अंत विधी.....
लेखक:-शार्दुल सुधीर मोडक...
काल्पनिक कथा.....
भाग :-पहिला...
जांभूळवाडी वेताळ डोंगराच्या पायथ्याशी वसलेले छोटेशे गाव!!!चारीबाजूने हिरवेगार निसर्ग गावाच्या शेजारून वाहणारी नदी,मोठं मोठी झाडे,अश्या निसर्गरम्य वातावरण जांभूळवाडीला लाभले होते,गावातील सर्व माणसे आपल्या आपल्या शेतातील कामात व्यस्त होती,सूर्य माध्यावर आला होता,दुपारचं ऊन अंगाची लाहीलाही करत होत,शिरप्या ये शिरप्या लेका झाली का तुझी कामे???चल लेका भाकर खाऊन घेऊयात!! नाम्यांनी आपल्या शेतातूनच शिरप्याला आवाज दिला,
व्हय व्हय आलोय !!!नाम्या लेका लय भूक लागली का रे ?? लय बोंबलू राहिलाय!!!शिरप्या भाजी भाकरीची टोपली हातात घेत म्हणाला!!! नाम्या आपली भाकरीची टोपली घेऊन शिरप्याच्या शेतात आला,दोघे ही शेतातल्या झाडाच्या खाली जेवायला बसले!हिकडच्या तिकडच्या गप्पा मारत दोघे जेवत होते,नाम्या लेका ही शांती हाय ना तुक्याची पोर???व्हय रे शिरप्या !!नाम्या शिरप्या कडे बघत म्हणाला!!शेताच्या मधल्या वाटेतून शांती पळत पळत शिरप्या आणि नाम्या कडे येत होती,थोड्याच वेळात ती थापा टाकीत दोघान समोर येऊन उभी राहिली!!

शांती जोरजोरात रडू लागली, अग ये शांते रडून काऊन राहिली ???शिरप्या हातातील भाकरी टोपलीत ठेवत म्हणाला!!,शिरप्या काका बा शेतात जातो सांगून गेलाया सकाळच्याला,माय शेतात जाऊन आलिया, पण बा शेतात नाय,मी समदी कडं पाहून आलिया, पण कुठंच नाय तो, शांती ढसा ढसा रडायला लागली,
शिरप्यानी आणि नाम्यांनी तिला समजावले,तुक्या नाम्या आणि शिरप्याचा जिगरी मित्र!!नाम्या आणि शिरप्यानी भराभरा हात धुतले आणि दोघे शाती बरोबर निघाले,तुक्या गायब झाल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली,गावातील सरपंच पाटील यांनी सगळ्यांना चावडीवर जमा केले,नुकतेच गावात बदली होऊन असलेले इन्सपेक्टर मोहिते ही चावडीवर हजार झाले,नाम्या शिरप्या आणि शांती ही चावडीवर आले!!पाटील साहेब मी या गावात नवखा आहे आणि माझ्याकडे जास्त माणसं पण नाहीत,मला तुमची मदत लागेल तुक्याला शोधायला!!!मोहिते हातातील काठी भिरवत म्हणाले!!हो चालतंय की,ये शिरप्या तू दहा वीस जण संगतीला घे आणि मोहिते साहेबान बरोबर जा!!नाम्या तू पण काही जणांना संगतीला घेऊन नदी जवळच्या भागात जाऊन बघ!!

मोहिते शिरप्या आणि दहा वीस जणांना घेऊन डोंगराच्या पायथ्याशी तुक्याला शोधायला निघाले,नाम्या पण नदीच्या बाजूला तुक्याला शोधायला निघाला!!संध्याकाळचे पाच वाजले, तरी तुक्या सापडला नाही हताश होऊन मोहिते परत गावात जाण्यास निघाले,इतक्यात एक जण थापा टाकत मोहितेंच्या समोर येऊन उभा राहिला,आणि म्हणाला, साहेब तुक्या सापडला,नदीच्या तिथं झाडीत पडला हुता,पाटलांना वाटतया की मारून पडलाय, तुम्हांसनी लवकर बोलवल्या!! इन्सपेक्टर मोहिते तडक नदीच्या दिशेने निघाले, थोड्याच वेळात ते घटनास्थळी पोहचले,सारा गाव नदी जवळ जमा झाला होता,सगळ्यांना बाजूला करत मोहिते तुक्याच्या जवळ गेले,त्याची हाताची नाडी तपासली,आणि डोक्यावरची टोपी काढत म्हणाले, पाटील साहेब हा मेलाय, तुक्याच्या बायको आणि तुक्याची मुलगी यांनी जोरजोरात रडायला सुरवात केली, पाटील साहेब हा कसा मेला का याला कोणी मारला हे पोस्टमार्टम केल्याशिवाय कळणार नाही,मी बॉडी पोस्टमार्टम साठी पाठवण्याची व्यवस्था करतो,इन्सपेक्टर मोहित्यानी पंचनामा केला, काही वेळातच अंबुलन्स मधून तुक्याच्या बॉडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आली, तो पर्यंत तुक्याच्या नातलगांना कळवण्यात आले.....
रात्री दहा वाजता तुक्याच्या बॉडी डॉक्टरांनी पटलांकडे सुपूर्त केली, इन्सपेक्टर मोहिते रिपोर्ट वाचत होते,रिपोर्ट वाचून ते पाटलांना म्हणाले,पाटील साहेब तुक्या हृदयविकाराच्या झटक्याने गेला,सगळे तुक्याच्या बॉडी घेऊन तुक्याच्या घरी पोहचले,तुक्याच्या बॉडी पाहून त्याची बायको आणि मुलगी आणि वयस्कर बाप जोरजोरात आक्रोश करू लागले,गावातील बायका तुक्याच्या बायकोला आणि मुलीला धीर देत होते,तुक्याच्या बाप उर बडून घेत होता,पाटील त्याला शांत करत होते,एव्हाना अकरा वाजले होते,गावातील जाणकार मंडळी तिरडी बंधू लागले,
तुक्याच्या कुटुंबाचा आक्रोश रात्रीच्या वेळी अंगावर शहारे आणत होता!!! हे सगळे चालू असताना शिरप्या पाटलांना म्हणाला,पाटील ते नवं पण अंत विधी करायचा कुठं????शिरप्याच्या या वाक्याने सगळे शांत झाले, इतक्या वेळ चाललेला गोंधळ अचानक शांत झाला!!तुक्याच्या बायको,मुलगी शांती तुक्याच्या बाप सगळे शांत झाले,सगळे एकमेकांच्या तोंडाकड पाहून लागले,सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती,उन्हाळा असूनही ही सगळ्यांना दरदरून घाम फुटला होता!!!

