हडळीचं पोर भाग 7
माझ्या कपाळावर डाव्या हाताचा पंजा दाबून बयोने विचारले...
माझ्या कपाळावर डाव्या हाताचा पंजा दाबून बयोने विचारले...
याच्याबद्दल विचारत होती ना ती ?
मी होय म्हणालो. म्हातारीने कान, गळा चाचपला आणि मस्तक हुंगल ही आगाऊ माहितीही दिली.
थांब थोडा..म्हणत ती उठली. घरात गेली. तेव्हढ्यात मी घंगाळातल्या पाण्यात स्वतःच प्रतिबिंब पाहून घेतलं..
कपाळ, गळा आणि कानाजवळची जागा भाजल्यासारखी काळपट झाली होती. डोक्यावरचे केस करपल्यासारखे दिसत होते. हे असे का झाले असावे याचा विचार करण्याच्या नादात दाराच्या उंबरठ्यावरून बयो मला न्याहाळतेय हे माझ्या लक्षातही आले नव्हते.
परत आल्यावर तिने ओंजळीत पाणी घेतलं. त्याची धार अंगठ्यावरून सावकाश घंगाळात सोडली. स्वच्छ, नितळ असलेलं ते पाणी आता पुरतं लाल झालं होतं. तिनं ते पाणी माझ्या डोक्यावरून एकसारखं ओतलं. सर्वांगाला चरका देत ते खाली खाली जात राहिलं. पण अंग कसं मोकळं झालं.
अंग पुसल्यावर मी घरातल्या आरशात पाहिलं..मघाच्या जळक्या डागांचा कुठेच पत्ता नव्हता.
त्या मध्यरात्री मला अचानक जाग आली. शेजारी बयो नव्हती. दाराबाहेर ओसरीवर तिचा आवाज मात्र येत होता. काळ्याकुट्ट अंधारात ती कोणाशी बोलत होती ?....ते जे कोणी होते त्याचा आवाज मला येत नव्हता. पण बयोचा आवाज मात्र खणखणीत होता.
कुणाला विचारून हा खेळ केलास ? त्याला माझ्याशिवाय कोणी हात लावलेला खपणार नाही...इतकी वर्षे उगाच वाढवला का पदराखाली ?यापुढे वाड्यात दिसाल तर तुमची धडगत नाही..
बयोचा हा अवतार त्याला पसंत पडला नसावा. ते आतल्याआत धुमसत असावं कारण वाड्यातला गारठा एकाएकी वाढला होता. तो हावी होत चालल्याचे पाहून बयोने अत्यंत भेसूर आवाजात काही शब्द फेकले. ती भाषा मी यापूर्वी कधीच ऐकली नव्हती. मग मात्र त्याने काढता पाय घेतला असावा. गारठा नाहीसा झाला. वाघळानी कल्ला केला. मीही अंथरुणात येऊन मुकाट पडलो. माझ्या बयोची आता मला भीती वाटू लागली होती. त्या सावटाखाली कधी डोळा लागला ते कळलेच नाही.
दुसऱ्या दिवशी शाळेतून परत येतांना वडाच्या झाडाजवळ गर्दी दिसली. थांबलो. वाट काढत पुढे गेलो नि समोरचं दृश्य पाहून थबकलो...
पारंब्यामध्ये कालच्या त्या म्हातारीच प्रेत करकचून बांधून लटकत होतं. तिचे हात आणि नाक भाजले होते. कपाळावर रुपयाएव्हढी चरचरीत डागल्याची खूण होती..
(क्रमशः)
हडळीचं पोर भाग 8
वाड्यातले अघटित प्रकार, बयोचं सामर्थ्य, म्हातारीचा मृत्यू यामुळे मी अंतर्मुख झालो होतो. इतर सामान्य मुलांप्रमाणे आपले जीवन नाही याची जाणीव होत होती. घडलेल्या घटनांची संगती लावण्याचा प्रयत्न मी करीत होतो. हे जे काही चाललंय ते कुणाला तरी सांगावं असं राहून राहून वाटत होतं. पण तेव्हढं जिवाभावाच कोणीच नव्हते. दादाही कित्येक महिन्यापासून वाड्याकडे फिरकले नव्हते आणि आले असतें तरी मी त्यांना काही सांगितलं नसतं. त्या कठोर माणसापेक्षा बयोची भीतीयुक्त माया कितीतरी सुसह्य होती.
तो रविवारचा दिवस होता. शाळेला सुटी असल्याने मी चौकात उगीचच बसलो होतो. तेथून वाड्याच्या वळचणीत काय दडलंय ते पाहत असतांना एक कावळा तुळशी वृंदावनाजवळ आला. आजवर पाहिलेल्या कावळ्यांपेक्षा त्याचा आकार बराच मोठा होता. वाड्याच्या पुराण पुरुषासारखा अधिकाराने तो काहीवेळ वावरला. तेथून तुळईवर लटकलेल्या वटवाघळाजवळ जाऊन तो कर्कश्य स्वरात ओरडू लागला.
मी तिकडे धावून त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्यावर झडप टाकली. मी पुढे पळू लागलो. तो पाठलाग करू लागला. चौकात त्याने मला गाठलेच. उजव्या मांडीत चोच खुपसून त्याने मांसाचा गोळाच बाहेर काढला. प्राणांतिक वेदनांनी मी कळवळलो आणि बोंब ठोकली.
माझी किंकाळी ऐकून बयो बाहेर आली. कावळा अद्याप माझ्या मांसावर ताव मारत होता. त्याच्याकडे लक्ष न देता बयोने मला ओट्यावर बसवलं. हळद आणून जखमेत भरली. वरून तिचं जुनं लुगडं फाडून पट्टी बांधली. एव्हढं होईपर्यंत कावळ्याची नजर बयोच्या नजरेला भिडली. तो वरमला आणि बयोच्या पायात घुटमळू लागला. माझ्यावरचा सोपस्कार आटोपून बयोने त्याला खूण केली. तो अलगद तिच्या हातावर येऊन बसला....
बयोने त्याच्या अंगावरून हात फिरवला, त्याच्या नजरेत तृप्तता पसरली. तिच्या हातावर मान, चोच घासून तो धुंद होऊ लागला..आणि..
काही कळण्याच्या आतच बयोने त्याचे दोन्ही भव्य पंख उपसून काढत फेकून दिले. त्याचा लोळगोळा झालेला देह खाली टाकला. काही वेळानंतर तो दोन्ही पायांनी खुरडत, सरपटत बाहेर जात होता. त्याची हैराण नजर मात्र बयोकडेच होती.
मी बयोकडे पाहिलं...तिच्या गहिऱ्या डोळ्यात पाणी लकाकत होतं..
(क्रमशः)
-सचिन पाटील<