कथा : गायब भाग २
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अहो काय झालं एवढे का घाबरले आहात तुम्ही... मिसेस नेने जवळ येऊन बोलल्या... थरथरत्या आवाजात मिस्टर नेने सांगू लागले, "मी ऑफिस मध्ये थोडं भांडण करून बाहेर पडलो मग एका ठिकाणी जाऊन बसलो होतो माझ्या माझ्या विचारात तेव्हा एक भिकारी आला त्याला पण मी वाकडे तिकडे बोललो...???"
मिसेस नेने : मग काय झालं त्यात एवढे तुम्ही कधी कोणाशी नीट बोलता...??
मिस्टर नेने : अग पण त्या वेळी माझी सावली गायब झाली होती ती कुठेच दिसेना गेली होती...इतरांची मात्र दिसत होती मी खूप घाबरलो होतो म्हणून घर गाठले मी लगेच....
हे ऐकत असताना मिसेस नेने पण घाबरल्या त्यांनी लगेच मिठाने मिस्टर नेने ची दृष्ट काढली आणी ते मीठ घराबाहेर नेऊन टाकले, कसलातरी आवाज आला त्यामुळे मिसेस नेने थांबल्या आणि हिकडं तिकडं बघू लागल्या, कपाळावर किंचितसा घाम आला ते त्यांनी पदराने पुसत असताना त्यांना अचानक एक सावली सररकन गेल्याची जाणीव झाली, त्या खूप घाबरल्या आणि पळत घरात गेल्या...
मिस्टर नेने : आता तुला काय धाड भरली का घाबरली तू???
मिसेस नेने : अहो तुम्ही उठा पाहू आताच्या आता...
मिसेस नेने यांना पाहायचा होते की नेने यांची सावली दिसते की नाही ते पण नेने यांची सावली दिसली त्यामुळे त्या आता थोड्या सावरल्या काही तरी भासच झाला असणार मनोमनी म्हणाल्या आणि वाढदिवसाच्या तयारीला लागल्या... मिस्टर नेने मात्र अजून व त्याच विचारात होते आता तर ते एवढे घाबरले होते की स्वतःच्या सावली कडे पण बघू वाटत नव्हते त्यांना....वाढदिवसाची तयारी झाली सर्व पाहुणे आले घर लोकांनी भरून गेले... घरात पूर्ण गोंधळ चालू होता, मिस्टर नेने आणि मिसेस नेने एका जागी बसून ते सर्व पहात होते... केक आणला गेला केक वरील मोम्बत्ती लावली तशी घरातील सर्व लाईट्स बंद केल्या, आता फक्त केक दिसत होता...केक वरील मोम्बत्ती फुकली गेली wish मागीतली गेली टाळ्यांच्या कडकडाट मध्ये Happy Birthday चा आवाज घुमला... मिस्टर नेने हे सर्व पहात असताना त्यांना त्यांच्या जवळ कोणीतरी असल्याचा भास झाला ते घाबरले आणि जवळील मिसेस नेने चा हाथला जोरात दाबत त्यांनी ओरडले अरे लाईट लावा कोणीतरी लवकर.... म्हणताच लाईट्स on झाल्या सर्व जण मिस्टर नेने कडे बघत होते पण मिस्टर नेने त्यांच्या उजव्या बाजूस बघत होते....
मिसेस नेने : अहो काय झालं का ओरडलात
मिस्टर नेने : काही नाही काही नाही चालू द्या तुमचं... म्हणत मिस्टर नेने उठले आणि आपल्या रूम मध्ये जाऊन बसले....
मिसेस नेणेंना सर्व कळलं होते, पण सर्वांच्या समोर त्यांना कसे बोलायचं म्हणून त्या काही बोलल्या नाहीत... बडे पार्टी झाली तसे सर्व पाहुणे शेजारचे जाऊ लागले... आता मिसेस नेने मिस्टर नेने कडे गेल्या आणि रूम मध्ये जाताच जोरात चिरखल्या...... त्यांचा आवाज घरात सर्वत्र घुमला घरातील लोक धावत त्यांच्या कडे गेले... मिसेस नेने दाराचा आधार घेऊन खाली बसून रडत होत्या... कपाळावर मारत होत्या.. घरातील लोकांना तर काहीच कळेना झाले, मग सुनेने विचारले...
सून : अहो आई काय झालं का रडत आहात तुम्ही???
मिसेस नेने : ते गेले.... ते गेले .... ते गेले..... ते गेले....
सून : कोण गेले कुठे गेले???
मिसेस नेने : तुझा सासरा गेला ग बाई म्हणत रडू लागल्या....
सुनेने रूम मध्ये पाहिले , बाबा बाबा म्हणून हाक पण दिल्या पण बाबा नव्हते , ते कुठे तरी बाहेर गेले असतील असे समजूत ती मिसेस नेने ची काढू लागली...
मिसेस नेने : अग कुठे बाहेर जातील ते, त्यांची चप्पल तर येथेच आहे ते बघ, आणि ते असे अनवाणी कुठे जात नाही...
सून : अहो आई शांत व्हा ना का त्रास करून घेत आहात, बाबा येथे नाहीत म्हणजे ते नक्की बाहेर गेले आहेत..
मिसेस नेने : ते बाहेर नाहीत गेले त्यांना घेऊन गेली ती लांब ....
सून : कोण ती??????
मिसेस नेने : ती सावली... भली मोठी सावली....भयानक सावली....सावली ला कधी डोळे असतात का ??? असतात मी पाहिले आहे तिचे ते रक्तालेले डोळे, नक्की ती सावली ह्यांच्या मागावर आली होती.... जेव्हा मी ह्यांची मिठाने दृष्ट काढून ते मीठ बाहेर पाण्यात फेकले होते तेव्हा ते मीठ पाण्यात नीट बुडाले देखील नाही ना विरघळले देखील.... ऑफिस मधून आल्यापासून ती सावली माझी सावली तो भिकारी, ऑफिस मधील भांडण एवढंच बोलत होते......
सून : आई एक मिनिट थांबा.... शांत रहा सर्व जण बघा काहीतरी आवाज येत आहे विचित्र....
तो आवाज म्हणजे मांसाचे तुकडे पडत असताना येत असतो तसा येत होता आणि तो ही स्पष्ट..... बाकीच्यांना आपल्या रूम मध्ये जायला लावले... जीव मुठीत घेऊन सून आणि मिसेस नेने त्या आवाजाच्या दिशेने निघाल्या.... रात्रीचे 11 वाजून गेले होते... घराच्या पाठीमाघून तो आवाज येत होता.... त्या दोघी दबक्या पावलाने चालत होत्या... अंधार भरपूर होता नीट दिसत नव्हते... "कोण आहे तेथे, कोण आहे, काय करत आहात" असा एक प्रश्न त्या दोघीनी विचारला असता तो आवाज बंद झाला....सर्वत्र शांतता पसरली, दोघी एकमेकींच्या जवळ चिटकून हातात हात घेऊन उभ्या होत्या..... "कोण आहे सांगा ना"
आता मात्र त्यांना गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला कोणीतरी गुरकत आहे आपल्यावर....हे कळताच त्यांनी पावले माघे घेतली आणि घराकडे चालू लागल्या आता घराच्या पाठीमाघे येणारा आवाज आता त्यांच्या पुढ्यात येऊ लागला........ कोणीतरी गुरकण्याचा आवाज...
क्रमशः
(अभिप्राय नक्की कळवा)