♣ साथसहेली ♣
【 प्रस्तावना 】
सर्व वाचक मित्रांना माझा नमस्कार..!!! खुप मोठ्या कालावधी नंतर आपली एका कथेच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेट होत आहे. 'साथसहेली' अशी एक कथा आहे ज्यात अंधश्रद्धेवर जास्त भर दिला आहे. ही कथा आहे दोन मैत्रिणींची, पुढे त्यांच्यात आलेल्या दुराव्याची आणि एका भयभीत सत्याची..आजही खेड्या- पाड्यात् अश्या अनेक प्रथा आहेत ज्याचा संबंध सरळ भुत-प्रेताशी जोडला जातो. माझी वाचक मित्रांना सांगायचे आहे की या कथेपुरते का होईना भूतांवर विश्वास ठेवावा आणि वाचन सुरु करावे. आणि ज्यांनी खरच भूत-प्रेत पाहिले आहे त्यांनी न घाबरता मन लावून वाचन करावे. कथा प्रमाणबद्ध असल्याने कथेचे लहान भाग आहेत, यामुळे कथा रोज पोस्ट केली जाईल. माझी वाचक मित्रांना विनंती आहे की कथा आवडल्यास, न आवडल्यास, काही कमी किंवा जास्त झाल्यास अभिप्राय म्हणून प्रत्येक भागावर आपले मत कमेंटमध्ये जरूर टाकावे.
'साथसहेली' ही कथा पूर्णतः काल्पनिक असून या कथेचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. कथा अंधश्रद्धेला पुढे करत नाही. सर्वानी कथा एक करमणुक म्हणून वाचावी आणि कथेचा आनंद घ्यावा. धन्यवाद..!!!

- यश देव
♣ साथसहेली ♣
【भाग १】
【भाग १】
भल्या पहाटे 5 ला कोंबडयाने बाग दिली. बंडोपंत अंथरुणातुन उठले आणि अंगणातला उसाचा घास गोठ्यात गायीसमोर टाकला. गाय घास चरायला लागली तसे बंडोपंत धार काढू लागले. "एवढं उजाड़लया तरी तुमची पोरं लोळत हाय..आवाज ध्या की जरा मी ज़रा रानात जाऊन आले" बंडोपंतांची बायको रमाबाई जांभळया देत म्हणाली." मीरे अगं ये मीरे उठ की...तांब्या आणून दे एक आतून.." बंडोपंत म्हणाले. वडिलांचा आवाज ऐकून बावीस वर्षाची अख्ख्या गावात सर्वात सुंदर दिसणारी नाजुक गोरीपान पोरगी 'मीरा' ताड़कन उठली आणि आतून तांब्या आणून पंतासमोर जोरात ठेवला आणि सरळ मोरीत घुसली. मीरा तशी स्वभावाने शांत, भोळी पण तेवढीच् तापट होती. स्वतःचे निर्णय स्वतः घाई-गड़बड़ित घ्यायची. बंडोपंतांचे त्यांच्या दोन्ही लेकरांवर जीवापाड प्रेम होते. गाईची
धार काढून काढून पंतांची हाताची बोटे दुखु लागली, एक पातेलं दोन तांबे गच्च भरली. किटलित एक तांब्या ओतून किटली गाडीला लावली आणि पाटलांच्या घरी दूध घेऊन गेले. गावात बंडोपंतांना सगळेच पंत म्हणून ओळखायचे. येता जाता नमस्कार करायचे. गावाच्या पाटलांसोबत त्यांची घनिष्ट मैत्री होती. पाटलांची मुलगी सोनी आणि मीरा एकाच वर्गात शिकत होत्या. पाटील पंतांसोबत दारात गप्पा मारत बसले. गरम पाण्याने स्नान करुन मीरा ओले केस पुसत मोरीतून बाहेर आली, गॅसवर दूध ठेवले, देवाला दिवा-धुप लावून अंगणात रांगोळी काढू लागली. शेजारी राहणारा गण्या रोज तिला रांगोळी काढ़ताना बघायचा. बाहेर येऊन तिला म्हणाला, "काय मग मीरा आज सुट्टी का कॉलेजला?" मीरा हो म्हणाली आणि आत गेली. आत आल्यावर बघते तर पातेल्यातलं निम्मं दूध ओतु गेले होते. बाबा खुप बोलेल मला आल्यावर म्हणून पटकन गॅस पुसला आणि पातेल्यात अर्धा ग्लास पाणी ओतले. मिराचा दोन वर्षानी लहान भाऊ बाळू अजुन आतल्या खोलीतच पसरला होता. " बाळया उठ रे आता...