🙏🙏 नाथाची गाथा🙏🙏
भाग ::-एक
अंधेरीतल्या हाय प्रोफाईल मिरा देसाई रोडवरील शरारा व्हिला त स्वरा दुपारचे तीन वाजले तरी रडून रडून तशीच आराम खुर्चीत बसली होती.सकाळी दहा वाजता संदेश व तिचं कडाडून भांडण झालं होतं .संदेशचं विखारी बोलणं आठवुन तिला आणखिनच रडू येत होतंव सकाळचा प्रसंग जसा चा तसा उभा राहिला.
"देवदासी ची पोर हिच तुझी औकात होती नी आज तुला एक नामांकित गायिका बनवलंय मी" ,संदेशाच्या या वाक्यासरशी
"हे तु जे काही केलंय ते काही फुकट केलं नाहीस त्या बदल्यात मी ही माझं सर्वस्व अर्पण केलंय,आणि हो आज मी जी काही आहे त्यात माझ्या उपजत कलेचाही तितकाच वाटा आहे.तु सपोर्ट करत नव्हता तरी मी प्रगतीच करत होती" स्वरा ही फणकाऱ्यातच म्हणाली.
"ठिक आहे तर मग आजपासुन तु तुझी कला वापर मी ही पाहतो तुझी उपजत कला","आणि हो मला मोकळं कर"
हे ऐकल्याबरोबर स्वराचा तोल सुटला नी लालबुंद होत ती ही फुत्कारली"त्यापेक्षा सरळ सांग ना कि ती 'उर्मीला जावळेकर' रुतलीय काळजात व तुझी गरज संपलीय"त्या सरशी संदेश ने खाडकन कानशिलात लगावत"तुला काय समजायचं ते समज ! पण तिच्यात व माझ्यात तसं काहीच नाही मात्र as singer मला जे हवंय ते तिच्यात आहे. तुझ्या गायकीत जी हुक (किक)हवी ती राहिलीच नाही सो पुढं तुझं तु ठरव कि इथं राहायचं कि ...."नी पुढचे शब्द ऐकण्या आधीच जोराची मुस्काटात देत you basturd...,gate out from here,.......,........" नी जोराचा धक्का देऊन संदेश ला घालवत धाडकन दरवाजा लावला व हातात येईल त्या वस्तु फेकत बराच वेळ घरातील सामानाची तोडफोड करु लागली व नंतर पलंगावर स्वताला झोकत हमसुन हमसुन रडू लागली.
" माझ्यातली हुक हरवली कि माझं सौंदर्य?,हुक(किक)हरवलेली मी कोण?हि स्वरा जोगतीण कोण?
दमाणी सरांनी तर म्हटलं होतं कि तु संदेश बरोबर तुझं करिअर शोधायला चाललीस पण तुझ्या गायनाची खरी प्रेरणा तर एकनाथ आहे.जकनाथाच्या प्रेमानच तुझ्या गायनास हुक मिळते.व तीच हुक तु सोडून संदेश सोबत चालली.पण स्वरा लक्षात ठेव तु फक्त गायकी घेऊन चाललीस हुक नाही.मग हा संदेश का म्हणाला कि तुझ्या गायनात आता सुरुवातीची हुक राहिली नाही.नी तिला पुन्हा भरुन आलं.नाथा......,चुकले रे मी.पाच वर्षात मी कितीही प्रगती केली असेल पण पुन्हा सर्व शुन्य.नाथा !
...........ती पुन्हा पाचोळ्यागत भुतकाळात गरगर गिरक्या घेऊ लागली.
