🔸भाग तीनची लिंक 👇👇👇
🔸मनोरूग्ण - भाग चार🔸
तो दिवस संध्याकाळ पर्यंत संतोषसाठी नेहमीसारखाच होता.. संतोष त्याच्या शिफ्टमधील दुसरी फेरी पुर्ण करत असताना बस घेऊन पुण्याकडे परत येत होता...कात्रजचा घाट संपल्यानंतर 'कात्रज चौकात' उतरणार्या प्रवाशांसाठी कंडक्टरने बेल मारली.. स्टॉप जवळ येताच संतोषने बस थांबवली..त्याच स्टॉपवर एक डोक्यापासून ते पायापर्यंत गडद काळ्या रंगाचा रेनकोट घातलेला कोणीतरी एक व्यक्ती उभा असलेला संतोषने दूरूनच पाहिला..पुर्ण अंगावर काळा रेनकोट, पायात बुट, हातात हातमोजे, चेहरा रुमालाने बांधलेला आणी डोळ्यावर काळा गॉगल..जणू त्याच्या शरीराचा एकही भाग कोणालाही दिसू नये याची काळजी तो घेत असावा..त्या स्टॉपवर बस थांबताच चार पाच प्रवासी लगबगीने समोरच्या दरवाजातून खाली उतरले.. आणी ते प्रवासी उतरताच हा रेनकोटधारी आत बसमध्ये चढला.🗿
यावेळेला कात्रजवरून स्वारगेटला जायला पुणे महानगर परिवहनच्या बसेस दर दहा मिनीटाला उपलब्ध असतानाही तो व्यक्ती एस टी मध्ये चढल्याचे पाहुन संतोषला जरा आश्चर्यच वाटले..पण संतोषने त्याच्याकडे दूर्लक्ष केले.

ड्रायव्हर सिटच्या मागील सीटवर बसलेल्या त्या विचित्र व्यक्ती कडे संतोष अधुनमधून वरच्या आरशातुन पाहू लागला..तो काहिसा रहस्यमयी दिसणारा व्यक्ती त्याच्या काळ्या गॉगलमधून एकटक आपल्याकडेच पाहत आहे असे उगीचच संतोषला वाटत होते..
स्वारगेट स्थानकावर पोहोचताच कंडक्टरने सर्व प्रवाशांना खाली उतरवले.. संतोषने त्याची गाडी डेपोमध्ये नेऊन लावली आणी आजच्या दिवसाची शिफ्ट संपवून स्वतः रेस्ट रूममध्ये गेला.
स्वारगेट स्थानकावर पोहोचताच कंडक्टरने सर्व प्रवाशांना खाली उतरवले.. संतोषने त्याची गाडी डेपोमध्ये नेऊन लावली आणी आजच्या दिवसाची शिफ्ट संपवून स्वतः रेस्ट रूममध्ये गेला.
दूसर्या दिवशी सकाळी सातच्या दरम्यान नेहमीप्रमाणे संतोष बसस्थानकावर हजर झाला..नियंत्रक कक्षामधील रजिस्टर मध्ये आपली हजेरी लावली, कँटीन मध्ये जाऊन चहा-नाष्टा आटोपला.
बस डेपोकडे चालत जात असताना त्याने सातार्याच्या फलाटावर नजर टाकली..अनेक प्रवासी बसची वाट पाहत उभे असलेले त्याने पाहिले..त्याला आता रोजच्याप्रमाणे लवकर डेपोमध्ये उभी असलेली त्याची बस घेऊन त्या फलाटावर आणायची होती.
बसचे दार उघडून आत जाताच त्याची नजर ड्रायव्हर सीटच्या मागील सिटवर गेली आणी क्षणभर तो दचकलाच..काल त्याने पाहिलेला काळा रेनकोटधारी आजपण तेथेच बसलेला होता जो काल संध्याकाळी कात्रजच्या स्टॉपवर त्याच्या गाडीमध्ये चढला होता. तोच व्यक्ती तशाच सर्वांग झाकलेल्या पेहरावामध्ये निवांतपणे सिटवर रेललेला होता आणी हातामध्ये पेपर धरून काहीतरी वाचत असलेला संतोषला दिसला..संतोषला त्याचा थोडा रागच आला.

