सकाळी लवकरच सर्व जागे झाले. ओढ लागली होती ना ती गुहा पहायची. सर्व तयार झाले. जलाशय पार करुन मग वरती चढायच होते. जलाशयातील पाणी खुपच थंड होते. अगदी बर्फासारखे गार होते. पाण्यात पाय ठेवताच साराच्या अंगावर सरसर करत काटाच आला. अंगाला टोकदार काटे टोचावे तसे हे गार पाणी झोंबत होते. अशा या पाण्यात ते आदिवासी तरुण सहज झेपावले आणि जलाशय पार करु लागले. तसे बाकीचे सर्व पाण्यात उतरले. हुडहुडी भरलेल्या अंगानेच सर्व तो जलाशय पर करु लागले. जस जसे पुढे जाऊ लागले तसे तो जलाशय खोल होऊ लागला. पोहतच पार करावा लागणार हे निश्चीतच होते आणि तसे सर्व तयारीचे होते. पोहत पोहत सर्वानी तो जलाशय पार केला. पलीकडे जाताच सर्वाना थंड पाण्याचा कडका जाणवू लागला. पाण्यातून बाहेर येताच सर्वांगात थंडीची लहर उठली. सर्वानी ताबडतोब उबदार कपडे परिधान केले तसे त्याना थोडेसे बरे वाटले. पण खरी पंचाईत होते ती आता ओघळ चढाई करणे. एकदमच खडी अशी ती ओघळ फारच चिंचोळी होती आणि पाण्याने शेवाळलेली देखील होती. त्यामूळे पाय घसरणार हेही नक्कीच होते. लॉरा ते पाहूनच वैतागली होती.
लॉरा : हट यार.. परत ही घसरगुंडी चढायची आहे.
आंद्रे : यासाठी मार्ग आहे. तुम्ही बघाच आपण सहज ही ओघळ पार करु.
आंद्रे : यासाठी मार्ग आहे. तुम्ही बघाच आपण सहज ही ओघळ पार करु.
एक आदिवासी तरुण पुढे झाला. त्याने रस्सी आपल्या कमरेभोवती बांधली आणि तो त्या ओघळीमधे शिरला. अगदी सहजच तो ती ओघळ चढू लागला. बघता बघता तो सरसर करत अगदी लीलया ती ओघळ पार करु लागला. झपझप उड्या घेत त्याने वरती असणारा तो मोठा खडक पार केला. ते पाहून सारा आणि लॉराच काय बाकीचे लोकही शॉक झाले. त्या वरती गेलेल्या तरुणाने कमरेची रस्सी सोडून खडकामधे असणार्या मजबूत अशा एका झाडाला घट्ट बांधली. आता वरती चढायला रस्सी होती त्यामूळे अवघड वाटणारे ते कार्य खुपच सोपे झाले. रस्सीच्या सहाय्याने एक एक करत सर्व वरती आले. सैम आणि सारा पाहत होते. त्या खडकावरुन विशाल पसरलेले ते जंगल खुपच सहज पाहता येत होते. त्या खडकावरून थोडे पुढे जाताच वरुन कोसळणारया त्या धबधब्याच्या बरोबर मागे आत जाता येत होते. हळूहळू आधार घेत सर्व तिथे पोहचले. धबधबा मागे सोडून ते आत दिसणार्या रस्त्याने चालू लागले. थोडे अंतर पुढे जाताच प्रकाश कमी कमी होऊ लागला आणि काळोख पसरू लागला. सर्वानी सोबतच्या टॉर्च चालू केल्या.
काही अंतरावर जाताच ते आदिवासी तरुण अचानक थांबले. ते आंद्रेशी त्यांच्या भाषेत बोलू लागले. बाकीचे सर्व फक्त पाहत होते. शेवटी सैम पुढे झाला.
सैम : आंद्रे काय झाले? काय म्हणत आहेत हे दोघे.
आंद्रे: सैम ते म्हणत आहेत की इथुन पुढे ही रहस्यमय गुहा चालू होते आहे. आपण सर्वानी आता सावध राहीले पाहिजे तसेच आत खुप अंधार असणार आहे. आणि इथून पुढे मार्ग कसा असेल हे यानाही माहीत नाहीये. तसेच इथुन पुढे जाणे त्याना मान्य नाही कारण पुढे मृत्यु आहे पण फक्त सरदार बोलले आहेत म्हणून हे आपल्या सोबत आत येत आहेत.
सैम : त्यासाठी आम्ही सर्व आभारी आहोत. इथुन पुढे जो मार्ग असेल तो आपण सोबत चर्चा करत आणि एकूण परिस्थीतीचा अंदाज घेऊन पार करु.
सारा : हो आंद्रे. सैम जे म्हणतो आहे तसेच आपण करु. आणि हो जर याना पुढे यायचे नसेल तर ते परत जाऊ शकतात आम्ही फोर्स नाही करणार. पण यांची सोबत असेल तर पुढील मार्गही सोपा होईल.
आंद्रे: ते सोबत येण्यास तयारच आहेत. फक्त ते पुढे असणारा धोका आणि माहिती नसणारे मार्ग यावरती बोलत होते.
सैम : तसे असेल तर आपण पुढे जाऊयात.
आंद्रे : ओके.. चला.