महाराष्ट्र व कर्नाटक सिमजवळील बेळगावजिल्ह्यातील सौंदत्ती येथील रेणुका मातेच्या मंदिरात गंगा जोगतीणीची(देवदासीची) लेक सरी.मंदीर आवारातल्या काळोख्या रातीतली गावातल्या धनदांडग्यांच्या वासनेची घुसमट,आईची तगमग आजही निवांतात तिच्या काळजाच्या ठिकऱ्या करतात.आईचा तो टाहो ऐकी व ते निष्पाप वय बेंबीच्या देठापासून आक्रोश करी.पण नियतीला व आख्ख्या गावालाच गहाण झालेल्या गंगू जोगतिणीला शरण जाण्याशिवाय पर्याय नसे.सरी वयानं वाढु लागली तसी तिला घृणा वाटू लागली.तसं गावातल्या धनाजी पंतानं तिला वसती गृहात ठेवलं.सोलापुरला दहावी व नंतर बारावी सातारा येथे करतांना तिच्या गायनातील कसब सहज कुणाच्याही लक्षात येई.गायकी ही कला तिच्या रक्तातच होती.तिची आजी व आजोबा तमाशाचा फड चालवत.ते उत्कृष्ठ गायक.तोच गुण देवदासी म्हणुन सोडलेल्या गंगूत आलेला.जोगवा मागतांना गंगु गाऊ लागली म्हणजे सौंदत्तीच्या रेणुकामाता मंदीरात,गल्लीत व गावात गर्दी उसळे.लहानपणी सरीही सोबतच गाई.तोच आवाज गायकी शाळेतल्या कार्यक्रमात सरीत दिसुन येई.बारावी पास आऊट झाल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकाच्या आग्रहानं धनाजी पंतानं सरीला पुण्यात संगीत महाविद्यालयात प्रवेशित केलं.पुण्याला आल्यानंतर सरी ही गायनानं व रुपानं ही फुलली तसं तिनं ही धनाजी पंत हे कोण लागतात हे आईला विचारणं सोडलं व निदान हाच आपला जन्मदाता असावा असा समजोता करून घेतला.कला शाखेतून संगीतात पदवीच्या शिक्षणाचं पहिलं वर्ष सरुनं चांगलच गाजवलं.
संस्थेचं आंतरमहाविद्यालयीन स्नेहसंमेलन नियोजित झालं.संस्थेचे पुण्यातच मेडीकल, इंजिनिअरिंग, चित्रकला,लाॅ असे वेगवेगळ्या विभागाचे सतरा काॅलेजेस होते व यंदा संयोजन सरीचंच संगित महाविद्यालय करणार होतं.सरुनं ही एक फक्कड लावणी घेतली. किंबहुना सरांनीच घ्यावयास लावली.
स्नेह संमेलन जसंजसं जवळ येऊ लागलं तसतशी मुलं झपाटून तयारीला लागलीत.या वर्षी परीक्षक म्हणुन कुणीतरी प्रसिद्ध सिने संगीत दिग्दर्शक येणार होते .
संमेलन सहा तास चाललं एकाहुन एक सरस नृत्य,गाणे, मिमिक्रि,नाट्यछटा सादर झाल्या.प्रेक्षकामधुन शिट्या, दाद, शेरेबाजी, हुल्लडबाजी होऊ लागली.मध्यतंरी चित्रकला महाविद्यालयाचं कुणीतरी एकनाथ थोरात अभंग सादर करणार असं घोषीत झालं पण म्हणणारा येईच ना.वेळ जाऊ लागला तसा प्रेक्षकातून नाही नाही ती शेरेबाजी होऊ लागली.शेवटी त्यापुढचं नृत्य झालं. सरूचा इतक्या मोठ्या स्टेजवर व इतक्या प्रचंड गर्दीत गाण्याचा पहिलाच प्रसंग.ती थरथरू लागली.तशातच नाव घोषीत झालं.बहुतेक तिची लावणी शेवटचीच असावी.सरूनं गायला सुरूवात करताच पुर्ण हाॅल दणाणून गेला.तिचा गावरान आवाज व त्याला फडाचा टच असलेला तडका,तिच्या नृत्यातली मादक व बहारदार अदा सारं सारं विलक्षण होतं.परीक्षक ही मंत्रमुग्ध होऊन जणू आपण तमाशातल्या फडातच लावणी पाहतोय इतके गुंग झाले.लावणी संपताच वन्स मोअरच्या आवाजानं सारं मंच दणाणलं व पुन्हा संगीत सुरू होऊन लावणी झाली.
आता साऱ्यांनी लावणीच प्रथम असा घोष सुरू केला.परीक्षक ही निकालाची तयारी करणार तितक्यात निवेदकाजवळ कोलाहल वाढला.मध्यतरी उपस्थित नसलेला अभंग म्हणणारा स्पर्धक उपस्थीत झाला होता.व त्याचे प्राध्यापक त्याला चान्स द्या म्हणुन निवेदकाशी वाद घालत होते पण आता निकालाची वेळ झालीय व तुम्ही दिलेली वेळ पाळली नाही म्हणुन नाकारत होते.सरते शेवटी स्पर्धेकरिता नाही फक्त सादर करू द्या या अटीवर तडजोड झाली व एकनाथ थोरात नावाचं बावळट ध्यान स्टेजवर उभं राहीलं.पण प्रेक्षक बसायलाच तयार होईनात .नुसता गलका.परीक्षक ही निकाल तयार करण्याच्या धुंदीत.तशातच कुणी खाली बाटल्या ,टमाटर फेकू लागले.सरू ही आपलाच प्रथम क्रमांक येणार या आनंदात पायातले घुंगरू सोडू लागली नी..."भक्ती वाचुनी मुक्तीची मज जडली रे व्याधी!
