🙏🙏नाथाची गाथा🙏🙏
भाग::-दोन
गोदेत रिपरपत्या पावसात पहाटेला रक्तमासाचा सडा मिसळला त्याच वक्ताला सातमाळ्यातल्या सुरगाणा तालुक्यातील माथेवाडीतल्या डाब दरीतल्या रानात किसना थोरातावर अस्वलानं झडप घातल्याची हाकाटी उठली.पासष्टी गाठलेला किसना दा उगवतीला सुक (शुक्र)दिसताच गाईम्हसरांना वैरण घालून झाडलोट करण्यासाठी निंबाच्या झाडावरील मचाणावरून खाली उतरताच मक्याच्या रानात दबा धरून बसलेलं अस्वल समोर ठाकलेलं पाहुन वल्या धोतरानं किसनान दा पांडुरंगाचा धावा करत परत मचाणावर चढण्यासाठी मचाणावर टांगलेल्या शिडीवर झेप घेतली. तरी अस्वलानं त्याची पोटरी फोडलीच.किसना दा कसाबसा वर चढत बोंबा मारू लागताच आजुबाजुला मळ्यात राखणीला असलेले माणसं मशाली टायर पेटवत मदतीला धावली.माणसाचा गलका व आग पाहुन अस्वलानं रानात पळ काढला.आलेल्या माणसांनी मचाणावरुन किसना दा ला खाली उतरवत बैलगाडीत घातलं व गाडी घरला हाकारली.पोटरीतून रक्त सारखं वाहत होतं व त्यानं किसना दा ला ग्लानी येत होती.
"का रं दा तु घरलाच राहायचं सोडून राखणीला का आलास?"असं महाद्यानं विचारताच "महाद्या गपगुमानं गाडी दामटवं घरला!तुला माहित नाही का,किसना दा का राखणीला आला?"सखाबा नं दटावलं.
घर येता येता गावंही जागं झालं होतं व जो तो काय झालं म्हणुन पृच्छा करत होते साऱ्यांना सांभाळत सखाबानं किसनादा ला घरात आणताच झाल्या परकारानं जिजाक्का नं एकच गिल्ला केला.शेजारणीनं हळद आणत पोटरीत भरली व कपडा घट्ट बांधला. कुणीतरी चहा करुन दिला.किसना दा बाजल्यावर पडला.सखाबानं "जिजाक्का, दा ला शहरातच दवाखान्यात न्यावं लागेल.एक्या कुठंय?"तितक्यात किसना संतापत"त्या मुडद्याचं नाव नको काढू सखा!माझ्या हिशेबी मेलय ते बेणं."म्हणताच"तुम्ही गपगुमानं पडा कि!काहून त्रागा करताय?मी घेऊन जाते तुम्हास्नी दवाखान्यात".
सखाबाला समजेना काय करावं.दुपारी जाण्याचं ठरवुन सखाबा नं एकाला वाडीत एक्या कुठं पिऊन पडलं असेल ते हुडकायला पाठवलं व तो ही घराकडं निघाला.पण त्याच्या मनात एक्याचेच विचार घुमू लागले...........एकनाथ गुणी पोर पाच वर्षात इतकं वाया का गेलं????त्याच्या समोर सारं चित्र सरकु लागलं.
