🔸भाग पाचची लिंक 👇👇👇
🔸मनोरूग्ण - भाग सहा🔸
अनंतला सातार्याला पोहोचायला संध्याकाळ झाली होती. त्याने आता शहरातच एका लॉजवर मुक्काम करुन आराम करण्याचा निर्णय घेतला..दिवसभराच्या दगदगीमुळे त्याला थकवा आल्यासारखे वाटत होते. आणी अशीच धावपळ त्याला उद्यापण करावी लागणार होती. 🚶
दूसर्या दिवशी सकाळी चहा-नाष्टा आवरून तो लॉजच्या बाहेर पडला आणी म्हात्रेवाडीमध्ये त्याला रेश्माचा जो थोडाफार पत्ता मिळाला होता त्यानूसार तो सातारा शहरात रेश्माचे घर शोधु लागला..अखेर बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर त्याला तिचे घर सापडले..बंद दारावरची बेल वाजवताच एका वयोव्रूद्ध महिलेने दार उघडले..ती महिला म्हणजे सागरची आई असावी असा अंदाज अनंतने बांधला.
"नमस्कार..मी अनंत, सागरचा जूना मित्र, कामानिमित्त पुण्यावरून सातार्याला आलो होतो"
रेश्माच्या माहेरच्यांप्रमाणे येथे पण लगेचच घरातुन बाहेर काढु नये म्हणुन अनंत जास्तच अदबीने बोलत होता..त्यामुळे म्हातारीने पण त्याला लगेच घरात घेतले.
रेश्माच्या माहेरच्यांप्रमाणे येथे पण लगेचच घरातुन बाहेर काढु नये म्हणुन अनंत जास्तच अदबीने बोलत होता..त्यामुळे म्हातारीने पण त्याला लगेच घरात घेतले.
"याअगोदर कधी घरी आलेला पाहिला नाही मी तुला" अनंत सोफ्यावर बसल्यानंतर म्हातारीने विचारले.
"नाही ना, सागर बोलवायचा नेहमी पण कधी यायला जमलेच नाही, कुठे बाहेर गेला आहे का तो मावशी?" अनंतने चौकशी केली.
उत्तरादाखल म्हातारीने जड अंतकरणाने बाजुच्या भितीवर बोट दाखवले तिथे सागरचा हार घातलेला फोटो टांगलेला होता.
"एक वर्ष होऊन गेलंय, सागर आपल्या सर्वांना सोडून देवाघरी गेलाय"😥
"अरेरे..फारच वाईट झाले..माफ करा मला मावशी, मी बर्याच दिवसांपासून त्याच्या संपर्कात नाहीये ना, म्हणुन हि दुर्दैवी बातमी माझ्यापर्यंत पोहोचली नाही" दुखी चेहर्याने अनंत म्हणाला.
"असु दे बेटा, जे होऊन गेले त्याला आपण काय करणार..बस जरा वेळ, मी तुझ्यासाठी चहा करुन आणते" म्हातारी किचनमध्ये निघून गेली.
म्हणजे संतोषने सांगितल्याप्रमाणे खरोखरच वर्षभरापूर्वी सागरचा अकाली म्रुत्यु झालेला होता हे तरी खरे होते..सागरच्या म्रुत्यूचे नेमके कारण फक्त संतोष आणी रेश्मालाच माहिती होते दुसर्या कोणालाही नाही..त्यामुळे त्याविषयीची माहिती म्हातारीकडून मिळणार नव्हती..अनंतला खरेतर रेश्माला भेटायचे होते..तिला काही प्रश्न विचारायचे होते पण ती आता घरात आहे का कुठे बाहेर गेलीय हे म्हातारीला कसे विचारावे हे त्याला समजत नव्हते.. त्याचबरोबर चहा बनवण्यासाठी म्हातारी स्वतःच गेली म्हणजे घरात तिच्याशिवाय कोणीही नसावे हे पण त्याला उमजले होते.
दहा पंधरा मिनीटे तो सोफ्यावर पेपर चाळत बसला, त्यानंतर ती म्हातारी हातामध्ये दोन कप चहा घेऊन आली.
दहा पंधरा मिनीटे तो सोफ्यावर पेपर चाळत बसला, त्यानंतर ती म्हातारी हातामध्ये दोन कप चहा घेऊन आली.
"हे घे बेटा, आता वय झालयं माझ तरीपण घरातली सगळी काम मलाच करावी लागतात..म्हणुन चहाला ऊशीर लागला बघ"
"घरातली कामे तुम्ही करता तर मग रेश्मा वहिनी कुठे असतात?"
चहा पिताना अनंतने मुद्याला हात घातला होता. ☕️
चहा पिताना अनंतने मुद्याला हात घातला होता. ☕️
अनंतचा प्रश्न ऐकून म्हातारी थोडावेळ शांतच बसली.
