ही रहस्यमयी घटना 92-93 च्या काळात घडलेली.आमच्या एरीयातील पोरं रोज संध्याकाळी अभ्यास झाल्या वर बाहेर खेळायला जमत.त्यात आमचा आवडता खेळ म्हणजे स्टॅच्यु अँड ओव्हर खूप मजा यायची एखादयाला खूप वेळ ताटकळत ठेवायच आणि जरा हलला की पाठीत बुक्यांचा मार खावा लागायचा मुलगी हलली तर 10 उठा बशा काढायला लावायच्या. एक कुटुंब आमच्या समोरील नव्यानेच तयार झालेल्या बिल्डींग मध्ये राहायला आले होते.ते ग्राऊंडफ्लोरला राहायला होते.नवरा बायको आणि एक लहानमूलगी.ते नवरा बायको जास्त कोणाशी बोलत नसत,एक प्रकारच दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत.आम्ही खेळात गुंतलेले असताना त्यांच्या घरातून ती मुलगी आमच्या खेळा कडे गुंग होऊन बघत होती,म्हणून आम्ही तिलाही खेळायला बोलवले खूप गोड होती ती सर्व जण तिला खूप वेळ बघत राहायचे असं एक प्रकारचे सँमोहन होते तिच्यात.आता रोज ती खेळायला येऊ लागली आम्ही तिला नाव विचारायचो पण नुसती हसायची काही बोलत नसे.आम्हाला खूप उत्सुकता असे तिचा आवाज ऐकायची तिला बोलताना बघायची तिच्या बद्दल अजून जाणून घ्यायची हे कोण कुटुंब कुठचे कुठून आले हे एकदा जाणुन घ्यायचे असा आम्ही निर्धार केला आणि तो लवकर फळाला आला.आम्ही एकदा सोनसाखळी खेळत होतो आणि तीच एकटी राहिली होती आऊट व्हायची खूप पकडायचा प्रयत्न करत असताना आणि आता तिला पकणार तेवढयात एकदम तिने आम्हाला स्टॅच्यु केलं आम्ही सर्व स्तब्ध उभे एकमेकांचे हाथ धरून आणि ही आमच्या मागे गेली बराच वेळ आम्ही ओव्हर होण्याची वाट पहात होतो.म्हणून आम्ही हळूच मागे वळून पाहिलं तर ती नव्हती तिच्या घरचा दरवाजा उघडा होता म्हणून आम्ही धावत तिला असं का केलं विचारायला गेलो तर घरात गेल्यावर एक धक्का बसला, समोरच्या टीपॉय वर त्या मुलीचा हार घातलेला फोटो होता.त्या मुलीच सहा महिन्यापूर्वी अल्पशाआजाराने निधन झालं होतं.पण त्या पालकांना ती दिसत नसे परंतु त्या दिवसा नंतर ती परत कोणाला दिसली नाही कवचितच ती दरवाजावर उभी असलेली पाहण्यात येत ते ही एक क्षणापुरती.ते आधी जिथे रहात तिथे ती मुलगी त्यानाच दिसत असे म्हणून ते इथे शिफ्ट झाले पण आता त्यांना सोडून इतरांना ती दिसत असे पुढे कालांतराने त्या मुलीच्या जाण्याचा दुःखात ते नवरा बायको ही गेले नंतर मात्र ती छोटुली कोणालाही दिसली नाही .
लेखन प्रथम वाडकर