♣ साथसहेली ♣
【भाग ६】
【भाग ६】
देवयानीचे काळे सत्य मीराच्या लक्षात येते. देवयानी एका काळ्या चेटकिनीची उपासक आहे तिला समजले आणि ती आपल्यावर जादू करून माझ्या शरीराचा फायदा घेत आहे हे मीराला समजले. मीरा देवयानीच्या घरातून पळ काढ़ला. आता घरी जाण्याशिवाय तिच्याकडे दूसरा पर्याय नव्हता. भर दुपारी ढग काळे झाले होते, पाच तासाने मीरा तिच्या गावात बसमधून उतरली, घराच्या दिशेने चालु लागली. तिचे पाय जड झाले होते हळू हळू पाऊले टाकत ती पुढे जात होती. गावतली सगळी लोक तिच्याकडे आता वेगळ्या नजरेने बघत होती, पण मीरा खाली मान घालून पुढे चालत होती. खूप दिवस ही पोरगी दिसली नाही याचे सगळ्यांना नवल वाटत होते. मीरा हळू चालत घराजवळ बॅग घेऊन पोहचली. अंगणात रमाबाई कपडे वाळत घालत होत्या, मीराला पाहताच त्यांचे हातातली बादली खाली पडली आणि त्यांनी हंबंरडा फोड़ला," मीरे अगं मीरे...कुठं तोंड काळ केलतया, कुठं एवढी लाज विकुन आलीस अन आई-बापाला विसरली ग पोरी तू.." रमाबाई ओरडत रडत होत्या, रमाबाईचा आवाज ऐकून बंडोपंत दारात आले, मीराला पाहुन रागाने पाहू लागले, " अवं बगा ना व मीरा परत आली घरी" रमाबाई बोलल्या. बंडोपंत अजुन चिडले, मीराला दारात बघुन त्यांचा संताप अजुन वाढला, "कशाला आली परत बापाच्या दारात तोंड काळं करुन, रमे हाकलुन दे हिला इथून". मीरा पंतांच्या पाया जवळ पडली, पाय धरून ढसा ढसा रडु लागली. न सांगता निघून गेल्याने आणि खूप दिवसांनी घरी आल्यामुळे तिला रडू कोसळले. पण बंडोपंत पाय झटकुन आत निघुन गेले. रमाबाई मीराला आतल्या खोलीत घेऊन गेल्या आणि विचारपुस करू लागल्या. पण मीराने जास्त काही न सांगता मी मुंबईत माझ्या मैत्रीणीच्या घरी राहिले एवढच सांगितलं. मीराचा भाऊ बाळू अबोल झालता पण ताई परत आली म्हणून खुशही झालता. पंत थोड्यावेळाने घरातून बाहेर निघुन गेले. घरात वातावरण थोड़े शांत झाल्यावर खुप दिवसांनी आईच्या हातचे जेवण केले. दोन-तीन दिवस बंडोपंत मीरासोबत बोलले नाही पण शेवटी हा अबोला मिटला, पण बंडोपंतानी मीरासाठी स्थळ बघायला सुरुवात केली. मीरा आता काहीच बोलू शकत नव्हती. पंत म्हणतील त्याच्यासोबत लग्न करायच तिने ठरवलं. एक-दोन स्थळे येऊन गेली पण पंतांनाच ती पटली नाहीत. पुढच्या महिन्यात अलिबागचे एक स्थळ मीरासाठी घरी आले. मीरा साडी घालून पुढे हॉलमध्ये सगळ्यांसमोर येऊन बसली. पाहता क्षणी कोणीही पसंत करेल अशी सुंदर दिसत होती. मुलगा सुद्धा दिसायला चांगला होता. गोरा आणि उंच होता, पहिलवांन सारखी तब्येत होती. मुलाच्या घरच्यांनी मीराची चौकशी केली, नंतर बंडोपंत मुलाला प्रश्न विचारू लागले. मुलाचे नाव संग्राम होते, मुलगा उच्च शिक्षित होता आणि मोठ्या कंपनीत कामाला होता. सर्वकाही चांगले होते पण एक गोष्ट बंडोपंतांना खटकली, ती म्हणजे मुलाची सहा महिन्यांनी मुंबईला बदली होणार होती. हे ऐकून पंत आणि रमाबाई एकमेकांकडे पाहू लागले. मुंबई नाव ऐकताच मीराने खाली मान घातली. त्यांना मीरा पसंत पडली होती पण पंत फोन करुन कळवतो तुम्हाला अस म्हणाले. चहा नाश्ता करुन पाहुने