बुगीमॅन
(लघुकथा......रिपोस्ट.....फक्त नवीन वाचकांच्यासाठी)
बीपsssss....बीपssssss मोबाईल चा आवाज झाला....तसा नुकताच घरी आलेल्या जॉन वीक ने आपला मोबाईल चेक केला...त्याने केलेल्या कामाची रक्कम त्याला मिळाली होती....त्याने आपला 2,3 छिद्र पडलेला कोट काढला...बुलटप्रूफ जॅकेट उतरवले....बुलटप्रूफ जॅकेट मध्ये 3 गोळ्या अडकलेल्या होत्या त्या त्याने काढल्या....कमरेला अडकवलेली 2 पिस्तुले...10,12 रिकामी मॅगझीन,2 हँडग्रीनेड त्याने काढून आपल्या हत्यारगृहात नेऊन ठेवली...आरशासमोर उभा राहून तो आपल्या जखमा बघू लागला....हातावरील रक्त जे त्याचे नव्हते ते तो साफ करू लागला...जखमेवर मलमपट्टी लावून त्याने एक सुंदर त्याचं आवडीचं गाणं लावून जेवू लागला...आज त्याला खूप मेहनत करावी लागली होती...कारण न्युयॉर्क मधील सगळ्यात खतरनाक "अँडरसन गँग" सम्पवण्याची कामगिरी हाय टेबल ने त्याच्याकडे सोपवली होती....अगदी त्यांच्या अड्ड्यावर घुसून जॉन ने गँग मधील जवळपास सगळ्यांचा खात्मा केला होता....सिरीयल किलर कम्पणीत जॉन टॉप चा किलर होता...अँडरसन गँग ला जॉन सम्पवणार की स्वतः संपणार ?? असे प्रश्न हाय टेबल मध्ये अनेकांना पडले होते....पण जिंकला जॉनच
त्या रात्री पाऊस होता....अँडरसन गँग ला सम्पवून जॉन ने स्मिथ चे काम घेतले...त्याच्या ऑफिस मधून निघताना त्याला अचानक थंडी वाजून आली...त्याचं डोकं प्रचंड गरगरू लागलं...पण त्याचा विचार न करता त्याने मिळालेली सुपारी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला...तो गाडी चालवत होता...त्याला आरश्यात कसली तरी आकृती दिसली त्याने मान फिरवून मागे बघितलं...मागे कोणीच नाही....गाडी मधला रेडिओ खरखरू लागला...त्याला काही समजेना...वायपर सुद्धा आपोआप फिरू लागले....तशी त्याला आरश्यात बघितलं असता कोणी तरी काळी बाई बसली असल्याचं दिसलं...त्याने परत मागे बघितलं तर मागे कुणीच नव्हतं...त्याचा पिस्तूलाकडे गेलेला हाथ मागे आला...तसा तो एका जुन्या कारखान्यात येऊन पोचला. .तिथे मिळालेल्या सुपारी प्रमाणे दोघांना ठोकले...आणि गाडीत बसून घरी आला
नेहमी प्रमाणे घरात येऊन त्याने गाणे लावून जेवण चालू केले....तो जेवण्यात मग्न होता...तितक्यात कसला तरी आवाज झाला...तो तिकडे धावला त्याने बघितलं तर टीव्ही खाली पडून त्याचा चक्काचूर झाला होता....त्याची नजर सगळीकडे फिरली पण तिथे तर कुणीच नव्हते...भयाण शांतता पसरली..तसा अचानक टीव्ही तुन कर्णकर्कश आवाज सुरू झाला...त्या आवाजाने तो दचकला...काही तरी वेगळ्या भाषेत कोणी तरी बोलत होत...असा टीव्हीचा विचित्र आवाज येत होता...ही भाषा जॉन ला नवीन होती...त्याने टीव्हीचा स्विच बंद केला...