किसना थोरात माथेवाडीतलं खाऊन पिऊन सुखी माणुस.डाब दरीत तीस एकराचा ठाव.आजुबाजुला सातमाळ्याचे उंच डोंगर पण त्याचं रान कासवाच्या थाळीगत.दोन विहीरीचं पाणी पिऊन रान तरारुन पिके.मका,ऊस,भात भाजीपाला भरपुर पिके.मळ्यातच गाई म्हसरं बैल यांच्या करता गोठा व शेतावजारं खतं ठेवण्याकरता अलग घर बांधलेलं.वाडीपासुन मळा तीन चार मैलावर म्हणुन गावापासून जरा एकाकीच. किसना दा ला मोठा गणा व लहान एकनाथ अशी दोन मुलं.मोठा गणा हा सारा मळा सांभाळी व आपली पत्नी सारजीसह मळ्यातच मुक्काम करी.एकनाथ ला देवानं आवाजाची अलौकिक देण दिलेली असल्यानं माथेवाडीतल्या विठ्ठल मंदिरात भजन किर्तनात कायम गाई.त्याला भजनात गातांना पाहिलं कि किसना छाती फुलवुन "माझ्या एकनाथला किर्तनकारच बनवेन.सारा गाव त्याच्या आवाजानं मंत्रमुग्ध होई.किसना दा नं त्याला एटीडी करायला व संगीत शिकण्यासाठी पुण्यात पाठवलं व पुढे आळंदी संस्थानात दाखल करायचं घाटलं होतं . पोरगं पुण्यात चांगलं नाव काढू लागलं नी अचानक गावी आलं तसं नंतर गेलंच नाही व गेल्या पाच वर्षात दारू, पत्तं ,वाईट संगत यात पुरतं वाया गेलं.गणा सतत मळ्यात राबुन राबुन खंगला.एकनाथानं मळ्यात गणासोबत राबावं म्हणुन सतत खटके उडु लागले.पण एकनाथ सकाळी उठला कि गुत्त्याची वाट काढी व सकाळीच तंग होई.मग कुठं कुरापत काढी तर कुठे पत्ते कुटी.मळ्यात कितीही धावपळ असो पण त्याला अजिबात सोयर सुतक नसे.तशातच गणा आजारी पडला.सुरगाण्याला दाखवलं पण फरक नाही.पुढे नाशिक व तेथुन मुंबई ला हलवलं.त्यातच लकवा झाला.व गणा मुंबई लाच सारजेसह दवाखान्यात अडकला.मळ्यात गाई वासरांना चारापाणी करणं, मळ्यात काम करणं हेकिसनाला या वयात जमेना.तसेच मळ्यात रमजान करिता कलिंगडं लावलेली,मका लावलेला.तो खाण्याकरिता कोल्हे,रानडुकरं,अस्वल डोंगरातुन रातीला येत.त्या करिता रात्री राखणीला मळ्यातच मक्काम कोण करेल?हा मोठा प्रश्न.म्हणुन यावरुनच किसनादात व एकनाथात परवा वाद झाला.एकनाथ संध्याकाळी तंग होऊन आला तसं"एक्या तुला लाज कशी नाही वाटत रं!
आपलं सोन्यावाणी भाऊ राबून राबून खंगला नी आता तर दवाखान्यात झुजतोय नी तु पिऊन येतोय.मळ्याचं कोण बघेल?"त्यावर नशेतच ""तुझा मळा हाय नी तु हाय.मला टेंशन द्यायचं नाही"असं म्हणताच किसनादाचं ही पित्त खवळलं नी त्यानं त्याच तिरमिरीत सोटा उचलत एक्यावर धाव घेतली.लोक मधये पडलेत व एक्या न जेवताच बाहेर पडलं.मळ्यात जाणं तर भागच . शेवटी किसनादाच मळ्यात गेला व नेमकं अस्वलानं झडप घातली.
सखाबाला सारं आठवलं.
एकनाथ ला गाठून त्याला भेटणं अगत्त्याचं होतं.
दुपार झाली तरी एकनाथ चा तपास लागेना.किसनाला ज्वर चढला.जिजाक्का नं आपल्या माना भावाला निरोप पाठवुन गावाहून पोरगी रखमा सकट बोलवुन घेतलं.
हा सारा प्रकार घडला त्या पहाटेला परवाच्या भांडणानं भनकलेला एक्या शेजारच्या वाडीत गिनीच्या गुत्त्याच्या बाजूला नशेतच पडला होता.पहाटे अचानक "नाथा ,बघ मी आले तुला भेटायला!"असा आवाज कानावर पडताच एकनाथ खाडकन उठला.'नाथा'!!!.पाच वर्षात हे नाव तो प्रथमच ऐकत होता.एक्या , एकनाथ असंच ऐकायची सवय.'नाथा'म्हणारी कोण?आठवलं.आपल्याला या आवानं हाक मारणारी एकच."सरु"
.
.
सरु जोग
.
.सरु जोगतीण.
