त दहा वर्षे जेलमध्ये राहुन नंतर तुझी सुटका होऊ शकते..गुड प्लॅनिंग, नाही का?"
अनंतचे बोलणे ऐकून संतोष काहीवेळ विचारमग्न झाला.
"मी स्वतःला फाशीपासून वाचवण्यासाठी ही सगळी कहाणी रचून सांगत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे.. खर सांगायच तर मला फक्त कोणासमोर तरी माझे मन मोकळे करायचे होते.. कारण मला येथे आणल्यापासून कोणीही मला एकही प्रश्न विचारला नव्हता,कि कोणी माझे मत ऐकून घेतले होते..
बाकी माझे मत विचाराल तर मला स्वतःला फाशीपेक्षा इतर कोणतीही कमी शिक्षा नकोच आहे.. कारण मला आता म्रुत्युपेक्षाही जगण्याचीच जास्त भिती वाटायला लागली आहे.. लोकांच्या विचित्र नजरांना आणी शेरेबाजीला मी कंटाळलो आहे..आता फक्त म्रुत्यूच माझी या परिस्थितीतून सुटका करू शकतो… पण प्लीज, माझी तुमच्याकडे एकच विनंती आहे"
संतोष मान खाली घालून शांतपणे बोलत होता.
"कोणती विनंती?"
"माझी ही कहाणी तुम्ही समाजासमोर मांडावी हि विनंती..मला आता जगण्याची ईच्छा अजिबात नाही पण माझ्या नावासमोर ह्या अपघाताचा जो कलंक लागला आहे तो म्रुत्युपेक्षाही फार भयंकर त्रासदायक आहे.. लोक मला वर्षानुवर्षे या अपघातासाठी लक्षात ठेवतील, शिव्याशाप देतील असे मला वाटतेय.. आणी सागरचीपण हिच ईच्छा असावी...आता मला माहित नाही माझे आई-बाबा,रेश्मा, माझे नातेवाईक आणी मित्र माझ्याबद्दल काय विचार करत असतील, पण एक तुम्हीच आहात जे समाजाचे माझ्याविषयीचे मत बदलवू शकता"
अचानक बोलता बोलता संतोषने त्याच्या चेअरवरून उठून अनंतचे पाय घट्ट पकडले..
"प्लीज माझ्या नावावरचा हा कलंक दूर करा सर..ह्या घटनेचे सत्य समाजासमोर येऊ द्या..किमान मी खरोखर एवढा वाईट नाहीये हे तरी त्यांना समजू द्या..यापलीकडे माझी दुसरी कोणतीही अपेक्षा नाही, हीच माझी शेवटची ईच्छा समजा"🙏
संतोषची विनवणी पाहून अनंतला कसेतरीच झाले..तो त्याच्या चेअरवरून उठून उभा राहिला , संतोषला पण उठवले.
"हे बघ मित्रा, कायद्यासमोर मी काही करू शकत नाही, पण एवढी खात्री नक्कीच देईल की..या प्रकरणामध्ये जे काही सत्य असेल तेच माझ्याकडून कोर्टामध्ये मांडले जाईल..सत्य मांडण्यापासून मला कोणीही रोखू शकणार नाही"
एवढे बोलून अनंतने त्याची डायरी मिटली आणी तो शांतपणे पावले टाकत त्या जेलरुमच्या बाहेर पडला.. आजवर त्याने अनेक निर्ढावलेले गुन्हेगार पाहिले होते.. अनेक किचकट केसेस हँडल केल्या होत्या पण संतोषची केस त्याला या सर्वांपेक्षा वेगळी वाटत होती..जेलच्या बाहेर पडुन अनंत थेट इन्स्पेक्टर घोरपडेंच्या केबिनमध्ये गेला..
"मग अनंतराव, लई वेळ लावला आत? काय म्हणत होतं ते येडं... प्रश्नांची उत्तरे दिली का नाय त्याने?" केबिनच्या खिडकीतुन बाहेर तोंडातल्या गुटख्याची पिंक टाकत घोरपडेने विचारले.
"इंटरेस्टिंग केस आहे घोरपडे साहेब, समजत नाहीये तो खरोखरच वेडा आहे का जरा जास्तच हुशार आहे ते..या केससाठी मला थोडा जास्त वेळ लागेल..तुम्ही उद्या त्याला एक दिवसासाठी मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवून द्या..तेथे मानसोपचारतज्ज्ञा कडून त्याची पुर्ण तपासणी करून घेऊ...दोन दिवसांनी माझी असिस्टंट मोनाली हॉस्पीटलमधून रिपोर्ट कलेक्ट करेल.."