निघुन गेले. मीरा आतल्या खोलीत निघुन गेली. संध्याकाळी बंडोपंत मीराजवळ अंगणात चहा घेत मीराला म्हणाले," मीरा, पोरगा चांगला हाय, पैश्यावाला हाय घर पण हाय त्याचं पण समदं तुझ्यावर हाय, तुला आवडला असेल त्यों तर हा म्हण." मीरा म्हणाली, "मला मुलगा पसंत आहे पण तो पुढे मुंबईला नोकरीला जाणार, मग मला पण त्याच्यासोबत मुंबईत रहाव लागन बाबा." पंत म्हणाले," व्हयं पण तुला बी नीट रहावं लागल तिथे, आपली पाटलाची सोनी बी मुंबईत आली म्हणे रहायला. मीरे तू सांग तुला पोरगा आवडला असल तर आत्ताच फोन करून सांगतो त्यांना." मीरा पंतांना हो म्हणाली आणि पंतांनी मुलाच्या घरी फोन केला, मुलाच्या वडिलांनी बंडोपंतांना मीराला घेऊन अलीबागला त्यांच्या घरी बैठकसाठी बोलवले. रविवारी पंतांनी अलीबागला जाण्यासाठी खास वेळ काढला आणि दुपारी 1 वाजता अलीबागला मीराला घेऊन पोहचले. मुलाच्या घरचा पत्ता विचारत घर सापडत दोघे एका भल्यामोठ्या वाड्याच्या बाहेर येऊन थांबले. साऱ्या गावात नाव असलेला "पिंपळ वाङा" बाहेर लांबुन भव्य दुमजली इमारतीसारखा टोलेजंग दिसत होता. वाड़याच्या बाहेर भले मोठे पसरलेले पिंपळाचे जुने झाड़ होते म्हणूनच जणु वाड्याला गावातील लोक पिंपळवाङा म्हणत असत. पिंपळवाड्याला दोन्ही मजल्यावर सागवान लाकडी मोठे दरवाजे आणि खिडक्या होत्या. लांबून वाडा एकदम शांत वाटत होता. वाड्याच्या बाहेरही भयाण शांतता होती फक्त वाऱ्याचा आवाज मनातील शांतता भंग करत होता. पंतांनी झाडाखाली बसलेल्या एका म्हातार्याला सावकारांचे घर विचारले तर त्याने वाड़याकड़े बोट केले. पंत मीराला घेऊन वाड़याच्या आत शिरले. समोरच मीराचे होणारे सासरे म्हणजेच संग्रामचे वडील खुर्चीवर पंतांची वाट बघत बसले होते. पंतांचे स्वागत झाले, पाहुणचार झाला. जेवण झाल्यावर वाड़याच्या मध्यभागी बैठक पार पडली. ज्योतिषाला बोलवण्यात आले. दोघांच्या जन्मपत्रिका समोर ठेवून गुण जुळवणी करण्यात आली. दोष नसल्याने सगळेच खुश झाले.
दोन्हीकडून पसंती आली लग्नाची सुपारी आनंदाने फोडली. पंतांनी घाई गड़बड़ित पुढच्या महिन्याच लग्न उरकुन टाकू असा विचार मांडला. संग्रामला मुंबईला जायच्या आधीच लग्न पार पडावे म्हणून त्याच्या घरचे सुद्धा तयार झाले. लग्न डमरूबाबांच्या आशीर्वादाने त्यांच्याच मठात करायचे ठरले. संग्रामच्या वाडिलांनी निमंत्रण पत्रिका पंतांसोबत बोलून एका कागदावर मांडून घेतली. संध्याकाळ झाली ढग दाटुन आले आणि थोड्याच्वेळात धो-धो पाऊस सुरु झाला. कामानिमित्त पंतांचा पिंपळवाड्यात 3 दिवस मुक्काम वाढला. मीराला उद्या मुंबईचे नवीन घर दाखवून आणु का असं संग्रामने पंताना विचारले. "अहो जावईबापू विचारता कशाला आता मीरा तुमचीच हाय, दोघ फिरून या उद्या मुंबई" पंत हसत बोलले. दुसऱ्या दिवशी छापलेल्या लग्नपत्रिका घरी आल्या आणि त्यावर नाव टाकने सुरु झाले. सकाळी संग्राम आणि मीरा काही लग्नपत्रिका घेऊन दुचाकीवर मुंबईला निघाले. संग्रामने नवी मुंबईतील त्यांचे नवीन घर दाखवले. मीराला नवीन घर आवडले ती खुप खुश झाली. घरांचे अजुन थोड़े काम बाकी