🙏पोरकं प्रारब्ध🙏
भाग::--दुसरा
![]() |
🙏पोरकं प्रारब्ध🙏 भाग::--दुसरा- Awesome story by Vasudev Patil |
भिमानं सकाळी अंघोळ केली व फिरण्यासाठी बस-स्टाॅपकडं काठी टेकत निघाला.शिवकृपा सलूनवर कटींगसाठी बसलेल्या बबन्यानं आरशातून भिमा आला व शेजारच्या दुकानात पेपर वाचतोय हे पाहिलं व त्याला ऐकू जाईल अशा आवाजात तो सखा जाधवाला सांगू लागला.
"आरं सखा लेका,तुला काय माहित पडलं का!"
"नाय ब्वा .का ?काय झालं?"पढवुन ठेवलेला सखा जाधव वस्तरा चालवत म्हणाला.
बबन्या व भिमाचं वैर जसं होतं तसंच वैर राणा डाॅक्टर व सखा जाधवात होतं.भिमा व सरी आजीनं खानावळ काढली नी बबन्याचं हाॅटेल बसलं. त्या दिवसापासून बबन्या काही ना काही कुरापत काढून भिमाशी भांडायचा.मग अंगण शेजारी ट्रक लावतांना 'माझ्या अंगणातुन चाक गेलच कसं ?' हेही कारण पुरे व्हायचं .तसंच निलेश राणानं सखाचं सलून केंद्राजवळून उचलायला लावलं होतं यावरून सखा डाॅक्टरावर काट खायचा.राणा व लाभा प्रकरण बबन्याला कळताच त्यानं सखाला गाठून पत्ते टाकून ओपन लाडीस खेळू पाहत होता.
"आरं सखा कुणास्नी सांगु नको.ऐक नीट.ते राणा डाॅक्टर लई छाकटं निघालं रं"
"बबनराव झालं काय !ते तर सांगा"
"आरं तो लवकरच गावातनं पाखरू पळवणार"
"पाखरू!कुणाचं?"सखानं माहित असुनही जिज्ञासा दाखवली.
भिमा पेपरचं पान पलटवणं थांबवत चेहऱ्यासमोर पेपर धरत कान टवकारू लागला.
"सखा ,त्यानं त्या भिमा ड्रायव्हरच्या दिलावर उपचार करून आणलेत मुंबई वरनं"
"बबनराव देव माणुस हाय राणा डाॅक्टर, त्यामुळेच तर भिमा वाचला",सखा गोडाईनं मीठ घोळू लागला.
"खाक देव माणुस.आरं तो आता त्या मोबदल्यात भिमाच्या पोरीवरच ........"
भिमाची तळपायाची आग मस्तकात गेली.उठावं की ऐकावं त्याला सुधरेना.
"बबनराव उलगडून सांगा की काय नेमकं"सखा साळसुदपणाचा आव आणत विचारू लागला.
"आरं तो राणा त्या पोरीला पळवायची तयारी करतोय"आरशातून तिरपा कटाक्ष भिमावर टाकत बबन्यानं बेछूट हल्ला चढवला.
"बबनराव,काही ही काय सांगता!भिमा किती कडक हाय,त्याचं पोरीवर बारीक लक्ष असतं तो आसलं इपरीत कसं घडू देईल!"सखा ही आता छूपे हल्ले करु लागला.
"आरं सखा लेका त्याच्यानं बायको सांभाळली गेली नाही तो पोरीला काय सांभाळेल!"
भिमा खाडकन उठला व एका झटक्यात अंतर कापत बबन्याला आवळून हातातल्या काठीनं बदडु लागला.
बबन्या आग लागली भडका उठेलच आता हे हेरुन मार चुकवत अर्ध्या कापलेल्या केसासहीत पळाला.भिमानं सख्याच्या सलूनच्या काचाचा चुराडा करत सख्याचंं गचांड धरलं व काठीनं बेदम चोपला.
लोक मध्ये पडले.भिमाचं बायपास झालेलं ह्रदय थडथड धडधड करु लागलं.त्याला धाप लागली.लोकांनी शांत करत त्याला घराला पोहोचवलं.
घरी येताच भिमानं कवाड लावलं.
"लाभे!"तो वाघागत डरकाळी फोडू लागला.
"खरं सांग त्या राणाचं व तुझं.....?"