चल आपल्याला डमरुबाबाच्या टेकड़ीवर जाऊन यायचय पुढल्या महिन्यात परीक्षा हाय आपली" मीरा ओरडली. मीरा BA फाइनल करत होती आणि तिचा भाऊ बारावीला होता, दोघांचेही महत्वाचे वर्ष होते. डमरुबाबाचा टेकड़ीवरचा मठ गावात खुप प्रसिद्ध होता. गावात काही विपरीत घड़नार असेल तर बाबा त्यांच्याकडे असलेले जुने चामडीचे डमरू वाजवायचे. बाबा बोलतात ते खरे होते असे गावातील सगळे लोक मानायचे. गावाबाहेरून सुद्धा बरेचजन मठावर दर्शनला यायचे. रमाबाई रानातून आली तेव्हा बाळू आणि मीरा चहा घेत होते. रमाबाई म्हणाली," आत्ता उठलास व्हय् बाळया..अन् एवढं आवरून सावरून कुठ निघलाय?".. " आग् आम्ही डमरूबाबाच्या टेकडीवर जाऊन दर्शन घेऊन येतोया"मीरा म्हणाली..."व्हय..जाऊन चांगला आशीर्वाद घेऊन या बाबाचा आणि या पोराच् डोक ठेव बाबांच्या पायावर आणि विचार हयो असं कमुन वागतो येडयावानी" रमाबाई म्हणाली. दोघ चप्पल घालून घराबाहेर पडले. रस्त्याने जाताना गावातील सारिच माणसं मीराकड़े एकटक पहायची. सकाळचे कोवळे ऊन तिच्या अंगावर पड़त असल्यामुळे सोन्यासारखी चमकत होती. दिसायला खुपच भारी होती मीरा. बाळया मात्र सगळ्यांकडे रागाने बघायचा. दोघे टेकडीवर मठाबाहेर आले मीराने डोक्यावरून ओढणी घेतली आणि चप्पल काढून छम-छम पैंजन वाजवत आत गेली. डमरूबाबा आत देवपूजेत बसले होते. बाहेर चटाईवर गावातील लोक बाबांच्या दर्शनासाठी वाट पहात होती. गुरुपोर्णिमेच्या दिवशी गावाबाहेरून लांबचे लोक बाबांच्या दर्शनासाठी यायचे. काहीजन त्यांना देवच मानायचे. बाळू आणि मीरा बाजूला चटाईवर बसले. पुजा संपल्यावर डमरूबाबा बाहेर आले. एक एक करुन सगळे दर्शन घेऊ लागले. बाबा हसतमुख़ाने आशीर्वाद देऊन हातावर गोड प्रसाद ठेवत होते. दर्शन घेऊन सगळे लोक मठाबाहेर आले. मीरा बाळूला घेऊन बाबाजवळ गेली आणि म्हणाली," बाबा पुढच्या महिन्यात आमची परीक्षा हाय आशीर्वाद दया बाबा.." बाबांनी डोक्यावर हात ठेवला. मीरा म्हणाली," बाबा तुम्ही बोलता ते खरं होतया असं समदे म्हणत्यात, माझं बी काहीतरी सांगा बाबा"...बाबा म्हणाले," तू खुप हुशार हाय पोरी पास होशील. पण पोरी तुझं या गावात खुप कमी दिवस राहिले हाय.."असं म्हणून बाबा आत गाभार्यात निघुन गेले. मीराचा चेहरा उतरला. बाप आपलं लगीन लावतोय की काय तिला प्रश्न पडला. बाळू तिच्याकडे बघुन मजेत हसत होता. तिने त्याच्या डोक्यावर चापट मारली आणि म्हणाली "बाळया हसतो कशाला चल घरी चुपचाप". दारात आल्यावर पाहते तर तिने काढलेल्या सुंदर रांगोळी वर कोणीतरी पाय दिला होता...