♣ साथसहेली ♣
【भाग १२】
【भाग १२】
मीरा आणि अक्का डमरूबाबांना भेटून परत पिंपळवाड्यावर येतात. संध्याकाळ होत आलेली असते, संग्राम अजुन ऑफिसवरुन आलेला नसतो. मीरा आत खोलीत आराम करायला जाते तोच तिच्या समोर देवयानी येते. मीरा तिच्याकडे दुर्लक्ष करून तिच्या आरपार जाते, तिला झीड़कारते. देवयानीला खुप राग येतो, 7 वाजलेले असतात अन ती लगेचच मीराच्या शरीरात प्रवेश करते. दनदन पायऱ्या चढत थेट वरच्या मजल्यावर जाते. इकडे-तिकडे चकरा मारू लागते, स्वतःशी गप्पा मारू लागते. "हां पिंपळवाडा माझा आहे, संग्राम फक्त माझा आहे.." असे शब्द तिच्या तोंडातून निघत होते. मीराला अजुन कसा त्रास द्यायचा याचा विचार देवयानी करायची. अक्का संध्याकाळ झाल्यानंतर मीरासोबत बोलाचे टाळत असत. मीराच्या अश्या बदललेल्या वागण्यामुळे रात्री संग्रामही मीराच्या जवळ येत नाहीये देवयानीला समजले. त्यामुळे तिला संग्रामचा ही राग येत होता. संग्रामवर कशी भुरळ पाडु याचा विचार देवयानी करू लागली. रात्रभर मीराला वाड्याच्या वरती चकरा मारताना, स्वतःशी गप्पा मारताना पाहुन वाड़याबाहेरची लोकं नाव ठेवू लागली, पिंपळवाड्यात काहीतरी गड़बड़ आहे असा संशय घेऊ लागली, पिंपळवाड़याकड़े बोट करून चर्चा करू लागली. गावातील बायकांमध्ये मीराबद्दल चर्चा होऊ लागली. सहाजिकच संग्रामपासुन हे सगळे लपनार नव्हते. गावातल्या एका माणसाकडून संग्रामला वाडयाबद्दल गावात अशी उलट सुलट चर्चा होत आहे हे समजले. संग्रामने ही गोष्ट अककांच्या कानावर घातली. अककांनी कशीबशी संग्रामची समजुत काढली आणि त्याला शांत केले. दुपारी वाड्यात कोणी नसताना अक्का मीराच्या खोलीत आल्या, मीरा बेडवर बसली होती. अककांनी मीराला काल देवयानीने काय केले ते सांगितले आणि गावात बोभाटापण झालाय हे देखील सांगितले. अक्का म्हणाल्या," या देवयानीचा खेळ लवकरच संपवावा लागेल मीरा नाहीतर तुझ्यासोबत हा पिंपळवाङा ही बदनाम होईल, तूला डमरूबाबांनी तिच्या अस्थि गोळा करून आणायला सांगितल्या होत्या, तुला माहिती आहे का तिची जागा?"..मीरा सांगू लागली," होय अक्का मला माहिती आहे तीची हाडं कुठे सापड़तील मला, तीची हाडं तिच्याच घरी आहेत..तीचा मृत्यू तिच्या घरातच झाला आहे, तीथच् देवयानी काळ्या चेटकीनीची पुजा करायची".."म्हणजे तू मुंबईला जाणार व्हयं?"अककांनी विचारले. मीरा हो म्हणाली. "मी येऊ का तुझ्यासोबत??" अककांनी विचारले. मीरा नको म्हणाली, डमरूबाबांना यज्ञ करण्यासाठी तुमची मदत लागेल म्हणत मीराने अक्काला इथेच थांबण्यास सांगितले. हे काम मी एकटीच करणार हे तिने ठरवले.