पसरलेली भयाण शांतता मोडत इन्सपेक्टर मोहिते म्हणाले,पाटील साहेब मला कळलंय स्मशान भूमीतील प्रकार माझ्या कानावर आलंय, पण मी या गोष्टींवर आजिबात विश्वास ठेवत नाही,म्हणून अंत विधी स्मशान भूमीतच होतील,पाटलांनी मोहितेना खूप समजावण्याचा प्रयन्त केला,पण इन्सपेक्टर मोहितेंच्या पुढे पाटलांचा नाईलाज झाला,जाणकारांनी पटापटा तिरडी बांधली,राहिलेली सोपस्कार उरकून तुक्याच्या अंत यात्रा स्मशानाच्या दिशेने निघाली,भयाण शांततेत फक्त राम नाम सत्य हे म्हणत लोक चालली होती,थोड्याच वेळात अंत यात्रा स्मशानात पोहचली,चार पाच जणांना पटापट मशाली पेटवल्या,गुरुजींनी पटापट सर्व साहित्य ठेऊन अंत विधीची तयारी केली,तुक्याच्या बाप गुरुजींन समोर बसून अंत विधी करू लागला,अर्ध्या तासात सर्व विधी उरकले,सारा गाव भीतीने अक्षरशः थर थर कापत होता,इन्स्पेक्टर मोहिते गावकारांच्या अश्या वागण्याचे हसू येत होते,तीन फेऱ्या मारून तुक्याच्या बापाने पाण्याने भरलेला माठ मागे न बघता सोडून तिला,माठ जमिनीवर पडून जोरात फुटला,त्या शांततेत माठाचा फुटण्याचा आवाज काळजात धडकी भरत होता,तुक्याच्या बॉडीला चितेवर झोपवण्यात आलं, लोकांनी पटापट लाकडांनी तुक्याची बॉडी झाकली,आणि एक पेटती मशाल तुक्याच्या बापाच्या हातात दिली,डोळ्यातील पाणी पुसत तुक्याच्या बापानी तुक्याला अग्नी दिला,बघता बघता तुक्याच्या बॉडीने आणि चिंतेने पेट घेतला,सगळे गावकरी पटापट निघण्याच्या तयारीत होते,सांगण्याची पाठ फिरते ना फिरते तोच धड आवाज झाला,सगळ्यानी मागे वळून पाहिले तर तुक्याच्या जळणारा हात चितेतून बाहेर आला होता,आणि त्यावर रचलेले जळणारे लाकूड खाली पडले होते.......
सगळे जाग्यावर उभे राहून पाहत होते,काही वेळ असाच शांततेत गेला,कोणीच पुढाकार घेइना,म्हणून इन्सपेक्टर मोहिते चिते जवळ आले,आणी चितेतून खाली पडलेले जळणारे लाकूड उचलण्यासाठी खाली वाकले अचानक चितेतून बाहेर आलेला तुक्याचा हाताने इन्सपेक्टर मोहित्यांचा हाताला घट्ट धरले,मोहिते जिवाच्या आकांताने ओरडले,समोरचे दृश्य पाहून सगळे मिळेल त्या वाटेने पळू लागले,अथक प्रयन्त करून मोहित्यानी आपला हात कसा बसा सोडविला,आणि ते दिसेल त्या वाटेने पळत सुटले,स्मशानात जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला,पळता पळता मोहित्यानी मागे वळून पाहिले,त्यांची दातखील बसली,स्मशानातील दृश्य खूपच भयंकर होत,तुक्याच् जळणार प्रेत चितेवर उठून बसल होत, आणि जोरजोरात हसत होत,त्याच्या हसण्याने पूर्ण गाव हादरले....
क्रमशः। ......