"ओ मिस्टर.! येथे काय करताय तुम्ही? कुठे जायचय तुम्हाला ? तिकडे फलाटावर जावून थांबा तुम्ही..!"
संतोषने आवाज चढवला पण त्या समोरील व्यक्तीने संतोषकडे थोडेसुद्धा लक्ष दिले नाही..तो निवांत त्याच्या पुढ्यातील पेपरवर नजर रोखून होता.📰
संतोषने आवाज चढवला पण त्या समोरील व्यक्तीने संतोषकडे थोडेसुद्धा लक्ष दिले नाही..तो निवांत त्याच्या पुढ्यातील पेपरवर नजर रोखून होता.📰
"ओ..तुम्हाला बोलतोय मी, येथे काय पेपर वाचत बसले.. तिकीट काढलेय का तुम्ही??"
संतोषने पुढे होऊन त्याच्या हातातील पेपरवर नजर टाकली आणी त्याला दरदरून घाम फुटला. त्या रेनकोटधारी व्यक्तीच्या हातातील पेपर सुमारे वर्षभरा पुर्वीचा होता..आणी तो नजर रोखून पाहत असलेल्या पानावर शंखेश्वराच्या डोंगरावरील सागरच्या खुनाची छोटीशी बातमी दिसत होती..ती बातमी पाहुन संतोषचा थरकाप उडाला होता आणी त्या रेनकोटधारीची आता त्याला थोडीशी भितीपण वाटायला लागली होती.

"अरे तुला सांगितलेले कळत नाही का? बधीर आहेस का? चल हो गाडीच्या खाली"
रागात संतोषने त्याच्या खांद्याला धरून हिसका देऊन उठवण्याचा प्रयत्न केला पण जोर लावूनही तो त्याला त्याच्या जागेवरून किंचितही हलवू शकला नाही. अजूनही तो व्यक्ती निमुटपणे पेपरच वाचत होता. संतोषला पण आता काय करावे हे समजेनासे झाले, त्याने रागारागाने त्या रेनकोटधारीच्या डोळ्यावरचा काळा चष्मा हिसकावून काढला आणी आता मात्र संतोषच्या चेहर्यावरचा रंग उडाला..त्या चष्म्याच्या आतमध्ये डोळे नव्हतेच..तर फक्त दोन अर्धवट खाचा होत्या.
आता त्या रेनकोटधारीने वळून संतोषकडे पाहिले आणी स्वताच्या हाताने चेहर्यावरचा रूमाल काढून फेकला.
त्याचा चेहरा काळाकुट्ट आणी भयंकर विद्रूप दिसत होता. आगीच्या भट्टीमध्ये अर्धवट भाजल्यासारखा. त्याचा भयानक चेहरा पाहुन संतोषच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली.
"बापरे..! कं...कोण आहेस तु?"😨
त्याचा चेहरा काळाकुट्ट आणी भयंकर विद्रूप दिसत होता. आगीच्या भट्टीमध्ये अर्धवट भाजल्यासारखा. त्याचा भयानक चेहरा पाहुन संतोषच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली.
"बापरे..! कं...कोण आहेस तु?"😨
"विसरलास मला तु? बारा डिसेंबरची संध्याकाळ, शंखेश्वरचा डोंगर..तू , रेश्मा आणी मी आपण तिघेच... सगळं विसरलास ?"
भितीदायक थंडगार आवाज होता त्याचा पण बोलत असताना त्याच्या तोंडातून गरम वाफा निघत होत्या..तप्त निखार्यासारखे त्याचे शब्द संतोषच्या कानावर पडले आणी तो हादरला.
"स..सागर तु??.तु परत कसा आलास?"