अचानक झालेल्या प्रकारानं व आकस्मिक निलेशचं नाव निघाल्यानं लाभा थरथराटू लागली.
तिची नजर खाली गेली .
तोच हातातली काठी पाठीवर टेकवत लाभाला भिमानं देव्हाऱ्यापुढं ढकलत "घे आण देवाची नी सांग खरं काय ते?"
"बाबा तसं काहीच नाही,नी आपणास कुणी काय सांगितलं हे असलं!"
"नसत्या चौकशा बंद कर नी आधी विचारलं ते सांग"
लाभा रडायला लागली.
भिमानं संतापानं थरथरत तिचा हात पकडला व आपल्या डोक्यावर ठेवत
"घे आण या बापाची नी सांग तुझं काहीच नाही"
लाभानं एका झटक्यात हात मागे ओढताच भिमा काय ते समजला नी तो काठीनं तरण्या ताठ्या पोरीला बदडु लागला.
"पापी ,कुलटा, आई वर गेलीच ना?,या बापाच्या पालन पोषणात काय कमी पडलं तुला?का आईचं वाण दाखवलं.?"
तो काठीन बेफाम मारत होता व जोरजोरानं ओरडत रडत होता.तोच मागचं कवाड उघडत सरू आजी धावतच आली तिनं भिमाच्या हातातनं काठी हिसकावत दूर भिरकावली.भिमाला दुर ढकलत लाभाला छातीशी लावलं.लाभा एक शब्द बोलली नाही.
झाला प्रकार लक्षात येताच सरू आजीनं भिमाला समजावलं.
"आरं पोरा मी पोरीला पुरती ओळखते रं,आणि त्या डाॅक्टर पोराला भी.दोन्ही गुणाची हायेत.उमरमानानं झालं असेल पण त्यांच्या मनात खोट नाही.नी तु खुशाल त्या सटवीच्या पापा पायी पोरीला मारायला निघाला!"
रात्री निलेश जेवायला आला तर भिमानं खानावळ बंद हाय एवढंच तुटकपणे उत्तर देत खाडकन कवाड बंद केलं.निलेशला हा काय प्रकार समजेना.पण त्यानं ही पाहु नंतर असा विचार करत निघणंच पसंत केलं.
रात्री कोणीच जेवलं नाही.
लाभाला फणफणुन ताप भरला.सरू आजी तिच्या कपाळावर पट्ट्या ठेवत होती.
भिमाला पुन्हा संताप चढला.
"मावशे काही होणार नाही मेली तर मरू दे!"
"पोरा ,मरण्यासाठी कारं दिड वर्षाच्या चिमुरडीला खस्ता खाऊन मोठं केलं का तु!,चुकणं आणि पाप करणं यात फरक असतो लेका समजून घे"
भिमाचा बांध फुटला तो खाली ढासळत गुडघ्यात मान घातली व पोरासारखा धाय मोकलून रडू लागला.
"मावशी कळतंय गं मला .पण कोणी त्या सटवीचं नाव काढलं की शुद्ध हरपते."
बापाला रडतांना पाहुन लाभा धावतच आली व बापास बिलगली.नी मग दोन्ही जण रडू लागले.
"बाबा!बाबा!"बराच वेळपर्यंत भिमा पोरीच्या पाठीवर हात फिरवत होता.
"पोरी एक ऐक माझं .त्या डाॅक्टरशी सर्व संबंध तोड.खानावळ ही बंद कर त्याची.हे गावच सोडतो मी काही दिवसात व लवकरच तुझं लग्न ठरवतो"
लाभा नुसती रडतच होती ."बाबा हे गावच काय तुमच्यासाठी हे जग ही सोडेन मी"
बऱ्याच रात्रीपर्यंत कुणीच झोपेना.भिमाला आपलं सारं पोरकंपण आठवू लागलं. तो सुन्या अंधारात आपल्या माणसांना शोधू लागला.आपल्या माणसात त्याला काही पाठीत खंजीर खुपसणारी माणसं ही दिसू लागली.
.
.
.
पोळयाची अवस उजाडली रखमानं पहाटेच तयारी करून आपल्या नवऱ्यास उठवलं.आज फक्त दुपारपर्यंतच काम होतं व दुपारुन पोळ्यासाठी सुटी होणार होती.पण मारत्याला रोज रोज कामानं कंटाळा आला होता व आज त्याला पोळ्याची मस्त पिऊन आराम करायचा होता.
