हडळीचं पोर ! -भाग 3
आमचा वाडा...ती एक शापित वास्तू असल्याचा प्रवाद होता. मुळात हा वाडा आम्ही बांधलेला नव्हता. दादांनी तो विकत घेतला होता. आमच्यापूर्वी तो कित्येकांच्या हातात गेला पण टिकला मात्र नाही. एक एक करून त्याचे मालक, त्यांची कुटुंबे उध्वस्त झाली..देशोधडीला लागली. आम्ही मात्र त्याला पुरून उरलो
......जणू तो आमचीच वाट पाहत होता !
......जणू तो आमचीच वाट पाहत होता !
वाड्याला खेटून दोन बुरुज होते. दूरवरून पाहिलं की काळोखात दोन स्त्रिया उभ्या असल्यासारखे ते दिसत. वाड्याच्या मध्यभागी असलेल्या चौकात घडीव दगडांनी बांधलेलं भलंमोठं सुंदर तुळशी वृंदावन होतं. पण त्यात तुळस कधी फुललीच नाही. संध्याकाळी तिथे कावळ्यांची गर्दी होई. बयो त्यांना हुसकावू देत नसे. ताज्या स्वयंपाकाचा काही भाग तिथं ठेवायला लावायची. वाड्याच्या तुळया धरून अनेक वटवाघळे वस्तीला होती. बयो त्यांनाही मला हात लावू द्यायची नाही. आपल्या अन्नात, घरादारात प्रत्येकाचा वाटा असतो असं ती म्हणायची.
वाड्याच्या दक्षिणेला आमची शेती होती. पूर्णतः दुष्काळी असलेल्या त्या मुलुखात आमची विहीर बाराही महिने पाण्याने शिगोशिग भरायची. दादा शेतात गेल्याचे फारसे आठवत नाही. पण धान्य मात्र विपुल पिकायचं. कणग्या सदोदित भरलेल्या असायच्या. सगळं गाव एकीकडे आणि आमचं उत्पन्न एकीकडे असा मामला होता. पण या वाड्यावर कोणताच संन्याशी, फकीर, भिकारी भिक्षा मागण्यासाठी फिरकायचा नाही.
काही चोरांना मात्र त्याचा पत्ता नसावा. अमावास्येच्या रात्रीचा अंधार पाहून दाेघांनी भिंत आेलांडून आत येण्याचा प्रयत्न केला. सकाळी त्यांची काळीठिक्कर झालेली प्रेतं वाड्याशेजारच्या काटेरी बाभळीत पडलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी भयंकर पाहिल्याचा भाव होता. त्यानंतरही एकाने चोरीची हिकमत केली. काही दिवसांनी तो गावात वेडा म्हणून फिरतांना दिसला. त्यांच्याबद्दल आईला विचारलं तर ती एकच सांगायची..
चोरी वाईट असते. त्याचं फळ मिळतंच !
दुष्कर्माची फळं देव देतो हे एेकलं होत. पण देवाचा आमच्या वाड्याशी संबंधच काय ?
...वाड्यात देवघर काय देवाच्या नावानं एक धोंडाही नव्हता.
(क्रमशः)
हडळीचं पोर ! भाग 4
_______________________________________
मुलं मोठी झाली की आवडेनाशी होतात. बहुधा ती प्रश्न विचारू लागतात म्हणून ! मी जसा वय आणि बुद्धीने वाढत गेलो तशा बयोचं वेगळेपण मला अधिक जाणवू लागलं होतं. मी तिच्यावर नकळत नजर ठेवू लागलो. ही बाब बयोच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही. ती स्वतःला अधिकाधिक आक्रसून घेऊ लागली. अर्थात तिची माझ्यावरची माया कमी झाल्याचं तिनं कुठेही जाणवू दिले नाही.
गावातील सगळ्या मुलांना आजोळ होते. सुटीत ती मामाच्या गावी जात. मी मात्र अद्याप गावाबाहेर पाय टाकला नव्हता. न राहवून तिला विचारलंच..
बयो, माझे मामा कुठं आहेत, तुझं माहेर कुठे आहे ?
खूप दूर आहे बाळा..तुझे वडील मला घेऊन आले आणि माहेर सुटलं !
मला दादांचा प्रचंड राग आला. इतक्या चांगल्या बाईचं माहेर तोडत का कुणी ? जाम वाईट माणूस आहे. सारखं कड्यांना तेल घालायला लावतो.
बयो, मला बहीण भाऊ का नाहीत ग ! ...तिला बरं वाटावं म्हणून मी विचारलं.
तुझ्या आधी दोन झाली..पण जगली नाहीत. तू मात्र भलता चिवट..टिकलास. आईचं डोकं खाण्यासाठी ! का रे, एकट वाटत का ? मी आहे ना तुझ्याजवळ.
ती असं काही बोलली की मला भरून येई. मग तिच्या कमरेला हातांचा विळखा घालून मी पदराचा धुंद गंध हुंगत असे.
बयोचा दिनक्रम वेगळा होता. मी झोपतो तोवर ती जागी असे. मी उठेपर्यंत वाडा साफसूफ करून, सुस्नात होऊन ती माझ्या उशाशी बसलेली असायची. ती झोपते कधी अन उठते कधी हे मला कधीच दिसले नाही. शेतीचा इतका मोठा पसारा गडीमाणसांच्या मदतीशिवाय कसा आवरता येतो हे समजणे माझ्या आवाक्याबाहेर होते.
अलीकडे मला चित्रविचित्र स्वप्ने पडत. आमच्या वाड्यात अनेक बिनचेहऱ्यांचे स्त्री पुरुष वावरत आहेत, मी दिसलो की माझ्याबद्दल बयोला खुणेने विचारत..मग बयो छद्मी हसून माझ्या डोक्यावरून हात फिरवत असे. तिच्या चेहऱ्यावर त्यावेळी भयंकर खुनशी भाव असत..घामाघूम झाल्याने मला जाग यायची. पहावे तर तर बयो माझं डोकं कुरवाळत बसलेली दिसायची. मग मला धीर यायचा. तिच्या कुशीत आणखी खोल शिरून मी निर्धास्त झोपायचो.
(क्रमशः)
_____________________________________________________________________________