तो उठुन आजुबाजुला पाहु लागला.छे!भास निव्वळ भास.तो उठला.गिनीला उठवून टॅंगोपंच मागू लागला. तिही अर्धवट झोपेतच होती.त्यानं तोंड न धुताच घटाघटा बाटल्या झिरवल्या व तिथंच बाजूला आडवा झाला तो दुपारच्या दोन पर्यंत अगदी निपचीत.सरु तिथंच तो शुद्धीत येण्याची वाट पाहत बसली.माशा रो रो करत घोंगावत होत्या.उन चेहऱ्यावर पडत होतं.सरु त्याला हाका मारत होती "नाथा, हे नाथा!उठ ना रे बघ मी सरु आले ना.तो उठला व इकडे तिकडे पाहू लागला.तो गिनीच्या गुत्त्यात जायला लागला तोच त्याची पाऊलं घराची वाट चालू लागली.त्याला कळेच ना आपण कुठं जातोय.दारु तर पुरती उतरली होती व भुकही सपाटून लागली होती.तशातच तो घरासमोर येऊन ठाकला.त्याला पाहताच जिजाक्का नं तोंडाचा पट्टा सुरु केला."मेल्या मुडदा बसीवला तुझा! इथं बाप मरणाच्या दाढेत सापडलाय नि तु कुठं फिरतोय रं!,माझ्या सोन्यासारख्या गणादाला लखवा होण्यापतुर तुला होऊन तु गचकला असता तर मी गंगेत न्हाले असते."सखाबानं व लोकांनी तिला शांत केलं.एकनाथ ला समजुन चुकलं काहीतरी घडलयं.तसाच तो घरात घुसताच बापाची सुजुन टम्म फुगलेली पोटरी दिसली.अंगातली उतरली असल्यानं त्यानं गांभिर्य ओळखुन एका कोपऱ्यात बसणंच पसंत केलं.त्याला पाहताच किसनाची लाही लाही झाली.तो रागानं"याला येथुन घालवा मला याचं तोंडही पाहायचं नाही"
सखाबानं सर्वांना समजावत शांत केलं व पुढं कसं करता म्हणुन विचारता झाला.तितक्यात जिजाक्काचा भाऊ माना मामा आपली पोरगी रखमा सोबत आला.माना मामानं किसना दाला नाशिक ला नेण्याचं ठरवलं व सोबत जिजाक्काला ही न्यायचं ठरवलं.एकनाथनं कसं ही करुन मळा सांभाळायचा.जिजाक्कानं रखमा ला इथच राहु दे असं सांगितलं.पण माना नं "तिचं बीएस्सीचं शेवटचं वर्ष म्हणुन ती आजच नाशीक वरुन दापोली ला जाणार असल्यानं सोबत आणलीय"असं सांगताच जिजाक्का रडायला लागली.कारण एकनाथसोबत लग्न करण्याचं मानानं अगदी सुरुवातीपासुन कबुल केलं होतं पण एकनाथ चे पाच वर्षांपासूनचे पराक्रम पाहुन त्यानं त्याबाबत मागच्या आठवड्यातच बहिणीला स्पष्ट नकार दिला होता.शेवटी वाडीतली गाडी करुन निघाले.किसनदानं सखाबा ला "मळ्यात तुझा माणुस पाठव गाई म्हशी तठल्या असतील.त्या एक्याचं खरं नाही.भले जनावर तुझ्या गोठ्यात ने.मळ्याचं जे व्हायचं ते व्हवू दे पण जनावर उपासी नको."सांगितलं.तितक्यात"तुम्ही खुशाल जा मी बघेन सारं"एकनाथ बोलला तसं साऱ्यांना आश्चर्य वाटलं.नी एकनाथ ला ही कळेना कि आपल्या तोंडातून शब्द बाहेर कसे पडता आहेत.रखमा जातांना तिरक्या नजरेनं मागं पाहत होती.हे जिजाक्का ला जाणवताच"मान्या राहू दे ना रे पोरीला"म्हणाली.
"आक्का दारुड्याच्या दावणीलामाझी गुणी पोर बांधायला मला काय वेड लागलं का!"असं स्पष्ट सुनावलं.हे ऐकुण किसनदाला ही इंगळी डसल्यागत झालं.कारण मानाची काहीच औकात नसतांना एकनाथ मुळंच ऐकावं लागत होतं पण एकनाथ वर याचा काहीच परिणाम जाणवत नव्हता.
सारी निघून गेली.एकनाथला भुक सपाटून लागलेली.तो घरातनं निघाला.कुठं जायचं काहीच कळत नव्हतं .पावले मळ्याची वाट चालु लागली व आपल्याला कुणीतरी घेऊन जातय पण दिसत नाही.असंच त्याला वाटत होतं.मळ्यात पोहोचे पर्यंत संध्याकाळ झाली.सारच त्याला नवखं वाटत होतं.त्यानं गुरांना चारापाणी केलं.गाई म्हशी तटल्या होत्या धार काढली व सोसायटीची गाडी टेकडीपर्यंत येई तेथे दुध पोहोचतं करुन परत गिनीच्या गुत्यावर जाऊन बाटल्या सोबतीला घेऊन मळ्यात आला.तितक्यात सखाबाचा माणुस डबा देऊन गेला.परत जातांना एका रात्री मचाणावरच झोप . कालचं अस्वल कदाचित पुन्हा येईल,अशी सुचना देऊन गेला.एकानं बाटल्या रिचवल्या डबा खाल्ला .गुरांना वैरण काडी केली व गोठ्याजवळ बसला.थंड हवेने दारु चढू लागली तशी डोळ्यात झोप दाटू लागली.तितक्यात तोच आवाज"नाथा,कालपासुन मी बोलतेयपण तु बोलतच नाही.किती हा राग!बोल ना रे!"
