हडळीचं पोर भाग 9
त्या रात्री बयो मला कुशीत घट्ट ओढून घेत झोपली. जणू मला तिच्यापासून हिसकावून न्यायला कुणीतरी येणार होते. झोपतांना माझ्या लक्षात आले...आताही तिच्या अंगात तेच हिरवेगार लुगडे होते...तिची तयारी पूर्ण झाली होती.
मांडीची जखम ठसठसत होती. पापण्यांमध्ये झोप शिरलीच नव्हती. केवळ डोळे मिटून पडलो होतो. मध्यरात्रीची वेळ असावी. माझ्या हातांचा विळखा अलगद सोडवून बयो उठली. मी किलकिल्या डोळ्यांनी बघत होतो. ती खोलीबाहेर पडली. पण त्या गडद काळोखात तिच्या मागे जाण्याची माझी हिंमत झाली नाही. बराच वेळ लोटला तरी बयो परतली नाही. मग मात्र माझा धीर सुटला. सर्व अवसान एकवटून मी चौकात व तेथून उघड्या असलेल्या दारातून मी बाहेर पडलो.
त्या किर्रर अंधारात कुणीतरी हमसून रडत होतं, बडबडत होतं. इतका करुण स्वर मी कधीच ऐकला नव्हता...मी धाडस करून पुढे जाऊन पाहिलं...
ती बयोच होती. तिच्या हातात लोळागोळा झालेल्या कावळ्याच निष्प्राण शरीर होतं. तिच्या डोळ्यातले अश्रू त्यावर पडत होते. काही घटकांपूर्वी त्याचे पंख त्वेषाने उपसणारी हीच का ती बयो असा प्रश्न मला पडला. न राहवून मी तिच्या खांद्यावर हात ठेवला.
आलास बाळा !...ती उदगारली..माझं येणं तिला अपेक्षित होतं.
माझे दोन्ही हात धरून तिने खाली बसवलं. हातातला मृत कावळा माझ्या मांडीवर ठेवला आणि पुन्हा एकवार ती धाय मोकलून रडू लागली. तिच्या आकांताने गर्द रात्रीतला तो आसमंत थरारून गेला.
रडण्याचा भर ओसरल्यावर ती मला घेऊन थोडी पुढे गेली. तिथे लाकडांच्या मोळीचं छोटं सरण रचलेल होतं. कावळ्याच कलेवर त्यावर ठेवून तिनं मला इशारा केला. तिनं हाती दिलेल्या पेटत्या पलित्याने मी चिता पेटवली. माझ्या जीवावर उठलेल्या त्या पक्ष्याला मी मोक्षाचा मार्ग मोकळा करून दिला होता.
बयोच्या चेहऱ्यावर अपूर्व समाधान विलसत होते....
चल बाळा, परत जाऊ या..आता सर्व काही स्पष्ट करण्याची वेळ आली आहे ! म्हणत माझा हात धरून ती त्वरेने माघारी फिरली..
हडळीचं पोर भाग 10*
कावळ्याचा अंत्यविधी आटोपून वाड्यात येईपर्यंत बयो गप्प होती. तिच्या मनातली घालमेल चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती. माझ्या खांद्यावर ठेवलेल्या तिच्या हाताची पकड घट्ट होत होती. वाड्यात पोहचल्यावर काय घडेल याचा अंदाज करून करून माझं डोकं शिणून गेलं होतं.
वाड्याच्या चौकात बयोने डोक्यावरून पाणी घेतलं. मलाही अंघोळ घातली. भल्या पहाटे तयार होऊन आम्ही एकमेकांसमोर बसलो. माझ्या नजरेत नजर लावून बयोने बैठक घातली. माझे केस कुरवाळले. तिचे गहिरे डोळे माझ्या आत्म्याचा आरपार वेध घेत होते. आज बयोचा नूरच काही और होता..
बाळा, तुझे दादा तुझ्याजवळ काही देऊन गेलेत का ? तिने कोंडी फोडली.
न..न..नाही, का ग बयो, काय झालं ? मी उत्तरलो.
नीट आठव बाळा, काही वस्तू...तिनं जरबेच्या सुरात विचारलं. मी पुन्हा नन्नाचा पाढा लावला.
खरं सांग, मला सर्व काही ठाऊक आहे ! आता मात्र ती चिडली होती.
ठाऊक आहे तर मला का विचारतेस ? मी अभावितपणे बोलून गेलो आणि तिचा तोल सुटला. तिच्या तोंडातून शब्दांच्या ठिणग्या उडू लागल्या..
तुम्ही माणसे इथूनतिथून सारखीच...लोभी..हलकट..फक्त स्वतःचा स्वार्थ जपणारी. मी जीवाची जोखीम पत्करून तुला जन्म दिला..किती संकटातून वाचवलं! आणि तू..तुही माझ्यावर उलटतोस. किमान तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मला..
अग बयो..मी काय केलं ? हवं तर दादा आल्यावर त्यांना विचार ! मी हतबल होऊन म्हणालो.
तो कसला येतोय आता...म्हणून ती भेसूर हसली.
म्हणजे ? मी न समजून विचारलं.
तो गेलाय कायमच्या प्रवासाला..तुला ती वस्तू ज्या दिवशी दिली त्याच रात्री घोळसून घोळसून मारला त्याला !..
बयो आता मूळ रुपात येत होती. तिच्या डोळ्यातले ते दोन पांढरे बिंदू आता लालभडक झाले होते. कपाळावरच्या शिरा फुटण्याच्या बेतात होत्या. हाताच्या बोटांची लांबी वाढत होती. मानेला वारंवार झटके बसत होते. अंगातून उग्र गंध पाझरू लागला होता. तिच्या श्वासोच्छ्वासाची गती कमालीची वाढली होती. तिच्या क्रोधाला साथ देण्यासाठी बाहेर वटवाघळे बेशिस्तपणे उडून पंख वाजवत होती.
हे बघ..माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नकोस..तुझा बाप सुटला नाही तर तू काय चीज आहेस...मुकाट्याने सांग ती वस्तू कुठे आहे ? मला आईपण विसरायला लावू नकोस..तिने पुन्हा धमकावले.
पण आता मी तिच्या कोणत्याच धमकीला भिणार नव्हतो..काहीही झालं तरी मी बयोचा अंश होतो !
(क्रमशः)