नमस्कार वाचकवर्ग मी अनुप देशमाने लिखाणातील गोडी आणि त्यात वाचकांची जोडी असली की सर्व काही मिळत आणि मिळत असते, किती प्रयत्न करतोय पुन्हा काहीतरी लिहावे याच पण काम आणि त्या कामातून वेळ मला काही मिळेना, पण आज ठरवलंच काही झालं तरी आज लिहायचं म्हणजे लिहायचं आणि घेतली एक कथा लिहण्यास, माझी एक #हाक ही कथा अपूर्ण आहे त्यामुळे काही वाचक माझ्यावर नाराज आहेत पण त्यांना एक सांगू इच्छुतो की त्या कथेला लवकरच न्याय मिळेल काळजी नसावी.... आज मी अपना समोर एक #भयकथा घेऊन येत आहे... पूर्वी प्रमाणे आपले प्रेम असेच राहील यात काही शंका नाही ... चला तर मग कथेला सुरुवात करू😁😁
कथा - #घुंगरु भाग १ ला
लेखक - #अनुप_देशमाने
टेबलावर ठेवलेला मोबाईल वाजला तशी सीमा किचन मधून बाहेर पळत आली, आलेला फोन तिच्या नवऱ्याचा होता,
सीमा : बोला ना
अभि : किती उशीर फोन उचलायला??
सीमा : अहो दूध तापवत होते, त्यामुळे उशीर झाला चिडू नका ना, बोला का फोन केला??
अभि : बर आईक तर मग, मला आठवड्याची सुट्टी मिळाली आहे ऑफिस मधून तर मी आज येताना आपल्या चौघांची तिकीट काढून येतो ...
सीमा : कसलं तिकीट काढता, मी काही फिल्म वगैरे बघायला नाही बर का येणार🙄
अभि : आग वेडी, मी फिल्म च्या तिकीट च नाही बोलत आहे, आपण उद्या कोकणात जाऊया गावी तेवढंच पोरांना विरंगुळा... कसा आहे प्लॅन😎
सीमा : (खूप खुश होत) खूप म्हणजे खूप भारी आहे प्लॅन, या लवकर घरी आज मग मी बॅग पॅक करायला घेते लगेच आणि समीर ला कॉल लावून बोलावून घेते घरी...
अभि : आणि स्मिता कुठेय???
सीमा : अहो ती क्लास ला गेली आहे येईल इतक्यातच..
अभि : बर चल ठेवतो, तू आवरयला घे मी काम आटपुन लवकर घरी येतो..
समीर आणि स्मिता ही सीमा आणि अभि ची पोर... दोघे ही कॉलेज कुमार... 10 वर्ष झाले असतील ह्यांनी कोकणात जाऊन...नेहमी अभि च्या माघे लागायचे की बाबा चला ना गावी, बघू द्या एकदा तरी शेती तेथील रस्ते, तेथील राहणीमान... एकदाच ते ठरलं उद्या हे सगळे निघणार होते... सीमा ने समीर ला कॉल लावून बोलावून घेतले तसा तो आला ही आणि बरोबर स्मिता पण आली...तिघे मिळून खूप खुश झाले, मिळून ते बॅग पॅकिंग करू लागले कारण जवळ आठवडा ते राहणार होते,
स्मिता : आई आपण टफी ला पण घेऊन जाऊया...👍
सीमा : हो ग बाळा, त्याला एकट्याला सोडून कसे जाऊ आपण..
समीर : आई आपल्या कडे गाडी असताना आपण ट्रेन का जायचं ग तिकडे???
सीमा : जी मज्जा ट्रेन ने असते ना कोकणात जायला ती मज्जा इतर कुठेही नाही बाळा...
तिघांनी मिळून बॅग पॅक करून ठेवल्या... आता अभि यायची वाट बघत होते...इतक्यात बेल वाजली, स्मिता ने दरवाजा उघडला तर अभि आला होता, स्मिता ने अभि ला घट्ट मिठी मारली आणि thanks baba म्हणाली...अभि फ्रेश होऊन आला तसा सीमा ने सर्वा साठी चहा आणला, सर्व जण चहा पित पीत गप्पा मारू लागले...
स्मिता : बाबा तिकडे नारळ फ्री भेटतात का, मला फणस देखील खायचा आहे, काजू चे झाड बघायचे आहे, सर्व एन्जॉय करणार आहे मी...
स्मिता च्या बोलण्यावर सगळे हसू लागले..☺️☺️
सीमा : सगळा एन्जॉय कर, नाहीतर आपण तुला तिकडचा नवरा मुलगा शोधू...