विठ्ठला$$$$$ मीच खरा अपराधी."असे शांत, धीर गंभीर बोल साऱ्या सभागृहात घुमू लागले.त्या आवाजातली सादगी, गोडवा ,आर्तता प्रत्येकाच्या हृदयात भिडू लागला.बाहेर जाणारी पावलं जागेवर थबकली .परीक्षकांनी निकालाची कागद बाजुला ठेवली.सरु घुंगरुमाळा धरुन तशीच स्तब्ध.पुढची पाच मिनीटे एकनाथ थोरातच गात होता बाकी सारी सृष्टी जणू शांत पहुडली होती.अभंग संपवुन थोरात मागं निघुन गेला पण बिलकुल शांतता.त्या समाधीतुन कुणीच बाहेर येईना.शेवटी सहा तासातल्या कार्यक्रमात पहिल्यांदाच परीक्षक स्वत: उठुन टाळ्या वाजवू लागले नि मग किती तरी वेळ टाळ्या वाजत राहिल्या.शेवटी सर्व नियम धाब्यावर बसवून निकाल खोडला गेला .खास परीक्षक ,प्रेक्षक व स्पर्धकाच्या इच्छेने निर्विवाद पणे प्रथम क्रमांक थोरात व द्वितीय क्रमांक सरु चा आला.सरुला थोरातचा प्रथम क्रमांक आला याचाच जास्त आनंद झाला.त्याच्या एका अभंगानं साऱ्यांचीच मनं जिंकली.बक्षीस घेतांना सरू बक्षिसापेक्षा एकनाथ थोरात कडेच पाहत होती.समारोप आटोपल्यावर तो सरूकडं आला व "माफ करा प्रथम आपणच आलात मि स्पर्धेत नव्हतोच पण एवढ्या मोठ्या परीक्षकांचा अवमान नको म्हणुन ते मी नाईलाजाने स्विकारले.ते साभार परत"असं म्हणत नटवर ची मुर्ती हातात देऊन चालता झाला. तरी सरू खुळ्यागत त्याच्याकडेच पाहत राहिली.जिवनात ती आज स्वताहुन हारली होती पण काय हारत होती हे मात्र तिलाही कळत नव्हतं.
संस्थेनं प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकाच्या पदव्युत्तर शिक्षणाची सोय व विशेष म्हणजे संगीताचं विशेष प्रशिक्षण ख्यातनाम संगीतकार दमाणी सरांमार्फत घेण्याची सोय केली.दोघांची वरचेवर भेट होऊ लागली.पंधरा दिवसातच दोन्ही एकरुप झाली व दमाणी सरांनाही दोघांचा संगीतातला वकुब समजला. एकनाथाला अभंग ,ओव्या, भारुड,श्लोक पदं,एकतारी ,नवनाथी यात काहीच शिकवायची गरज नाही तर सरु फडी लावणी,बैठकी लावणी ,लोक कला, लोक संगीत यात प्राविण्य.दमाणी सर जातीवंत कलाकार माणुस.त्यांनी यांना शिकवण्यापेक्षा हे दोघं सतत एकत्र रहावित व एकमेकांच्या मदतीनच जे शिकता येईल ते शिकावं त्यातच दोघांचं व संगीताचं हित आहे हे हेरलं होतं.त्यामुळे सरू एकनाथा सोबत सारस बाग, शनिवार वाडा तर कधी सुटीला वेरुळ लेणी फिरू लागली तास नं तास संगीतावर लोककलेवर वारकरी संप्रदायावर बोलु लागली.एकनाथ ही सहज मनानं सारं तिला समजावी.तिला बरच आधी माहीत ही होतं पण ती आता संगीताला वेगळ्याच अंगानं शिकत होती.यातच ते दोघं एकमेकाशी एकरूप झालेत हे दमाणी सरांनी ही ओळखलं होतं व त्यांनाही तेच हवं होतं. आता त्यांनी या दोघांचे संगीताचे कार्यक्रम पुण्यात आयोजित केले.यांची जुगलबंदी पाहण्या करिता रसिक तुफान गर्दी करू लागले.काही होणाऱ्या चुका प्रेक्षकांना समजत नसत पण एकनाथ ला त्या कळत. त्या तो सरूला समजावून सांगे.सर्व कार्यक्रमाच्या क्लिप्स सरू जतन करून ठेवी.