"रखमे आज जाऊ दे गं सणासुदीचं काम.राहु की घरी.भिमालाही सुटीच आहे."
"अवं असं काय करता?दुपार बारापर्यंत ट्रकीच्या दोन खेपा भरल्या की दुपारनं पोळाच साजरा करु.कंटाळा का करत्यात!"
पण मारत्याची हिम्मतच होत नव्हती.त्याला सण असुनही उदास,भकासी जाणवत होती.रखमानं एक भाकर बदडत भिमाला उठवलं. शेजारच्या सरीकडं भिमासाठी भाकरी ठेवत"सरे, दुपारी येते तोवर लक्ष ठेव गं भिमावर!"म्हणत कामावर निघाली.सरी आज जाणार नव्हती कामावर.
तोच दहा वर्षाचं भिमा पोर"आये रहा की घरला,समदेच घरला आहेत नी तुम्ही आजही नाय राहत"म्हणत रडु लागला.
"येईन ना मी,सांगितलं ना!"सांगत ट्रकवर रखमा व मारत्या विटभट्ट्यावर विटा भरण्यासाठी निघून गेले.
पहिली खेप भरे पावेतो ड्रायव्हर थोडी थोडी मारत झिंगला.तशीच ट्रक नेत पार्टीकडं उपसली.दुसरी भरे पावेतो ड्रायव्हर पुरा टल्ली झाला.ट्रक भरली.टर्ररर भर्र्ररर करत ट्रक निघाला.रस्त्यात एका टपरीवर साऱ्यांनी कचोरी खाल्ली.रखमानं कचोरी न खाता आपल्या भिमासाठी पाणी पिऊन कचोरी कागदात बांधुंन पुडा कमरेत अडकवला.आता उपसली ट्रक की घरीच जायचं.टल्ली ड्रायव्हरच्या पोटात कचोरी जाताच तो पेंगू लागला. मजुर ट्रकात भरलेल्या विटावर बसलेले.ड्रायव्हर पेंगत पेंगत गाडी भरधाव हाकू लागला.पुढच्या वळणावर समोरुन येणारा ट्रकनं याला भरपूर वाचवलं त्यात याची गाडी लिंबाला आदळत खाली पलटी झाली.रखमा मारत्या सहित मजुर पोळा न करताच विटाच्या ढिगाऱ्यात दाबली गेली.बैलाला सजवणारे लोक एकच आरडाओरडा करत धावली.हात लागले विटा फेकल्या जाऊ लागल्या एक एक मजुर निघू लागलं.कमरेतला कचोरीचा पुडा हातात घेतलेली रखमा निघाली ,मारत्या निघाला.छोट्या भिमाच्या हातात तिकडीचं मडकं दिलं गेलं.डोक्यावर रुमाल टाकला नी सरीनं एकच हंबरडा फोडला..
"रखमे !किती लबाड गं तु! दुपारपर्यंत सांगुन तुझ्या भिमाला कायमचंच माझ्याकडं सोपवलं"
तोच गावातला काशीबाचं रखमेची तिरडी बांधतांना रखमेच्या हातातील पुड्याकडं लक्ष गेलं नी मायेची ममता पाहुन आतापर्यंत किती तरी लोकांना खांदा देणारा काशीबा ही टाहो फोडुन आरडला.भिमानं मडकं तसच सोडत रखमेच्या तिरडीवर आडवा पडत"आये नाही सांगत होतो ना! नाही ऐकलं!बाबा !"
...
...
नात्यानं कुणीच लागत नसुनही केवळ शेजारीण व रखमी जातांना सांगुन गेली म्हणुन सरीनं भीमाला पोटच्या पोरागत वाढवू लागली.
दहाव्या वर्षीच भिमाची शाळा सुटली . तो सरी मावशीला मदत करत करत विट भट्टीवरच काम करु लागला.सरीला दुसरं कोणीच नसल्यानं भिमालाच ती आपला पोर मानू लागली.
