एक रात्र भुताच्या गावीभाग एक
हा अनुभव मी माझ्या मामांकडून ऐकलाय. पात्र व स्थळांची नावे बदलण्यात आलेली आहेत. तर ते हिवाळ्याचे दिवस होते तरीही फारशी थंडी काही पडली नव्हती.शैलेश सहपरिवार त्याच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला निघाला होता. त्या गावी जायला रात्रीची एकच बस होती. कंडक्टरने घंटी वाजवली न बस सुटली. तसाच सुस्कारा टाकत सुनंदा(शेलेशची पत्नि)म्हणाली,"सुटली रे देवा बस ".अन् इकडे मुलांची भांडण सुरु झाली की कोण खिडकीजवळ बसणार?तशी सुनंदा त्याँच्यावर ओरडली," मोनु, राणी झालं का सुरु तुमचं लगेच? गप्प बसा नाही तर धपाटेच देते." राणी मोठी होती 8 वर्षाँची न मोनु 6 वर्षांचा. शैलेश मोबाईल खिशात ठेवत मुलांना म्हणाला,"दंगा करायचा नाही ह." बाहेरुन हवा आत येत होती त्यामुळे शैलेशने खिडकी लावून घेतली तशी दोन्ही मुलं गप्प बसली.तर असा हसत खेळत त्यांचा प्रवास सुरु होता.राणी तिच्या बाबांजवळ खिडकीतून बाहेर बघत होती.तिची आई न भाऊ मात्र झोपी गेले होते.राणीच्या मनात अनेक विचार नाचू लागले."ही झाडं,चांदोबा आपल्यासोबतच धावत असतील का?" पण अंधारामुळे तिला ते सगळ भेसुर वाटू लागलहोतं.ती झाडं आता त्या गडद अंधारात तिला आणखीनच भयावह वाटू लागली होती.तो ढगाआड लपणारा चंन्द्रभुतांच्या सिरियलमध्ये दाखवतात तसाच दिसत होता.आता नक्कीच भूत मला पकडून नेणार अशी धास्ती तिच्या
मनात घर करु लागली.तशीच ती तिच्या बाबांच्या कुशीत शिरली आणि विचार करतच झोपी गेली.रात्रीच्याप्रवासामुळे बरेच जण झोपी गेले होते.शैलेश मात्र जागाच होता.हात समोर करत त्याने घड्याळात बघीतलेरात्रीचे पाउण वाजले होते. घड्याळावरुन त्याची नजर हटत नाही तोच फट्टटट असा आवाज आला.अन सगळेच जण एका जबरदस्त धक्क्याने जागे झालेत.2 4 लहान मुलं आवाज ऐकून रडायलाच लागली आणि काय झाले म्हणत गोंधळ करु लागली.बस जागेवरच थांम्बली.लगेच कंडक्टरने खाली उतरुन बघीतले;त्याच्यासोबत काहीप्रवासी पण उतरले
बसला चौफेर प्रदक्षिणा घातल्यावर कंडक्टरने ड्रायवरला दारातून आवाज दिला.."पायलट जरा बाहेर या की .." तोंडात तंबाकू भरत आणि हात झटकत ड्रायवर बाहेर आला. मागे जाऊन पाहतो तर काय बसचे टायर पंक्चर झालेले"पंक्चर झालय ..गाडी पुढ जाणार न्हाय इतक्या रात्रीची दुरुस्त बी व्हणार नाही तवा सर्वांनी आपापली सोय करावी " ते ऐकून सर्व प्रवासांच्या कपाला वर आठ्या पडल्या शैलेश लगेच ड्रायवर वर ओरडला "एवढ्या निर्जन रस्त्यावर लहान लेकरे बाळे बायका घेऊन कुठ जायचं आम्ही ? काही बंदोबस्त तर करा " त्यावर ड्रायवर उत्तरला "आम्हाला काय नाद लागलाय का अस करायला? समजून घ्या कि हो हा रस्ता बगा पुढ जाऊन हायवेला मिळतो तिथून वाहनांना कमी नाही " तसेच ड्रायवर आणि एसटी ला शिव्या घालीत लॉक आपल्या समानसूमान सोबत गाडीबाहेर पडले. आणि हायवेच्या दिशेने जाऊ लागले शैलेश आणि सुनंदाचा नाईलाज होता मोनू झोपूनच होता त्याला शैलेशने कडेवर घेतले हातात अज्जड बँग्स घेऊन दोघे कसे बसे चलत होते. राणीदेखील आईचा हात धरून चालू लागली हायवे फारसा लांब नव्हताच तेवढ्यात अर्धातास व रस्त्यातील दोन फाटे ओलांडताच त्यांना हायवे मिळाला आणि सर्वजन तेथे पोहोचले. पण आता थंडी जोम धरू लागली होती. वाहनाची येजा सुरु होती. शैलेशने घड्याळ पाहिले तर रात्रीचे १:३० वाजले होते.. आणि ज्याला जे वाहन भेटेल त्यात बसून तेते जात होते. शेवटी शैलेशने हात करून एका टेम्पोला थांबवले. तो मुलगा २४ एक वयाचा होता. शैलेश त्याला म्हणाला .."बाबा रे इथ कुठ जवळपास एखादे गाव असेल तर सोड आम्हाला तिथपर्यत " खांद्यावर मुल हातात एक जड बँग आणि सुनंदा जवळ देखील तेवढीच वजनाची. आणि एका हातात झोपेला आलेली राणी सगळे त्या मुलाने एकवेळ पहिले आणि म्हणाला "या भाऊ बसा ती आणा ते सामान इकडे " सामान ठेवून सगळे जन टेम्पोत बसले आणि सुनंदा शैलेशला म्हणाली हे कुठ येऊन अडकलोय हो आपण ?" ती फार धास्तावली होती कसल्यातरी तंद्रीतून बाहेर पडत शैलेश म्हणाला "आ आग मोनुला ताप चढलाय ग " सुनंदाने लगेच त्याला जवळ घेतले आणि शोल ने झाकले "थंडी मुळे असेल हो आता कसे करायचे ?" राणी तिच्या आईच्या मांडीवर तसीच झोपून गेली होती ..शैलेश राणीला देखील हात लावत म्हणाला ..."राणी ला नाहीये न .. असे मम्हणतच तो उद्गारला "जवळच्या गावात गेल्यास बघू काहीतरी
त्यांचे बोलणे तो मुलगा शांत पणे ऐकत होता समोर गाडीचालवत तो म्हणाला "जवळच एक डॉक्टर आहे समोरच्या पाड्यावर" थांबवू का गाडी?" तसेच सुनंदा म्हणाली फार उपकार होतील दादा तुमचे " त्यावर तो मुलगा म्हणाला "ताई दागदागिने जपून ठेवा चोरटे फार वावरतात इकडे " सुनंदा आणि शैलेश थोडे चरकलेच आणि सुनंदाने दागिने शैलेश कडे दिले . त्यावर तो मुलगा म्हणाला "गाडी फैल पडली न फाट्यावर तुमची " तुम्हाला कस माहित ?" शैलेशने आश्चर्याने त्या मुलाला विचारले तो मुलगा म्हणाला "नेहमीच च आहे हे स्पोट आहे तो हहह.. " शैलेश आणि सुनंदा दोघे एकमेकाकडे बघू लागले पण शांतच बसले अनेक वाईट साईट विचार दोघांच्याहि मनात घोळत होते अचानक टेम्पो थांबला व दोघेहि भानावर आले रस्त्याच्या कडेला तो टेम्पो उभा करून तो मुलगा खाली उतरला तिथून एक पायवाट गेली होती डॉक्टर घेऊनयेतो असे सांगून तो मुलगा त्या पायवाटेने निघाला इकडे हायवे सगळा सामसूम होता.. काळ कुत्र देखील दिसत नव्हते आणि वाहन ते तर अजिबात नाही अर्धा पाऊन तास उलटून गेला तरी पण तो मुलगा आला नाही दोघहि विचारात पडले काय करायचं ?