आता बऱ्याच मोठ्या आॅर्केस्टाकडून यांची विचारणा होऊ लागली पण एकनाथाचं स्वप्न वेगळं असल्याने त़ो नकार देई व जेवढं शिकता येईल तेवढं शिकण्याचा प्रयत्न करी.मध्यंतरी सिमरण प्राॅडक्शनचे मालक हिमानी लोखंडवाला यांनी आपला मुलगा संदेश ला पाठवुन एका गाण्यात दोघांना चान्स देऊ केला दमाणी सरांनी विचारल्यावर एकनाथ ने सपशेल नकार दिला.संदेश ला ही गोष्ट खुपच खटकली.सरुही नाराज झाली.नंतर सरू नं निवांत नाथाला विचारलं ."नाथा तुझं पुढचं व्हिजन काय?तु हे छोटेमोठे कार्यक्रम करतोस मग मोठी आॅफर का नाकारली?
नाथानं सरूचा हात हातात घेत जवळ बसवलं व"सरु, या छोट्या कार्यक्रमातुनच मी शिकतोय .एकदा कि शिक्षण झालं कि मला या महाराष्ट्रातला मोठा किर्तनकार व्हायचंय व वारकरी संप्रदायाकरताच झटायचंय .माझं पहिलच किर्तन लाखो वारकऱ्यांसमोर चंद्रभागेच्या वाळवंटी व्हावं हेच माझं स्वप्न आहे.त्या करिता सिनेसृष्टीत भरपुर ग्लॅमर,पैसा असला तरी मला तिकडं जायचंच नाही.तु साथीला असली तर मला उर्जा मिळेल गं.राहसील ना सोबत?"एकनाथ कळवळून बोलत होता.पण सरुला आठवत होतं तो अंधार ,काळोख्या रात्री,आईची असहाय तगमग,तिला यातून बाहेर पडायचं होतं व शिवाय देव मंदीर समाज रुढी याबद्दल तर तिच्या मनात घृणाच होती.एकांतांत हे सर्व तिला खायला उठे.त्यामुळं नाथानं निवडलेला वारकरी भक्तीचा मार्ग तिला रुचेना.
संदेश लोखंडवाला सरू मागं घिरट्या घालू लागला .सरुही नाथा ऐवजी त्यालाच प्राधान्य देत विविध ठिकाणी फिरू लागली.संदेश नं तिला मुंबई ला येण्याची गळ घातली पण तिला नाथाही सोबतच हवा होता.त्याकरिता ती नाथाचं मन वळवू लागली.इकडे संदेश एकनाथ चं पत्तं कट करून सरुला एकटीलाच पटवू लागला.सरुही सदानकदा संदेश सोबतच राहू लागली .तशातच संदेश व एकनाथ चं काही तरी झालं .त्या दिवसापासून नाथानं सरूशी बोलणंच बंद केलं व सरळ गावाकडं निघुन गेला.सरूनही त्या रागाच्या भरातच संदेश सोबत मुंबई ला जाण्याचं पक्क केलं.संदेशला तर स्वर्ग दोन बोटेच उरला.सरुनं आपला निर्णय दमाणी सरांना सांगताच हे असं काही तरी घडणार याची कुणकुण त्यांनाही होतीच.
"सरू तुझा निर्णय पक्का नसेल तर वडिलाच्या नात्यानं सल्ला देतोय!,बघ तु लोखंडवाल्याचा चित्रपट स्विकार पण तुर्तास पुण्यातच रहा.म्हणजे तुला पदवीचं शेवटचं वर्ष ही करता येईल"
तितक्यात तुमच्यातला दुरावा ही निवडेल मग पाहु पुढचा निर्णय"
पण या मताला चित्रपटाच्या तारखांचा बहाणा दाखवत संदेशनं धुडकावून लावलं.त्या दरम्यान सरू नाथाला सुरगाण्याला घरी जाऊन भेटली.तीन चार दिवस राहुन त्याला पटवू लागली.तिला नाथासोबत फिल्मसृष्टीत करिअर करायचं होतं तर संदेश लोखंडवाल्याला तिच्या कलेपेक्षा तीचं सौंदर्य हवं होतं ह्या तिड्यातच एकनाथ बिथरला होता.तरी तो तिला जाऊ नको म्हणून विनवत होता.शेवटी ती मुंबई करिता परत निघाली.दमाणी सरांना तिनं आपला निर्णय कळवला.
