![]() |
| आता तुझा फॉर्म संपला. |
बाधा भाग - १
आता तुझा फॉर्म संपला...*
लेखक:- अंकुश सू. नवघरे. (पालघर)
पुनः प्रकाशन:- २९.०३.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो मी अंकुश नवघरे....
आज मी तुमच्यासाठी जी कथा घेऊन आलोय ती सत्यकथा असून मला एक माझ्याच व्यावसायातील लेडी अडवोकॅटे म्याडम नी २००६ साली सांगितला होता. त्यांना कोणीतरी मला भेटायला सांगितले होते. खूप प्रयत्नांनि त्यांच्यावरचे आलेले संकट दूर करण्यास मला यश मिळाले होते, ते पूर्णपणे नाही पण ९०% नक्कीच दूर झालेले आहे. कथा विचार करायला लावणारी आहे की कधीकधी आपली स्वतःची कर्मे आपलाच कसा घात करतात तसेच काही गोष्टींचे अस्तित्व नाकारले तरी त्या असतात. पुढील कथा त्यांच्याच शब्दांत....
साधारणतः २० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही त्यावेळी भेंडीबाजार ह्या भागात राहायचो. माझे वडील कलेक्टर असल्यामुळे आमच्या भागातील जवळपास सर्वच माणसे आम्हाला ओळखत होती. वडिलांच्या निधनानंतर आईनेही जास्त वर्ष काढली नाहीत. आईवडील गेल्यानंतर मी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आणि वकिलीची परीक्षा देऊन व्यवसायाला सुरुवात केली. माझे वडील कलेक्टर असल्यामुळे थोड्याच दिवसांत त्यांच्या नावलौकीकमुळे किंवा पुण्याईमुळे असेल पण माझा व्यवसाय थोड्याच दिवसांत खूपच तेजीत चालू लागला. मी फौजदारी क्षेत्र निवडल्यामुळे खून, बलात्कार, दरोडे, चोरी, मारहाण इत्यादी अनेक केसेस माझ्याकडे येत होत्या. केस चालवण्याचा माझा हातखंडा असल्याने मला सर्वच केस मध्ये यश मिळत होते. मी कित्येक मोठं मोठ्या अपराधी लोकांना लीलया सोडवले होते. कायदा हा माझ्या हातचा मळ बनला होता. माझी कीर्ती इतकी वाढली होती के मला चांगले वाईट ह्या सर्वाचाच विसर पडला. मला फक्त प्रसिद्धी दिसत होती. त्या काळात म्हणजे १९९० च्या काळात मी कामात इतकी व्यस्त असायचे की मला आठवड्यातून ४ ते ५ वेळा केसेस निमित्त विमानाने इतर राज्यांत जावे लागत असे. मी एखाद्या केस मध्ये युक्तिवाद करणार अशी बातमी कळल्यावर सकाळपासूनच पत्रकारांची आणि लोकांची गर्दी वाढत असे. लोक सकाळपासूनच कोर्टात येऊन वाट पाहत असत.
माझी लोकप्रियता बघून माझी काही महत्वाच्या दाव्यांसाठी अतिरिक्त वकील म्हणून नेमणूक केली होती. अशाप्रकारे माझा व्यवसाय खूपच तेजीत चालला असताना ती केस माझ्याकडे आली. त्या केस मध्ये माझी स्पेशिअल वकील म्हणून माझी नेमणूक झाली होती. आम्हा वकील लोकांना काही वर्षांच्या प्रॅक्टिस नंतर कोण माणूस दोषी आहे की निर्दोष आहे हे अनुभवानेच कळू लागते. त्याच प्रमाणे कुठल्या केस मध्ये किती दम आहे ते पण सहजरित्या कळू शकते. काही लोक आम्हा वकिलांवर असा आरोप करतात की आम्ही अपराधी लोकांना का सोडवतो इत्यादी पण मला हे सांगावेसे वाटते की आमच्याकडे आलेला कोणीही व्यक्ती हा आमचा अशील असतो आणि त्याची मदत करणे किंवा त्याला सोडवणे हे आमचे व्यावसायिक कर्तव्य असते त्यामुळे आम्ही हे करतो कारण की काही वरवर अपराधी वाटणारे लोक निरपराध पण असतात. त्यामुळेे आमच्याकडे आलेला अशील हा आमच्या साठी देवसामानाच असती. पण ती गोष्ट वेगळी आहे की कधीकधी काही गोष्टी करायला नकोत. ती "केस" खूप महत्त्वाची होती कारण त्या केस मध्ये एक मोठ्या हस्तीचा हात होता. त्यामुळे मला त्यात पैसे, प्रसिद्धी, पॉवर भरपूर मिळणार होते म्हणून मी ती केस स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता.