कोण तु ?सससरु....इतकी वर्ष तु कुठं होतततीस ..तू? पारभरीत केलय तू माझ्या जिवनाचं!चचचचल नकोय तू मला.नी हो तो तो संदेश लोखंडवाला काय म्हणायचा मला...कि एकनाथा पुरे तुझी गाथा.तुझा आवाज घण्टा कामाचा नाहीस तू तू"
अरे पण मी हे तुला का सांगतोय.,चल निघ तु येथून मला नकोय तु".असं असंबंद्ध बोलत तो उठला व निंबाच्या झाडावर बांधलेल्या मचाणावर चढण्यासाठी शिडी कडे जाऊ लागला.तोच तोल जाऊन धावेवरच पडला.व तसाच पडून घोरू लागला.सरूने त्याला भरपुर उठवण्याचा प्रयत्न केला पण फोल ठरला. मळ्यातल्या कलिंगडाच्या शेतात खालच्या बांधानं डोंगरातुन उतरलेली रानडुकरं घुसुन फडशा पाडू लागली तर काल परतलेलं अस्वल वर नाकपुड्या करत डाब दरीत उतरून मक्याची कणसं खात एकनाथ कडं सरकू लागलं.कालच्या प्रकारानं नाहीतरी वाडीतली माणसं भयभीतच झाली होती.सरू उठली व साऱ्या रानात फिरताच रानडुकरं अस्वल फिनाट ,झिंगाट जीव वाचवत पळालीत.
सकाळी सहाला एकनाथ ला जाग आली.तो उठला व गोठ्यात शिरणार तितक्यात गोठा स्वच्छ झाडलेला ,गाई वासरांना वैरणपाणी केलेलं व गाईच्या धारा कुणीतरी काढत असल्याचा आवाज गोठ्यातुन येत होता.त्याला आश्चर्याचा धक्काच बसला.त्यानं आत डोकावलं तर बाई धार काढतांना पाठमोरी दिसली .एकनाथानं "कोण"?असं विचारताच धार काढणं उरकवत उठून "मी रखमा,माना मामाची!"
नाही ओळखलं?............
तीच तिरकी नजर.......

भाग::- तिसरा
"रखमा! तु तर कालच दापोली ला जाणार होती ना मग इथं कशी?"एकनाथ नं आश्चर्यानं विचारलं.
" होय, काल आत्या मामाजी ला नाशिकला सोडलं .नंतर बाबांनी मला बस वर बसवलं नि चालते झाले.पण मला आत्या व तुम्ही आठवले.तुम्हाला कोण खाऊ घालेल?या काळजीनं उतरले बसमधून नी आले तुमच्या कडं"असं सांगुन तिरक्या नजरेनं ती एकनाथ कडं पाहू लागली.ती नजर एकनाथ ला भुरळ घालू लागली पण तरीही तो तातडीनं म्हणाला "अगं पण मामा काय म्हणेल?तुझं काॅलेज?आणि ......" "मग जाऊ का परत?"रखमा उद्गारली.
एकनाथ ला ती तिथं राहणं मुळीच पटेना .आपण पुरते दारुत गुरफटल्यानं मामाचा कालचा नकार त्याला आठवला व त्यानंही कधीच तिला त्या अॅगलनं पाहिलं नव्हतं.हि इथं राहिली तर लोक काय म्हणतील?
"रखमा ,माझं काही खरं नाही .तु परत जा." तितक्यात "तुमचं खरं नाही म्हणुनच मी आलेय"असं रखमा ठणकावून म्हणाली.व लगेच गणा व सारजा राहत होते त्या गोठ्याजवळील घराकडं निघुन गेली . एकनाथ ला तिला ठेवणं पटेना पण तिची तिरकी नजर त्याला आपलं गवसलेलं काहीतरी इथच सापडेल असं आतुन वाटायला भाग पाडत होती.