अखेर अमावस्येनंतर पाचवा दिवस उजाडला, अक्का ग्रंथ वाचन करत होत्या तेवढ्यात डमडमडम डमरू वाजण्याचा आवाज वाड्यात घुमु लागला. मीरा धावत बैठकीत आली, डमरूबाबा वाड्यात आले होते. मीरा आणि अक्काने त्यांना वाकुन नमस्कार केला. बाबा वाड्यात इकडे तिकडे बघत होते, त्यांचे हात थरथर कांपत होते घाम आला होता. भटकत्या आत्माचा वाड्यात वावर आहे त्यांना जानवले, वाड्यातले पाणी पिण्यास त्यांनी नकार दिला. अककांनी देवघरात हवनकुंडाची पूर्ण तयारी केली केली होती. अक्का डमरूबाबांना घेऊन देवघरात गेल्या. डमरूबाबांनी मंत्रोच्चारण करत यज्ञ सुरु केला. मीरा आणि अक्का त्यांच्या समोर बसल्या होत्या. यज्ञ सुरु झाला तसे वातावरण प्रसन्न झाले. देवयानीची अस्थि आणायला जाण्यासाठी मीराची पूर्ण तयारी झाली होती, यज्ञ पूर्ण झाल्यावर तिला निघायचे होते. थोड्यावेळाने डमरूबाबांचा यज्ञ पूर्ण झाला आणि बाबा मीराला म्हणाले," हे बघ बाळा, ही शेवटची संधी आहे आपल्यासाठी, देवयानीला या वाडयाबाहेर काढायचे असेल तर तुला प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलावे लागेल. तुला कोणत्याही परिस्थितित देव्यानिच्या अस्थि गोळा करुन उद्याचा सूर्योदय होण्याच्या आत ईथे आणाव्या लागतील. उद्या सूर्योदय झाल्यानंतर लगेचच तिच्या अस्थि नदीकाठी हवनकुंडात टाकून नंतर त्यांचे नदीत विसर्जन केले पाहिजे तरच देवयानीला मुक्ती मिळेल.." मीरा डमरूबाबांना म्हणाली," पण बाबा रात्री देवयानी माझ्या शरीरात असते, आज रात्री तिच्या अस्थिपर्यंत ती कशी पोहचु देईल मला?" डमरुबाबांनी त्यांच्या जवळ असलेला त्यांच्या गुरुंनी दिलेला ब्रह्मयज्ञ भस्म मीराच्या कपाळाला लावला आणि मीराच्या हातात दिला. हां भस्म तुझ्या शरीराची रक्षा करेन, देवयानीला तुझ्या शरीरात प्रवेश करू देणार नाही. डमरूबाबांचा आशीर्वाद घेऊन मीरा देवयानीच्या घरी जायला निघते. संध्याकाळ झालेली असते अंधार पड़त आलेला असतो. मीरा देवयानीच्या बंगल्याजवळ पोहचते. देवयानीचा बंगला लांबुन एकदम कोपर्यात झाड़ा-झुडपात लपलेला तिला दिसतो. एखाद्या झपाटलेल्या बंगल्यासारखे ते दृश्य दिसत होते. त्या ठिकाणी कोणीही नसते, भयान शांतता पसरलेली असते. मीरा हळूच गेट उघड़ते आणि आत घुसते. बंगल्याचा काचेचा दरवाजा अर्धा फुटलेला असतो. हळूच धक्का देऊन मीरा दरवाजा उघड़ते. कर्रर्रर्रर्रर्रर्र दरवाजा उघडण्याचा आवाज घुमु लागतो. बंगल्यात सगळीकडे धूळ आणि झाडांचा पालापाचोळा पडलेला असतो. बंगल्यात लाईट सुद्धा गेलेली असते. मीरा तिच्या जवळची बॅटरी काढ़ते, सगळीकडे मकडीचे विनलेले जाळे चमकू लागते, वरती वटवाघुळांना बंगल्यात कोणीतरी आल्याची चाहूल लागते आणि ते इकडे तिकडे उडायला लागतात. मीरा वरती देवयानीच्या स्टोअर रूमकड़े जाण्यास निघते. जिन्याची एक एक पायरी हळू हळू चढ़त वर जात असते तेवढ्यात मागून आवाज मोठ्याने येतो,"मीरा थांब..." पण डमरूबाबांनी सांगितल्याप्रमाणे ती मागे वळून पहात नाही, तो आवाज बंगल्यात मोठ्याने घुमु लागतो. मीरा एक एक पायरी वर चढु लागते. तिला पुन्हा आवाज येतो,"मीरा थांब..पुढे जाऊ नकोस" मीरा खुप घाबरते. हा आवाज देवयानीचा असतो, पण मीरा माता चंडाईचा जप करत सरळ पुढे जाते. स्टोअर रूमच्या बाहेर आल्यावर मीराचे हात थरथर कापू लागतात.