स्मिता : हो चालेल ना, पण नवरा शेतकरी असावा म्हणजे त्याला कमीत कमी घरच्यांना वेळ देण्यासाठी सुट्टी मागावी लागणार नाही....(अभि कडे बघत तिने त्याच्या वर पॉईंट मारला, आणि सर्व परत हसू लागले)
रात्रीचे जेवण करून सगळे लवकर झोपले कारण उद्या लवकर ट्रेन होती... पहाटेचा अलार्म झाला सीमा ने उठून अलार्म बंद केला, तशी ती उठून गिझर लावण्यास गेली, घर झाडण्यास सुरवात केली, झाडून झाल्यावर तिने आधी स्वता अंघोळ केली, देव पूजा करून तिने अभी ला उठवले आणि सांगितले की मुलांना पण उठवा, तसा अभी पण उठला आणि मुलांना उठवण्यास गेला, हिकडं सीमा किचन मध्ये चहा आणि नाष्टा च करत होती, सगळे उठून अवरू लागले, एक एक करून सगळे किचन मध्ये जमा झाले, सीमा ने सर्वाना चहा आणि नाष्टा चे दिले आणि स्वता देखील नाष्टा करून घेतला, चला आता घराला कुलूप लावायची वेळ आली, तसा टफी बाहेर पळत आला, अभि ने घराला कुलूप लावले आणि सगळे रेल्वे स्टेशन कडे निघाले.... सकाळचे 7 30 वाजले होते, ट्रेन येण्यास 10 मिनिट बाकी होते,
नवीन अनुभव मिळणार ह्या उत्सुकतेपोटी स्मिता आणि समीर खूप खुश होते, किती वर्षे झाले होते त्यांनी बाबा कडे हट्ट केलेला होता गावी जाण्यासाठी आणि तो आता पूर्ण झाला होता, समीर अभियांत्रिकी च्या तिसऱ्या वर्षात होता आणि स्मिता बी कॉम च्या दुसऱ्या वर्षात होती, पावसाळी दिवस होते त्यामुळे उन्ह कमी होते, वातावरण थंड आणि फ्रेश होते, अनौनसमेंट झाली "सर्व यात्रेकरू लक्ष द्या गाडी नंबर 12345 कोकण एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅट फॉर्म नंबर 2 वर येत आहे" तशी स्मिता आणि समीर च्या चेहऱ्यावरील खुशी अजून जास्त वाढली... कधी एकदा ट्रेन येतेय आणि आम्ही जाऊन सीट वर बसतो असे त्यांना झाले होते, ट्रेन थांबली तसे सगळे ट्रेन मध्ये जाऊन बसले, स्मिता आणि समीर खिडकी जवळ बसले..... पोरांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून अभी चे डोळे ओले झाले, त्याला ही कळलं होतं की कामा मुळे आपण फॅमिली ला वेळ देऊ शकत नव्हतो... सीमा ने हाथ दाबत शांत होण्याचा इशारा अभी ला दिला....
सीमा : झुक झुक झुक आगीणगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी....
स्मिता : पळती झाडे पाहूया आजीच्या गावाला जाऊया 😂😂
सगळे परत हसू लागले... खर तर ते गाव म्हणजे अभी चे होते तेथे त्याचा भाऊ विक्रांत आणि त्याची फॅमिली आणि आई असे रहात होते, कधी मधी अभी त्याला पैशाची मदत करत होता, शिकला नसल्यामुळे त्याला शेती करावी लागत होती, पण शेती खूप होती, आणि वाडा देखील खूप मोठा जुना अगदी इंग्रज काळातला....
"भेळ, भेळ, भेळ, सुकी भेळ, ओली भेळ"
"बोटल, पाणी बोटल, थंडा पाणी बोटल"
"ATM पाऊच, पॅन कार्ड, आधार कार्ड पाऊच"
अशा मार्केटिंग आवाजात जी प्रवास करण्याची मज्जा आहे ना ती कशातच नाही याची प्रचिती आता स्मिता आणि समीर ला येऊ लागली, ट्रेन ने आता चांगलाच स्पीड धरला होता, अभी ने विक्रांत ला कॉल करून कळवले होते निघालो आहे अमुक अमुक वेळेत आम्ही पोहचू..
प्रवासाचा तृप्त अनुभव घेत सगळे निघाले होते, खाण्यास चिवडा आणि लाडू आणले होते ते सगळे खात होते....गाव येण्यास अजून 2 तास होते... सीमा आणि अभी झोपी गेले, स्मिता आणि समीर कानात हेडफोन टाकून गाण्याचा आस्वाद बरोबर ट्रेन चा प्रवास तोंडी लावत होते....
क्रमशः
#अनुप_देशमाने🙏