चकवा
भाग दूसरा
बैलांच्या पायातील घुंगरं आणि गळ्यातल्या कसांड्यांचा आवाज तर आधीपासूनच येत होता. पण मी दुर्लक्ष केलं. तो आवाज जसा जसा जवळ येऊ लागला तसं माझं लक्ष त्या आवाजाकडे वेधलं गेलं. बघतो तर काय छुम छुम करत ती डमणी माझ्याच दिशेने येत होती. ते सगळं चित्र बघून माझी चांगलीच पाचावर धारण बसली. अंग घामानं पूर्ण भिजलं होतं. अंगातले कपडेसुध्दा ओले झाले होते. एक नाही ना दोन नाही मी हातातली बॅटरीक, काठी अन् पायातल्या चपला दिल्या फेकून. ठोकली धूम गावाकडे. गावात येईपर्यंत पाठीमागे वळूनही पााहिलं नाही! पुढे त्या बैलांचं आणि डमणीचं काय झालं काय माहीत? एका दमात सगळ सांगून सायब्या शांत झाला.भाग दूसरा
आमावस्या आणि पौर्णिमेला ती जागा घातकच आहे. जुन्या काळात तिथं एक बैलगाडीवाला तहान लागल्यामुळे मेलेला आहे. उन्हाळ्याचा टाइम होता. तो कुठूनतरी पोटभर जेवण करुन आला असेल. इथे आल्यावर त्याला खूप तहान लागली. त्याला वाटलं तळ्यात पाणी असेल. पण तळं आटलेलं होतं. मग त्यानं त्याच निंबाच्या सावलीत बैलगाडी सोडली. पाण्यामुळे त्याचा जीव कासाविस झाला होता. कोणीतरी येईल या आशेनं त्यानं निंबाच्या सावलीत शेला अंथरला. त्याच्यावर अंग टाकलं. तोंडावर टोपी घेतली. थकल्यामुळे त्याचे डोळे आपोआप लागले. उन्हामुळे वावराकडे कोणीच फिरकलं नाही. सकाळी लोकं कामावर गेली तेव्हा त्याचा मुतदेह आढळला होता. तेव्हापासून दर आमावस्या आणि पौर्णिमेला तिथं तसं काहीतरी घडतेच. श्रीपत बुड्यानं मोठा सुसकारा टाकत सांगितलं.
शेकोटी विझत आली होती. सम्यानं शेकोटीत थोडीशी लागडं टाकली. थोडं वाळलेलं गवत टाकलं. गवताला फुंकर मारली. पुन्हा शेकोटीने पेट घेतला. सूर्य थोडा वर आला होता. कोवळ्या उन्हाची किरणं जमिनीवर पडली होती. मानवणार्या शेकोटीचे आता चटके लागत होते. श्रीपतबुडा शांतपणे सम्या आणि सायब्याकडे बघत होता. सम्याच्या डोक्यात पांढरे बैल आणि डमणीचे विचार घूमत होते.
सम्या आज येशील का माझ्या सोबत वावरात? खूप भीतीवाटते एकट्याला जायची. वावरात गेलं नाही तर नुकसान होते. काहीच उपाय नाही दूसरा! सायब्यानं सम्याला विचारलं.
तसा सम्या विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. हो ठीक आहे. ये रात्री बोलवायला. जाऊ आपण!
सम्याचा होकार ऐकताच सायब्या खूशीतच घरी निघून गेला. तसा श्रीपत आबा उठून गेला आणि सम्या विचार करतच रस्त्याने चालू लागला.
क्रमशः
माफ् करा भाग थोड़ा मधात सुटला होता.परत पूर्ण टाकला आहे आणि शेवट पन भाग टाकला आहे.
चकवा - भाग तिसरा
सम्याच्या डोक्यात दिवसभर आमावस्या, पौर्णिमा, पांढरे बैल, डमणी हेच विचार थैमान घालत होते. रात्री जेवणं करुन सगळे झोपले होते. सम्या सायब्याची वाट पाहत होता. अंथरुणात पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात विचारचक्र चालूच होते. तेवढ्यात घरावर कसला तरी आवाज आला. त्यानं दुर्लक्ष केलं. परत घरावरुन काहीतरी पडल्याचा मोठा आवाज आला. त्यानं इकडे तिकडे बघितलं. सगळे शांत झोपलेले होते. त्यानेही डोळे बंद केले. तोंडावर चादर घेतली. त्यानंतर घरावरचा आवाज वाढतच गेला. घरावरील कौलं खाली पडत होती. मांजर असेल म्हणून सुरुवातीला त्यानं लक्ष दिलं नाही. मात्र, घरावरील कौलं खाली पडत आहेत म्हणून त्यानं बाहेर जाऊन बघितलं. घरावर मांजर वगैरे काहीच नव्हतं. घरावरील कौलं खाली पडलेली नव्हती. सगळ जसंच्या तसं होतं.

मांजरीनेच पायानं कौलं उखरली असतील, असं समजून तो घरात जायला लागला इतक्यात घरामागील रांजणातून कोणीतरी पाणी काढत असल्याचा आवाज आला. त्याचे कान टवकारले. रांजण कोण रिकामा करत असेल. घरातले सगळे तर झोपलेले आहेत. विचार करत असतानाच कुणीतरी आंघोळ करत असल्याचा भास त्याला झाला. पाणी अंगावरुन घेताना बांगड्या वाजत होत्या. कोण असेल इतक्या रात्री आपल्या न्हानीत आंघोळ करणारं! मनाशीच पुटपुटत तो न्हानीजवळ गेला. तर तिथे कोणीच नव्हतं. मात्र, रांजणाच्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडावर कुणीतरी चढल्यासारखं त्याला जानवलं. वडाच्या पारंब्या, फांद्या अचानक जोरजोरात हलायला लागल्या होत्या. सम्या वडाच्या झाडाकडे निरखून बघत होता पण झाडावर काहीच दिसत नव्हतं.