होते, जवळपास जेवणाची सोय नव्हती म्हणून दोघ जेवायला बाहेर हॉटेलमध्ये आले. संग्राम मीराकड़े डोळ्यांत डोळे घालून एकटक बघत होता, मीराने त्याच्या हातावर हात ठेवला तोच वेटरने आर्डर विचारली. जेवण उरकुन दोघ बाहेर पडले. संग्राम आता मीराला त्याचे ऑफिस दाखवायला घेऊन आला. संग्राम तिला वरती ऑफिसमध्ये घेऊन गेला, तेथील ओळखीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. संग्रामला आत बॉसकड़े जाऊन एक महीना सुट्टीसाठी मागणी करायची होती आणि पत्रिकाही द्यायची होती. त्याने मीराला काहीवेळ बाहेर थांबन्यास सांगितले. अर्धा पाउन तास संग्रामची वाट बघुन मीरा कंटाळली आणि ऑफिसच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी आली. ऑफिसच्या बाहेर आल्यावर मीराला तो जवळपासचा भाग ओळखीचा वाटू लागला. या आधीही तेथे येऊन गेल्यासारखे तिला वाटू लागले. मीरा बाहेर असलेल्या बागेत झाडाखाली येऊन बसली. तेवढ्यात एक कार तिथे येऊन थांबली. कारचे दार वॉचमनने उघडले. काळ्या साडीवर उंच गोरी देखणी स्त्री बाहेर पडली. मीराने तिच्याकडे पाहिल्यावर ती मीराकडे येऊ लागली. मीराला तिच्याकडे पाहुन धक्का बसला. तिचे हात-पाय थरथर कापू लागले आणि सुकलेल्या कळीसारखा चेहरा खाली पडला. कारण ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून देवयानी होती. मीराने तिच्याकडे पाहुन न पाहिल्यासारखे केले. ती मीराजवळ आली आणि म्हणाली," अगं मीरा तू ईथे मुंबईत ??" मीराला देवयानी कशी आहे हे चांगलेच माहिती होते. दोघी एकमेकिंच्या जीवलग मैत्रिणी होत्या पण काही महिन्यांपूर्वी देवयानीने मीराचा गैरफायदा घेतला होता. आता झालेल्या गोष्टी आठवून राग करण्यात काही अर्थ नव्हता. "माझे मिस्टर या कंपनीत कामाला आहेत, त्यांच्या सोबत आलेय मी" मीरा हळू आवाजात म्हणाली म्हणाली. देवयानी म्हणाली, " ओह खुप छान, अभिनंदन मीरा..." मीरा मात्र शांत उभी होती, तिच्याशी बोलन्याची इच्छा होत नव्हती. देवयानी खाली मान घालून बोलू लागली," मीरा, मला माहिती आहे तू अजुन माझ्यावर नाराज आहे. माझ्याकडून खुप चूक झाली. माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला. पण तू निघून गेल्यानंतर मला खूप वाईट वाटले. मी असे वागायला नको होते तुझ्यासोबत. एक जीवलग मैत्रीण म्हणून शक्य असेल तर मला माफ़ कर. येते मी.." एवढं बोलून देवयानी मागे वळाली तोच मीराने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थांबवले. मीरा भावनिक होऊन म्हणाली," देवयानी मी तुला माझी खरी मैत्रीण समजते. मी तुला माफ़ केले नाही तर मी केलेल्या खऱ्या मैत्रीला काहीच अर्थ राहणार नाही. मी तुला माँफ केलेय देवयानी.." देवयानी आनंदित झाली आणि म्हणाली.."खरच मीरा तू मला माफ़ केलेस ?" मीरा-"हो देवयानी. आणि ही घे माझ्या लग्नाची पात्रिका, तुला माझ्या लग्नात यावच लागेल. नाहीतर मला पुन्हा राग येईल" देवयानी हसली" थैंक्स मीरा तू खरच खुप चांगली आहेस..मी नक्की येईल." तेवढ्यात संग्राम मीराला शोधत खाली बागेत येतो. देवयानी आणि संग्रामची नजरानजर होते....