मग त्यांनी ठरवले कि तो ज्या दिशेस गेला आहे आपण देखील त्याच्या मागोमाग जाउयात पायवाट आहे म्हणजे नक्कीच वस्ती देखील असेल राणीला शैलेश ने आणि मोनूला सुनंदाने कडेवर घेतले आणि ते निघाले थंडी बरीच वाढली होती त्या वाटेने आत गेल्यास शैलेश ला समजले कि आपण फसलोय तिथ कुठलेच गाव नव्हते होत ते फक्त एक घनदाट जंगल आजूबाजूस गर्द झाडी आणि वेली तसाच तो सुनंदाला म्हणाला "अग इथ डॉक्टर वगेरे काही नाहीये इथे धोका आहे चल परत " कपाळावर आठ्या पाडत मोनुला कडेवर घेऊन सुनंदा त्याच्या सोबत चालू लागली... भयाण शांतता तेथे पसरली होती. आणि कोल्हेकुई ऐकू येत होती.. आणि कुठूनतरी पानामधून सळसळ करीत नागराज निघून जात होता. दोघांचीहि पाचावर धारण बसली होती. थोडेसे चलत चलत .. शैलेश ला जाणवले कि हि तीच जागा होती जिथ आपण १० मिनिटा पूर्वी आलो होतो .... शैलेशला सर्व समजले कि ते चुकले होते ... रस्ता भटकले होते ... आणि त्याच त्याच जागेवर फिरून येत होते. त्याने सुनंदाला सांगितले सुनंदाच्या डोळ्यात पाणी आले शैलेश तिला आधार देत म्हणाला "अग घाबरू नकोस सापडेलच बाहेरचा रस्ता " असे म्हणत तो सरळ जाऊ लागला कि एका करड्या आवाजात त्यांनी ऐकू आले "थांबा तिथेच कुठे निघालात ?" सुनंदा आणि शैलेश तिथेच थबकले वडाच्या झाडा मागून एक माणूस चालत येत होता हळूहळू तो जवळ आला. तशी सुनंदा घाबरून शैलेशच्या ,मागे लपली तो माणूस समोर आला दिसायला साधारण वय जवळपास ४५ असेल आणि कपडे जरा मळकट होते शैलेश काही बोलणार इतक्यात तो बोलला ..."इतक्या रातच लेकरा बाळ आणि बाई संग इथ काय करून राहिला भाऊ तू ली धोका असतो जंगलात " त्याच्या त्या शब्दांनी शैलेशला हायस वाटले घडलेला प्रकार त्याने त्या माणसाला सांगितला "अस व्हय तर रस्ता सापडत न्हाई व्हय पाडा तर हाय हिथ प्र तुम्हाला गवसणार न्हाय मी पाड्यावरचाच माणूस आहे चला माझ्या मागन " शैलेशचा नाईलाज होता तरी ते दोघे त्याच्या मागे मागे चालू लागले पण "तुम्ही इथ काय करताय ?"शैलेश म्हणाला तो माणूस उत्तरला .."तुम्हाला बी इथच आणून सोडल व्हय त्या टेम्पो वाल्यान असच करतो बगा त्यो रातीला आण तुमच्या सारख्यांना मदत करतो " त्यावर संशायाने शैलेश म्हणाला " म्हणजे ?" त्यावर तो माणूस म्हणाला.."त्यो टेम्पो नव्हेच तो चकवा हाय चकवा " तो माणूस गंभीर आणि दबक्या आवाजात सुनंदा आणि शैलेश कड पाहत म्हणाला .लय दिवसा पूर्वी त्याचा अक्षीडेंट झाला व्हता बगा त्याचा तिथ त्या जागेवर तवापासून तो लोकासनी दिसतो अन हिथ आणून सोडतो मला बी आणून सोडल व्हत इथच त्यान" अन असे म्हणत तो माणूस जरास विद्र्क असे हसला ... बस्स सुनंदाच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला .. त्यांना वाटू लागले आपण एका भूतासोबत अर्धा पाऊन तास घालवला हे आठवून त्या दोघांना .. थरथर होऊ लागले "हे कस शक्य आहे ? नक्कीच काही तरी घोळ आहे