हडळीचं पोर !
भाग 1
भाग 1
ते हिरवं लुगडं पाहून मन पुन्हा हरखून गेलं. माझ्यापासून 15-20 फुटांवर असलेल्या त्या वस्त्रातून आताही आईच्या मायेच्या थंडगार लहरी अंगावर येत होत्या. नकळत डोळे मिटले आणि पापण्यांच्या आड तिची मूर्ती उभी राहिली.
इतकी सुंदर आई क्वचित कुणाला लाभते. कमरेपर्यंत रुळणारे आणि आमच्या शेतातील मातीहुन अधिक काळे असणारे दाट केस, नाजूक जिवणी, मोत्यांना फिके पाडणारे दात आणि सकाळच्या कोवळ्या उन्हाला लाजवणारा रंग..शाळेत जायचो तेव्हा असं वाटायचं की तिचा हात धरून गावभर मिरवाव..अभिमानानं सगळ्या वर्गाला दाखवावी..बघा माझी आई किती सुंदर आहे !! नाहीतर बाकीच्यांची आई..कोणी नकटी, कोणाचे दात मिश्री लावून काळे झालेले, पिंजारल्या केसांच्या, बिनतेलाच्या बटांच्या जटा झालेल्या, मातकट साडी नेसणाऱ्या.. भकास डोळ्यांच्या कुठल्या!
आईचे डोळे...ते खचितच वेगळे होते. इतके काळेभोर की डोहातले पाणी त्यांच्यात साठले आहे असे वाटायचे..तिथे बुब्बुळांच्या जागी फक्त दोन बिंदू लकाकत. मी चार यत्ता शिकलो नी एके दिवशी तिला विचारूनच टाकलं..
बयो ! तुला नीट दिसत का एव्हढ्याशा बुब्बुळांनी ?
ती हलकं हसली. मला जवळ घेऊन म्हणाली,
हो रे बाळा..सर्वांना जे दिसते त्यापेक्षा मला जास्त आणि दूरचे दिसते..
तिनं काहीही सांगितलं असतं तरी मला मान्य होतं. मी तिचा लाडका मुलगा होतो आणि ती माझी पंचप्राण होती.

आईची आणखी एक खास बात होती. मी कळता झाल्यापासून पाहत होतो, तिचं वय वाढल्याचं कोणतंच चिन्ह दिसायचं नाही. दादा, माझे वडील काळ्यावरून पांढऱ्या केसांवर आले. माझ्या मित्रांचे आईवडील तोंडावर सुरकुत्या घेऊन फिरू लागले. पण बयो म्हणजे माझ्या आईच वय जणू कुणी गोठवलं होतं...
थोडं दादांविषयी सांगायला हवं. ते माझे वडील होते. पण नात्यापुरतेच.. कमालीचा करडा स्वभाव..आईने त्यांच्यासमोर कधीच नजर वर केली नाही. ओसरीत कुरकुर वाजणाऱ्या झोपाळ्यावर ते बसत..काही वेळाने खेकसत..
कड्यांना तेल घालायला जमेल की गड्याला बोलवू ?
आई बसल्या जागी ओठांची हालचाल करायची..पण तिच्या शब्दांना बाहेर येण्याचे धैर्य नसे..दादा पाय वाजवीत बाहेर गेल्यावर ती निमूटपणे तेलात बुडवलेली चिंधी कड्यांमध्ये घालायची..मी झोपाळा मागेपुढे करून बघायचो..आवाज बंद झाला की दोन्हीही गालात हसायचो..
(क्रमशः)

भाग २
घरात आईच्या पुढेमागे करत घुटमळण्यात आनंद मानणारा मी गावात जातांना मात्र खालमानेनं चालायचो. मला मित्र म्हणून नव्हतेच. शाळेत माझ्याशी मैत्री करायला कुणीच तयार नसायचं. त्याचा पहिला अनुभव अत्यंत वाईट होता. झालं असं..

शाळेत मास्तरांनी एका मुलाशेजारी बसवलं. मधल्या सुटीत आम्ही एकत्र डबा खाल्ला. शाळा सुटल्यानंतर त्यानं ‘घरी चलतोस का ’ म्हणून विचारलं. मी सोबत गेलो. त्याचं घर शाळेजवळच होतं. तिथं त्याच्या आईने आम्हाला लाडू दिला. तो खात असतांनाच तिनं विचारलं..
तू कोणाचा पाेरगा रे ?
वाड्यावरच्या बयोचा ...मी उत्तर दिलं.
जिवंत भूत पाहिल्यासारखा तिचा चेहरा झाला. तिनं तावातावानं माझ्या हातातला उरलासुरला लाडू हिसकावून घेतला. तिच्या मुलाला अक्षरश: फरफटत घेवून गेली. त्याला दरडावून विचारलं..
शाळेत याच्या डब्यातलं काही खाल्लं नाहीस ना ?
त्याने नाही म्हणून सांगितल्यावर ती थोडी शांत झाली. पुन्हा माझ्याजवळ येवून म्हणाली.
बाबा, पाया पडते तुझ्या, पण माझ्या पोराच्या वाट्याला जाऊ नकोस. त्याचं काही चुकलं असेल तर मी पदर पसरते. पण त्याच्यापासून दूर राहा.
मला काहीच कळलं नाही. पण शहाण्या माणसासारखा मी त्यांच्या घराबाहेर पडलो. जातांना एकदा तिकडे वळून पाहिलं. तिने अंगणात तांब्याभर पाणी फेकलं होतं. घराच्या उंबऱ्याला कसलासा अंगारा फासत होती..माझ्याकडे एक डोळा ठेवून !

घरी गेल्यावर आईला हा प्रकार सांगितला. तिचे डोळे भरून आले. पण व्हायचं काय की तिच्या गहिऱ्या डोळ्यांत पाणी आलेलं चटकन समजायचं नाही. एव्हाना मी मात्र तिच्या डोळ्यातले भाव ओळखायला सरावलो होतो. ती एव्हढंच म्हणाली.
बाळा, यापुढे शाळा सुटली की सरळ घरी यायचं. कुणाकडे जायच नाही.
तिचा शब्द मला प्रमाण होता. तेव्हापासून मी कुणाकडेच गेलो नाही. पण शाळेत एकटेपणाचा त्रास होवू लागला. खेळायला काय अगदी माझ्याशी भांडायलाही कुणी तयार होत नसत. कल्ला चाललेला असे, भांडणे होत, खेळ रंगात येई पण मी तिथं पोहचलो की स्मशानशांतता पसरे. अर्धनागडी, फाटक्या अंगाची पोरं ती, मला जणू वाळीत टाकल्याप्रमाणे वागवत होती. काही दिवसांनी मलाही एकटेपणाचा सराव झाला. नाहीतरी शाळेपेक्षा मनोरंजक गोष्टी आमच्या वाड्यावर घडत होत्या...