सर्पकुल -भाग 2- Marathi bhaykatha,marathi bhutkatha,marathi bhitidayak katha,horror marathi
वृंदाची किंकाळी त्या खोलीतल्या कृत्रिम काळोखाचे हृदय भेदत वाडयात घुमली. इतका वरच्या पट्टीतला आवाज ऐकण्याची सवय नसलेल्या त्या वास्तूचे डोळे वटारले गेले. कित्येक वर्षात आज प्रथमच काहीतरी अघटित घडले होते. तिथली शिस्त मोडली गेली होती. दराऱ्याच्या पाषाणहृदयी भिंतींना कुणीतरी छेद देण्याचा प्रयत्न केला होता. हे अकल्पित होते.. ती सरळसरळ बंडखोरी होती. कित्येक पिढ्यांपासून सुरु असलेल्या गूढ आणि अभद्र शांततेच्या परंपरेला दिलेले ते आव्हान होते.
ते वेटोळे सरळ होऊन सरपटत बाहेर पडले त्याला अर्धा तास झाला. वृंदा भीतीने आणि त्याहून आश्चर्याने थरथरत गुडघ्यात डोके घालून बसली होती. या घरातली माणसे किती दगडी... इतका वेळ झाला पण कुणीही वास्तपुस्त करण्यासाठी आले नाही. अशा या घराला वारस मिळावा म्हणून मी गर्भारपण झेलावं ? आणि हवाय कशाला यांना वारस... वारस कसला, नवा दगड पाहिजे आहे यांना ! ना कोणाविषयी माया ना संसाराची आसक्ती.. तिच्या डोळ्यातून कढत अश्रू बाहेर पडू लागले.
वाऱ्याचा प्रचंड झोत त्या खोलीची दारे-खिडक्या उघडून गेला. अचानक आत आलेल्या प्रकाशात तिने स्पष्ट पाहिले आणि काही वेळापूर्वी वाटली होती त्याहून कितीतरी भीतीचा मोठा गोळा तिच्या पोटात उभा राहिला....
काही फुटांवर असलेल्या कोपऱ्यातून सहा हिरवेगार डोळे तिच्याकडे बघत होते. त्यांच्या चेहऱ्यावर आसुरी समाधान होते. पोट आणि पाय जमिनीला घट्ट चिकटवलेल्या तिघांनी हातांच्या साह्याने छाती आणि चेहरा वर तोलला होता. फणा काढलेल्या भुजंगाच्या मुद्रेत ते वृंदाला एकटक न्याहाळत होते. त्यांची ती नजर असह्य होऊन ती किंचाळली...
निघा इथून ! चालते व्हा...
अचानक भानावर आल्यासारखे तिघांनी एकमेकांकडे पाहिले. त्यातला जो सर्वाधिक उंच होता, वृंदाचा सासरा उठून उभा राहिला. त्याने अंगावरचे कपडे झटकले. अद्याप जमिनीवरच सरपटत पडलेला वृंदाचा नवरा सुभाष आणि दीर यांना हात देऊन त्याने उभे केले. वृंदाकडे बघून दात विचकत तो म्हणाला,
एव्हढं काही चिडायचं कारण नाही सूनबाई ! काहीच वाईट घडलेलं नाही.
पण तुम्ही असे अंधारात लपून मला बघत होतात...शी!! शिसारीने वृंदा म्हणाली.
अग नातू होणार आहे मला..मग लक्ष नको ठेवायला ? निर्लज्जपणे तो म्हातारा बोलला.
वृंदाने जळजळीत नजरेने सुभाषकडे पाहिले. त्याने निमूटपणे मान खाली घातली.
नुसत्या डोळ्यांनी कुणालाही काबूत करू शकेल असे सामर्थ्य असलेला नवरा इतका असहाय झालेला
पाहून वृंदाला अपराधी वाटू लागले. काहीच न बोलता ती तिच्या खोलीत निघून गेली. उशीत डोकं खुपसून ती रडत राहिली.
वृंदाच्या सासऱ्याने खाडकन लहान मुलाच्या मुस्कटात लगावली...नि गरजला.
तुला कितीदा सांगितलंय, ह्या दारांच्या कड्या दुरुस्त कर म्हणून ! तुला शिक्षा द्यायलाच पाहिजे..सुभाष, याला आज आपल्यासोबत घ्यायचं नाही..समजलं !