अनेकांचे मुडदे पडणार जॉन आज ह्या छोट्याश्या घटनेने घाबरला होता...कोणीतरी आहे...पण कोण?? त्याची पावले आता दुसऱ्या खोलीकडे वळली....त्याची नजर चौफेर फिरत होती...अचानक स्विच काढलेला टीव्ही परत वाजू लागला....तो पटकन तिथे पोचला...पण काहीच नव्हतं...त्याने बाजूच्या कपाटातील दारू जरा ग्लासात ओतली आणि दोन घोट घेऊन...तो बेडरूम मध्ये पोचला...बेडरूम मध्ये अंधार होता...चाचपडत त्याचा हात लाईटच्या स्विच जवळ पोचला....बेडरूमचा लाईट लागला तसा जॉन खाली कोसळला....त्याने बघितलं की एक कृष्णवर्णीय बाई...तिचे पोट फाटले होते...रक्ताने बेड लालभुंद झाला होता...ती बाई जॉन कडे हाथ करून कुठल्यातरी वेगळ्याच भाषेत बोलत होती...तिच्या किंचाळीने सगळं घरं शहारले होते...सहन न झाल्याने जॉन ने डोळे बंद करून कानाजवळ हाथ नेला...आवाज कमी झाला तसा त्याने बेड कडे पाहिले तिथे कोणीच नव्हते....जॉन खूप घाबरला होता....हे काय होतंय हे त्याला कळेना...रात्रभर त्याला झोप नव्हती कसला तरी वेगळ्या भाषेतला आवाज त्याच्या कानात घुमत होता....सकाळी उठून तो अंघोळी साठी बाथरूम मध्ये गेला..पाण्याने भरलेला बाथ टब मध्ये तो बसला काहीतरी विचार करीत त्याला डुलकी लागली...काही वेळात परत तो आवाज त्याच्या कानात घुमू लागला...त्याने डोळे उघडले तर पाण्याच्या जागी रक्त होते आणि समोर तीच बाई...तिचे पोट फाटले होते..त्यातले रक्त पूर्ण बाथटब मध्ये पसरलं होत...ती बाई परत वेगळ्या भाषेत जॉन ला काही सांगण्याचा प्रयत्न करीत होती...पण जॉन प्रचंड घाबरला आणि किंचाळत तो बाथटब मधून बाहेर पडला...बाहेर येऊन बघतो तर तिथे कोणीच नव्हतं...आता हा त्रास त्याला रोजच होऊ लागला...नेहमी ती पोट फाटलेली विचित्र बाई त्याला समोर दिसू लागली....गाडी चालवत असताना सुद्धा ती दिसायची.. जेवताना ती दिसायची...त्या भयाण किंचाळणार्या आणि वेदनेने विव्हळणार्या आवाजामुळे जॉन कित्येक दिवस झोपला नव्हता...हे काहीतरी अमानवी आहे असं त्याला वाटलं कट्टर नास्तिक असलेला जॉन ह्या त्रासाला कंटाळून शेवटी एक परानॉर्मल एक्सपर्ट जवळ जॉन गेला...त्याला सर्व हकीकत सांगितली....तो परानॉर्मल एक्सपर्ट जॉनच्या घरी आला त्याने सगळी पाहणी केली....आणि तो जॉन ला म्हणाला

"तुमच्या आसपास कुणीतरी दुःखी आत्मा वावरत आहे...बहुतेक तिला तुमच्याकडून कोणतीतरी मदत हवी आहे...म्हणून ती तुमच्यासमोर येते पण त्रास देत नाही...मी काही उपाय करतो जेणेकरून ती तुम्हाला त्रास देणार नाही"
