गायब भाग १ ला
लेखक - मी स्वतः
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
बस झालं आता हे सर्व नेहमीच झालं आहे, कंटाळा आला आहे आता जगण्याचा नको वाटू लागलंय मला आयुष्य आता... वाटत की जावे आणि दरीत जीव द्यावा किंवा एखाद्या हायवे वर जाऊन आपला शेवट करावा... असे नाना प्रकारचे विचार घेऊन मिस्टर नेने ऑफिसातून पाय आदळत निघून गेले....थोड्या वेळात नेने ला फोन येतो तो ही त्यांच्या मिसेस नेने चा..
मिसेस नेने : अहो आज लवकर घरी याल ना, रिंकू चा वाढदिवस आहे ना आपल्या नातीचा..
मिस्टर नेने : तू त्यासाठी मला फोन केला असशील तर आधी फोन ठेव माझ्या माघे काय कामे कमी आहेत का जी तू असल्या कामासाठी फोन करतेस...
मिसेस नेने : अहो चिडायला काय झालं एवढं, ऑफिस मध्ये काही झालं का, शांत व्हा ना तुम्ही आधी आणि हो त्रास झाला तर बीपी ची गोळी ठेवली आहे तुमच्या पाकीट मध्ये तेवढी लक्ष असू द्या...
मिस्टर नेने : तु ना नसत्या चौकशी करू नकोस फोन ठेव आणि माझे मी बघून घेईन मी आहे खंबीर... आणि नेने फोन ठेऊन देतात...
नेने हे एक इन्शुरन्स कंपनी मध्ये क्लर्क म्हणून कार्यरत आहेत त्यांची रिटायरमेंट वयाच्या आधी देत असल्यामुळे त्यांचे ऑफिस मध्ये जोराचे भांडण झाले होते... म्हणून ते एका ठिकाणी निर्जन वस्तीतील एका बाकड्यावर बसले होते विचार करत...खूप तापट स्वभावाचे हे नेने राग आल्यावर कोणाचे ऐकणार नाहीत आणि राग शांत झाला की ह्यांच्या सारखा गोड माणूस मिळणे म्हणजे कठीणच...
ते बसलेले असताना त्यांच्या जवळ एक भिकारी येतो आणि त्यांना पैसे मागतो...ते त्याला नकार देतात आणि त्याला दुर्लक्ष करतात... तरीपण तो भिकारी त्यांना विनवणी करत राहतो... मग नेने चिडतात आणि ते जोरात त्याचावर खेकसतात...
"तू गायब हो बर नाहीतर मी गायब होईल बघ"
भिकारी बिचारा अपेक्षा ठेऊन बसला होता पण त्यांच्या ह्या वाक्यामुळे त्याच्या अपेक्षेने भरलेले आभाळ गायब झाले पण शेवटी जाताना तो एक बोलून जातो ज्याने नेने त्याच्या कडे बघतच बसतात....
भिकारी : "देवाने गायब होण्याची कला दिली असती तर बरं झालं असत, कायमचा गायब झालो असतो मी असा भीक मागण्या पेक्षा"
नेने विचारात पडले खरंच जर माणसाला गायब होण्याची कला जर अवगत झाली तर भारी होईल... मी आधी माझ्या ऑफिस मध्ये जाऊन बसेल तेथे माझ्या बद्दल कोण काय म्हणतेय का ते बघेन.... परत मी घरी जाईल माझ्या बद्दल माझी सून आणि मुलगा काय वाईट साईट तर बोलत नसतील ना..... माझी बायको मी नसताना काय काम करत असेल हे सर्व मी बघेन पण कोणालाही मी दिसणार नाही ... खूप भारी होईल, अश्या स्वप्नात ते रंगून गेले पण अचानक जाग आली तर कळलं की हे स्वप्न आहे पण दिवसा आणि डोळे उघडे असताना पडलेले स्वप्न म्हणजे नेमके काय पण हा #गायब होण्याचा फॉर्म्युला कोणाकडे कुठून मिळणार आपल्याला हे शक्य होईल का पण??? जाऊ दे आपण घरीच गेलेलं बरे म्हनून ते उठले आणि घरी जाऊ लागले.... जात असताना त्यांना जाणवले की आपली सावली सावली का दिसत नाहीये.... कुठे गेली असेल सावली, बाकी लोकांची तर दिसत आहे सावली मग माझी कुठे गेली , त्यांना आता घाम फुटला, श्वास जोरात चालू झाला बायकोने दिलेली बीपी ची गोळी त्यांनी लगेच तोंडात टाकली थोडा वेळ शांत झाले आणि आपल्या पाठमोऱ्या नसणाऱ्या/असणाऱ्या सावली कडे दुर्लक्ष करत त्यांनी घर गाठले.........पण एक सावली त्यांचा पिच्छा करत होती हे त्यांनी नोटीस केले नाही ती सावली तशीच त्यांच्या घराबाहेर त्यांची वाट बघत उभी होती....
क्रमशः
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