ती केस अशी होती की त्या केस मध्ये एका निरपराध माणसाला एका खुनाच्या केस मध्ये गोवले होते. खालच्या कोर्टात त्याच्या वकिलाने त्याला सोडवले होते परंतु आता केस वरच्या कोर्टात वर्ग झाली होती. त्या केस मध्ये असे काही इशु होते की जर ते बाहेर आले असते तर पूर्ण राजकीय वर्तुळ हलणार होते आणि समीकरणे बदलणार होती. त्याकाळी माझा खूपच दबदबा निर्माण झाल्याने त्या केस मध्ये त्या माणसाला दोषी ठरवण्यासाठी वकील म्हणून माझी नेमणूक करण्यात आली होती. त्या केस मध्ये सरकारी वकील म्हणून मी येणार हे निश्चित झाल्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली होती. तो माणूस निर्दोष आहे हे सर्वांना माहीत होते किंवा वाटत होते, परंतु आता ह्या केस ची सूत्रे माझ्याकडे आल्यामुळे त्याच्या वाचण्याची आशा संपली होती. मला केस चे भरपूर पैसे मिळाले होते त्यामुळे मी त्याच आनंदात होते. मला चांगल्या वाईटच विसर पडला होता परंतु त्याचबरोबर माझे कर्तव्य पण मला पार पाडायचे होते त्यामूळे माझा नाईलाज झाला असेल कदाचित.
ती केस चालू झाली त्यावेळी काही लोकांनी मला ती केस सोडून देण्याची खूप विनंती केली. त्या माणसाच्या नातेवाईकांनीही माझ्या ऑफिस चे उंबरठे झिजवले परंतु मला दया आली नाही आणि त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला, मी केस जिंकले होते आणि त्या माणसाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला अजून वरच्या कोर्टापर्यंत जाण्याची मुभा होती परंतु गरिबीमुळे म्हणा की अजून काही त्याने पुढे काहीही न करता मिळालेली शिक्षा भोगण्याचा निर्णय घेतला होता. मिळालेल्या यशामुळे माझं सगळीकडे खूप कौतुक होत होत परंतु मला काहीतरी विचित्र वाटत होतं. मला हवातसा आनंद होत नव्हता. मी कोर्टरूम मधून बाहेर पडले त्याचवेळी पोलीस त्याला कस्टडी मध्ये घेऊन जात असताना त्याची आणि माझी नजरानजर झाली. त्याची नजर एकदम थंड वाटत होती तरीही त्या नजरेत एक जळजळीत कटाक्ष होता. ती नजर बघून क्षणभर मी भांबावून गेले होते आणि मला काहीच भान न राहून कितीतरी वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले. कितीतरी वेळाने कोणीतरी मला भानावर आणले त्यावेळी मला क्षणभर आठवले की तो माणूस जाताजाता काहीतरी पुटपुटत गेला. मला पुसटसे आठवत होते की तो म्हणत होता कीं आता तुझा फॉर्म संपला.
