लेखक:- अॅड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि. १४.०८.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)

दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना, मला माझ्या एक बहिणीचा कॉल आला होता आणि बोलता बोलता ती मला म्हणाली की काल नुतनचे अकॅसिडेंट झाले,... आणि जी बोलत होती ती नुतनची मोठी बहीण, मी तिला विचारले की काय झालं, कुठे पडली, त्यावर ती म्हणाली की काय आणि कसे तिचे तिलाच कळले नाही.. नूतन माझी मानलेली बहीण आहे, व्यवसायाने डॉक्टर आहे, वय लहान असले तरी औषधाला खूप गुण आहे.. तिचे क्लिनिक भाईंदर बाजूला आहे, तिकडे जाताना ती नेहमी ऑटो ने जाते, पण त्या दिवशी ती आणि तिचे वडील बस ने आले, बस स्लोव झाली आणि वडील उतरले, नूतन पण उतरणार इतक्यात एकदम तिला ब्लॅंक झाल्यासारखे वाटले, डोळ्यासमोर अंधेरी जशी आली आणि ती उतरता उतरता उलट बाजूने उतरली, हे सर्व कसे घडले तिच्याही लक्षात आले नाही, जे व्हायचे तेच झाले, उलट बाजूने उतरल्यामुळे तिचा तोल जाऊन ती पडली आणि तिला खूपच मार बसला. हे का आणि कसे झाले तिला अजिबात कळलेच नाही, तिने ह्याधीही कित्येकदा बस ने प्रवास केलेला आहे, पण ही वेळच खूप वेगळी होती, पण बोलतात ना की काळ आला होता पण वेळ आली नव्हती,.. माझी बहीण मला हे सांगत असताना अचानक माझे डोळे मिटले जाऊन मला ध्यान लागले आणि मला दिसले की हा साधा प्रकार नाहीय तर ही करणी बाधा आहे, मी माझ्या तुय बहिणीला काहीच बोललो नाही, आणि संभाषण आटोपते घेऊन नूतनला कॉल करतो असे म्हणून फोन ठेवला. मी नुतनला कॉल करून सांगितले की नूतन काय झाले तुला इतकं धडपडायला!! ती म्हणाली मलाही माहीत नाही रे काय आणि कसे झाले, त्यावर मी तिला म्हणालो की नूतन ... तुला वाटते तशी ही साधी गोष्ट नाहीय, हा अपघात नाहीय तर बाहेरची बाधा आहे,... त्यावर ती म्हणाली की मग आता काय करायचे, तुझ्याकडे काही मार्ग आहे का, त्यावर मी तिला म्हणालो की, ... तू दि च्या इकडे राहणाऱ्या काकांकडून एकदा पाहून घे,(हे काका माझ्या बहिणीच्या घराजवळ राहतात, आणि बाहेरची बाधा बघतात तसेच उपाय देतात), खरंतर मीच तिला उपाय देणार होतो परंतु श्रावण असल्याने माझी पारायणे चालू आहेत म्हणून मी तिला त्या काकांकडे जाण्यास सांगितले, तिने लगेच ते मान्य केले, कारण नूतनचा माझ्यावर खूप विश्वास आहे, ही नूतन तीच जिच्यावर मी हॉस्टेल नावाची सत्य भयकथा लिहिली आहे आणि माझ्याबाबत सांगायचे झाले तर जे माझ्या एकदम जवळचे आहेत किंवा फोल्लोअप मध्ये राहाताय त्यांचा चेहरा नुसता डोळ्यासमोर आला तरी त्यांच्यावर येणारे किंवा आलेले संकट मला ध्यानात दिसायला लागते. नूतनने तिच्या बहिणीला कॉल करायचा म्हणून कॉल ठेवला, आणि मी ती लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करू लागलो. थोडावेळाने परत नुतनचा मला कॉल आला आणि ती म्हणाली की तू बोललेलास तेच निघाले, ही बाहेरची बाधाच आहे. नंतर तिने मला दोनच दिवसनपूर्वीच एक प्रसंग सांगितला...