सुभाषने मान डोलावली तशी धाकट्याने त्याच्या पायावर लोळण घेतली.
दादा, बापू असं करू नका..मला तुमच्यासोबत घ्या..तुम्ही सांगाल ती कामे करीन मी. पण मला टाकून जाऊ नका....लहान मुलासारखा ओक्साबोक्शी रडत तो मिनतवाऱ्या करत होत्या.
म्हातारा समाधानाने हसला.. त्याला उठवून बोलला.
बरं, बरं..पण यापुढे लक्षात ठेव. सगळी कामे वेळेवर झाली पाहिजेत.
ती तिघेही वरच्या मजल्यावर जाण्यासाठी निघाले. जिन्यात वृंदाची सासू उभी होती. तिच्या चेहऱ्यावर कमालीची घृणा पसरली होती. तिच्याकडे साफ दुर्लक्ष करून ते झपाझप पायऱ्या चढून गेले. एका खोलीत जाऊन त्यांनी दार आतून बंद केले. ती प्रौढ स्त्री मान वळवून त्यांच्या सर्व हालचाली डोळ्यात साठवित होती. पुढच्या परिणामांची कल्पना येताच तिच्या अंगावर शहारे आले. ती लगबगीने वृंदाचा शोध घेऊ लागली.
त्राग्याचा भर ओसरून डोळे मिटून वृंदा विचार करत पडली होती. ते ओंगळवाणे जनावर तिच्या पापण्यांआड उभे राहिले. त्याचा तो लिबलिबित थंडगार स्पर्श आठवून तिला किळस वाटली. पण मग त्याक्षणी आपण त्या स्पर्शाच्या मोहात का पडलो? तो विळखा हवाहवासा का वाटला? त्याच्याशी आपल्या भावना काहीकाळ का असेना, पण एकरूप का झाल्या? हे कसले मायाजाल आहे....एकामागे एक तिच्या मेंदूच्या दारावर प्रश्नांच्या थापा पडू लागल्या. ती भानावर आली. खरोखर कोणीतरी दार ठोठावत होते.
नीटनेटकी होऊन वृंदाने दार उघडले..सासूला दारात उभी पाहून झालेले आश्चर्य ती लपवू शकली नाही.
काय ग काय करते आहेस ? सासूने विचारले.
काही नाही. उगाच पडले होते...खाली पाहत वृंदाने सांगितले.
तिचा हात धरून सासूने तिला पलंगावर बसवले. मग हळूच निजवले. तिच्या ओटीपोटावरील साडी किंचित खाली सरकवत काहीशा उभार पोटावर हात फिरवू लागली. कमालीचे बरे वाटल्याने वृंदाचे डोळे आपोआप मिटले गेले.
काय म्हणावं या बाईला ? आजवर कधी नीट बोलली नाही आपल्याशी पण स्पर्शातून तिची माया जणू उतू चाललीये....प्रेमाच्या स्पर्शाची भुकेली झालेल्या वृंदाची आसवे सलग वाहू लागली. संवादाची उर्मी दाटून आली.
आत्याबाई, एक सांगायचं होतं! वृंदा म्हणाली.
बोल...मधाळ स्वरात सासू बोलली.
मघाशी झालेला प्रकार वृंदाने तपशीलवार सांगितला. सासूच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले. नाकपुड्या आणि ओठ थरथरू लागले. पण संयम राखून ती म्हणाली.
खरं म्हणजे माझंच चुकलं..मी आधीच हे करायला हवं होतं....
सोबत आणलेल्या धारदार चाकूने तिने वृंदाच्या पोटावर सप्पदिशी रेघ ओढली.
त्या रेषेतून फुटलेली रक्ताची धार खाली वाहू लागली...मग कमीअधिक होत गेल्याने तिच्या उभ्या रेघा झाल्या. त्या असंतुलित धारांची एक नक्षी तयार झाली..
पापणीही न लवू देता वृंदाची सासू त्याकडे बघत होती.
वृंदा मात्र आळीपाळीने पोट आणि सासूच्या तोंडाकडे बघत होती.....तिच्या शरीरात ओरडण्याचेही त्राण उरले नव्हते..
त्या खोलीबाहेर उभे असलेले कुणीतरी प्रचंड संतापात फुत्कार टाकत होते.
(क्रमशः)