हळूच कड़ी उघडून मीरा आत घुसते. समोर त्या काळ्या चेटकीनीचा फ़ोटो पाहुन तिला ठसका लागतो, छाती धड़धड़ करू लागते. फोटोमधल्या चेटकिनीचे ते अक्राळ विक्राळ रूप पाहून मीरा थोडी बिथरते. त्या फ़ोटोच्या समोर खाली रक्ताचे उडालेले दाग असतात, खाली फरशीवर जळालेली राख असते. मीरा हाताने ती राख चाचपू लागते आणि अचानक किंचाळण्याचे, मोठ्याने रडण्याचे आवाज बंगल्यात घुमु लागतात, देवयानीच्या ओरडन्याचा आवाज मीराच्या कानावर पड़त होता. मीराला घाम फुटला होता, अश्या घाबरलेल्या अवस्थेत ती देव्यानीची एक एक अस्थि कापडात गुंढाळत होती. सगळी अस्थि गोळा केल्यानंतर मीरा उठली. चेटकीनीचे किंचाळण्याचे, मोठ्याने रडण्याचे आवाज वाढू लागले. पूर्ण बंगल्यात कोणीतरी मेल्यावर एखादे मातम चालु असल्यासारखे भुता-खेतांचे रडण्याचे आवाज येत होते, देवयानीचा आक्रोश वाढत होता. बंगल्यातली दारं-खिड़क्या वाजत होत्या, वाऱ्याने पड़दे उड़त होते. पटापट पायऱ्या उतरत मीरा खाली येते. बंगल्यातून बाहेर पड़ताना अचानक दारातच देवयानी तिच्या समोर येते, मीरा खुप घाबरते, आता ही आपल्याला मारून टाकनार अशी भीती तिला वाटू लागते. मीराकड़े पाहुन ती पांढरे डोळे मोठे करते, तिच्याशी चकवा खेळण्याचा प्रयत्न करते. मीरा डोळे झाकते, डमरूबाबांच्या गुरुंचा भस्म डोळ्यांवर लावते, देवयानी अदृश्य झाल्यासारख तिला वाटते. मीरा पळत बंगल्याच्या बाहेर येते. सगळे आवाज अचानक बंद होतात आणि बंगल्याच्या दारं-खिड़क्या आपोआप खटाखट बंद होतात. अचानक चालू झालेला गोंधळ बंद होतो आणि सगळीकडे शांतता पसरते. बाहेर आल्यावर मीरा मोकळा श्वास घेते आणि पिंपळवाड्यावर जायला निघते. मध्यरात्री दीड-दोन वाजता मीरा हळूच पिंपळवाड्यात येते. सगळे गाढ़ झोंपेत असतात, डमरूबाबा देवघरात ध्यान करत असतात, अक्का मीरा सुरक्षित परत घरी यावी यासाठी जागं राहून देवाचा जप करत बसलेल्या असतात. मीराला समोर पाहुन अक्का खुश होतात. डमरूबाबा डोळे उघड़तात. सुखरुप परत आल्याने दोघांना आनंद होतो. मीरा त्यांच्या हातात कापडात बांधून आणलेली देवयानीची अस्थि देते. डमरूबाबा म्हणतात," मीरा तू सुरक्षित परत आलीस म्हणजे आमचे ध्यान सफल झाले.आपण आत्ताच यज्ञ सुरु केला असता पण मृत व्यक्तीवर रात्री अत्यसंकार करता येत नाहीत. सकाळी सूर्योदय होताच आपण देवयानीच्या अस्थिंवर गावाबाहेरच्या नदीवर जाऊन अंत्यसंस्कार करू." तेवढ्यात मीराचे लक्ष देवघराबाहेर बसलेल्या देवयानीकड़े जाते. देव्याननी देवघरात येऊ शकत नसल्याने, लांबुन मीराकडे बघत खाली बसून हात जोडून रडत होती. बहुतेक देवयानी मीराची माफ़ी मागत असावी. आणि क्षणार्धात ती गायब झाली. डमरूबाबा पुन्हा ध्यान करत बसले, मीरा आणि अकका सूर्योदयाची वाट बघत होत्या. अखेर काही तासांनी सूर्याची कोवळी किरणे खिड़कीतून देवघरात पडली. डमरूबाबा, अक्का आणि मीरा पायवाटेने गावाबाहेर असलेल्या नदीकाठी आले. डमरूबाबांनी हवन करण्याचे साहित्य काढून छोटा हवनकुंड तयार केला. मंत्रोच्चारण करत डमरूबाबांनी देवयानीच्या अस्थिंना अग्नि दिला. काहीवेळाने, अस्थि मीराला पुन्हा गोळा करायला सांगितल्या. त्या देवयानीच्या अस्थी घेऊन डमरूबाबा मीराला घेऊन नदीच्या पाण्यात उतरतात आणि म्हणतात," मीरा, जरी मैत्रिणीने वासनेच्या आहारी जाऊन तुला खुप त्रास दिला खूप छळले तरी तू या क्षणी तिला मोठ्या मनाने माफ़ कर. तू यावेळी तिला माफ नाही केले तर तिची आत्मा शांत नाही होणार. एक खरी मैत्री निभावुन तुझे कर्तव्य पार पाड़. देवयानीच्या अस्थिंचे नदीत विसर्जन करून तिला आज मुक्ती दे बाळा..मुक्ती दे.." मीरा खाली देवयानीच्या अस्थिंकड़े पाहते, देवयानीसोबत मुंबईत घालवलेले सगळे क्षण तिला आठवतात. सोबत केलेल्या गप्पा गोष्टी आठवतात. देवयानी जे काही वागली तिला माफ करत मीराच्या डोळ्यांत टचकन पाणी येते. देवयानीच्या अस्थिंचे नदीत विसर्जन करून मीरा तिच्या भटकत्या आत्म्याला कायमची मुक्ती देते, एक खरी सहेली असल्याचे कर्तव्य पार पाड़ते.........
(समाप्त)