रखमा नं दुपार पर्यंत पंधरा दिवसांपासून बंद घर व्यवस्थित लावुन जेवण तयार करून एकनाथ ला खाऊ घातलं.जेवतांना ती जवळच बसली.एकनाथला आज दारुची आठवणच आली नाही व तो खालमानेनं गिळु लागला पण अनावधानाने नजरानजर झाली की त्याला आपण खोल डोहात उतरतोय असं वाटे.जेवण आटोपुन तो शेतातल्या कामात शिरला.पाच सात वर्षांपासून काम सुटलच होतं काय करावं हे त्याला कळेना.गाईकरता गवत काढलं टरबुजाच्या शेतात फिरतांना अनाहुतपणे टरबुजाचे फळे पालटू लागला अडकलेले वेल सरळ केले.रखमा ही येऊन त्याला मदत करू लागली.नंतर दोघांनी दुध काढलं ते सोसायटीच्या गाडीवर देण्यासाठी तो जाऊ लागला.तेव्हा रखमानं त्याला बजावलं कि "मी इथं आली हे कुणालाच सांगु नका व सखाबाला भेटून जेवणाचा डबा ही काहीही कारण सांगून पाठवू नका असं सांगा".
पण का गं?
"अहो मी बाबांना न सांगता माझ्या मर्जीनं तुमच्यासाठी आली व हे कुणाला कळलं म्हणजे!"रखमानं सांगताच "पण तु इथं आहे हे तर कळेलच ना गं कुणाला नि कुणाला तरी,मग काय करशील?"भाबळेपणानं एकनाथ नं विचारताच"अहो कळेल तेव्हा पाहू पण स्वत:हून सांगु नका".
दुध देऊन एकनाथ सखाबा ला भेटला.सखाबानं त्याला तिथंच जेवण करायला लावलं .तो का कू करत होता पण पर्याय नव्हता.नाथानं सखाबाकडून आता शेतात काय काय करावं लागेल ते समजुन घेतलं.सखाबाला आश्चर्य वाटलं. रात्री मचाणावर झोप व आगी करता फटाके,टायर ,फाटकी कपडं जवळ ठेव झोपजाग ठेव एकदम खाली उतरू नको,अशा सुचना दिल्या.
एकनाथ मळ्यात आला तर रखमा वाटच पाहत होती.त्यानं जेवण करून आल्याचं सांगताच"बरं झालं नकार दिला असता तर उगाच संशय वाटला असता "म्हणत तिनं ही जेवण उरकलं.नंतर तो झोपण्यासाठी मचाणावर जाऊ लागला.तोच रखमा नं "मी कुठं झोपू?", विचारताच ""तु घरात झोप व आतून दरवाजा बंद कर रात्री बाहेर निघू नको"असं एकनाथनं बजावलं
रखमा नं लाजतच "काहो ऐका ना एकटं घरात मला भिती वाटतेय .तुम्हीही खाली झोपा किंवा मला मचाणावर येऊ द्या"म्हणू लागली.अगं मी घरात झोपलो तर राखण कशी व्हायची!चल तुच मचाणावर चल."
रखमाला ही तेच हवं होतं. श्रावण आमोशाला आठ दहा दिवस झाले होते.ढगाळ आकाशात चांद लपाछपी खेळत होता .नाथा रखमाशी योग्य अंतर राखुन मचाणावर झोपायची तयारी करू लागला. रखमानं झोपता झोपता लॅपटाॅपवर अभंग लावला. आवाज ऐकताच एकनाथला कानात कोणी तरी तप्त शिसं ओततंय असंच वाटू लागलं व एकदम संतापुन त्यानं "रखमे काय हे!बंद कर ते."
का हो चांगला देवाचा अभंग लावलाय वावगं काय त्यात"रखमा म्हणाली.
रखमे , ही क्लिप कुठून मिळाली तुला?
"अहो, कालच मि कॅसेट ऐकलीय व यु ट्युब वर अपलोड केली तर कालपासुन लाखो व्हिवर्स मिळाले.कुणी गायला हे मात्र माहीत नाही.काय आवाजात हुक(किक)आहे ऐका तुम्ही"रखमा म्हणाली व एकनाथ च्या प्रतिक्रियेची वाट पाहु लागली.
रखमे जुन्या जखमांना ओरबाडून उगाच रक्तबंबाळ करू नको. प्लिज बंद कर.
रखमानही आजच्या पुरतं इतकं पुरे हे ओळखुन बंद