दमाणी कळवळुन म्हणाले"पोरी तु करिअर कुठंही कर पण एकनाथ ला सोडू नको.कारण तु कलाकार म्हणुन कितीही श्रेष्ठ असलीस तरी गायनातली तुझी खरी हुक (किक) एकनाथ च आहे. तुझ्या रक्तात संगीत आहे हे मान्य त्या जोरावर तु यशस्वी ही होशील.पण पोरी लक्षात ठेव संगीत मनामनात प्रेम फुलवतं परंतू ते फुलवण्याकरिता जे संगित हवं ते प्रेमातुनच निर्माण होतं आणि त्याच प्रेमाची हुक तुला एकनाथा कडुन मिळत होती म्हणुन तु यशस्वी होत होती.तशीच हुक तुझ्याकडून त्याला ही मिळत होती हे त्यानला माहित आहे म्हणुन तु जर गेलीस तर कदाचित माझा एकनागाणंच बंद करेल"
सरूला हा अपमान वाटला .आपण यांना करुनच दाखवू या तोऱ्यातच ती उठली वसंदेश सोबत गेली.
महिन्यातच संदेशनं तिला "स्वरा"या नावानं चित्रपटात गायक म्हणुन लाॅंच केलं सिमरण प्राॅंडक्शन व आवाज नविन म्हणुन गाणी तुफान चालली.मिरा देसाई रोडवर शरारा व्हिला.फिरायला ..कार.असा जबर थाट सुरु झाला पण त्या बदल्यात इच्छा नसतांनाही तिला ससंदेश सोबत लिव्ह इन रिलेशनशिप ठेवावी लागली.नंतक्ष पुन्हा चित्रपट निघाले.तीन वर्षाच्या काळात तीन चार चित्रपट पण नंतर त्या आवाजातली मोहिनी ओसरू लागली तिनं संदेश कडं लग्नाचा तगादा लावला. तो सर्व ऐश्वर्य देई पण लग्नाचं टाळेच.नंतर छोटे छोटे कार्यक्रमातच ती गाऊ लागली.नंतर तो तिला मुद्दाम गाणं देणं ही टाळु लागला.तिला सर्व ऐशोआराम देई पण आता तो वेगवेगळ्या गायिका शोधून त्यांच्यासोबतच राहू लागला.आता उर्मीला जावळेकर ला वरळी सी लिंक जवळ फ्लॅट देऊन तो तिथच राहू लागला होता.म्हणूनच सकाळी हा सारा प्रकार घडला.
स्वराला आता दमाणी सर, नाथा आठवू लागलें.आपण नाथाला फसवलं त्याचं फळ आपल्याला मिळालं.खरचं आपल्या संगीताची हुक तोच होता.त्याच्या हुक शिवाय आपली गायकी काहीच नाही हे पाच वर्षात अनुभवलं.आपलं जिवण बरबाद झालं याला संपवुच पण त्या अगोदर आपल्या सर्वस्वाची त्यास हुक देऊन त्याचं स्वप्न तरी पुर्ण करू नी मग हे जिवण संपवू.
स्वरानं तोंड धुतलं. आपली बुगट्टी चिरान गाडी काढली.आग्रा हाय वे वर यायला तिला रात्रीचज अकरा वाजले.तिची गाडी एकशे वीस च्या स्पीड ने नाशिक कडं धावत होती सातमाळ्याच्या डोंगररांगात वसलेल्या सुरगाण्यातील माथावाडी या नाथाच्या गावी जाण्यासाठी.कसारा घाट ओलांडला व ती नाशिक मध्ये प्रवेश करणार तोच दिवसभराचा त्राण व थंड हवा यानं तिला झपकी आली व क्षणात समोरुन रेतीच्या डंपरने धडाड 🗯🗯🗯💥💥💥💥धम्म........
रक्तमासांचा सडा.......
🙏🙏नाथाची गाथा🙏🙏 भाग::-2-3
Link :-