शैलेश पूर्णपणे सावध झाला तो माणूस पुढ चलतच होता अन चलत चलतच तो अचानक थांबला "ती बघा माझी झोपडी " झाडातून बोट दाखवत इशारा करीत त्याने सांगितले कंदिलाचा प्रकाश आता थोडा दिसू लागला होता सुनंदाला जरा हायस वाटले ... तो माणूस म्हणाला "मी आता पाच मिनिटात येतो बरका भाऊ " आणि जो गेला तो परत आलाच नाही १५ मिनिटे २० मिनिटे उलटून गेली त्यावर वैतागून शैलेश म्हणाला "कुठे गेला असेल हा चल सुनंदा आपण जाऊन बघुयात " आणि हळू हळू दोघांनी मुलांना कडेवर घेतले व त्या झोपडीच्या दिशेने जाऊ लागले कंदिलाचा प्रकाश बाहेर पडत होता शैलेशने दोन वेळा आवाज दिला पण आतून काही कोनाहे उत्तर आले नाही मग शैलेश ने दर हळूच आत ढकलून उघडले तर समोर असलेले दृश्य पाहून त्यांच्यातोंडून शब्द बाहेर पडणे अशक्य होते काळे कपडे घालून लांब पांढरे केस असलेली एक बाई पाठमोरी बसली होती मोकळे केस आणि मोठ्या मोठ्याने मंत्र म्हणत होती मान गरागरा फिरवत हातवारे करीत ती मंत्र म्हणत होती आजूबाजूला तिच्या हळद कुंकू पसरले होते लिंब काळ्या बाहुल्या एक कवटी त्यावर हळद कुंकू ओतलेले चक्क रक्ताप्रमाणे वाटत होते आणि समोर ती राक्षसी प्रतीकृती असलेली बाई त्या सर्वाची पूजा करीत होती डोळे विस्फारून शैलेश ते सर्व पाहत होता...ते भयंकर दृश्य बघून सुनंदा तर मटकन मोनूला घेऊन खालीच बसली कसेबसे राणीला खाली ठेवत त्याने सुनंदाला सावरले भीतीपोटी तिच्या तोंडून आवाज फुटत नव्हता पण ती ओरडेल या भीतीने शैलेश ने तिचे तोंड दाबुन ठेवले "न शांत हो सूनु असे म्हणत तिला समजावले " व बाहेर आले दम टाकत सुनंदा शांत झाली तो माणूस तर तिथ कुठ दिसतच नव्हता तोच शैलेशने मागे वळून पहिले तर राणी गायब झाली होती शैलेश गांगरला नि त्याने इकडे तिकडे पहिले तर इवलुशी राणी त्याला आतमध्ये दिसली त्या बाईजवळच हा काही साधासुधा प्रकार नाही से म्हणत सुनंदाला नकळत शैलेश आत गेला . कि त्या बाईने मागे वळून पाहिले... तिच्या माथी भरून कुंकू ..गळ्यात विचित्र माळा शैलेश तडकच आत गेला आणि त्या बाईला दरडावून म्हणाला "ए कोण तू ? काय करतेयस हे ? सोड माझ्या मुलीला " असे म्हणताच ती बाई विद्रुक रित्या हसली .. आणि म्हणाली "मुडद्या टोकलस तू माझ्या पूजेला हा सोडणार न्हाय मी तुला " ती अत्यंत वृद्ध होती जवळपास ७९ -८० वर्षाची ती उठे पर्यंत शैलेशने चपळाईने राणीला उचलून आपल्याकड घेतले आणि तो बाहेर जाऊ लागला .. कि तसेच त्या बाईने एक काठी जोरदार रितीन शैलेशच्या पाठीवर हाणली आणि