"याव लागलं मला ..तुम्ही दोघं कसे आहात हे पाहण्यासाठी"
"याव लागलं मला ..तुम्ही दोघं कसे आहात हे पाहण्यासाठी"
"म..मला माफ कर सागर...त्या रेश्माने मला तुझ्याबद्दल खूप भडकावले होते रे...नेहमी मला सांगायची सागर माझा छळ करतो, खूप त्रास देतो.. आणी..आणी म्हणायची मी जर तिच्याशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करेल म्हणुन..मग सांग ना मी काय करायचे होते ते..तुला मारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता रे"
संतोष भेदरलेल्या आवाजात भरभर बोलत होता..
संतोष भेदरलेल्या आवाजात भरभर बोलत होता..
"हो का ? छान उत्तर देतोस की तु..नादान मुलीचा मुर्ख प्रियकर..तिने सांगितले आणी तु ऐकलेस? खरेतर तुलाच माझी अडचण होत होती ना, तुझ्या प्रेयसीसोबत माझे लग्न झाले होते म्हणुन"
सागरचा आवाज वाढला होता.
सागरचा आवाज वाढला होता.
"माझ्याकडुन चूक झाली सागर..! हवं तर मी यापुढे परत कधीही रेश्माला भेटायला सुद्धा जाणार नाही"
सागरला त्या भयानक रुपात पुन्हा आपल्या समोर आलेले पाहून संतोष गयावया करू लागला.त्याचे बोलणे ऐकून सागर हसू लागला..
सागरला त्या भयानक रुपात पुन्हा आपल्या समोर आलेले पाहून संतोष गयावया करू लागला.त्याचे बोलणे ऐकून सागर हसू लागला..
"रेश्माला भेटायला? हा..हा.! आता तुझी ईच्छा असली तरीपण तु जाऊ शकणार नाहीस"
बोलता बोलताच सागरचा चेहरा क्रुद्ध झाला होता. त्याच्या तोंडातून आणखी वाफा निघायला लागल्या होत्या.. झटक्यात उभे राहुन त्याने त्याच्या दोन्ही जळालेल्या काळ्या हातांनी संतोषचे हात घट्ट पकडले.. भेदरलेल्या संतोषला काहीही समजण्याच्या आधीच रेनकोटधारी सागरचे रूपांतर एका काळ्या सावलीमध्ये झाले आणी ती सावली संतोषच्या अंगामध्ये सामावली जावून अद्रूश्य झाली..संतोष जोरजोरात आपले डोके झटकू लागला..त्याचे डोळे लालभडक दिसायला लागले होते..त्याचा आता स्वतावरच ताबा राहिलेला नव्हता. तो चटकन ड्रायव्हिंग सिटवर बसला आणी बस चालू करून डेपोमधून स्थानकावर आला..सातारा फलाटावर प्रवासी बसची वाट पाहत उभे होते पण संतोषने बस फलाटावर न नेता थेट स्थानकाबाहेर काढली.🚍
आजचा संतोष हा रोजचा संतोष राहिलेला नव्हता.. त्याच्या शरीरामध्ये आता सागरच्या दुष्टआत्म्याने प्रवेश केलेला होता..तोच सागर जो जिवंत असताना त्याचा माणसांवर विश्वास होता.. जगातल्या माणुसकीवर आणी चांगुलपणावर त्याची श्रद्धा होती.. पण त्याविश्वासाच्या बदल्यात जगाने त्याचा विश्वासघात करून त्याचाही घात केला होता आणी त्यामुळेच त्याचा आता सगळ्या माणसांवर राग होता.. पुर्ण जगावरच राग होता..त्यातल्या त्यात संतोष आणी रेश्मावर तर जरा जास्तच..
सागरच्या ताब्यात आता संतोषचे शरीर होते..सागरने ताबा मिळवलेला संतोष त्याची बस घेऊन स्वारगेट चौकामध्ये आला आणी पुलगेटच्या बाजूला जाणार्या एकेरी मार्गावर राँगवे ने भरधाव वेगानं जावू लागला. सकाळची थंडीची वेळ होती आणी दररोजच्या पेक्षा आज रस्त्यावर रहदारी पण कमीच होती.