(क्रमशः)

【भाग ७】
【भाग ७】
संग्राम मीराला मुंबईत फिरायला नेतो तेव्हा संग्रामच्या ऑफिसजवळ मीरा आणि देवयानीची भेट होते. मीरा संग्राम आणि देवयानी दोघांची ओळख करून देते. देवयानी त्यांना घरी येण्याचा हट्ट करते पण मीरा नाकारते. संग्रामसुद्धा देवयानीला पुढच्या महिन्यात लग्नाला येण्यास सांगतो. देवयानी संग्रामला आधीपासून ओळखत असल्यासारख त्याच्याकडे सारखी एकटक बघत असते. देवयानी मीराचा निरोप घेऊन वरती ऑफिसमध्ये जाते. खरतर ते दोघे एकाच ऑफिसमध्ये काम करत असतात. पण संग्राम आणि देवयानी आधीपासून एकमेकांना ओळखतात हे मीराला माहिती नसते. संग्रामसुद्धा खाली मान घालून मीराला बाहेर घेऊन येतो आणि मीराला सांगू लागतो, या मिसेस देवयानी बसंत आहेत आमच्या कंपनीच्या जुन्या मालकाच्या पत्नी. हे ऐकून मीराला आश्चर्य वाटते. संग्राम मीराला विचारतो," पण मीरा त्या तुला कसेकाय ओळखतात?" मीरा सांगू लागली," अरे मी याआधी मुंबईत चित्रपटाच्या कामासाठी आले होते तेव्हा यांच्याच घरी राहिले होते आणि आम्ही खुप जवळच्या मैत्रिणी आहोत. संग्राम पुढे सांगू लागला," या देवयानी मॅडम ज़रा विचित्रच आहेत. मला पहिल्यापासून एकटक बघत असत ओफ्फिसमध्ये आल्यावर.."संग्राम सांगतच होता तेवढ्यात जोरात पाऊस सुरु होतो आणि दोघे एका आडोश्याला पळत येतात, हातात हात घालून उभे राहतात. संग्राम देवयानीबद्दल सांगायच विसरतो. संग्राम मीराचे केस बाजूला करत तिला भर पाऊसात जवळ घेतो. दोघांची मने पाऊसात ओली होतात, दोघेही एकमेकांकडे बघत राहतात. पाण्यात पोहणाऱ्या दोन राजहंस पक्षाप्रमाणे दोघांचे एकमेकांवर एवढे प्रेम जड़ते की त्यांना पाऊस उघडल्याचे देखील भान राहत नाही. रात्री अलीबागला घरी यायला त्यांना उशीर होतो. पंत दोघांची वाट बघत जागेच असतात, सकाळी त्यांना मिराला घेऊन गावाला परत जायचे असते. संग्राम त्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो. मीरा पुढे बैठकीत विचार करत पडलेली असते. देवयानीची अचानक भेट होणे, संग्राम आणि देवयानीची ओळख असणे याचे तिला आश्चर्य वाटत होते. देवयानीने माफी तर मागितली आणि मी सरळ तिला माफ केले या विचाराने तिची झोप उडाली. तरीही देवयानी बद्दल मनातला सगळा राग काढून पुन्हा नवीन मैत्री केल्याचा तिला आनंद झाला होता. पण तिकडे देवयानी पुन्हा एका नवीन काळ्या जादूचा वार मीरावर करण्याच्या तयारीत लागली होती. मीरा आपल्याला सोडून पळून गेली आणि आता माझ्याच आवडत्या संग्रामसोबत लग्न करणार हे बघुन देवयानीच्या मनात बदला घेण्याची प्रबळ भावना निर्माण झाली.
ती मिरावर अजून जळू लागली. असे काय करू की मीरा आणि संग्राम वेगळे होतील आणि संग्राम पुन्हा माझ्याकडे येईल याचा विचार ती करत होती. संग्राम आणि मीराचे लग्न मोड़ावे अशी तिची अघोरी इच्छा होती आणि संग्रामला पुन्हा मिळवण्यासाठी ती अतोनात काळ्या जादूचे प्रयोग करू लागली. मीराचे लग्न अमावस्येच्या पाचव्या दिवशी ठेवले होते. या अमावस्येला शेवटची वशीकरण पूजा करून दोघांचे लग्न मोडून टाकायचे असा तिचा ध्यास होता. तिकडे मीरा घरी गावाला येते. काही दिवसांवर लग्न आल्याने जोरदार तयारी सुरु असते. अधुनमधून संग्रामचे मीराला, मीराचे संग्रामला फोन चालू असत. दोघ एकमेकांवर खुप प्रेम करत होते एकमेकांशिवाय त्यांना करमत नव्हते. मुलीला मोठ्या सावकारांचे स्थळ मिळाले म्हणून पंत आणि रमाबाई सुद्धा खुश् होत्या. आपल्या पोरीवर देवयानी नावाच्या एखाद्या चेटकिनीची काळी छाया असेल याची त्यांना कल्पनाही नव्हती.