ती म्हणाली की तिने मुंबईत एक ठिकाणी नवीन क्लीनिक सुरू केले आहे, परंतु तिथेच असणाऱ्या एक लोकल डॉक्टर ने तिला त्रास द्यायला सुरवात केलेली होती, तो डॉक्टर तिच्या मैत्रीणीचाच नवरा, त्याची १२ वर्षाची प्रॅक्टिस आहे, पण नूतन खूप हुशार डॉक्टर असल्याने त्याला वाटले असावे की आता त्याच्या व्यवसायावर परिणाम होणार, खरेतर त्या डॉक्टरला आणि त्याच्या बायकोला खास काही येत नाही, पण म्हणतात ना की अल्ला मेहेरबान तो गधा पहेलवान, त्याने हिला क्लीनिक चा गाळा देणाऱ्या मालकाला आणि एजंट ला सांगीतले की तुम्ही हिला जागा देऊ नका, मी तुम्हाला ती देणार असलेल्या भाड्याच्या दुप्पट भाडे दर महिना देईन, तसेच तो त्या एजंटला ही फुकटात महिना पैसे द्यायला तयार झाला, त्यावर त्या एजंट आणि मालकाने नुतनला सांगितले पण करार झाला असल्याने तसेच नुतनला ती जागा आवडलेली असल्याने तिने त्या गोष्टीला विरोध केला, त्यानंतर त्याने नुतनचे कॅरेक्टर चांगले नाही, इत्यादी काय काय सांगायला सुरवात केली, आणि अप्रत्यक्षरीत्या तिच्यावर दबाव आणायला सुरवात केली, पण ती काही ऐकत नाही म्हणून त्यानेच तिच्यावर हा मारण प्रयोग केला असे ते काका म्हणाले. त्या काकांनी लागलीच तिला मंत्राउन काहीतरी उतारा करायला दिले आणि आश्चर्य असे की ते केल्यावर तिला एकदम हलके आणि रिलॅक्स वाटू लागले. तिचा अपघात झाल्यापासून तिच्या घरातील सदस्य पण खूप आजारी होते, तिने जे सांगितले ते असे की,.. घरातील सर्वाना रात्री अजिबात झोप येन नव्हती, आजारपणं वाढलेली, एक प्रकारचा मानसिक ताण वाढला होता, परंतु ह्यामागे असे काहीतरी असेल ह्याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती.. आता सर्व ठीक आहे.. पण धोका अजून टळला नाही... मला ह्या लेखातून इतकेच सांगायचे आहे की करणी इत्यादि सारख्या गोष्टी असतात, मी अशा खूप केसेस हाताळल्या आहेत, पण सर्वानाच मर्यादा असते, काही केसेस मला सोडवता आलेल्या नाहीत. माझ्याकडे येणाऱ्या जातकांना ज्योतिष मार्गदर्शन करत असताना मला असे जाणवले की करणी बाधा इत्यादी गोष्टी होण्याआधी त्या व्यक्तीचा नक्कीच काहीतरी अपघात होत असतो, कदाचित ती एक सूचना किंवा त्या शक्तीला दिलेला पहिला भोग किंवा आपण केलेला प्रयोग चालू झाला आहे हे पाहण्याची खूण असावी, असे अपघात कधी कधी क्षुल्लक असूनही त्यानंतर त्या व्यक्तींची पूर्ण आयुष्याची वाताहत होताना मी पाहिली आहे. ह्या आपल्या ग्रुपवर पण असे कित्येक आहेत ज्यांच्या बाबत हे घडले आहे, आणि म्हणूनच अंधश्रद्धा पसरवीणे हा हेतू नाही पण सांगणे आहे की कुठल्याही अपघाताकडे साध्या नजरेने पाहू नका, कदाचित ती एक मोठ्या घातपाताची सुरवात ही असू शकेल...
धन्यवाद...
अॅड. अंकुश सू. नवघरे
Created by Marathi horror Stories