कंटाळून सम्या घराकडे वळला तेवढ्यात त्याला सायब्यानं हाक मारल्यासारखं वाटलं. मागे वळून पाहिलं तर सायब्याच होता.
इतक्या रात्री आमच्या न्हानीत तूच आंघोळ करत होतास का? सम्यानं रागातच विचारलं.
नाही, मी तर आता आलो. सायब्यानं हसतच उत्तर दिलं.
त्याचं हसणं खूनशी होतं. त्याचे पाय फिरलेले होते. पायाची बोटं मागे होती आणि टाचा पुढे होत्या. हाताची बोटं झडलेली होती. त्याचा चेहरा फक्त सायब्यासारखा होता. त्याचा आवाजसुध्दा सायब्यारखाच होता.
चल मग निघायचं का? सायब्यानं विचारलं.
तसा कसलाही विचार न करता सम्या रस्त्यानं चालायला लागला. सायब्या पुढे त्याच्या पाठीमागे सम्या चालत होता. चालताना दोघेही काहीच बोलत नव्हते. सायब्या मधून मधून लपत होता. त्याच्या अशा वागण्याचं कारण सम्या त्याला विचारत होता. तो मात्र त्यावर काहीच बोलत नव्हता. फक्त पुढे पुढे चालत होता. सम्या त्याच्या पाठीमागे दर्याखोर्यातून अनवानी पायांनी चालत होता. चालता चालता सम्या थकल्याचं त्याच्या लक्षात आलं होतं. कावेबाजपणे त्यानं सम्याला तहान लागली का? विचारलं. सम्यानं नकार दिला. त्यानंतर तो सम्याला नदीवर घेऊन गेला. तिथे त्याला झोप आली का? विचारलं. त्यानं नकार दिला. संपूर्ण नदीचा काठ त्या दोघांनी पालथा घातला. तासाभराने त्याने सम्याला एका खोल डोहाजवळ उभं केलं. परत तहान लागली का? विचारलं. त्याला तहान लागलेली होतीच. सम्यानं पाणी बघताच होकार दिला. सम्याचा होकार ऐकून सायब्याचे डोळे चमकले होते. त्यानं सम्याला डोहातील पाणी प्यायला सांगितलं. पण खोल पाण्याची भिती वाटल्यामुळे त्यानं पाणी प्यायला नकार दिला. त्यानंतर त्यानं सम्याला शेतशिवार, नदीचा काठ आणि संपूर्ण परिसराच्या दोन तीन चकरा मारुन थकवलं होतं. सम्या चालून चालून तर थकला होताच पण तहान लागल्यामुळे अर्धमेला झाला होता.
मसनवटीत आल्यानंतर संधी साधून त्यानं पुन्हा सम्याला झोप आली का? विचारलं. सम्यानं होकार दिला. सायब्याला आनंद झाला. आनंदाच्या भरातच त्यानं सम्याला पाठीमागे यायला सांगितलं. सम्या त्याच्या पाठीपाठी चालत होता. इतक्यात सायब्याला तोडलेल्या काट्यांचं भरण दिसलं. त्यानं ते काट्यांचं भरण अर्ध उचलून बाजूला ठेवलं. राहिलेल्या अर्ध्या भरणावर सम्याला झोपवलं. त्याच्या अंगावर उरलेलं अर्ध भरण टाकून दिलं.
सकाळी सम्या गायब झाल्याची वार्ता गावभर पसरली. श्रीपतबुडा, सायब्यासह सगळं गाव त्याला शोधण्यासाठी सैरावैरा फिरत होते. लोक नदीच्या काठावर, आजूबाजूच्या विहिरीत, शेतात सगळीकडे त्याला शोधत होते. तेवढ्यात सायब्या श्रीपतबुड्याच्या समोर आला तसं बुड्याला त्या दोघांचं बोलणं आठवलं. बुुड्यानं त्याला खडसावून विचारलं तसा सायब्या घाबरला. मी तर काल रात्री वावरात गेलोच नाही. मला रात्री कधी झोप लागली ते कळलं नाही. आम्ही ठरवलं होतं पण मीच झोपलो घरात. सायब्यानं घाबरत घाबरत सांगितलं. तेवढ्यात काट्यांच्या भरणात सम्याचे कपडे दिससल्याचं कोणतरी ओरडून सांगितलं. सगळेजण तिकडे धावले. सम्याला काट्यांच्या भरणातून बाहेर काढलं. सम्या बेफाम झाला होता. त्याला पकडणारांना तो फेकून देत होता. दहा दहा माणसांना ऐकत नव्हता. त्यामुळे त्याला दोरखंडांनी बांधून घरी आणलं. श्रीपतबुड्यानं त्याला अंगारा लावला. मंत्रोच्चार करुन पाणी दिलं. त्याच्या अंगावरून लिंबूचा उतारा केला. त्याच्या संपूर्ण अंगात काटे घुसलेले होते. त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या. काही वेळानंतर सम्या भानावर आला खरा पण त्याला झालेलं काहीच आठवत नव्हतं.

समाप्त.