अमावस्या जशी जवळ येत होती तशी देवयानी रोज काहीतरी काळी जादू मीराच्या केस आणि वस्त्रावर करत होती. आणि अमावस्येच्या दिवशी हेच केस आणि वस्त्र हवनकुंडात जाळून भस्म करून मीरावर वार करायचा आणि लग्न मोडून टाकायचे असा तिचा क्रूर डाव होता...
आकाशात काळ्या ढगांनी आरड़ा-ओरडा सुरु केला, चंद्र कुठेतरी लपून बसला. होय, हीच ती काळी अमावस्येची रात्र ज्याची देवयानी खुप दिवसांपासून वाट बघत होती. आज मीराचा खेळ संपवायचाच म्हणून देवयानी काळ्या चेटकीनीची आराधना करण्यास काळी साडी, मोकळे केस कपाळावर गडद काळे कुंकु आणि डोळ्यांत भड़क काजळ घालून वरच्या खोलीत आली. घरातील सगळे दिवे बंद होते, तूफ़ान वारा सुटला होता. दार-खिड़क्याचे पांढरे पडदे वार्याने उड़त होते. बंगल्याबाहेर असलेल्या मोठ्या झाडावर वटवाघुळांची जत्रा भरली होती, वाकड्या तिकडया फांद्यांना उलटे लटकुन वाघुळे आत डोकावत होती. तिने खिड़कित एका घुबडाला दोरीने उलटे लटकवले होते. विधि पूर्ण होईपर्यंत त्याचे दूध देऊन लाड करायचे आणि शेवटी हवनकुंडात त्याची मान मोडून रक्त पिळुन टाकायचे असा हिंस्र विधी होता. जर घुबड़ मान फिरवुन पळून गेले तर पूर्णाहुती भंग होऊन देवयानीच्या जीवालाही धोका होता याची तिला कल्पना नव्हती. देवयानीने त्या घुबडाला दोरीने घट्ट बांधून ठेवले होते. देवयानीने त्या काळ्या चेटकीनीला काळे कुंकु लावले आणि हवनकुंडासमोर बसून तिची आराधना सुरु केली. उलटे स्वस्तिक काढून त्यावर मिराचे केस आणि वस्त्र ठेवले. वशीकरण मंत्राचे उच्चारण करून ती मीराला आठवू लागली. प्रत्येक मंत्राचे उच्चारण करताना ती मीराचा एक एक केस हवनकुंडात जाळत होती. इकडे मीराच्या अंगात ताप वाढू लागला अंगाला घाम फुटला. ती जमिनीवर आडवी झोपली होती. एकतर मीरा झोपेतच गतप्राण होईल किंवा देवयानीचा विधी भंग होईल असा काळ्या जादूचा हा जीवघेणा प्रयोग चालु होता. वशीकरण मंत्रोच्चारण झाल्यावर देवयानीमध्ये काळी चेटकिन जागी झाली. अक्राळ विक्राळ रूप, लाल-पांढरे डोळे आणि हिंस्र दातांचा चावा घेत देवयानी घुबडाला पकडायला निघाली. घुबड़ जीव वाचवन्यासाठी फड़फड़ करत आक्रोश करत होते. तिकडे मीरा तापेने कन्हत होती. घुबडासोबतच देवयानी मीराचाही जीव घेणार होती. पण नियतीला काही वेगळेच मंजूर होते. देवयानी घुबडाला पकड़नार इतक्यात तूफ़ान वारा आला. खिड़कित अडकून घुबडाची दोरी सैल झाली. घुबडाने मान फिरवली आणि दूध सांडून ते उडून गेले. काळी चेटकीन (देवयानी) मोठ्याने किंचाळून आक्रोश करू लागली. पूर्णाहुतीचा भंग झाला विधी अपूर्ण राहिला होता. हवनकुंडात आगीचा भड़का उडाला, देवयानीच्या काळ्या साडीने पेट घेतला आणि आगीत जळून तिचा मृत्यु झाला. तिचा देह आहे त्या ठिकाणी बेचिराख झाला...