अजून काहीवेळ चर्चा करून अनंतने घोरपडेंचा निरोप घेतला.. आता संध्याकाळ उलटून गेली होती.. कारागृहाच्या पार्किंग मध्ये कारमध्येच झोपी गेलेल्या गणेशला जागे करून अनंतने त्याच्या घराजवळ सोडले आणी स्वतः गाडी घेऊन आपल्या निवासस्थानी गेला.🚗
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
दुसर्या दिवशी अनंतला ऑफीसला यायला दहा वाजले होते..गणेश आणी शमा ऑफिस मधल्या डॉक्युमेंटच्या कामात व्यस्त होते..
मोनाली तिच्या चेअरवर बसून मोबाईलमध्ये कोणाशीतरी चँटिंग करत असलेली दिसत होती..अनंत तिच्या टेबलजवळ येऊन थांबला.
"मोनाली, केबिनमध्ये ये..आरोपी संतोषचे सगळे डिटेल्स मी तुला देतो त्याप्रमाणे त्याची केस फाईल तयार करायला घे..परवा त्याचा पुर्ण मेडीकल चेकअपचा रिपोर्ट येरवड्यावरून कलेक्ट करून तोही या फाईलला लावून टाक"
"ओके सर..तुम्ही कुठे बाहेरगावी जाणार आहात का?" मोनालीने मोबाईल बंद करत विचारले.
"येस, मी आणी गण्या कामानिमित्त उद्या सातार्याला जाणार आहोत..दोन तीन दिवस ऑफिसचे सगळे कामकाज तुच बघ, काही अर्जंट असेल तर मला कॉल कर."
"पण सर मी तर उद्यापासून तीन दिवसांच्या रजेवर आहे..आधीच सांगितले होते की तुम्हाला" गणेश मध्येच म्हणाला.
"हम्मं..हरकत नाही, मी एकटाच जावून येईल मग"
अनंतने गणेशला आश्वस्त केले..
त्यानंतर दिवसभर अनंतने त्याचे सर्व महत्त्वाचे कामकाज उरकून घेतले आणी दुसर्या दिवशी सकाळी एकटाच त्याची कार घेऊन बेंगलोर हायवेला लागला. दोन तासात सातारा गाठून नंतरच्या तासाभरात 'म्हात्रेवाडी' गावामध्ये येऊन त्याने संतोषच्या घराची चौकशी केली. छोटे शहर असल्याने त्याला संतोषचे घर शोधायला फारसे कष्ट पडले नाही..संतोषच्या घरी त्याचे म्हातारे आई बाबा होते. त्यांना अनंतने स्वताची ओळख करून दिली..आणी काही माहिती विचारू लागला, उत्तरादाखल आईच्या डोळ्यात पाणी आले,
" काय सांगू वकीलसायेब, आमच पोरगं असं नव्हत हो,पण त्याच्या हातुन हे अस कस झाल कुणास ठावूक.."😢
"रेश्माविषयी तुम्हाला काही माहिती आहे का?" अनंतने विचारले.
"नाव घेऊ नका त्या अवदसाच, तिज्यामुळच तर बिघडला आमचा संतोष, तिज्या घरच्यांनी तिच सातार्याला लगीन लावून दिल होत तरीबी तिन आमच्या पोराचा पिच्छा सोडला नव्हता...शेवटी तिला कंटाळुनच तर आमचा संतोष गावातला चांगला जम बसवलेला धंदा सोडून कामासाठी पुण्याला गेला आणी मग पुढं हे समद घडलं"
संतोषच्या आईने माहिती सांगितली, त्यानंतर अनंतने रेश्माच्या सध्याच्या स्थितीबद्दल काही माहिती आहे का असे विचारल्यावर संतोषच्या आईबाबांकडून नकार मिळाला, तिथे आणखी थोडी चौकशी करून अनंतने त्यांचा निरोप घेतला.
त्याच गावात रेश्माचे पण घर होते..तिच्या घरी जावून घरातील तिच्या आप्तेष्टांकडून रेश्माविषयी चौकशी करण्याचे अनंतने ठरवले खरे, पण त्याचे नाव आणी ओळख सांगताच रेश्माच्या घरच्यांनी कोणतीही माहिती देण्यास ठाम नकार दिला आणी ताबडतोब त्याला पाणीही न विचारता घरातुन बाहेर काढले ..
"फासावर लटकवा त्या xxxxला" 😡
असे बोलून लगेचच घराचे दार मिटवून घेतले..अनंतने पण त्यांना जास्त फोर्स न करता थेट रेश्माच्या सासरच्या घरी म्हणजेच सातार्याला जाण्याचा निर्णय घेतला..कारण तिथेच त्याला रेश्मा भेटणार होती आणी संतोषने सांगितलेली कहाणी खरोखरच सत्य आहे का नाही याची पडताळणी पण करता येणार होती. त्याने म्हात्रेवाडीतील रेश्माच्या घराच्या आजूबाजूला चौकशी करून तिचे सासरचे आडनाव आणी थोडाफार पत्ता मिळवला आणी कारमध्ये बसून म्हात्रेवाडीच्या बाहेर पडला.
#क्रमश..