पुन्हा एकदा तोच भयानक वाटणारा काळोख. एकटीच हरवलेली सारा. इतर सर्वाना शोधत असताना अचानक समोर आलेली त्यांची मृत शरीरे. आणि पुन्हा एकदा ती सावली तिचा पाठलाग करून तिला मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सारा खडबडून जागी झाली ती त्याच जुन्या स्वप्नामुळे. घामाने चिंब भिजलेली ती थरथरत होती. तिला आता मात्र भीती वाटू लागली. आपण काही चुक तर करत नाही ना असा विचार त्यावेळी तिच्या मनात आला. पण पुन्हा एकदा तिच्या वैचारिक बुद्धीने तिला हे सर्व भास आहेत याची जाणीव करुन दिली आणि ती परत झोपी गेली. रात्र अजुन खुप बाकी होती.
सकाळी सुर्य उगवला आणि पक्षी किलबिलाट करु लागले तसे सर्व जागे झाले. पुढील मार्ग सुरु लवकर सुरु करणे गरजेचे होते म्हणून सर्व पटकन आवरून पुढच्या प्रवासाला तयार झाले. ते आदिवासी तरुण पुढे झाले. मागे सैम मग सारा.. लॉरा.. स्टीव आणि जॉन सोबत चालले आणि सर्वात शेवटी आन्द्रे. थोडे अंतर पुढे जाताच एकदम घनदाट जंगल सुरु झाले. आता समोर रस्ता दिसत न्हवता तर रस्ता तयार करावा लागत होता. इतकी दाट झाडी होती. ते आदिवासी तरुण हातातील भल्या मोठ्या चाकूने झाडी सपासप तोडून रस्ता तयार करत होते. यामुळे प्रवास एकदमच मंद गतीने चालू होता. सैम आणि आन्द्रेही आता त्या दोघाना मदत करु लागले. एव्हाना खुप वेळ गेला होता पण त्या दाट झाडीमुळे सुर्यकिरणे खाली पोहचत न्हवती. त्यामूळे वेळ समजत न्हवती.
अचानक ते दोन्ही तरुण थांबले. कोणाला काही समजले नाही. सैम आणि आन्द्रे पुढे जाणार तोच त्यानी हातानेच त्याना थांबण्यावचा इशारा केला. हातानेच त्यानी सर्वाना झाडीमागे लपण्यास सांगितले आणि ते दोघेही आडोशाला झाले. कोणाला काही कळत न्हवते की काय होत आहे. अचानक भुकंप यावा तसा आवाज येऊ लागला आणि जमीनही थरथरू लागली. एक भला मोठा 20 ते 25 हत्तीचा कळप उन्मत्त होऊन बेभान धावत होता. वाटेत आडवी येणारी झाडे झुडपे छोटे छोटे प्राणी सर्वच पायदळी तुडवत तो झुंड येत होता. जॉन हे सर्व कैमरा मधे कैद करत होताच. ते हत्ती तसेच धावत आले आणि अगदीच शेजारुनच धडधड करत निघून गेले. त्यांचे आनखी फोटो घेण्यास जॉन पुढे सरसावला तोच अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. ते पाहून बाकीचे हसू लागले. जॉनही हसू लागला पण ते हसू अचानक भीतीमधे बदलले. जॉन हळूहळू त्या खड्ड्यात रुतू लागला. तो खड्डा नसून एक दलदल आहे हे त्याच्या लक्षात आले. बाकिच्यानाही ते लक्षात आले आणि जॉन साठी ते पुढे सरसावले. दलदल खुपच मोठी होती. जॉन अचानक जास्तच खाली फसू लागला. त्यामूळे सर्वच घाबरले. आन्द्रेने सोबतची रस्सी एका झाडाला बांधली आणि जॉनच्या दिशेने फेकली. पण जॉन ती रस्सी पकडू शकला नाही. ती खुप दुर होती. जॉन छातीपर्यंत आत फसला होता. आन्द्रेने रस्सी पुन्हा एकदा जोमाने फेकली. यावेळी रस्सी जॉनच्या एकदम जवळ गेली. त्याने पुर्ण ताकत लावून आपले हात त्या दलदलीतून कसेबसे वर काढले आणि ती रस्सी पकडली. तो अजुन आत फसत होताच. आन्द्रेमे सर्वाना रस्सी खेचण्यास संगितले तसे सर्वजण रस्सी खेचू लागले. हळूहळू जॉन वरती येऊ लागला. सर्वच ताकत लावून रस्सी खेचत होते. हळूहळू करत शेवटी जॉन वरती आला. काठावर येताच तो निपचित पडून राहीला. बाकी सर्वही दमले होते. खुपच दमछाक झाली होती. या सर्व घटनेत किती वेळ गेला हे कोणालाच नाही समजले.
सारा : जॉन आर यू ओके...
जॉन : येस.. मी ठिक आहे पण एक खराब न्यूज आहे.
लॉरा : आता आणखी काय झाले (भीतीच्या सुरात)
जॉन : कैमरा.. तो मात्र गेला..
लॉरा : हुश्श.. जाऊदे तो कैमरा..
जॉन : ह्म्म्म्ं...
सारा : खुपच धोकायदायक आहे हा मार्ग.
आन्द्रे : हो ना.. सरदार तसे सांगत होताच.
सैम : गाईज मला वाटत आपण इथेच मुक्काम करावा आजची रात्र. कारण वेळ खुपच झाली आहे. आणि आता काळोखही वाढत आहे.
सारा : हो आपण इथेच मुक्काम करुयात. स्टीव कुठे आहे.
सैम : हा काय इथेच होता तो.. स्टीव..
जॉन : येस.. मी ठिक आहे पण एक खराब न्यूज आहे.
लॉरा : आता आणखी काय झाले (भीतीच्या सुरात)
जॉन : कैमरा.. तो मात्र गेला..
लॉरा : हुश्श.. जाऊदे तो कैमरा..
जॉन : ह्म्म्म्ं...
सारा : खुपच धोकायदायक आहे हा मार्ग.
आन्द्रे : हो ना.. सरदार तसे सांगत होताच.
सैम : गाईज मला वाटत आपण इथेच मुक्काम करावा आजची रात्र. कारण वेळ खुपच झाली आहे. आणि आता काळोखही वाढत आहे.
सारा : हो आपण इथेच मुक्काम करुयात. स्टीव कुठे आहे.
सैम : हा काय इथेच होता तो.. स्टीव..
स्टीव अचानक गायब झाला होता. सर्व त्याला शोधू लागले पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. रात्र झाली तरी स्टीव सापडला नाही आणि शेवटी दमून शोध थांबला. जॉन अजुनही त्या धक्क्यातून सावरला न्हवता. भीती त्याच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होती. लॉरा त्याला सावरत होती पण काही उपयोग होत न्हवता. या सर्वात स्टीव गायब होता. सर्व काही अचानक बदलत होते.
तिथून काहिच अंतरावर गुहा राहिल्या होत्या. एक सावली तिथूनच सर्वाना पाहत होती......
क्रमशः....
क्षमस्व... कारण वेळेअभावी हा भाग अगदी छोटासा पोस्ट करत आहे.