"तुला आता कसं सांगू मला समजेनास झालयं बघ, चांगली मुलगी होती रेश्मा, सागरला आणी मलापण नीट बघायची.. सागरचे लग्न झाल्यावर वाटले होते आता उरलेले दिवस सर्व दगदग सोडून फक्त आराम करायचा पण कशाच काय माझ नशीबच खोटं..एकुलता एक तरुण मुलगा गेला आणी नवर्याच्या म्रुत्युमुळे रेश्माला पण मोठा मानसिक धक्का बसला, सागर गेल्यानंतर सहा महिनेच ती नीट राहिली आणी नंतर वेड्यासारखी वागू लागली..खूप उपचार केले आम्ही तिच्यावर पण सगळे व्यर्थ..शेवटी दोन महिन्याअगोदर तिला कराडला वेड्यांच्या इस्पितळात दाखल कराव लागलं..आणी तेव्हापासून आता ती तिकडेच असते" म्हातारीने समजावून सांगितले.

"काय?? रेश्मा मेंटल हॉस्पिटलमध्ये??"
अनंतला धक्का बसला होता..औपचारिकता म्हणुन अजून काही वेळ गप्पा मारुन आणी बोलता बोलता म्हातारीकडून अनेक महत्वपूर्ण माहिती गोळा करून अनंत परत जायला निघाला,
अनंतला धक्का बसला होता..औपचारिकता म्हणुन अजून काही वेळ गप्पा मारुन आणी बोलता बोलता म्हातारीकडून अनेक महत्वपूर्ण माहिती गोळा करून अनंत परत जायला निघाला,
"येत जा पोरा अधुनमधून घरी., रात्रंदिवस घरात एकटीच बसुन असते, रिकामं घर खायला उठत बघ, तुझ्यासारखे कोणी आले म्हणजे तेवढाच बोलण चालण होत, जुन्या आठवणी उजळतात, बाकी काही नाही" म्हातारीने तिची व्यथा मांडली, आणी "पुन्हा येतो मावशी" असे म्हणून अनंतने तिचा निरोप घेतला.
गेल्या सहा महिन्यांपर्यंत चांगली असणारी रेश्मा अचानकपणे मानसिक रुग्ण कशीकाय बनली असावी? संतोषने सांगितलेली कहाणी खरी तर नाही ना? सागर त्या दोघांचाही बदला घेण्याचा प्रयत्न करतोय का? असा विचार करत अनंतने त्याची गाडी सातार्या कडून कराड शहराच्या दिशेने वळवली.🚗
कराड हायवेपासून काहिशा अंतरावर असणारे ते एक छोटे सरकारी मानसिक रुग्णालय होते..येरवड्याच्या तुलनेत येथे अनेक अत्याधुनिक सुविधांची व सुरक्षेची कमतरता जाणवत होती.. अनंतने बाहेर गाडी पार्क केली आणी महिला रूग्णांच्या वार्डकडे गेला...तिथल्या लोखंडी गेटमधून आत गेल्यावर त्याला रिसेप्शनला पंजाबी ड्रेस आणी त्यावर पांढरा कोटासारखा शर्ट घातलेली एक जाडजूड महिला बसलेली दिसली..अनंतने तिला रेश्माचे नाव आणी आडनाव सांगितले आणी तिला भेटण्यासाठी आलो आहे असे सांगितले.
त्या महिला कर्मचार्याने अनंतकडे रोखून पाहिले.
"तुम्ही कोण तिचे?"
"मी..मी तिच्या गावाकडून आलोय, तिचा दुरचा नातेवाईक आहे"
"तुम्ही कोण तिचे?"
"मी..मी तिच्या गावाकडून आलोय, तिचा दुरचा नातेवाईक आहे"
"नाही चालणार..सोबत कोणी लेडिज असल्याशिवाय एकट्या जेंट्सला महिलांच्या सेक्शनमध्ये सोडायला अलावूड नाही आम्हाला" तिने कपाळावर आठ्या आणुन तुटकपणे सांगितले.
"हे बघा आरती मँडम, मी खूप दूरून आलोय हो..फक्त थोडावेळ भेटून लगेचच माघारी येईल मी" अनंतने तिच्या पांढर्या शर्टाच्या खिशाला लटकवलेल्या कार्डवरून तिचे नाव वाचले होते.
"नाही म्हणजे नाही, नियम तो नियम, चला लवकर कोणातरी महिलेला सोबत घेऊन या आधी" आरतीने नकार दिला.