भिमा ट्रक शिकला.पुढं सरी मावशीच्या मदतीनं स्वस्तातला जुना ट्रक घेतला.रात्रंदिवस मेहनत करत दोन वर्षात जुना विकुन व पतपेढी चं लोन घेऊन नवा ट्रक आणला व मुंबईला कपडा मिल मध्ये लावला.मुंब-सुरत कपडयाचे तागे वाहत तो आठ दिवसातुन खरातवाडीला येऊ लागला.मित्राच्या मदतीनं मील मधल्याच बदलापुरच्या सर्ईजेरावांची मुलगी केली.सुंदरा नावाप्रमाणंच जात्याच सुंदर.लग्न झालं.सुंदरा खरात वाडीत आली.एका वर्षात लाभा झाली.पण सुंदराचं खरातवाडीत चित्त लागेना.त्यात सरु मावशीचं तिचं अजिबात जमेना.मुळची सालस व कष्टाळू सरु मावशी पडती बाजू घेत समजून घेई.पण सुंदराला सरू मावशी नकोच होती.ती भिमाला बदलापुरलाच रहायला सांगू लागली.भिमाला सरु मावशीला सोडणं शक्यच नव्हतं.एकवेळ जन्मदात्री असती तरी त्यानं विचार केला नसता पण सरु मावशीनं काय केलंय हे तो जाणून होता.तरी दररोजचे वाद नको म्हणुन सरू मावशीनं त्याला समजावत बदलापुरला खोली करायला लावली.भिमा आता मुंबई-सुरत फेऱ्या मारत कधी बदलापुर तर कधी खरातवाडीत राहु लागला.लाभा एक वर्षाची झाली.सुंदरानं कपडा मीलच्या मॅनेजर शी सुत जमवलं.भिमाच्या कानावर जाताच त्यानं सुंदरा झोडपलं.पण सुंदराचं स्वैर वागणं कमी होईना.प्रकरणाचा बोभाटा झाला.आणि एक दिवस लाभाला एकटीला टाकून सुंदरा मॅनेजरसोबत कायमचीच गेली.भिमा नं लाभाला घेत खरातवाडी गाठली.
आपलं पोरकं प्रारब्ध वारसाहक्कानं आपल्या पोरीच्या ही वाट्याला यावं यानं भिमा खचला.पण सरु मावशीची आजी झाली व तिनं त्याच हिम्मतीनं लाभाचंही मातृत्व स्विकारलं.दिड वर्षाची लाभा रात्रभर रडे सरू आजी तिला कोरड्या पण मातृत्वानं ओथंबलेल्या छातीला कवटाळून झोपवी तर कधी मांडीवर धोपटत जोजवी.
भिमानं आता खरातवाडीतच ट्रक कामाला लावला.लाभा वाढू लागली तसं लोकं ही सुंदरा पळून गेली हे विसरू लागले पण तरीही कधी ना कधी ती धग धगधगेच.पुढे सरू आजी व भीमानं खानावळ सुरू करून लाभाला बी.फाॅम. पर्यंत शिकवलं.

भिमाला सारा पट आठवला.आईचं लांच्छन पोरीला लागुन तिचं आयुष्य डागाळू नये म्हणुन त्यानं काही ठरवलं.
दुसऱ्या दिवशी तो न सांगताच निघून गेला.तो परतला तो चार दिवसांनी.सोबत आणलेल्या माणसांनी ट्रक नेला.भिमानं ट्रक विकून डाॅक्टर राणाचे बायपासचे पैसे परत गेले.व लाभाला, सरू मावशीला घेत त्यानं कुठं जातोय हे कळू न देता पेणकडं प्रयाण केलं.
पण तरी अचानक पैसे परत करणं, खानावळीतलं जेवण बंद करणं यानं सैरभैर झालेल्या राणानं लाभाची एकांतात भेट घेतलीच.जी कुणालाच कळाली नाही.
मधल्या चार दिवसात भिमानं आपल्या मित्राची मुंबईला भेट घेतली होती.त्याच्या नशीबानं योग जुळून आला व त्या मित्राचाच दुरचा नातेवाईक पेणला राहत होता.मागच्याच महिन्यात मित्र प्रचंड संपत्ती मागे ठेवून देवाघरी गेला.त्याची दोन मुलं दुबईला होती.लहाना लग्नाचा होता.त्यासाठी लाभाचं पक्क करत ट्रकचा सौदा करत भिमा परतला होता.
.
.
लाभाचं प्राक्तन लाभाला कुठं घेऊन जाणार होतं हे येणाऱ्या काळगर्भातच गडप होतं...

क्रमश:.....
✒वासुदेव पाटील.