तसा त्या एक्सपर्ट ने घराभोवती क्रॉस लावले..दाराजवळ अभिमंत्रित विटांचा चुरा पसरवला...आणि जॉन चा निरोप घेऊन तो निघून गेला....जॉन आता रात्रीची वाट बघु लागला. .11 वाजत आले होते अजून तरी त्याला ती बाई दिसली नव्हती....थोड्या वेळाने परत त्याला ती किंचाळी वेदना ऐकू येऊ लागल्या...त्याला प्रचंड राग आला आणि त्याने आपली पिस्तुल काढली पण घरात तर कोणीच नव्हते...त्याने खिडकीतून बाहेर पाहिले ती बाई आज घराबाहेर लॉन मध्ये उभी होती...बहुतेक तिला आता येण्यासाठी त्या अभिमंत्रित विटांच्या चुर्याचा अडथळा येत असावा...तिने जॉन कडे केविलवाण्या नजरेने पाहिले...आणि ती परत फिरून चालू लागली...ही आता कुठे जात आहे?? ह्या उत्सुकतेपाई जॉन तिच्या मागे जाऊ लागला....सुमसान सडके वरून तो एकटाच तिचा पाठलाग करत चालला होता...वाटेतील कुत्री भुकत होती...तिचे चालणे चालूच होते...जॉन घरापासून खूप दूर आला होता...ती एका बंद पडलेल्या कारखान्याजवळ थांबली....जॉन ने बघितले आणि मनात विचार केला
"अरे हे तर तीच जागा आहे जिथून मला त्रास चालू झाला""
त्या बाईने आता आपला हात त्या गोदाऊनकडे दाखवला...तसा जॉन तिच्याकडे बघत आत शिरला...आता हसण्याखिडळण्याचा आवाज येत होता...तो आत जाऊ लागला तसा एक सडका वास त्याच्या नाकात शिरला...त्याने आपले कोपर नाकावर ठेवले आणि मुख्य हॉल जवळ आला एका दारा मागून लपून त्याने बघितले की...टेबलावर एक मृत व्यक्ती आहे...आणि 4,5 लोक त्याचे पोट फाडून काहीतरी करत होते...जॉनने आपली पिस्तुल काढली आणि हॉल कडे जाऊ लागला...त्याच्या बुटांचा आवाज पूर्ण हॉल मध्ये घुमत होता....कसली तरी चाहूल लागताच त्या लोकांनी मागे पाहिले...जॉन वीक येताना पाहून त्यांनी खाली ठेवलेल्या बंदुका उचलण्याचा प्रयत्न केला पण चपळ जॉन ने क्षणात काही राउंड फायर केले तसे तिघे जमिनीवर कोसळले....त्यांचा प्राण जॉनच्या गोळ्यांनी घेतला...एकाच्या पायावर गोळी लागली तसा तो तळमळू लागला...जॉन त्याच्या जवळ गेला आणि त्याच्या कपाळावर गन ठेऊन एकच प्रश्न विचारला
"कुणाचा हाथ आहे ह्या मागे?"
तसा तो घाबरलेला गुंडाच्या तोंडून एक वाक्य निघालं
"मला मारू नको जॉन..स्मिथ...स्मिथ....स्मिथ करतोय हे सगळं"
जॉनने चेहऱ्यावर एक स्मितहास्य केले आणि "थँक्स" अस बोलून ड्रीगर दाबला
दुसऱ्या दिवशी जॉनने तयारी केली...आपली सर्व हत्यारे त्याने गोळा केली आणि स्मिथ च्या ऑफिस जवळ पोचला...ग्रामोफोन वर स्मिथ ऑपरा म्युझिक मोठ्या आवाजात ऐकत कसला तरी विचार करत आपल्या खुर्ची वर डोळे बंद करून पडला होता...म्युझिक संपलं तसा स्मिथ जागा झाला आणि समोरचे दृश्य बघून तो दचकलाच...कारण समोर जॉन वीक बसला होता....विना अपॉइंटमेंट कुठल्या गँगस्टर ला भेटायला गेलेला जॉन वीक म्हणजे साक्षात मृत्यूच.....हे स्मिथ ला माहीत होतं...पण त्याने आपल भय खोट्या हास्याच्या मागे लपवल आणि म्हणाला

"अरे जॉन...इकडे कसा काय आलास?तुझ्या कामाचे पेमेंट तुला कालच पे केलंय मी"
