बुजगावण
विशेष आभार: कनिष्क हिवरेकर
भाग 71 शेवट👻🙏🏻
इकडून विष्णू आणि संध्या बाहेर आलेले पाहून जाखोबाने धावत जाऊन त्यांना आधार दिला सर्वांनी त्यांना बाहेर काढले... इकडे आबारावंचा अंत झाला होता .. ते धारातीर्थी कोसळले होते...चार पावलावर दूर.. ते बुजगावणे रागाने फुत्कार करत उभे होते .... अनिश च्या हाता,ध्ये त्याच्या सडलेल्या शरीराचा सापळा होता... अनिश आणि महाकाळ दोघांची हि नजरानजर झाली होती.... अनिशच्या डोळ्यामध्ये आपल्या मित्रासाठी असलेली प्रेमाची भावना आणि त्यांच्या मृत्यूचा राग होता.... आणि इकडे महाकाळचा दंभ लोभ आणि मत्सर होता....परंतु आज इतिहास घडला जानार होता...अनिशने वाघाच्या गर्जने प्रमाणे एक गर्जना केली... आणि आपले सर्वबळ एकटवून त्याने महाकाळचा सडलेला सापळा आगीच्या भडक्यात फेकला .... आगीचा भडका त्या सापळ्याला आतमध्ये शोषून घेणार होता तोच ते बुजगावणे अनिशच्या अत्यंत जवळ आले.. तो अनिशला हात लावणारच होता ... आपले काटेरी हात त्याने अनिशच्या गळ्यात घुसवण्यासाठी जवळ आणले होते तोच तो सापळा आगीत जाऊन एक भला मोठा .. निळा हिरवा आगीचा भडका झाला .... अनिशने त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि बस शेवटचे एक वाक्य बोलून त्याने महाकाळला अर्थात त्या बुजगावण्याला आगीत भिरकावले “ हा आहे तुझा अंत महाकाळ...” पण त्याने अनिशला देखील आगीमध्ये ओढून घेतले.... त्याच सोबत आगीचा आणखी एक भला मोठा भडका झाला .... सबंध गावकरी त्या भडक्याने थरारले .... सर्वांच्या डोळ्यामध्ये ती आग प्रतिबिंबित होत होती.... “अ .... नि ... श ......” संध्या जीवाच्या आकांताने अनिशचे नाव घेऊन ओरडली..... आणि खाली कोसळून पडली... जखोबा आणि विष्णू दोघेही नम झाले होते .... कारण त्यांचा नायक अनिश सैतानाशी लढता लढता त्याला हरवून स्वतः धारातीर्थी पडला होता ....हा त्यांचा समज होता.... आगीचा भडका शांत झाला पहाट झाली अखेरीस त्या बुजगावण्याचा अंत झाला होता.....विष्णूची नजर आपल्या हातातील त्या गणपतीच्या अर्ध्या चित्रावर पडली.... “ परमेश्वरा....! काय केलस रे हे ..... आमचा अनिश हिरावून घेतलास तू...वक्रतुंडा रे गणेशा .. काय केलस तू हे ....”
सगळीकडे एकदम शांती पसरली होती... कि तोच जखोबालापहाटेच्या पहिल्या सूर्याची किरण पडताना दिसली... ती एका राखेच्या ढिगारावर...आणि त्या राखेच्या आणि लाकडाच्या जळलेल्या ढिगामध्ये काहीतरी हालचाल झालेली दिसून आली... त्याने विष्णूच्या खांद्यावर थाप दिली ....” सायबानू ते बघा ... तिकडे बघा लवकर साय्बाणु...” विष्णूने त्या ढिगाराकडे पाहिले तसा ढिगारा उधळला गेला ....आणि लडखडत त्यामधून स्वतः अनिश उभा राहिला .....
त्याला पाहून सर्व गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला ....विजय झाला होता ... अखेरीस इतिहास घडला ... एका साधारण मानवाने हि एक घृणकर्मी गाथा संपवली होती....शेवटी दैव जिंकले आणि सैतान हरला
गावकऱ्यांच्या मदतीने उर्वरित प्रेतांचे अंतिम संस्कार व्यवस्थित पार पाडले गेले आपल्या सर्व मित्रांच्या आठवणी उराशी बाळगून अनिश, संध्या आणि विष्णू तिघे हि गढदुर्ग गाव सोडून गेले व परत कधीही न येण्याचा निर्णय त्यांनी घेतला.... शेवटी गावातली लोक हि सुखात राहिले.... अनिश आणि दोघांनी आपल्या शहरी परतून लग्न केले व दोघे सुखाने नांदू लागले... नकळत दोघांनी एकमेकांशी आपल्या भावना व्यक्त केल्या
हरली सैतानी शक्ती जिंकले दैव
केला साधारण मानवाने त्याचा सामना
संपवला केला अखेरीस बुजगावण्याचा खात्मा......
समाप्त:👻🙏🏻
Nice story ahe pan madhe khup boar zal
ReplyDeleteKhup chaan Kanishk suspense khup sundar
ReplyDelete