त्यादिवशी मी सर्व काम संपवून घरी निघाले होते. मी माझ्या घरापासून १०० मीटर अंतरावर असताना अचानक मला काय झाले काहीच कळले नाही पण मला घराचा रस्ताच सापडत नव्हता. असा किती वेळ गेला असेल कोण जाणे पण माझं नशीब चांगले म्हणून मला तिकडेच राहणाऱ्या एका म्हाताऱ्या माणसाने माझ्या घरी आणून सोडले आणि म्हणाला की जवळपास २ तास झाले मी पाहतोय की तुम्ही इकडेच फिरत आहात.. मला संशय आला की काहीतरी ठीक दिसत नाही म्हणून मी तुम्हाला इकडे आणून सोडले...तुमची तब्बेत तर ठीक आहे ना? त्याच्या बोलण्याने मी भानावर आले. मला काहीच आठवत नव्हते की गेले दोन तास मी काय करत होते. त्यादिवशी मला बरं वाटत नव्हते म्हणून मी सर्व अँपॉइंटमेंट्स रद्द करून ऑफिस ला गेलेच नाही.
तो दिवस खूपच वाईट होता. माझं डोकं खुपच दुःखत होतं आणि काही केल्या थांबतच नव्हतं. शेवटी दुपारी मी न जेवताच झोपले परंतु मला झोप येत नव्हती. ग्लानी अली होती आणि काहीतरी विचित्र स्वप्न पडत होती. संध्याकाळी मी उठले आणि जेवणाची ऑर्डर दिली. रात्री मला साधारणतः बारा वाजता अचानक जाग आली त्यावेळी असे वाटले की आपल्या घरात कोणीतरी वावरत आहे. माझा ह्या सर्व गोष्टींवर विश्वास नसल्याने मि पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि परत झोपी गेले. मी खाली जमिनिवरच झोपत असे. ते घर माझ्या वडिलांचे होते. छोटे असले तरी मला तेच खूप आवडायचे आणि एक माणसासाठी मोठ्या घराची आवश्यकता नव्हती. मी माझ्या आईच्या लाकडी कपाटाच्या खाली बिछाना अंथरून झोपत असे. ते शिसवाच्या लाकडा पासून बनले होते आणि इतके जड होते की तीन माणसांशीवाय हलतही नसे उचलायला दहा लोक पण पुरी पडली नसती, आणि भूकंप झाला असता तरी ते पडले नसते. म्हणूनच मला त्या कपाटाचा खूप आधार होता. त्या रात्री मला परत कशीबशी झोप लागली. रात्री २ वाजता परत मला काशल्याश्या आवाजाने जाग आली असता डिम लाईट मध्ये मला जे दिसले ते पाहून माझे डोळे उघडेच राहीले.
ते माझ्या आईचे कपाट चक्क हलत होते आणि त्यातील वस्तूंचा आवाज येत होता. क्षणभर मला असे वाटले की भूकंप होतोय की काय म्हणून मी क्षणाचाही विलंब न करता पटकन अंथरुणातून उठले आणि त्या कापाटापासून दूर झाले असता ते कपाट धाडकन जमिनीवर आदळले आणि त्याच्या ठिकार्या उडाल्या. माझ्या छातीत धस्स झाले की आज जर मी उठले नासते तर त्या कापटाखाली चिरडून माझा मृत्य झाला असता. त्यानंतर मी खिडकीतून खाली डोकावून पाहिले परंतु सगळीकडे निरव शांतता पसरली होती आणि सगळी माणसे शांत झोपली होती. त्या घटने नंतर मला अजीबतच झोप लागली नाही. पूर्ण रात्र मी विचार करत करत जागूनच काढली की आज जर मी उठून बसले नसते तर काय झाले असते.
दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कोर्टात गेले परंतु एक ही क्लाइंट फिरकला नाही. पूर्ण दिवस मी रिकामीच घालवला. असे आता रोजच होऊ लागले. हळू हळू माझी वकिली चालेनाशी झाली. असाच एक महिना झाला तरीही नवीन काम न मिळाल्याने शेवटी विश्वास नसतानाही एकाच्या सांगण्यावरून मी एल्फिस्टन रोड च्या इथे एक दर्ग्यात गेले. तिथे एका फकिराने मला सांगितले की तुमच्यावर जबरदस्त करणी केली आहे. खरेतर तुमच्या जीवावर भेतले असते पण व्यवसायावर निभावले. आता परत पूर्ववत कधीच होणार नाही. जाता जाता तो मला म्हणाला की "आता तुझा फॉर्म संपला". धन्यवाद...
अँड. अंकुश सु. नवघरे.