जरा इकडे तिकडे बघत जॉन त्याला म्हणाला "हे बघ स्मिथ मला फिरवून विचारायची सवय नाही.. एकच प्रश्न आणि उत्तर बरोबरच पाहिजे मला....त्या तुझ्या गोडाऊन मधल्या काळ्या माणसाच्या डेडबॉडी चे रहस्य काय? हे फक्त तूच सांगू शकतोस...कारण तुझे तिथले लोक मला योग्य उत्तर देऊ शकले नाहीत"
हे ऐकून स्मिथ समजून चुकला होता की जॉन ने गोडाऊन मधल्या त्या चोघांचा गेम वाजवला आहे...जरा घाबरतच तो म्हणाला
हे ऐकून स्मिथ समजून चुकला होता की जॉन ने गोडाऊन मधल्या त्या चोघांचा गेम वाजवला आहे...जरा घाबरतच तो म्हणाला
"हे बघ जॉन...तुझ्यापासून काय लपवायचं...आफ्रिकेत आपला एक कस्टमर आहे त्याला आपल्याकडील सगळ्यात महागडे "अँट्स" ड्रग्स लागते..आणि तुला माहीत आहेच की किती प्रॉफिट होतो ह्यातून पण ह्या साल्या सरकारने खूप टाईट सिक्युरिटी ठेवलीय...म्हणून आपला आफ्रिकेतील कस्टमर तिकडून एक माणूस पाठवत होता...वर्किंग व्हिसा वर त्याला माझ्याकडे कामावर ठेवत होतो त्यानंतर 2 महिन्यांनी त्याचा अपघाती मृत्यू दाखवून त्याच्या गावी डेडबॉडी पाठवायच्या निमित्ताने त्याच्या पोटात आपले काही किलो ड्रग्स त्याचे पोट फाडून त्यात भरत होतो आणि तो माल आपल्या कस्टमर कडे जात होता..असा बिसनेस आहे हा"
हे ऐकून जॉनने टेबलावर जोराचा हाथ मारला
"स्मिथ निष्पाप लोकांचा बळी देणे बरे नव्हे"
अचानक स्मिथ ची नजर दरवाज्याकडे गेली दरवाज्याच्या खालच्या फटीतून रक्त वाहून त्याच्या ऑफिस मध्ये येत होतं...हे बघून तो प्रचंड घाबरला..आणि ताडकन उभा राहिला
"अरे जॉन काय केलंस हे? माझी सगळी माणसं मारलीस? बोल कोण दिली माझी सुपारी तुला??बोल??मी दुप्पट पैसे देतो बोल""
तसा जॉन हसला आणि म्हणाला
"स्मिथ..स्मिथ...स्मिथ मला तुझी सुपारी एका आफ्रिकन बाई कडून मिळाली आहे..जिला तू 15 दिवसांपूर्वी मारलं होत..तुझी ड्रग्स ची सप्लाय करण्यासाठी...त्याच निष्पाप बाईने मला सुपारी दिलीय तुझी...आणि तुला माहीत आहेच की जॉन वीक ने एकदा काँट्रॅकट केलं की तो पूर्ण करतोच"
तसा स्मिथ चिडला त्याचा हात कमरेजवळ जात होता...पण जॉन ने काही कळायच्या आत आपली गन काढून स्मिथ च्या दिशेने फायर केले...गोळी बरोबर कपाळात लागली तसा स्मिथ टेबलावर कोसळला...टेबलावर रक्त वाहू लागलं....स्मिथ आणि गँग चा खेळ खल्लास झाला होता
जॉन उभा राहिला....ती आफ्रिकन बाई तिथेच उभी होती...जॉन कडे बघत तिने एक स्मितहास्य केले आणि तिच्या भाषेत काही तरी बोलून ती हवेत मिसळून गेली...जॉन ने ऑफिस चे दार उघडले सगळीकडे मृतदेह पडले होते पांढरीशुभ्र टाईल्स रक्ताने लालभडक झाली होती त्या लालभडक मार्गावरून एक वेगळ्या समाधानाने जॉन चालत होता.........(समाप्त)

शशांक_सुर्वे