अनंतने त्याच्या पाकिटातुन पाचशेच्या दोन नोटा काढून टेबलवर ठेवल्या. आरतीने इकडेतिकडे पाहत हळुच ते पैसे घेऊन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले.💵
अनंतने त्याच्या पाकिटातुन पाचशेच्या दोन नोटा काढून टेबलवर ठेवल्या. आरतीने इकडेतिकडे पाहत हळुच ते पैसे घेऊन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले.💵
"ठिके..इथून सरळ पुढे जावून नंतर डावीकडे वळा, बावीस नंबर रुममध्ये आहे तुमची पेशंट..पण फक्त लांबुनच बघायचे आणी दहा मिनीटात परत माघारी येथे यायचे बरका"
आरतीने परवानगी दिली.
आरतीने परवानगी दिली.
अनंतने मान डोलावली आणी तो सांगितलेल्या दिशेने गेला.
आत गेल्यावर त्याला एक लांबलचक बोळ आणी दोन्ही बाजूला एकाला लागुन एक खोल्या दिसत होत्या..अनंत तिथल्या अंधूक प्रकाशात खोल्यावरील नंबर वाचत पुढे पुढे जात होता..चालता चालता लोखंडी सळ्यांचे दरवाजे लावलेल्या खोल्यांच्या आत डोकावून पाहत होता..अंगावरील अस्ताव्यस्त कपड्यांतील वेगवेगळ्या वयोगटातील स्रिया पाहुन त्याला कसेतरी होत होते..त्यांचे हावभाव, आरडाओरडा, किंकाळ्या आणी विचित्र वागणे त्याच्या मनामध्ये भिती निर्माण करू पाहत होते..

या सर्व महिला-मुली काही दिवसांपूर्वी नॉर्मलच असतील ना? कुठल्यातरी सर्वसामान्य घरातीलच असतील ना? मग आज अशा अवस्थेमध्ये कशा पोहोचल्या असतील? नेमक्या कोणत्या चुका त्यांनी केल्या असतील? ही बाजूच्या खोलीत तर सतरा अठरा वयाची तरुण पोरगी दिसतेय, ती येथे कशी आली असेल, हिने पण काहीतरी चूक केली असेल का? का दूसर्या कोणीतरी केलेल्या चूकीची शिक्षा ही भोगत असेल?? आपण फक्त एका कहाणीच्या शोधामध्ये येथे आलोत पण येथे बंदिस्त असणार्या प्रत्येकाची स्वताची काहितरी कहाणी असेलच की?? 😑
विचारांचे वादळ अनंतच्या मनामध्ये घोंगावत होते..त्याच विचारात तो अखेर बावीस नंबर खोलीसमोर आला.. आतमध्ये एका कोपर्यात एक तरुण स्री गुढग्यांमध्ये डोके खूपसुन बसलेली होती.. अंगावर अस्ताव्यस्त ढगळ कपडे होते..तिचे काळे लांब केस मोकळ्या अवस्थेमध्ये खालीपर्यंत लोबंत होते.
"रेश्मा..! मी संतोषचा मित्र, तुला भेटण्यासाठी आलोय" अनंतने मोठ्याने आवाज दिला.
तिने मान वर करून अनंतकडे रोखून पाहिले, तिचे डोळे लाल दिसत होते..कपाळावरच्या जखमेवर पांढरी पट्टी बांधलेली होती, हातावर पण कसलेतरी ओरखडे पडलेले दिसत होते..ती अनंतकडे पाहुन कशीबशी हसली आणी उठून त्याच्याकडे येऊ लागली..
कोणे एके काळी रेश्मा दिसायला कदाचित सुंदर असेलही पण सध्यातरी अशा अवस्थेमध्ये अनंतला ती अजिबात सुंदर वाटत नव्हती.

"संतोषनेच मला येथे पाठवले आहे रेश्मा.. तुला भेटण्यासाठी"
अनंत तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होता..ती आता अनंतच्या जवळ आली होती..अनंत तिचा अंदाज घेत होता. अचानक तिच्या चेहर्यावरचे हावभाव बदलले, तिने झटकन लोखंडी सळ्यांमधून तिचे दोन्ही हात बाहेर काढून अनंतची मान घट्ट पकडली.. अचानक घडलेल्या या प्रकाराने अनंत घाबरुन गेला. त्याची मान सोडवण्याचा प्रयत्न करू लागला..पण रेश्मा सोडायला तयार नव्हती..ती संतापाने फणफणत होती, तिचे काळे पडलेले दात- ओठ खावून ती अनंतची मान आणखी जोर देऊन दाबत होती.😱

"प्लीज हेल्प..!! कोणी आहे का तिकडे..ओ मँडम..!!"
अनंत भयभीत होऊन मोठ्याने ओरडत होता..त्याचा आवाज ऐकून थोड्याच वेळात आरती मँडम जोराने धावत आतमध्ये आली आणी मग दोघांनी मिळून रेश्माच्या तावडीतून अनंतची मान सोडवली.. अनंतने सुटकेचा श्वास सोडला आणी आपली मान चोळत तो घाईने त्या बावीस नंबर रूमपासून दूर गेला.
क्रमश..