शैलेश विव्हळला"आःह्ह...." पण लगेच सावरला. प्रसंगवधान ठेवत त्याने लगेच काठी म्हातारी जवळून हिसकावून घेतली. आणि तिच्या डोक्यावर एक जोरदार प्रहार केला तशी ती म्हातारी जमिनीवर पडली तिच्या डोक्यातून रक्त वाहून ते चेहऱ्यावर येऊ लागले. तशी ती आणखीनच भयानक दिसु लागली शैलेशने हातातील काठी खाली फेकली तरी देखील ती म्हातारी उठून पाहू लागली होती सरपटत सरपटत त्यांच्या कडे येऊ लागली होती आणि "बळी ......बळी .. बळीsssss " असे ओरडू लागली शैलेशने बाहेर येऊन झोपडीचे सार घट्ट लावले सुनंदा बेशुद्ध पडली होती. राणी झोपेतून उठून बघू लागली तिला काही कळत नव्हते पण आपल्या आईकडे पाहून ती रडू लागली "बाबा काय झाले आईला ?" शैलेशने गाठोड्यातून पाणी काढले आणि बोटल सुनंदावर ओतली तशी ती हडबडून दचकून जागी झाली ..रडत रडत ती बोलण्याचा प्रयत्न करू लागली पण तोंडातून शब्द फुटेना शैलेशने मोनूला जवळ घेतले राणीकडे बघून तो म्हणाला "बेटा आपल्याला धावायचं आहे ग नाही तर आपण नाहीत वाचणार बाळा कळाले " छोटीशी राणी तिने बाबांचा हात धरला आणि दुसऱ्या हातात सुनंदाचा आणि मोनुला त्याने दुपट्ट्याने करकरून पाठीला बांधले आणि सुनंदाला त्याने जबरदस्तीने उठवले अन म्हणाला "सुनंदा तुला आपल्या मुलांची शपथ आहे सावर

क्रमशः
भाग दोन
सुनंदा तुला आपल्या मुलांची शपथ आहे सावर स्वतःला आणि धाव " तोवर ती म्हातारी दाराजवळ येऊन ठेपली ..आणि बळी बळी ..असा एकच हुंकार तिचा सर्वत्र घुमला आणि ती दार मोठ्या मोठ्याने ठोठावू लागली आणि तसेच तिघे आपला जीव मुठीत घेऊन धावू लागले ... मिळेल त्या वाटेने पळण्याचा प्रयत्न करू लागले पाठीमाघून भयंकर आवाज त्यांचा पाठलाग करीत होते राणी भीतीपोटी रडू लागली होती...सुनंदाने लगेच तिला कडेवर घेतले आणि शैलेशचा हात हातात धरून ती धडपडत पळू लागली होती बऱ्याच अंतरावर गेल्यास ते आवाज येणे बंद झाले दोघ दम टाकत तेथे थांबले पहाटेचे चार वाजले होते आणि समोर रस्ता दिसू लागला होता तोच त्यांना कुणाची तरी हालचाल जाणवली एक साठ वर्षाचा सायकलस्वार त्यांच्या दिशेने येत होता पण आता शैलेशला कसलीच रिस्क घ्यायची नव्हती २ वेळचा भयंकर अनुभव त्यांच्या पाठीशी होता. तो सायकलस्वार त्यांच्या कडे संशयास्पद नजरेने पाहू लागला शैलेश त्याच्याकडे लक्ष न देता सरळ रस्त्याने सुनंदा सोबत निघू लागला तसाच तो माणूस ओरडला "श्री स्वामी समर्थ ... श्री स्वामी समर्थ " ते ऐकून शैलेश आणि सुनंदा चपापले आणि हा कुणी वाईट व्यक्ती नाही याची त्यांना खात्री झाली आणि दोघे हि त्याच्याकडे वळले पण तो गृहस्थ मागे हटला शैलेश ला कळून आले कि याचा हि गैरसमज झाला आहे तसाच शैलेश त्याच्या जवळ जाऊन म्हणाला "श्री स्वामी समर्थ आता तरी खात्री पटली न " ते ऐकताच त्या गृहस्थाने आपल्या गळ्यातील समर्थांचे लॉकेट काढून शैलेशला देऊ करीत म्हणाला "मला माफ करा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही हे घ्या तातडीने हे घाला या जंगलात भयानक प्रकार घडतात " आणि त्याने आपल्या खिशात असलेल्यापैकी चार लॉकेट काढत सुनंदा राणी आणि मोनू ला देखील देऊ केले आणि शैलेश त्याचे ते बोलणे समजून गेला ...