सर्पकुल -भाग 3- Marathi bhaykatha,marathi bhutkatha,marathi bhitidayak katha,horror marathi
दाराबाहेर सुरू असलेल्या हालचाली आता वाढल्या होत्या. कुणीतरी जमिनीवर थडाथड फणा आपटत होते. खोलीत सुरू असलेला प्रकार त्याला पसंत पडला नसावा. तिथल्या क्रिया पूर्ण होण्यापूर्वीच त्यात विघ्न घालणे त्याच्यासाठी आवश्यक झाले होते. एरवी दुसरा प्रसंग असता तर त्याने दाराच्या चिरफळ्या उडवल्या असत्या पण खोलीत असलेल्या त्या बाईपुढे आज तो हतबल होता.
वृंदाच्या पोटावर केलेल्या जखमेतून रक्त वाहणे कमी कमी होत जाऊन थांबले. तिच्या सासूने पदराने तो सर्व भाग स्वच्छ केला. हातातली मुळी चुरडून टाकत तिची पूड त्या जखमेवर अलगद पसरली. तिचा वास कमालीचा उग्र होता. रक्त वाहून गेल्याने ग्लानी आलेली वृंदा हळूहळू भानावर येत होती..तो उग्र वास तिच्या नाजूक नाकपुड्यातून आत शिरला तशा तिच्या संवेदना जागृत झाल्या..
आत्याबाई...हे काय केलंत ? तिने विचारलं.
शू...म्हणत सासूने तिच्या तोंडावर हात ठेवला. तिचे कान दाराबाहेरच्या आवाजाचा वेध घेत होते. त्या धडका आता वाढल्या होत्या. कुठल्याही क्षणी ते आत येणार होते.
हातात उरलीसुरली मुळी दाराजवळ नेऊन सासूने खडूसारखी चालवत रेघ ओढली. योग्य बंदोबस्त केल्याची खात्री पटल्यावर ती पुन्हा वृंदाजवळ येऊन बसली. दोघींचे डोळे एक होऊन दाराकडे बघत होते. उपाय केलाय खरा....पण त्याची ताकद प्रचंड ठरली तर ???? अशी भीतीची तीक्ष्ण तार त्यांच्या काळजात खुपसली जात होती.
ते भक्कम शिसवी दार आणि उंबरठा यांच्यातल्या बारीक फटीतून काळेशार मुंडके आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. निसर्गाने बहाल केलेली कमाल लवचिकता पणाला लावून ते स्वतःला पुढे ढकलत होते. अमानवी ताकद असूनही केवळ या बाईने केलेल्या तोडग्यामुळे आज असहाय्य झाल्याची खदखद त्याला आणखीच संतप्त करत होती. शिवाय ती जागा....ती खरोखरच अरुंद होती. दाराच्या तासलेल्या कडा त्याला स्वैर हालचालीची परवानगी देत नव्हत्या.
संपूर्ण ताकद एकवटून त्याने मुंडक्याचा काही भाग आत टाकण्यात यश मिळवलं..साक्षात कळीकाळ भासणाऱ्या त्या तोंडातून लालकाळ्या रंगाची दुहेरी टोकाची जीभ अनिवार आतबाहेर करत होती. त्या खोलीतल्या आव्हानाचा वेध ती घेत होती. मागे सरपटणाऱ्या शरीराचा भाग आत घेण्यापूर्वी त्याने फडा काढून भय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण तितकी जागा उरलेली नव्हती. तो आणखी जोर लावणार तोच तो दर्प त्याच्या जिव्हेला जाणवला......
तो सर्रकन मागे सरकला. हा जहाल प्रतिविषाचा दर्प..म्हणायला जमिनीत फुलणाऱ्या वनस्पतीत आढळणारा..पण त्याच जमिनीवर सरपटणाऱ्या जीवांच्या आयुष्यावर उठणारा ! पण त्याचा छडा सामान्य माणसाला लागणे कर्मकठीण....या बावळट बाईकडे ते आलं कसं ? म्हणून मघापासून या खोलीत शिरायला परवानगी मिळत नव्हती तर !
पराभवाने आणि त्याहून अधिक अहंकार डिवचला गेल्याने उदरात कालकूट सामावलेला तो प्रचंड चिडून फुत्कार सोडू लागला. त्याच्या उष्ण श्वासानी त्या खोलीतील हवा तापली. तशा पलंगावर जीव मुठीत घेऊन बसलेल्या त्या दोन स्त्रिया अस्वस्थ होऊ लागल्या. तो तप्त वायू...त्यातलं जीवन प्रदान करणारे तत्व जणू निघून गेले होते. केवळ फुफ्फुस फुगण्यापूरती हवा ओढली जात होती..ती निश्चितच दिलासा देणारी नव्हती..
आणखी काही क्षण असेच गेले तर आपली जागेवर राख होईल असे वाटून वृंदाची सासू पुढे सरकली. तिच्या हातात जाडजूड काठी होती. आरपारचा सामना केल्याशिवाय जीव वाचवण्याचा मार्ग नाही हे उमगलेल्या त्या स्त्रीने काठीचा फटका त्या मुंडक्यावर टाकला. घाबरटपणे दिलेला तो टोला वर्मी बसला नाहीच. पण मस्तकातले विष त्या बाईच्या अंगात टोचण्यासाठी पवित्रा घेण्याची संधी नाही हे कळून चुकलेलं ते जनावर सावध मात्र झालं. ज्या कसोशीने ते आत शिरले त्याच्या कितीतरी पटीने जलदरीत्या ते बाहेर पडले. दाराची ती तासलेली पट्टी त्याला पुन्हा वेदना देऊन गेली. पण जिवाच्या भयापुढे त्यांची काय किंमत ? ते सरसर निघाले..अवमानित होऊन..खजील होऊन...दिडदमडीच्या मर्त्य मानवजातीकडून
पराभव पत्करून....तो उग्रवतार, ते जहाल खळखळणारे विष, ती धडकी भरवणारी जिव्हा, तो जीव गोळा करण्यास भाग पाडणारा फुत्कार....सर्व..सर्व काही शून्य ठरले होते.
जिन्याचा लाकडी कठडा आवळत तो खाली उतरला. त्या अंधारात स्वतःला सावरत त्याने ते बीळ हुडकले. सराईतपणे आत शिरून त्याने मार्ग कापला. जमिनीच्या दिशेने खोल उतरत जाणारे ते बीळ संपले तिथे एक भव्य खोली होती...
बिळातून लोंबकळत त्याने जमिनीवर स्वतःला झोकून दिले..
ती रखरखीत पण थंडगार भूमी होती. शीतरक्ताच्या प्राण्यांना हवी तशी...तो काळोख आणि गारवा! किती युगांपासून तिथे साठला असावा.. तो सरपटत कानोसा घेऊ लागला.. दीड हात फणा काढून उभा राहिला..दुभंगलेली जिव्हा आतबाहेर करून आपल्या आदिम शैलीत ती खोली निरखून पाहू लागला.

खेळणं उचलावे तितक्या सहजपणे त्याला एका हाताने उचलले..
आलास माझ्या बाळा !!! तो धीरगंभीर पण मायाळू आवाज म्हणाला..
हवेत उभारलेल्या त्या रौद्रभीषण फण्याचे हळुवार चुंबन घेतले गेले...मग त्याला सहजच जमिनीवर टाकले.
तिथे कितीतरी वेटोळी आधीच वळवळत होती...
( क्रमशः)