डोक्यावर लेडिज हेल्मेट घातलेली एक तरूण महिला तिच्या स्कुटीवरुन लहान मुलाला शाळेत पोहोचवून पुन्हा तिच्या घराकडे निघाली होती.. अचानक समोरून राँगवे ने भरधाव येणारी बस तिच्यासाठी अनपेक्षित होती.. ती आश्चर्य चकित झाली..मोठ्याने हाँर्न वाजवून आणी हेडलाईट चालू करून तिने त्या बसपासून वाचण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण बस तिच्या स्कुटीसहीत तिच्याही शरीराला चिरडून पुढे निघून गेली.
पुढील एक दोन दुचाकीस्वारांनी मात्र दूरूनच हे द्रूश्य पाहून आपल्या गाड्या ताबडतोब रोडच्या कडेला थांबवून स्वतला वाचवण्यात यश मिळवले. दरम्यान रस्त्यावरचा डिव्हायडर तोडून संतोष रॉंग वे वरून सरळ रस्त्यावर आला.

पुढे पुलगेटच्या अलीकडचा सिग्नल नुकता सुटणारच होता.. हळूहळू गाड्या पुढे सरकत होत्या.. पण संतोषला सिग्नल सुटेपर्यंत थांबायला वेळ नव्हता..त्याची भिरभिरणारी नजर समोरील गाड्यांवर फिरत होती... काय दिसत होते त्याला समोर?.. एका बाईकवर चिकटून बसून कुठेतरी फिरायला चाललेले कॉलेजचे मुलगा मुलगी दिसत होते..तर त्यांच्या बाजूच्या बाईकवर जॉबवर चाललेले पती पत्नी होते.. त्यांच्या पुढील कारमध्ये आयटी पार्कमध्ये जॉब करणारे चार युवक यूवती त्यांच्या ऑफीसकडे निघालेले दिसत होते.. लालभडक नजरेने त्यांना न्याहाळत संतोषने वेगात असलेली बस त्याच्या दिशेने वळवली.. पाहणार्याच्या काळजाचा थरकाप उडवून आणी त्या आठही जणांच्या जीवनाचा रेड सिग्नल लावूनच संतोषने त्याची बस पुलगेट चौकातुन पुन्हा यु टर्न मारून अधिक रहदारीच्या सारसबाग चौकाकडे वळवली.
चौकाकडे जाता जाता वाटेत आलेल्या एका रिक्षाचा चुराडा करून आणी सायकलवरून घाईने रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करणार्या एका वयोवृद्ध इसमाला जोरदार धडकेने सायकलसहीत बाजुच्या एका दूकानाच्या काचेवर फिरकावून देत संतोष पुढे निघाला. 🚌🚴

स्वारगेटचा सारसबाग चौक आता दररोजच्याप्रमाणे गर्दीने गजबजायला सुरूवात झाली होती.. चौकातील सिग्नलला जवळपास साठ ते सत्तर वेगवेगळ्या गाड्या सिग्नल सुटण्याची वाट पाहत थांबलेल्या दूरूनच दिसत होत्या..संतोषने बसचा सहावा गिअर टाकून बसचा स्पीड आणखी वाढवला..भरधाव वेगाने सिग्नलच्या दिशेने निघालेल्या बसला काही जणांनी पाहिले..बसचा ब्रेक फेल झाला असल्याचा गलका उठला आणी वाहनचालक घाईघाईने आपापली वाहने सोडून दूर पळायला लागले.. चौकात जोरदार धावपळ सुरू झाली..वार्याच्या वेगाने आलेली बस मोठा आवाज करत त्या सिग्नलवर उभ्या असणार्या वाहनांवर आदळली ..अनेक गाड्यांचा चक्काचूर झाला..समोर येईल त्या गाडीला आणी माणसाला चेंगरून अनेक वाहनांना सोबत घेऊन ती बस सिग्नलच्या मोठ्या खांबाला आदळून बंद पडली..चौकात काचेचा थर साचला.. जोराच्या धडकेमुळे संतोषचे डोके समोरील स्टेअरिंगवर आदळून रक्ताची धार लागली आणी तो जागेवरच बेशुद्ध पडला. 🚦
#क्रमशः