त्या गृहस्थाने राणीला लाडाने आपल्या सायकलवर बसवले व ते चौघे तेथून जाऊ लागले कि अचानकपणे भयंकर किंकाळी त्या जंगलात घुमली आणि ते तिघेही दचकले .. त्यावर ते गृहस्थ म्हणाले .."घाबरू नका स्वामी आपल्या सोबत आहेत म्हणा श्री स्वामी समर्थ " सगळेजन एका स्वरात स्वामीचे नामस्मरण करू लागले हळू हळू उजडू लागले व ते हायवेला एका धाब्याजवळ येऊन पोहचले जवळच्या त्या धाब्यावर ते गृहस्थ थांबले आणि त्यांनी चहाचा ओर्डर दिला. सगळेजन निवांत बसले सुनंदा मोनुला बघत होती. आता त्याचा ताप कमी झाला होता.तरी पण तो थोडा गुंगीतच होता चहा बिस्कीट घेत घेत त्यांचे बोलणे सुरु होत. शैलेशने न रहावून त्यांना विचारले"तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात काका पण हे सगळे काय होते ?" तो गृहस्थ उत्तरला "काही गोष्टी अनाकलनीय असतात इथ या हायवेवर बऱ्याच जणांनी आपला जीव गमावलाय" जो जंगलात गेला तो कधी परत आलाच नाही. कुणी म्हणते जंगलात भूत आहेत कुणी म्हणते चोर अन लुटारू आहेत. पण खर काय ते कुणालाच ठाऊक नाही. अगदी मलासुद्धा तुमचे नशीब चांगल म्हणून तुम्ही मला भेटलात. नाहीतर तुमचे बाहेर निघणे अशक्य होते मी माझा मुलगा गमावलाय तिथ म्हणून पहाटेच्या चारला गस्त घालतो तिथ कुणी न कुणी भेटतात. पण दरवेळी माणसेच असतील असे नाही आहे म्हणून मी स्वामिना जवळ ठेवतो. माझे रक्षण होते आणि दुसऱ्यांचे हि शैलेश लगेच म्हणाला "पण काका ती म्हातारी " त्याचे वाक्य तोडत तो गुहस्थ म्हणाला "तिचा उल्लेख देखील करू नका झाले गेल इथच विसरा इथून आले तसे उलट्या पावलांनी आपल्या घरी निघा" सुनंदाकडे बघत तो परत म्हणाला "बेटा आता इथून उलट्या पावलांनी सरळ घरी जा मोठ्या संकटातून देवानी तुम्हाला वाचवलय अजूनहि संकट टळलेले नाहीये घरी जाऊन कुलदेवीच्या नावान गोंधळ कर पण स्वामिना विसरू नका तुम्हाला विश्वास नसेल पण या दोन चिमुकल्यासाठी नक्की करा " सुनंदाचे डोळे पाणावले "नक्की करेल काका तुम्ही आलात देवाच्या रूपाने " तेवढ्यात एक travels तेथे येऊन थांबली "चला जा आता तुम्ही " ते सद्गृहस्थ बोलले शैलेश आणि सुनंदा त्यांच्या पाया पडले"सुखी राहा" असा आशीर्वाद मनोभावाने त्यांनी दिला अन शेवटचे एकच ते बोलले "इथून गेल्यावर सुद्धा हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करू नका या म्हाता-याचे एवढे ऐका आणि शैलेशने त्यास होकार दिला आणि ते गाडीत बसले तो सद्गुरू सायकल घेऊन उभा होता .. तिघांनी हो त्यांना हात हलवून निरोप घेतला ... आणि ते गृहस्थ हि निघाले.. सुनंदा आणि शैलेश गाडीतून त्यांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिले मित्रानो या कथेचे गूढजरी कायम असले तरीहि हि एक सत्य घटना आहे. आणि ज्याच्यावर हि बेतली आहे त्यांचे किती हाल झाले असतील. अशी गोष्ट कल्पनेत सुद्धा भयंकर वाटते. पण एवढे मात्र अहि कि आईवडिलांच्या प्रेमाला आणि स्वामीच्या नामाला कशाचीही तोड नाही ....
समाप्त ...