पुढे भयानक काळोख होता. त्यामूळे टॉर्चशिवाय पर्याय न्हवता. थोडे पुढे जाताच अचानक काहितरी आवाज झाला आणि अंगावर शहारा यावा तसा फडफड आवाज घुमू लागला. सर्वजण जिथे होते तिथेच थांबले. आवाज आता जास्तच येऊ लागला. आंद्रे आणि आदिवासी तरुण आवाजाचा कानोसा घेऊ लागले. तो आवाज आता एकदम जवळ आला. सर्वांचेच लक्ष तिकडे लागले होते. फडफड करत हजारो वटवाघुळे गुहेच्या आतून आले आणि चित्कार करत बाहेरच्या दिशेने झेपावले. ते इतके चित्कार करत होते की तो आवाज कानाला सहन होत न्हवता. काही क्षण तसाच गेला. सारा आणि लॉरा थोड्या घाबरल्या होत्या. स्टीव आणि जॉन एकमेका सोबत खेटून उभे होते.
आता परत पुढे मार्ग सुरु झाला. थोडे पुढे जाताच सर्वाना प्रकाश पडलेला दिसला. त्या प्रकाशात ती गुहा प्रखरपणे दिसू लागली. सर्व तिथे पोहचले. तो प्रकाश मनाला आनंद देणारा होता. सर्व तिथे खाली बसले. उजेडात ते गप्पा मारु लागले.
सारा : ही गुहा खुपच जुनी दिसते आहे आणि किती मोठी आहे
लॉरा : हो ना.. खुपच मोठी आहे. आणि ते अचानक आलेले वटवाघुळ.. बापरे किती भयानक होते ते.
सैम : लॉरा.. नशीब त्यानी तुला नाही पाहिले.. नाहीतर ते बिचारे घाबरुन मेले असते..हाहाहाहा..
लॉरा : हो ना.. खुपच मोठी आहे. आणि ते अचानक आलेले वटवाघुळ.. बापरे किती भयानक होते ते.
सैम : लॉरा.. नशीब त्यानी तुला नाही पाहिले.. नाहीतर ते बिचारे घाबरुन मेले असते..हाहाहाहा..
सर्वजण हसू लागले.
लॉरा : सैम.. तू खुप बोलला. आता तुझे काही खरे नाही..
असे म्हणत लॉरा उठली आणि सैमच्या मागे धावली. सैमही उठला आणि धावू लागला. त्यांची ती मस्ती पाहत सर्व हसत होते. सैम आणि लॉरा थोडे बाजुला धावत गेले. अचानक एक मोठा आवाज झाला. तसे सर्वांचे लक्ष तिकडे गेले. आंद्रे.. सारा.. जॉन.. सर्वच तिकडे धावले. लॉरा एका बाजुला पडलेली होती आणि सैम.. सैम तिथे कुठेच दिसत न्हवता. लॉराच्या तोंडावर पाणी मारताच ती जागी झाली.
सारा : लॉरा.. काय झाले.. आर यू ओके..
लॉरा : सैम.. सैम.. सैम... (भीतीने तिला बोलता देखील येत न्हवते)
सारा : सैम... लॉरा.. सैम ला काय झाले..
लॉरा : सैम.. आम्ही इकडे धावत आलो. अचानक इथली जमीन दुभागली गेली आणि सैम त्यामधे घसरला. मी त्याला हात देणार होतेच की कोणीतरी मागुन माझ्या डोक्यात वार केला आणि मी खाली पडले.
सैम.. तो या जमिनीच्या खाली आहे... सारा ते भयानक होते.. (ती भीतीने थरथर कापत होती)
सारा : लॉरा.. शांत हो.. स्टीव.. जॉन...लॉराला इथुन बाहेर घ्या.

स्टीव आणि जॉन लॉराला घेऊन बाहेर गेले.
सारा : आंद्रे हा काय प्रकार आहे. लॉरा काय बोलत आहे काही समजत नाहीये. आणि सैम इथुन गायब आहे. त्यात ही जागा इथेच संपत आहे. काय आहे हे.
आंद्रे : सारा सध्या मलाही काही समजत नाहीये. लॉराला थोडा वेळ देऊ आपण. मग बोलू आता लगेच काही नको. आणि आम्ही सैमचा शोध घेतो लगेच. तू लॉराला सांभाळ.
सारा : ठिक आहे..
आंद्रे : सारा सध्या मलाही काही समजत नाहीये. लॉराला थोडा वेळ देऊ आपण. मग बोलू आता लगेच काही नको. आणि आम्ही सैमचा शोध घेतो लगेच. तू लॉराला सांभाळ.
सारा : ठिक आहे..
आंद्रे आणि ते तरुण सैमला शोधू लागले. लॉरा अजुन बडबडत होतीच. जॉन आणि सारा तिला सावरत होते. स्टीव पुन्हा त्या जागी गेला. पण तो ही गोंधळला. कारण तिथे काहीच क्लु न्हवता. सैम कुठे कसा आणि का गायब झाला याचे उत्तर फक्त लॉराच देऊ शकेल असे सर्वाना वाटले पण लॉराला खुपच मोठा धक्का बसला होता आणि त्यातून ती सावरू शकत न्हवती.
काय झाले असावे सैमचे... ती रहस्यमय गुहा त्या सर्वांना आपल्या जाळ्यात ओढू लागली होती. सुरवात सैम पासुन झाली. सैम गायब होता.. लॉरा भीतीने थरथरलेली. रात्र आता नुकतीच चालू झाली होती.... खेळ आता सुरु झाला होता... वाचत रहा..... आपले अभिप्राय नक्कीच मांडा...
क्रमशः......